.
सानिया मिर्झाने जागतिक क्रमवारीत महिला दुहेरीमध्ये अव्वल क्रमांक पटकावला !
गेल्या आठवड्यातील वर्तमानपत्रावर नजर पडली, आणि ही बातमी वाचली!
एकाच वेळी आनंद आणि अभिमान दोन्ही दाटून आले..
पण दुसर्याच क्षणी स्वत:शी थोडी शरमही वाटली, जे ही बातमी आपल्याला ईतक्या उशीरा समजावी.
त्याच बरोबर वाईटही वाटले की ज्या व्हॉटसपवर नको नको त्या गल्लीन्यूज फिरत असतात, तिथेही कोणाला हे शेअर करावेसे वाटले नाही.
जिथे एकीकडे साईना नेहवालच्या कामगिरीबद्दल कौतुकाच्या पोस्ट फिरत असतात, जे ती डिजर्व्हही करतेच, पण तिथेच गेल्या काही काळात सानियाबद्दल अभिमानाने कोणी काही फिरवले आहे, असे क्वचितच आढळते.
किंबहुना ती भारतीय तिरंग्याच्या दिशेने पाय ठेऊन बसली आहे असे फेक फोटोच तिची बदनामी करताना मध्यंतरी पाहण्यात आले होते.
बहुधा यामागे कारण तिचे पाकिस्तानी क्रिकेटपटूशी लग्न करणे असावे. कदाचित यातही मुलगी भारतीय आणि मुलगा पाकिस्तानी हे जास्त भावना दुखावणारे असावे,. पण तिने त्यानंतरही भारतासाठीच आपले टेनिस खेळणे चालू ठेवले हे कोणालाही विचारात घ्यावेसे वाटले नाही वा त्याची किंमत मग आपल्या लेखी शून्य झाली.
असो,
सानिया मिर्झा!
एकेकाळची माझी प्रचंड आवडती टेनिसतारका !
याचा अर्थ असा होत नाही की आज आवडती नाही.. पण प्रचंड आवडती म्हणजे एकेकाळी वहीच्या मागच्या पानावर जिचा फोटो मी चिकटवला होता अशी एकमेव क्रिडापटू. अन्यथा हा मान मी चित्रपटसृष्टीतील कोण्या हिरोईनलाही अपवादानेच दिला होता. पण यामागे निव्वळ सानियाचे ग्लॅमरस दिसणे एवढेच नव्हते, तर तिचा स्पोर्टी लूक वेड लावायचा. आसपासच्या मुलींमध्ये तो अभावानेच आढळायचा. तिच्या एकेक स्टाईल स्टेटमेंटचे आम्हा मुलांनीही कॉपी करून झाले होते. मग ते तिच्यासारखे कानातले घालणे असो वा चष्म्याची फ्रेम असो. खेळाच्या जोडीनेच आपला असा एक वेगळा ठसा उमटवणारी महिला क्रिडापटू म्हणून तिची ही अचिव्हमेंट नाकारता येत नाही.
पण काही झाले तरी एखाद्या खेळाडूला खरी ओळख त्याचा / तिचा खेळच मिळवून देतो, आणि याची जाणीव ठेवत त्या खेळाशी ती नेहमीच प्रामाणिक राहीली. तिच्या बॅडपॅच मध्येही, जेव्हा सारे सानिया मिर्झा आता संपली, किंवा एका मर्यादेपलीकडे ती आपला खेळ उंचावू शकत नाही, ती भारताची अॅना कुर्निकोवा बनूनच राहणार, अशी तिची प्रतिमा तयार होत होती, तेव्हाही.. आणि तिच्या लग्नानंतर आता सानिया मिर्झा भारतीय टेनिसचा केवळ भूतकाळ बनून राहणार अश्या कंड्या पिकू लागल्या तेव्हाही.. तिने आपला लढाऊ बाणा सोडला नाही, ना आपली बंडखोर वृत्ती सोडली, येस्स बंडखोर वृत्ती ज्यासाठीच मी तिला ओळखायचो, आणि ज्यासाठीच ती मला आवडायची (आठवा तिच्या स्कर्टच्या लांबीवरून उठलेला वाद) ... आणि अखेर आपल्या खेळातील प्रतिस्पर्ध्यांशीच नाही तर समाजाशी देखील लढत देत तिने आज हे शिखर गाठले. हॅटस ऑफ सानिया!
पुढे मागे नक्कीच मेरी कोम वा मिल्खासिंग सारखा सानिया मिर्झाच्या जीवनावर देखील चित्रपट बनवला जाईल. (बहुधा आजच्या घडीच्या नायिकांमध्ये "आलिया भट्ट" ही तिची भुमिका सर्वांगाने पेलण्यास सक्षम राहावी.) पण त्या चित्रपटात तिच्या वैयक्तिक आयुष्याला फाटा देत एक सर्वोत्कृष्ट भारतीय महिला टेनिसपटू म्हणूनच तिचे दर्शन घडावे अशीच ईच्छा. कारण आजही तिचे भारतीय टेनिसमधील योगदान सर्वार्थाने जनमाणसात पोहोचले नाही असे मला वाटते. अगदी आमच्यासारख्या चाहत्यांपर्यंतही नाही.. अन्यथा सचिनच्या टेनिस एल्बोबद्दल खडानखडा माहिती असणार्या किती जणांना हे ठाऊक असेल की सानियाला देखील कसलासा सांधेदुखीचा आजार आहे. जो तिच्या कारकिर्दीच्या मुळावरच उठू शकतो. ज्याच्याशी झुंजत तिने हा चमत्कार घडवला आहे.
एक काळ होता जेव्हा भारतीय टेनिस लिएंडर पेस आणि महेश भूपती या नावांपासून सुरू व्हायचे तरी टेनिस बघायचो मात्र आम्ही सानिया मिर्झासाठीच. अन्यथा बुद्धीबळात जसे विश्वनाथ आनंद हे नाव सर्वांनाच ठाऊक असते पण तो खेळ बघत कोणी नाही, की फॉलो करत नाही, तसेच भारतीय टेनिसचे आमच्यालेखी झाले असते.
काही का असेना, क्रिकेटच्या ओवरडोसने वैतागलेले, अन टेनिसला काही काळ विसरलेले माझ्यासारखे कित्येक गटांगळू या आनंदाच्या बातमीनंतर पुन्हा या खेळात रस घेऊ लागतील अशी आशा करायला हरकत नाही.
थ्री चीअर्स फॉर सानिया !!
हिप हिप ...
ऋन्मेऽऽष
~ All posts on this thread
~ All posts on this thread edited due to them not being conformant to popular opinion ~
~ या धाग्यावरील सर्व पोष्टी लोकप्रिय मताशी फटकून असल्याने संपादित ~
इथून पळून जाऊन तुमच्या
इथून पळून जाऊन तुमच्या अड्ड्यावर पचकण्यापेक्षा मनातली मळमळ इथेच बाहेर काढा...तब्येतीला आराम पडेल...
खूप साठले तर मग विकारवांत्या होतात अशानी.
~ All posts on this thread
~ All posts on this thread edited due to them not being conformant to popular opinion ~
~ या धाग्यावरील सर्व पोष्टी लोकप्रिय मताशी फटकून असल्याने संपादित ~
ती महान, सर्वोत्कृष्ट आहेच.
ती महान, सर्वोत्कृष्ट आहेच. प्रत्येक खेळाडूच त्याच्या परिने असतो. त्याला डोक्यावर घेऊन नाचलेच पाहिजे असे नाही पण किमान त्यांनी जे कष्ट घेतले आहेत किमान त्याचा आदर करायला हवा
>>
+१
त्याचं काय आहे
त्याचं काय आहे जोशीकाका..तुम्ही राजकिय धाग्यावर ना ना रुपांनी काय धिंगाणा घालता, किंवा तुमच्या अड्ड्यावर कायबाय बरळत असता त्याबद्दल कधी मी काही बोलल्याचे आठवत नाही मला. पण तुम्ही खेळाच्या धाग्यावर येऊन असली काहीतरी पुचकावणी पोस्ट टाकलीत तर मी तुम्हाला सोडणार नाही.
आणि दुर्दैव असे की कुठल्याही रुपात आलात तरी तुमची घाणेरडी वृत्ती तुमचा मूळ आयडी दाखवून देतेच. सो, किमान इथे तरी सेन्सिबल बोलावेत अशी अपेक्षा आहे. तूर्तास इतकेच सांगणे...
बाकी (नको इतके) सूज्ञ आहात
>>>> काही का असेना,
>>>> काही का असेना, क्रिकेटच्या ओवरडोसने वैतागलेले, अन टेनिसला काही काळ विसरलेले माझ्यासारखे कित्येक गटांगळू या आनंदाच्या बातमीनंतर पुन्हा या खेळात रस घेऊ लागतील अशी आशा करायला हरकत नाही. <<<<<
याबाबत मी साशंक आहे.
क्रिकेटचा जरी ओव्हरडोस झाला तरी आहे त्या उपलब्ध साहित्यानिशी (फळकुट/रबरी प्लॅस्टिकचा चेंडू भिंत वगैरे) आहे तेव्हड्या जागेत अन असतील तितक्या खेळाडूंमधे क्रिकेट अत्यंत स्वस्तात सामान्यांना खेळता येते, अन त्यामुळेच ते अतिशय लोकप्रिय आहे.
तशा प्रकारे अन्य कोणताच मैदानी खेळ (रनिंग सोडून) अगदी फुटबॉलही नाही, कमीत कमी खर्चात अन कमीत कमी वा उपलब्ध असलेल्या कोणत्याही आकाराच्या जागेत खेळता येत नाही, टेनिस/बॅडमिंटन तर नाहीच नाही. सबब, बाकी खेळांत, इथे टेनिसमधे कुणी रस घेऊ लागले तर ते नेमके काय करणार हे गुह्यच रहाते.
त्यामुळे मला असली आशा वाटत नाही.
मात्र एक आहे, सानिया अन सायना, तसेच पीटी उषा या सारख्या खेळाडूंमुळे हे खेळही खेळले जातात इतके तरी जनसामान्यांना कळते, व कदाचित त्यांच्यातुनच, तुरळकरित्या का होईना, पण पुढे त्या त्या खेळाकडे खेळाडू वळतात हे नक्की.
आमच्या वेळेस प्रकाश पदुकोण आमचा आयकॉन होता. अर्थातच तेव्हा मी देखिल भरपूर महामूर बॅडमिंटन खेळलो आहे. (पण तो खर्चिकच प्रकार, जनसामान्यांना न परवडणारा, आम्हालाही परवडायचा नाही. १९८० च्या आधी रोज साडेचार ते साडेसहा रुपयांचे एकेक शटल हा खर्च न परवडणाराच होता, आम्ही करायचो, पण मग पैसे कमवायलाही वाट्टेल ते कष्ट करावे लागायचे. घरुन इतका पैका मिळणे अशक्य होते.). असो.
सानिया उत्तम सिंगल्स खेळाडु
सानिया उत्तम सिंगल्स खेळाडु होती. तीचा फ़ोरहॅंड इतर कोणत्याही टॉप १० खेळाडुं इतका जोरकस होता. मनगटाच्या दुखापती नंतर त्यातला जोर कमी झाला. सिंगल्स खेळाडु म्हणुन ती २००७ मधे जागतिक क्रमवारीत २७ व्या स्थानावर होती हे काही कमी नक्कीच नाही.
मनगटाची दुखापत आणि सिगल्स खेळाडु या मानाने तीची वीक सर्विस यामुळे तीचं सिंगल्स मधल यश मर्यादित राहील. त्याची पूर्ण भरपाइ तीने डबल्स मधे क्रमवारीत १ ल्या स्थानावर येवुन केलेली आहे.
क्रिकेटचा जरी ओव्हरडोस झाला
क्रिकेटचा जरी ओव्हरडोस झाला तरी आहे त्या उपलब्ध साहित्यानिशी (फळकुट/रबरी प्लॅस्टिकचा चेंडू भिंत वगैरे) अन असतील तितक्या खेळाडूंमधे क्रिकेट अत्यंत स्वस्तात सामान्यांना खेळता येते, अन त्यामुळेच ते अतिशय लोकप्रिय आहे.
तशा प्रकारे अन्य कोणताच खेळ (रनिंग सोडून) अगदी फुटबॉलही नाही, कमीत कमी खर्चात खेळता येत नाही, टेनिस/बॅडमिम्टन तर नाहीच नाही. सबब, बाकी खेळांत, इथे टेनिसमधे कुणी रस घेऊ लागले तर ते नेमके काय करणार हे गुह्यच रहाते.
अशंत सहमत...हे असे क्रिकेट खेळणे आणि किमान शालेय स्तरावर खेळणे यात फार फरक आहे. त्यास्तरावर खेळण्यासाठीसुद्धा चांगली वुडन बॅट, शूज, पॅड, ग्लोव्ज असा सगळा जामजिमा करावा लागतो आणि तो फुटबॉलपेक्षा महागच पडतो.
आणि फुटबॉलचे कल्चर नाही आपल्याकडे म्हणून. ब्राझीलसारख्या महादरिद्री देशात एक मळकट बॉल घेऊन त्यावर अनवाणी खेळणारे गल्लीबोळात शेकड्यांनी आहेत. त्यातूनच रोनाल्डिनोसारखे जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होतात.
आणि आजकाल जरा गुणवत्ता असेल तर स्कॉलरशिप मिळण्याचे प्रमाणही वाढले आहे. हौसेला मोल नसते हे खरे आहे पण इच्छा असेल तर कमी पैशातही तुम्ही प्रगती करू शकता.
बरोबर आशुचॅम्प, पण आपली
बरोबर आशुचॅम्प,
पण आपली शिक्षणपद्धती व मार्कांच्यामागिल घोडदौड पाहिली की पुढील पिढीतून किती खेळाडू निर्माण होतील याची शंकाच वाटते, अन याच सर्व कारणमिमांसामुळे तर ऑलिम्पिकमधे पदकतालिकेत भारताची जागा तळाशी असते.
इथे मुळात खेळांना प्रतिष्ठा नाही.
तुमच्या माहीतीसाठी फक्त
तुमच्या माहीतीसाठी फक्त पुण्यात ५०० च्या वर टेनिस कोर्ट आहेत (सोसायट्या, जिमखाने धरून) आणि किमान ६००० च्या वर टेनिस खेळाडू आहे जे स्पर्धात्मक टेनिस खेळतात. ऋतुजा भोसले, अर्जुन कढे ही नावे लक्षात ठेवा. हे आपले रायजिंग स्टार्स आहेत.
तिच गोष्ट बॅडमिंटनची. १०० च्या वर कोर्टस आणि ७०००-८००० खेळाडू. आत्ताकुठे आपले खेळाडू नॅशनल चँम्पियन व्हायला लागलेत.
त्यांना पुरेसे सहाय्य आणि आर्थिक मदत मिळाली तर पुण्यातूही सानिया किंवा साईना तयार होऊ शकते. हा भाबडा आशावाद नाही.
खूप सुंदर लिहिले आहेस.
खूप सुंदर लिहिले आहेस. अभिप्राय सुद्धा खूप छान वाटलेत वाचायला.
लेख चांगला आहे. सानियाच्या
लेख चांगला आहे. सानियाच्या खेळाबद्दल अधिक लिहायला हवे होते.
ती महान, सर्वोत्कृष्ट आहेच. प्रत्येक खेळाडूच त्याच्या परिने असतो. त्याला डोक्यावर घेऊन नाचलेच पाहिजे असे नाही पण किमान त्यांनी जे कष्ट घेतले आहेत किमान त्याचा आदर करायला हवा >> +१
पण आपली शिक्षणपद्धती व
पण आपली शिक्षणपद्धती व मार्कांच्यामागिल घोडदौड पाहिली की पुढील पिढीतून किती खेळाडू निर्माण होतील याची शंकाच वाटते,
इथेच सगळे घोडे पेंड खाते ना. आपल्याकडे पाचवी सहावी पासून खेळाडू चमकायला लागतात. मेहनत करून ते जरा कुठे वरच्या दर्जाला पोचले की दहावी-बारावी च्या परिक्षा येतात की बोंबलल. आणि त्यातून तो खेळाडू अभ्यासातही चांगला असेल तर घरच्यांच्या दबावाखाली तो सरळ खेळाला बायबाय करून डॉक्टरी, इंजिनअरी किंवा अशाच वेळखाऊ अभ्यासक्रमात जातो. की संपले त्याचे करीयर.
फारच थोडे आहेत की जे अभ्यास सोडून खेळाला प्राधान्य देतात. पण तो एक प्रकारे जुगारच असतो कारण काही कारणाने तो नाही चमकला तर तिथेही नाही आणि अभ्यास नाही तर पुढचे करीयर नाही.
अजूनही आपल्याकडे ते खेळ बिनधास्त, तुझी आर्थिक बाजू मी सांभाळतो असे म्हणणारे उद्योजक नाही. आत्ता आत्ता भारत फोर्ज, कल्याणी ग्रुप यांनी असे काही खेळाडू दत्तक घेतले आहेत. पण ही संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढी आहे
पण आपली शिक्षणपद्धती व
पण आपली शिक्षणपद्धती व मार्कांच्यामागिल घोडदौड पाहिली की पुढील पिढीतून किती खेळाडू निर्माण होतील याची शंकाच वाटते>>>> डॉक्टर किंवा इंजिनियर तयार करणे ही काळाची गरज आहे असे आपल्याकडे मानतात. तेव्हा इतर क्षेत्रे तशी दुर्लक्षितच राहतात. डॉक्टर किंवा इंजिनियर झाला नाहीत तरीही तुम्हाला नोकरी मिळेल आणि त्याहूनही तुम्हाला मिळणार्या पैशावर तुमची गुणवत्ता जज केली जाणार नाही अशी परिस्थिति जेव्हा निर्माण होइल तेव्हाच लोक अनिश्चित करीयर चॉइसेस करु शकतील.
आपल्याकडे ते कल्चर नाही, व
आपल्याकडे ते कल्चर नाही, व चित्रकला शिकुन /गाणीबजावणी करून वा खेळ खेळून पोट भरत नाही हेच वास्तव जे वडीलांनी सांगितले, आम्ही अनुभवले, तेच आजचेही सत्य आहे. दुर्दैव आहे, दुसरे काय?
तरीही एकंदरीत वातावरण व तू वर उल्लेखिलेल्यासारख्या सोयी बघता, आशा ठेवायला खूप जागा आहे.
तुम्हाला कॅरोलिन वॉझ्नियाकी
तुम्हाला कॅरोलिन वॉझ्नियाकी माहिती आहे का हो कोणाला? ती पण टेनिसच खेळते.. एकही ग्रँड स्लॅम न जिंकता ती महिला एकेरीमध्ये नंबर एकची खेळाडू होती... आणि बरेच दिवस होती.. कारण तिने ATP/WTA च्या बर्याच स्पर्धा जिंकलेल्या होत्या..
सानिया मिर्झा डबल्स मध्य नंबर एकला पोहोचली आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे आणि त्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन..
ही क्रमवारी कशी निश्चित करतात त्याची एकदा माहिती काढा आणि मगच बोला...
त्यांना पुरेसे सहाय्य आणि
त्यांना पुरेसे सहाय्य आणि आर्थिक मदत मिळाली तर पुण्यातूही सानिया किंवा साईना तयार होऊ शकते. हा भाबडा आशावाद नाही.
- आशुचॅप १००% सहमत.
उगवत्या टेनिस खेळाडु.न्मधुन प्रार्थना ठो.न्बरे, शिवानी ई.न्गले याना विसरुन चालणार नाहि.
माझी मुलगी नॅशनल लेवल ला बारा वर्षाखालील गटात ४७ व्या स्थानावर आहे.
राज्य पातळिवर सातव्या स्थानावर.
बदल नक्किच होतोय, आपण आशावादि राहु या.
आशा नक्कीच आहे.
आशा नक्कीच आहे. अॉलिम्पिकमध्ये आपण दोन चार का होईना पदक मिळवायला लागलो आहोत. ही तर सुरुवात आहे. पण यासाठी वर म्हणल्याप्रमाणे सपोर्ट पाहिजे आणि पेशन्स पाहिजे.
कुठलाही खेळाडू पहिल्या दिवसापासून स्पर्धा जिंकत नाही. फारच असाधारण खेळाडू लवकर चमकतात पण बाकीचे केवळ दुसऱ्या स्थानावर राहील्यामुळे प्रकाशझोताच्या बाहेर जातात.
अशा वेळी त्यांना अंडर अचिव्हर म्हणून हिणवण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. प्रत्येक टेनिस प्लेअर फेडरर, नदाल होत नाही आणि प्रत्येक बॅडमिंटन प्लेअर साईना होत नाही. मी कित्येक खेळाडूंना जवळून पाहिले आहे. ७-८ वर्षाची ही मुले-मुली बाकीचे मित्र दंगा मस्ती करत असताना शाळा संपले की तासन तास कोर्टवर घाम गाळत असतात. कोचच्या शिव्या खातात, छाती फुटेस्तोवर मेहनत करतात, सगळी प्रलोभने असून कठोर डायट करतात, सुट्ट्यांचा वेळ पण प्रॅक्टिसमध्ये देतात. ते काय त्यांना वेळ जात नाही म्हणून का.
एक मुलगा तर रोज चिंचवडवरून डेक्कनला यायचा. पण कितीही प्रयत्न केला तरी कुठेतरी माशी शिंकायची आणि सेमीफायनल, फायनला हरायचा. आणि तब्बल ३ वर्षांनंतर एक डिस्ट्रिक्ट लेवलची स्पर्धा जिंकला. त्यावेळचा त्याचा आनंद अवर्णनीय होता. आता त्यासाठी तो आनंद ग्रँडस्लॅम जिंकल्यासारखाच होता. मग अशावेळी अरे काय तु फक्त डिस्ट्रिक्ट लेवल जिंकल्यावर कसला खुश होतोय असे म्हणले तर कसा काय पुढे खेळणार तो.
हजारो खेळाडूंमधून एखादीच सानिया, साईना तयार होते पण म्हणून बाकीचे ९९९ जण फुकटचे बघे नसतात. त्यांनीही तितकीच मेहनत घेतलेली असते. त्यामुळे प्रत्येक खेळाडूचा आदर करा. भले ते जिंकोत वा हारोत.
हजारो खेळाडूंमधून एखादीच
हजारो खेळाडूंमधून एखादीच सानिया, साईना तयार होते पण म्हणून बाकीचे ९९९ जण फुकटचे बघे नसतात. त्यांनीही तितकीच मेहनत घेतलेली असते. त्यामुळे प्रत्येक खेळाडूचा आदर करा. भले ते जिंकोत वा हारोत.
>>
प्रचंड सहमत!!
बरोबर आहे तुझे आशुचॅप. ह्या
बरोबर आहे तुझे आशुचॅप.
ह्या स्थानावर येण्यासाठि तिची तीन वर्षापासुनची मेहनत आहे.
म्हणजे बाकिन्च्याच्या मेहनती ची कल्पना येते.
चँप वरच्या पोस्टला हजार
चँप वरच्या पोस्टला हजार मोदक..
चांगलं लिहितोयस आशूचँप
चांगलं लिहितोयस आशूचँप
आशुचँप, अतिशय सुरेख पोस्ट !
आशुचँप, अतिशय सुरेख पोस्ट !
ही क्रमवारी कशी निश्चित करतात
ही क्रमवारी कशी निश्चित करतात त्याची एकदा माहिती काढा आणि मगच बोला...
>>>>>>>
एटीपी पाँईटस मिळणार्या स्पर्धा जिंकल्या तरच क्रमवारीत सुधारणा होते वगैरे मलाही तुटपुंजीच माहिती आहे, डिट्टेलवार जाणून घ्यायला आवडेलच... पण मगच बोला म्हणजे त्यावर आपण नक्की काय ठरवणार आहोत? सानिया कशी स्टेफी ग्राफ वा सेरेना विल्यम्स वगैरे पेक्षा कमी आहे, हे यातून सिद्ध करणार आहोत का?
@ आशूचॅंप आपल्या पोस्ट फार पोटतिडकीने येत आहेत, सुरेख असून त्यांच्याशी प्रचंड सहमत आहे हे वेगळे सांगायला नको.
धन्यवाद मंडळी... ऋन्मेऽऽष
धन्यवाद मंडळी...:)
ऋन्मेऽऽष वैतागला असेल त्याचा धागा हायजॅक केला म्हणून....सॉरी रे पण रहावले नाही म्हणून लिहीले
ते वाक्य तुझ्यासाठी नव्हती
ते वाक्य तुझ्यासाठी नव्हती ऋन्मेऽऽष..
ऋन्मेऽऽष वैतागला असेल त्याचा
ऋन्मेऽऽष वैतागला असेल त्याचा धागा हायजॅक केला म्हणून....
>>>>>
अरे उलट धागाकर्त्याच्या नजरेतून पाहिले तर आपल्या धाग्यावर चांगल्या पोस्ट येत आहेत हे बघून आनंदच होतो.
आज मला दिवसभर ऑफिस कामातून जास्त वेळ नाही मिळाला अन्यथा माझ्या पोस्टमध्येही असेच विचार असते, भले इतक्या चांगल्या पद्धतीने नसते, पण भावना याच.
मला पर्सनली असे वाटते की सानियाला अपेक्षित आदरसन्मान, जे ती डिजर्व्ह करते ते देण्यात आपण कमी पडतो, काही खेळाव्यतीरीक्त कारणांमुळे .. प्रश्न मग इथे सानियाचाही उरत नाही तर उरतो आपल्या मानसिकतेचा.
हिम्सकूल ओके, आणि मी ती
हिम्सकूल ओके, आणि मी ती चुकीच्या अर्थाने घेतली असेल तर सॉरी
प्रतिभा, माझी मुलगी नॅशनल
प्रतिभा,
माझी मुलगी नॅशनल लेवल ला बारा वर्षाखालील गटात ४७ व्या स्थानावर आहे.
राज्य पातळिवर सातव्या स्थानावर.
>>>
ग्रेट,
मी स्वता एकदाच टेनिस खेळलोय, त्यातही खेळापेक्षा फोटो काढून घेण्याचेच कौतुक जास्त, पण त्यावेळी त्या कोर्टमध्ये रॅकेट हातात पकडून बॉल मारायचे जे फील होते, मला वाईट वाटले की एवढा भारी खेळ मी का खेळत नाही.
युरो, सानियाच्या फोरहँडबद्दल
युरो, सानियाच्या फोरहँडबद्दल +१. तिच्या २-३ मॅचेस प्रत्यक्ष बघितल्या आहेत. सिंगल्स आणि डबल्स. टिव्हीवर पण शक्य होइल तेव्हा आणि तितक्या बघितल्या आहेत. सेरेना विरुद्ध तिची पहिली मॅच होती ती किंवा स्वेटलानाला दुबईत हरवलं ती अशा मॅचेस लक्षात आहेत. पण माझं निरिक्षण असं की कोर्टवर तिचा वावर बरेचदा अजिबात फोकस्ड वाटायचा नाही. काही तरी वेडेवेडे चाळे सुरू असायचे. साधे साधे पॉइंट्स बाहेर मारायची. वैतागून तिला फॉलो करणं सोडून दिलं होतं. ना ली आणि सानियाची कारकीर्द साधारण एकाच वेळी सुरू झाली होती (if I am not wrong) पण ली कुठेच्या कुठे गेली.
इथे कुणी तरी ग्रँडस्लॅम वि इतर स्पर्धांबद्दल लिहिलं आहे. लिअँडर पेसने पीट सँप्रसला हरवलं तेव्हा किंवा सानियानं स्वेटलानाला हरवलं तेव्हा हे दोन्ही टॉप प्लेयर्स होते. स्पर्धा ग्रँडस्लॅम नसली तरी सोपं नाही अशा प्लेयर्सना हरवणं. दुबईत सानियाला क्राउडचा खूप सपोर्ट होता आणि शिट्ट्या, टाळ्या या सगळ्यांनी स्वेटलाना एकदम वैतागलेली होती. त्याचा सानियाला फायदा झालाही असेल पण तरी मुख्य कामगिरी तिच्या खेळाचीच होती.
तरी भारतीय टेनिसला सानियामुळं सोन्याचे दिवस आले असं म्हणणं अतिशोयक्तीच. तिच्यामुळे ग्लॅमरची जोड मिळाली असेल कदाचित. पण कृष्णन, अमृतराज यांनी पाया घातला आणि खरे सोन्याचे दिवस आणले ते भुपती-पेस जोडीनंच.
अजून एक- सानिया आणि सायनाची तुलना नक्कीच होउ शकत नाही. नेटपलीकडे उभं राहून टोला हाणणे हे एक बारीकसे साम्य सोडले तर दोन्ही खेळांचे स्वरूप, इ भरपूर वेगळे आहे. शिवाय सायना मेनस्ट्रीम प्रोफेशनल आहे तर सानिया डबल्स प्लेयर आहे. टेनिसच्या डबल्स आणि सिंगल्सच्या मॅचेस बघणार्यांना हा फरक नक्कीच माहिती असणार.
सुनिल गवासकरने भारतीय क्रिकेटला सोन्याचे दिवस दाखवले म्हणून सचिनसारखे स्टार खेळाडूंना फायदा झाला >>>> हेच उदाहरण घेउन कुणी सचिन तेंडुलकरमुळे भारतीय क्रिकेटला सोन्याचे दिवस आले असं म्हणेल. म्हणोत बापडे.
Pages