Submitted by madevi on 21 April, 2015 - 05:51
आम्हाला २१ दिवसाची अमेरीका टुर करायची आहे.मला जाणकार लोकाकडुन माहिती ह्वी आहे.
१) २१ दिवस पुरतील का?
२) महत्वाची स्थळे (नेट वर माहिती मिळेल पण इथे अगदि खरी माहिती मिळ्ते)
३) सगळ्यात महत्वाचे टुर पॅकेज घ्यावे का स्वत; करावी.( इथेच गाड आडतय)
४) लहान मुले आहेत दोन.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
२१ दिवस पुरतील का? >>> एवढा
२१ दिवस पुरतील का? >>> एवढा मोठा देश पहायला आयुष्य पुरणार नाही. पण टूरवाल्यांसारखे बघायचे असेल (म्हणजे प्रसिध्द ठिकाणाना भोज्या ) तर बर्यापैकी बघून होईल.
२. कुठ्ल्या किनार्याला जायचा विचार आहे की दोन्ही?
३. लहान मुलं असतील तर टूर पॅकेज बरं.. एक एकटं फिरायला (माहिती नसताना) जड जाईल..
दोन्ही कडे जायचे
दोन्ही कडे जायचे आहे.
टुरवाल्यासारखेच जायचे आहे
टुर पॅकेजवाले फार पळवतात त्यामुळे एकटे हा पर्याय.पण थोडे टेन्शन येते.
कोणि अशी ट्रीप केली आहे का
customized tour पाहिजे असेल
customized tour पाहिजे असेल तर स्वताच करावी. आम्ही शकयतो स्वताच टुर करतो ज्यामुळे स्वतचा प्रोग्रम बनऊ शकतो .
अमेरिकेत टुर करायची असल्यास गाडी येणे आवश्यक आहे. ( बाकीच्या कुठल्याही देशात २१ दिवस बिना गाडी चालवता स्वता फिरु शकता पण अमेरिकेत ते शक्य वाटत नाही आहे). दोघाना गाडी येत असल्यास उत्तम,
लहान मुलाचा खाण्याचा सवयी आणि वेळा adjustable आहेत का? तसे असेल तर काही प्रोब्लेम येणार नाही.
मी सध्या एका अशाच कुटुंबासाठी
मी सध्या एका अशाच कुटुंबासाठी टूर तयार करतो आहे. न्यू यॉर्क,डीसी, नायगारा, १००० बेटे, लास वेगास, ग्रँड कॅनियन, लॉस एंजलिस, सान फ्रांसिस्को , नापा व्हॅली असा कार्यक्रम आहे.
न्यू यॉर्क = घरून निघून आगगाडीने
डी सी = गाडी ने
नायगारा, १००० बेटे = Tours For Fun च्या बसने
मग लास वेगास,लॉस एंजलिस, सान फ्रांसिस्को विमानाने. आणि मग त्या त्या ठिकाणी बसने पाठवायचा विचार आहे. याला सगळे मिळून १३/१४ दिवस लागतील.
यास अटलँटा , प्लोरिडा येणार नाहीत.
हे लोक इथे गाडी चालवू शकणार नाहीत. त्यांच्याबरोबर लहान मुलं नाहीत. ४०/४५ चे नवरा बायको, व १६ वर्षांचा मुलगा आहे.
नवर्याचा व्हिसा (२ महिने आधी कागद पाठवूनही ) अजून अडकलेला आहे. आणि बायको आणि मुलगा या शनिवारची तिकिटे काढून बसलेत..
मादेवी - जर तुम्ही अमेरिकेत
मादेवी - जर तुम्ही अमेरिकेत अगोदर भेट दिली असेल तर आता स्वतः एकटे जावा, नाहीतर टूरनेच जा.
आता प्रत्येक टूर कंपनी customized tour - दोन/ तीन टूर जॉइन करुन देते. नेटवर रिसर्च करा आणि चांगली टूर कंपनी शोधा.
लहान मुले असेल तर जून-ऑगस्ट (कडक उन्हाळा) टाळा आणि २१ दिवस खूप आहेत पण मध्ये मध्ये १ ते २ दिवसाचा ब्रेक (हॉटेलमध्ये) घ्या. जास्त दिवस आहे म्हणून सगळं धावत पळत बघू नका. दोन टूर
च्या मध्ये चांगल्या Destinationला ब्रेक घ्या.
customize tour option चा
customize tour option चा विचार चालु आहे.
east cost आणि west cost दोन्हिकडे जवळचे नातेवाईक आहेत त्यामुळे तिथे प्रत्येकी २ ते ३ दिवस राहता येईल.
डिस्नेला ४ ते ५ दिवस द्यायचा विचार आहे.
१६ दिवस हतात आहेत.
गोगा तुम्ही टुर प्लानर आहात
गोगा तुम्ही टुर प्लानर आहात का? तसे असेल तर विपु कराल का?
नाही हो.. घरी आलेल्या
नाही हो.. घरी आलेल्या नातेवाईकांसाठी.. मला जरा आवड देखील आहे त्यामुळे..
काल त्यांची पूर्ण ट्रीप प्लॅन केली.
म्हणजे न्यू-जर्सी ते लास-वेगास, ते लॉस एंजलिस, ते सान फ्रांसिस्को ते न्यू-जर्सी...
. लास वेगास मधे हॉटेल, ग्रँड कॅनियन, एक शो इत्यादी.
. लॉस एंजलिस मधे हॉटेल, युनिवर्सल, हॉलीवूड इत्यादी.
. सान फ्रांसिस्को सिटी टूर, नापा व्हॅली इत्यादी करून परत..
१० दिवस तीन माणसे..
विनय, मला पण अशी ट्रिप बुक
विनय,
मला पण अशी ट्रिप बुक करायची आहे. इंड्यातुन येणार्या ३ जणांसाठी. जुलै मधे.
डिटेल्स देशील का प्लिज?.
अरे वा, देसाई खरंच टूर ऑपरेटर
अरे वा, देसाई खरंच टूर ऑपरेटर बनले की
भाई .. हे घ्या... tours for
भाई .. हे घ्या...
tours for fun वरून नायगारा , आणि १००० आयलंड्ससाठी प्रवास आरक्षण केलं. मागे एक मित्र गेला होता चिन्यांच्या या बसगाडीतून... त्याला आवडली होती. (३ जणांचे २२५$)
मग हवाई-तिकीटांसाठी एकीकडे www.kayak.com आणि एकीकडे www.united.com चालू करून Multi-city वापरून, तारखा टाकून किमती काढल्या ( EWR/PHL हे पैकी कोणताही चालला असता). दोन्हीकडे किमती सर्वसाधारणपणे सारख्या होत्या, पंण United वर असलेल्या उड्डाण-वेळा जास्त सोईस्कर वाटल्या.
लगेच Hotels.com ला जाऊन त्या त्या दिवसांची रहाण्याची सोय करून टाकली. हॉटेल साठी इतर बर्याच site आहेत. मला वेगासला ($१०० प्रति दिवस) लॉस एंजलिसला (१५०$ प्रति दिवस) आणि सान फ्रान ला ($१९० प्रति दिवस) या भावाने चांगली Hotels मिळाली.
मग CanyonTours.com वरून लास-वेगास, ते Grand Canyon West Rim बस-बोट-हेलिकॉप्टर अशी व्यवस्था आरक्षीत केली ($२९५ माणशी),. ते हॉटेलहून घेऊन जातात आणि परत आणून सोडतात.
सर्कस-नाट्य आरक्षित केलं ($१२० माणशी).
LA ला Universal Studio चं तिकीट काढलं. Hollywood Tour इत्यादी तिथेच विकत घेता येइल. किंवा इथून काढता येईल.
SFO ला नापा व्हॅली टूर बूक केली. बाकी हॉटेल शहरात असल्याने चालत-फिरत बघता येईल
बहतेक ठिकाणी विमानतळासाठी बस आहे.
सोबत Android phone आणि Uber App देत आहे.. लागेल तिथे Uber वापरता येईल असा सगळा प्रकार आहे.
DC, Longwood Gardens, NY city (with Broadway Show) मी स्वतःच घेऊन जात आहे..
वेस्ट कोस्ट (योग्य की चुकीचा
वेस्ट कोस्ट (योग्य की चुकीचा किनारा ते लिहीत नाही. उगाच विखार नको :P) साठी लासन टूर्स ची साईट चेक करा. आमच्याकडे आलेल्या लोकांनी वापरलेली आहे आणि जनरली चांगला अनुभव आहे.
http://www.lassentours.com/
बहुसंख्य "चायनीज" लोक असतात पण भारतीय सुद्धा असतात थोडे, आणि व्हेज पर्याय मिळतात असे ऐकून आहे.
लासन टूर्सचा अनुभव चांगला
लासन टूर्सचा अनुभव चांगला आहे. बरेच भारतीय लोक असतात.
tours for fun किंवा goto bus
tours for fun किंवा goto bus सारख्या चिन्यांच्या बसगाड्या चांगल्या आहेत. फक्त जेवणाचा त्रास होतो. नेहमी चायनिज रेस्ट. ला थांबा घेतात हे लोक.
हॉटेल्स बुक करण्यासाठी priceline ची name your own price सेवा वापरून पहा. (SFO ला डाउनटाउन मधिल Hyatt मधे १००$/डे ला मिळाले)
माझ्या आई वडिलांनी टेक टुर्स
माझ्या आई वडिलांनी टेक टुर्स या साइटवरून येलोस्टोन-क्रेझी हॉर्स - आर्चेस नॅशनल पार्क - रशमोर ट्रिप केली (ट्रिप सुरुवात शेवट डेन्वर ). त्यांचाही अनुभव चांगला होता. बसमध्ये ९०% लोक चिनी होते.
गोगा छान माहिती दिलीत.
गोगा छान माहिती दिलीत. आमच्यासारख्या प्रथमच अमेरिका टुरला येणार्या लोकाना उपयोगी पडेल.
आम्ही आणखी काही स्पॉट अॅड केले आहेत ते वर्थ आहेत का ते सागा आणि काय बघायला पाहिजे तेही सजेस्ट़ करा प्लीज.
इस्ट कोस्ट
बोस्टन - टी पार्टी शीप & म्युझीयम्,हाय स्पीड बोट,
फिलाडेल्फीया - लीबर्टी बेल
ग्लास मुझीयम
वेस्ट कोस्ट
योसेमाइट
सॅन डीगो झू
हॉवर डॅम
लेक थॉ
मॅड्म तुसाज वॅक्स म्युझीय्म
व्ही शो
आणि यलोस्टोन (ऑप्श्नल)
Yellowstone - मस्त आवडीचा
Yellowstone - मस्त आवडीचा स्पॉट. १ ऑक्टोबर पासून बंद असतो. उन्हाळ्यात जा.
मॅड्म तुसाज वॅक्स म्युझीय्म - हल्ली बर्याच ठिकाणी असते. एक बघितलेत कुठेही की झाले.
हूवर डॅम - लास वेगास पासून जवळ आहे. बहुतेक Grand Canyon Bus Tour वाले दाखवतातच.
Yosemite - सान फ्रान. पासून जाता येते. इतके great वाटले नाही. पण एकदा जायला हरकत नाही.
Liberty Bell - ऐतिहासिक म्हणून प्रसिध्द
Boston - एकदा/दोनदा पहायला हरकत नाही. शहर आहे, पण चांगली कॉलेज/ विद्यापीठे आहेत.
Ruby Falls Atlanta = सुंदर जागा आहे. एकदा बघावीच.
Lurey Caverns = निसर्गाचा चमत्कार .
Museums in Washington DC - फार मस्त आहेत. आवड असेल तर २/३ दिवसही घालवू शकाल.
Atlanta, Nashville, Smokey mountains ट्रीप करण्यासारखी आहे.
Red wood forest - सान फ्रानला गेलात तर जरूर जाऊन या (Muir Woods)
बाकी मंडळी सांगतीलच. मी आज New York , Broadway बघायला आणि या वीकांताला Washington DC करणार आहे.
Glass Museum - कुठले ते कळले
Glass Museum - कुठले ते कळले नाही.
San Diago Zoo - प्रसिध्द आहे पण मी गेलेलो नाही. New York Zoo खूप वर्षांपूर्वी पाहिले होते. मस्त आहे.
Lake Tahoe - फार सुंदर आहे म्हणतात, जायचा विचार आहे.
Aquarium - अटलँटा मधे .. फार मस्त आहे.
Florida ला गेलात तर Disney, Universal बरोबर Sea world, NASA बघा..
विपूमधे भारतीय खाण्यापिण्याबद्दल विचारले होते त्याबद्दलः भारतीय खाणे खूप ठिकाणी मिळते. पण ते मिळेलच अशी खात्री बाळगू नका. चिन्यांच्या टूर वर गेलात तर ते चिनी हॉटेलसमोर थांबतात. ग्रँड कॅनियन, नापा इत्यादी ठिकाणी भारतीय खाणे मिळणार नाही. अमेरिकेत इतालियन, चायनिज, मेक्सिकन, आणि सबवे, पिझ्झा आणि फास्टफूड मधे भरपूर, चांगले , चविष्ट, स्वस्त खाणे मिळते. ( शाकाहारी असलात तरी). भारतीय खाणेच हवे असे असेल तर ते शोधता शोधता ट्रीपची मजा निघून जाईल. त्यापेक्षा इतर प्रकारच्या जेवणाची थोडी सवय असूद्या आणि समोर येईल त्यातले तुमच्या आवडीचे काहीतरी निवडून खा.. भारतीय खाणे घरी गेल्यावर परत मिळेलच त्यासाठी ट्रीपचा वेळ वाया घालवून मजा घालवू नका, असा माझा (फुकटचा आणि आगावूपणे दिलेला) सल्ला आहे. पूर्वी आलेल्या काही अनुभवांवरून शिकून 'भारतीयच खाणे हवे' अश्या मित्राना, नातेवाईकाना आम्ही ट्रीप मधे बरोबर नेत नाही.. कळावे.. आपला....
ग्लास म्युझियम बहुतेक तरी
ग्लास म्युझियम बहुतेक तरी नायगर्याच्या जवळ आहे कुठे तरी.
म्हणजे ते Corning ? तेच असेल
म्हणजे ते Corning ? तेच असेल .. ते एकदा नक्की बघण्यासारखे आहे. म्यूसियम आवडत असेल तर..
Knoxville ला जाणार आहे ते
Knoxville ला जाणार आहे ते Smokey mountains पासुन २० मैलावर आहे.
गाडी नाही आणि अर्धा दिवस free आहे. एक प्रायवेट बस कुठल्याही एका ठिकाणी सोडुन ४ तासानी परत आणायला तयार आहे. तर कुठे drop off/pick up करायला सांगावे . (Looking for best place to cover in available time)
हे
हे पहा.
http://www.taketours.com/new-york-ny/4-day-tennessee-bus-tour-from-new-y...
अतिशय सुंदर टेनसी टुर. खुप काही दाखवतात. आम्ही घेतली होती. आवडली.
>>Knoxville ला जाणार
>>Knoxville ला जाणार आहेत<<
नॉक्सविल पासुन चाटनुगा साधारण २ तासावर आहे (वन वे). वर उल्लेख केलेला रुबी फॉल चाटनुगाला आहे...
धन्यवाद अनिलभाई, तुम्ही
धन्यवाद अनिलभाई,
तुम्ही दिलेल्या प्लॅन वरुन day2 चा सकाळची दोन ठिकाण करायचे ठरवले आहे. ( Great Smoky Mountains Park & Ober Gatlinburg Aerial Tramway)
राज
रुबी फॉल ला नाही जाणार कारण ते १८० मैल आहे आणि आमच्याकडे तेवढा वेळ नाही. Smoky Mountains आवडले तर कदाचित परत जाईन. त्यावेळी रुबी फॉल ला पण जाईन.
बर्याच जणांनी माहिती दीली
बर्याच जणांनी माहिती दीली आहेच, त्यात ही आजून काही...
१. नायगराला जाताना - watkins glen state park बघा, तीन-चार तासात बघुन होईल....अतिशय सुंदर ठिकाण. १००० बेटांपेक्षा हा पर्याय मस्तय. गोटू बस वाले नायगरा बरोबर, १००० बेटं किंवा watkins glen हा पर्याय देतात.
हा watkins glen चा फोटो.
२. निसर्ग आणि पार्क्स बघायला आवडत असेल तर ग्रॅन्ड सर्कल टूर नक्की करा Zion, Bryce, Capitol Reef, Arches, Canyonlands and Grand Canyon national parks टूर्स मध्ये बरेच ऑप्श्न्स आहेत.
http://www.utah.com/itineraries/grand_circle.htm
(ही टूर स्वता केलीत तर अजून छान होईल.)
३. यलोस्टोन नॅशनल पार्क च्या अगदी जवळ टीटान नॅशनल पार्क आहे, यलो स्टोन ला जाणार असाल तर न चूकता बघण्यासारख पार्क.
शक्यतो समर वेकेशनचा सिझन टाळा, नाहितर सगळीकडे गर्दी आणि रांगा दिसतील.
वॉव तन्मय .. नेहेमीप्रमाणे
वॉव तन्मय .. नेहेमीप्रमाणे अमेझींग फोटोज् ..
व्हॉटकिन्स् ग्लेन स्टेट पार्क च्या माहितीबद्दल धन्यवाद ..
तन्मय जबरदस्त फोटो आहे !
तन्मय जबरदस्त फोटो आहे !
>>Smoky Mountains आवडले तर
>>Smoky Mountains आवडले तर कदाचित परत जाईन. त्यावेळी रुबी फॉल ला पण जाईन.<<
परत जमल्यास स्मोकिजला फॉलमध्ये या; बेस्ट सिजन...
तन्मय , तुझे फोटो पाहून ती
तन्मय , तुझे फोटो पाहून ती जागा सुंदर नसेल तरी सुंदर दिसायला लागेल
तो नायगाराजवळचा फॉल मस्त वाटतोय. आधी माहिती असतं तर नक्की गेले असते त्या ट्रीपमधे.
वा मस्त माहिती मी ही अशीच २०
वा मस्त माहिती
मी ही अशीच २० दिवसांची टुर २०१३ मधे केली. मी, नवरा आणि ११ वर्षांची मुलगी. बहिण बॉस्टन ला रहाते म्हणुन तिथुन सुरुवात केली. मग न्युयॉर्क, डी. सी. , नायग्रा, ऑर्लँडो, लास वेगस, लॉस अँजेलिस, सॅन फ्रन्सिस्को अशी टूर केली. माझी काही ऑब्झरव्हेशन्स.
१. ऐतिहासीक महत्वाचे शहर ह्या पेक्षा बॉस्टन मला लंडन च्या जवळचे वाटले व बहिणीने सगळ्या युनिव्हर्सीटीज अगदी खोलात दाखवल्या म्हणुन आवडले.
२. न्युयॉर्क मस्ट, डी.सी. मस्त... तिकडुन नायगरा ला जाताना हर्षे फॅक्टरी मधे गेलो. तिकडे जवळच ( साधारण हर्शे पासुन ७० मैला वर आमिष लोकांची वस्ती आहे. ह्याचा एक मित्र महित गार होता त्या मुळे ते खेडे पहाता आले.
३. नायगरा झकास... माझ्या मुलीने हेलिकॉप्टर राईड सॉलिड एन्जोय केली.
४. ऑर्लँडो ला हॉटेल - रीसॉर्ट जरा चौकशी करुनच घ्या. कारण खुप छान छान फोटो टाकुन भिक्कार व्यवस्था असते, हां ब्रेकफास्ट मात्र मस्त. तिकडे अॅपकॉट सेंटर, डिस्ने असे खूप ऑप्शन्स आहेत. नासा ला जाताना एखाद्या उपग्रहाचे लाँच वगैरे आहे का ती माहिती घेवुन जा. आम्ही गेलो त्याच्या दोन दिवस आधी एक लाँच झाला होता. आधी माहित असतं तर डिस्ने आणि नासा चे दिवस शफल केले असते. बाकी तिकडे उन आणि उकाडा आपल्या सारखा
५. लास वेगास मुलांना जाम बोर होते. आपण जर स्लॉट मशीन खेळणार असु तर मुले बोअर होतात. कारण त्यांना त्या एरियात अलाउड नसते. आर्थात हॉटेल म्हणजे एक छोटे गावच असते. मुलां साठी पण खूप आकर्षणं आहेत. पण मुलं जर खुप लहान असतिल तर ती बोअर होतील. ग्रँड कॅनियन विमान राईड आपल्याला मस्त. पण येवढ्या पहाटे मुले वैतागतात.
६. बाकी लॉस अँजेलिस ला गेलात तर युनीव्हर्सल स्टुडियोला नक्की जा. मुलं खुश आपण पण खुश. एस्पेशीयली किंग काँग राईड.
७. सॅन फ्रान्सिस्को पण मस्त आहे.
अमेरिकेत अंतरं जास्त असल्याने अंतर्गत विमान प्रवास करण्या व्यतिरिक्त पर्याय नाही. चालणे ही भरपूर आहे. पार्किंग चे नियम लय भारी असल्याने मोठे मोठे वळसे पडु शकतात. इडियन फूड पेक्षा इतर खा. देशातिल विमान प्रवासात पाणीही देत नाहीत. मुले बरोबर आहेत त्या मुळे ती व्यवस्था करुनच निघा. बॅगांच्या वजना बद्दल फार काटेकोर आहेत. एयर लाईन्स पर बॅग वजन चेक करतात. म्हणजे जर २० किलो प्रत्येकी असेल तर एकत्रित ३ माणसाना ६० किलो असे आपण समजुन चालणार नाही. म्हणजे ३ बॅगा आहेत तर एखादी २५ किलो, दुसरी १०, तिसरी २५ असे चालत नाही.
हे माझे अनुभव.
बाकी वरचे सल्ले उपयुक्त आहेतच
Pages