.
सानिया मिर्झाने जागतिक क्रमवारीत महिला दुहेरीमध्ये अव्वल क्रमांक पटकावला !
गेल्या आठवड्यातील वर्तमानपत्रावर नजर पडली, आणि ही बातमी वाचली!
एकाच वेळी आनंद आणि अभिमान दोन्ही दाटून आले..
पण दुसर्याच क्षणी स्वत:शी थोडी शरमही वाटली, जे ही बातमी आपल्याला ईतक्या उशीरा समजावी.
त्याच बरोबर वाईटही वाटले की ज्या व्हॉटसपवर नको नको त्या गल्लीन्यूज फिरत असतात, तिथेही कोणाला हे शेअर करावेसे वाटले नाही.
जिथे एकीकडे साईना नेहवालच्या कामगिरीबद्दल कौतुकाच्या पोस्ट फिरत असतात, जे ती डिजर्व्हही करतेच, पण तिथेच गेल्या काही काळात सानियाबद्दल अभिमानाने कोणी काही फिरवले आहे, असे क्वचितच आढळते.
किंबहुना ती भारतीय तिरंग्याच्या दिशेने पाय ठेऊन बसली आहे असे फेक फोटोच तिची बदनामी करताना मध्यंतरी पाहण्यात आले होते.
बहुधा यामागे कारण तिचे पाकिस्तानी क्रिकेटपटूशी लग्न करणे असावे. कदाचित यातही मुलगी भारतीय आणि मुलगा पाकिस्तानी हे जास्त भावना दुखावणारे असावे,. पण तिने त्यानंतरही भारतासाठीच आपले टेनिस खेळणे चालू ठेवले हे कोणालाही विचारात घ्यावेसे वाटले नाही वा त्याची किंमत मग आपल्या लेखी शून्य झाली.
असो,
सानिया मिर्झा!
एकेकाळची माझी प्रचंड आवडती टेनिसतारका !
याचा अर्थ असा होत नाही की आज आवडती नाही.. पण प्रचंड आवडती म्हणजे एकेकाळी वहीच्या मागच्या पानावर जिचा फोटो मी चिकटवला होता अशी एकमेव क्रिडापटू. अन्यथा हा मान मी चित्रपटसृष्टीतील कोण्या हिरोईनलाही अपवादानेच दिला होता. पण यामागे निव्वळ सानियाचे ग्लॅमरस दिसणे एवढेच नव्हते, तर तिचा स्पोर्टी लूक वेड लावायचा. आसपासच्या मुलींमध्ये तो अभावानेच आढळायचा. तिच्या एकेक स्टाईल स्टेटमेंटचे आम्हा मुलांनीही कॉपी करून झाले होते. मग ते तिच्यासारखे कानातले घालणे असो वा चष्म्याची फ्रेम असो. खेळाच्या जोडीनेच आपला असा एक वेगळा ठसा उमटवणारी महिला क्रिडापटू म्हणून तिची ही अचिव्हमेंट नाकारता येत नाही.
पण काही झाले तरी एखाद्या खेळाडूला खरी ओळख त्याचा / तिचा खेळच मिळवून देतो, आणि याची जाणीव ठेवत त्या खेळाशी ती नेहमीच प्रामाणिक राहीली. तिच्या बॅडपॅच मध्येही, जेव्हा सारे सानिया मिर्झा आता संपली, किंवा एका मर्यादेपलीकडे ती आपला खेळ उंचावू शकत नाही, ती भारताची अॅना कुर्निकोवा बनूनच राहणार, अशी तिची प्रतिमा तयार होत होती, तेव्हाही.. आणि तिच्या लग्नानंतर आता सानिया मिर्झा भारतीय टेनिसचा केवळ भूतकाळ बनून राहणार अश्या कंड्या पिकू लागल्या तेव्हाही.. तिने आपला लढाऊ बाणा सोडला नाही, ना आपली बंडखोर वृत्ती सोडली, येस्स बंडखोर वृत्ती ज्यासाठीच मी तिला ओळखायचो, आणि ज्यासाठीच ती मला आवडायची (आठवा तिच्या स्कर्टच्या लांबीवरून उठलेला वाद) ... आणि अखेर आपल्या खेळातील प्रतिस्पर्ध्यांशीच नाही तर समाजाशी देखील लढत देत तिने आज हे शिखर गाठले. हॅटस ऑफ सानिया!
पुढे मागे नक्कीच मेरी कोम वा मिल्खासिंग सारखा सानिया मिर्झाच्या जीवनावर देखील चित्रपट बनवला जाईल. (बहुधा आजच्या घडीच्या नायिकांमध्ये "आलिया भट्ट" ही तिची भुमिका सर्वांगाने पेलण्यास सक्षम राहावी.) पण त्या चित्रपटात तिच्या वैयक्तिक आयुष्याला फाटा देत एक सर्वोत्कृष्ट भारतीय महिला टेनिसपटू म्हणूनच तिचे दर्शन घडावे अशीच ईच्छा. कारण आजही तिचे भारतीय टेनिसमधील योगदान सर्वार्थाने जनमाणसात पोहोचले नाही असे मला वाटते. अगदी आमच्यासारख्या चाहत्यांपर्यंतही नाही.. अन्यथा सचिनच्या टेनिस एल्बोबद्दल खडानखडा माहिती असणार्या किती जणांना हे ठाऊक असेल की सानियाला देखील कसलासा सांधेदुखीचा आजार आहे. जो तिच्या कारकिर्दीच्या मुळावरच उठू शकतो. ज्याच्याशी झुंजत तिने हा चमत्कार घडवला आहे.
एक काळ होता जेव्हा भारतीय टेनिस लिएंडर पेस आणि महेश भूपती या नावांपासून सुरू व्हायचे तरी टेनिस बघायचो मात्र आम्ही सानिया मिर्झासाठीच. अन्यथा बुद्धीबळात जसे विश्वनाथ आनंद हे नाव सर्वांनाच ठाऊक असते पण तो खेळ बघत कोणी नाही, की फॉलो करत नाही, तसेच भारतीय टेनिसचे आमच्यालेखी झाले असते.
काही का असेना, क्रिकेटच्या ओवरडोसने वैतागलेले, अन टेनिसला काही काळ विसरलेले माझ्यासारखे कित्येक गटांगळू या आनंदाच्या बातमीनंतर पुन्हा या खेळात रस घेऊ लागतील अशी आशा करायला हरकत नाही.
थ्री चीअर्स फॉर सानिया !!
हिप हिप ...
ऋन्मेऽऽष
भारतीय टेनिसला सोनियाचे दिवस
भारतीय टेनिसला सोनियाचे दिवस सानियानं नाही दाखवले. पेस-भुपती यांच्यामुळे आलेल्या टेनिसच्या लाटेचा ज्यांना फायदा झाला त्या पिढीतली ती स्टार खेळाडू आहे असं म्हणता येइल.
अगं त्याला टेनिसशी कुठे देणे
अगं त्याला टेनिसशी कुठे देणे घेणे आहे ! वाच नीट ".....यामागे निव्वळ सानियाचे ग्लॅमरस दिसणे एवढेच नव्हते, तर तिचा स्पोर्टी लूक वेड लावायचा. " सो बेसिकली "लूक"साठीच फॅन आहे ना अन्यथा साईनासाठी नसता का बाफ काढला ?!
अर्र!! शीर्षकातच गडबड
अर्र!! शीर्षकातच गडबड असल्यानं मी पुढे नीट वाचलंच नाही.
सिंडरेला, तसे मी देखील
सिंडरेला,
तसे मी देखील पेसभूपती यांचा उल्लेख केला आहेच. त्यांना टाळून पुढे जाऊ शकत नाहीच. पण आपण म्हणता ते असे झाले की सुनिल गवासकरने भारतीय क्रिकेटला सोन्याचे दिवस दाखवले म्हणून सचिनसारखे स्टार खेळाडूंना फायदा झाला.
बाकी पेसभूपती यांच्या आपसातील वादाचा आणि इगो क्लॅशेसचा भारतीय टेनिसला फटका देखील बसला आहे. या धर्तीवर सानिया त्यांच्यापेक्षाही उजवीच वाटते मला.
@ मैत्रेयी,
मला जर लूक बघूनच फॅन व्हायचे असते तर मी फॅशन टीव्हीवरच्या मॉडेलच्या मागे नसतो लागलो. किंवा गेला बाजार महेश भट चित्रपटातील एखाद्या हिरोईनीवरच भुललो असतो ..
तर साहजिकच आधी तिचे टेनिस खेळणे महत्वाचे होते आणि त्यात ती नंबर वन आहे यावर आता अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब झाले आहे.
आणि हो, शक्य असल्यास सानिया
आणि हो, शक्य असल्यास सानिया साईना तुलना टाळा.
अर्थात आपण त्या ईंटेनशनने तिचे नाव घेतले असे मला म्हणायचे नाहीये, पण उगाच कोणाला नेमका तेवढाच धागा मिळायचा. त्या दोघी आपापल्या क्षेत्रात ग्रेट आहेत. त्यांची तुलना काही लोकांना करावीशी वाटणे हे दुर्दैवी वाटते.
त्या दोघी आत्ता पहिल्या
त्या दोघी आत्ता पहिल्या क्रमांकावर आहेत.
Sania was elevated to the No.1 spot in the women's doubles rankings, according to the latest Women's Tennis Association (WTA) list released on April 13.
Saina became the first Indian women to be crowned World No.1 on March 29 after her Indian Open Grand Prix triumph. But she dropped to the second place, overtaken by China's Li Xuerui, following her semifinals exit in the Malaysia Open Superseries.
But she regained the top slot after Li pulled out of Singapore Open Superseries.
[from TOI]
ऋऽऽन्मेष, >> तिच्या एकेक
ऋऽऽन्मेष,
>> तिच्या एकेक स्टाईल स्टेटमेंटचे आम्हा मुलांनीही कॉपी करून झाले होते. मग ते तिच्यासारखे कानातले घालणे असो
>> वा चष्म्याची फ्रेम असो.
तुम्ही इतरांची कॉपी करण्यात धन्यता मानता का हो? त्या दादोबा गांगुलींची कॉपी मारतांना बोट कायमचं वाकडं करवून घेतलंत. तुमची स्वत:ची शैली विकसित केलेली बघायला आवडेल.
आ.न.,
-गा.पै.
बाकी लेख ठीक आहे. पण >>अन्यथा
बाकी लेख ठीक आहे. पण >>अन्यथा बुद्धीबळात जसे विश्वनाथ आनंद हे नाव सर्वांनाच ठाऊक असते पण तो खेळ बघत कोणी नाही, की फॉलो करत नाही<< याबद्दल निषेध! तुमच्या फ्रेंडसर्कल मध्ये कोणी बघत नाही याचा अर्थ तुम्ही सरसकट सगळ्यांना यात धरु नका. जसे क्रिकेट बघण्यासाठी जागणारी मंडळी आहेत तसे चेस ची मॅच ६-६ तास बघणारी, benaud प्रमाणे स्विडलर ची कमेंट्री फॉलो करणारी देखील पुष्कळ जनता आहे. आता तुम्ही संख्याबलाचा मुद्दा आणणार असाल तर सांगतो की हा वर्ग दिवसेंदिवस वाढतोय. त्यामुळे आतातरी नवीन धागा काढण्याआधी माहिती नीट जमवत जा!
~ All posts on this thread
~ All posts on this thread edited due to them not being conformant to popular opinion ~
~ या धाग्यावरील सर्व पोष्टी लोकप्रिय मताशी फटकून असल्याने संपादित ~
ते जमलं असतं तर अर्ध्या
ते जमलं असतं तर अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या सानियापेक्षा विश्वविजयी साईनावर धागा निघाला असता.
>>
हे वाक्य आवडलं नाही. अत्यंत चुकीचे वाक्य!
बाकी धाग्या बद्दल नो कमेंट्स
@अप्पाकाका तो प्रश्न नाही हो!
@अप्पाकाका
तो प्रश्न नाही हो! आणि तुमचे मत काही पटले नाही. सानियाचे देखील कौतुक व्हायलाच पाहिजे. पण मग तिने काय केले ते पण नीट सांगावे ना! तिने खेळात नक्की काय सुधारणा केल्या, याविषयी काहीच बोललेले नाही. आत्ता युकी भाम्ब्रीने मरेलाऑस्ट्रलियन ओपन मध्ये झुंजवले अशा बातम्या यांच्या गावीच नसतात. मग यांना टेनिस फॅन कसे म्हणावे? अजून एक ग्लॅमर वरचा धागा निघाला नाही का? असो शतक लागणार यात दुमत नाही, तरी ऋन्मेऽऽष जमले तर प्रयत्न करा. मला तुमची शैली खूप आवडते पण असे काही लिहून गेलात की दातात खडा आल्यासारखे वाटते.
~ All posts on this thread
~ All posts on this thread edited due to them not being conformant to popular opinion ~
~ या धाग्यावरील सर्व पोष्टी लोकप्रिय मताशी फटकून असल्याने संपादित ~
ओफ्फो, तुम्हाला सानिया नाही
ओफ्फो, तुम्हाला सानिया नाही का आवडत? असो डबल्स देखील टेनिसच आहे ना? टॉड वुडब्रिज सार्वकालिक महान टेनिसपटू आहे पण आता त्याला देखील मग डबल्स स्टार म्हणावे लागेल. तसेच एकाही भारतीयाने आजवर सिंगल्स grandslam जिंकली नाही, मग सानियावरच रोख का? आणि atp/wta ची कुठलीही स्पर्धा सटरफटर नक्कीच नसते. या स्पर्धांतूनच भावी grandslam विजेते तयार होतात.
असो धागा अधिक भरकटण्याच्या आत हा विषय थांबवूयात. सानियाच्या खेळावर किंवा इतर भारतीय टेनिसपटूंवर चर्चा होणार असेल तर उत्तम अन्यथा ही माझी शेवटची पोस्ट!
मग लिअंडर आणि महेश यांना
मग लिअंडर आणि महेश यांना देखील डब्बल स्टारच म्हणावे
~ All posts on this thread
~ All posts on this thread edited due to them not being conformant to popular opinion ~
~ या धाग्यावरील सर्व पोष्टी लोकप्रिय मताशी फटकून असल्याने संपादित ~
~ All posts on this thread
~ All posts on this thread edited due to them not being conformant to popular opinion ~
~ या धाग्यावरील सर्व पोष्टी लोकप्रिय मताशी फटकून असल्याने संपादित ~
पायस, आपला माहिती घेऊन
पायस,
आपला माहिती घेऊन लिहिण्याचा मुद्दा योग्य आहे,
पण कित्येक वर्षे टेनिस फॉलो केले नसतानाही आता इथे धाग्यासाठी म्हणून गूगाळून माहिती संकलित करणे प्रशस्त वाटले नाही. अर्थात त्यात काही गैर नाही पण ती न्यूज वाचून ज्या भावना पटकन मनात आल्या त्या निसटायच्या आधी मांडल्या. त्या मांडायचा पहिला हेतू हाच की असे किती जणांशी झाले, होतेय, वा सानियाबद्दल इतर काय विचार करतात वगैरे, तसेच चर्चा झाली की प्रतिसादांतही माहिती मिळतेच. मी स्वता
जेव्हा टेनिस फॉलो करायचो तेव्हा ईतका लहान होतो की गुणांकन पद्धत आपल्याला समजतेय याचेच कौतुक वाटायचे, त्या जिवावर मी स्वताला टेनिस फॅन म्हणवू इच्छित नाही, पण सानिया फॅन नक्कीच आहे.
डब्बल स्टार हा शब्द असा
डब्बल स्टार हा शब्द असा हलक्या अर्थाने का घेतला जावा?
डबल खेळायचे स्किल आणि टॅक्टीक्ट्स नक्कीच भिन्न असतात हे बघूनही समजते.
क्रिकेटच्या भाषेत मॅक्सवेल हा मर्यादित षटकांचा स्टार आहे म्हणून कसोटी क्रिकेटचे चाहते त्याला हिणवत आहेत वा व्हायसे वर्सा असेच लक्ष्मणशी होतेय यातला प्रकार झाला.
आणि हो, सानियाने आपल्या सांधे दुखीच्या आजारामुळे सिंगल खेळणे सोडलेय बहुतेक*
~ All posts on this thread
~ All posts on this thread edited due to them not being conformant to popular opinion ~
~ या धाग्यावरील सर्व पोष्टी लोकप्रिय मताशी फटकून असल्याने संपादित ~
सचिनने आधी एकदिवसीयमधून
सचिनने आधी एकदिवसीयमधून निवृत्ती घेतली मग कसोटीमधून असे का?
मलिंगाने कसोटीमधून निवृत्ती घेतली पण एकदिवसीयमधून नाही असे का?
बरीच उदाहरणे देता येतील आणि असे का याचे उत्तर आपल्यालाही न सांगता समजेलच
~ All posts on this thread
~ All posts on this thread edited due to them not being conformant to popular opinion ~
~ या धाग्यावरील सर्व पोष्टी लोकप्रिय मताशी फटकून असल्याने संपादित ~
अन्यथा सचिनच्या टेनिस
अन्यथा सचिनच्या टेनिस एल्बोबद्दल खडानखडा माहिती असणार्या किती जणांना हे ठाऊक असेल की सानियाला देखील कसलासा सांधेदुखीचा आजार आहे >> कसलासा?? ऋन्मेऽऽष तुला पण नाही ना माहिती? असो.
~ All posts on this thread
~ All posts on this thread edited due to them not being conformant to popular opinion ~
~ या धाग्यावरील सर्व पोष्टी लोकप्रिय मताशी फटकून असल्याने संपादित ~
पायसच्या सर्व पोस्टीस १००%
पायसच्या सर्व पोस्टीस १००% अनुमोदन...
लेखनशैली आवडली. काही मते पटली नाहीत. असो.
दुबई ओपन वगैरे सटरफटर स्पर्धा
दुबई ओपन वगैरे सटरफटर स्पर्धा जिंकायच्या आणि त्या जोरावर टेनिस स्टार म्हणून मिरवायचे हा प्रकार ती करत राहिली.
कसंय आप्पा जोशी, दुसऱ्यांच्या कामगिरीबद्दल हिणकस बोलणे फार सोप्पे आहे. त्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. आंतरराष्ट्रीय दर्जाची कुठलीही स्पर्धा सोपी नसतेच. भले ती ग्रँडस्लॅममध्ये नसेल चमकली म्हणून ती फु़टकळ आहे असे अनुमान कसे काय काढले बुवा तुम्ही.
जागतिक क्रमवारीत ज्या अर्थी ती पहिल्या क्रमांकावर आहे त्या अर्थी ती ज्या स्पर्धांमध्ये खेळली त्यालाही महत्व आहे का नाही. आणि जर फु़टकळ स्पर्धांमुळेच क्रमवारीत पहिला क्रमांक मिळवता येत असता तर बाकीचे लोक्स तेच करत असले असते ना. कशाला कोण ग्रँडस्लॅममध्ये जाईल.
फक्त जिंकणाऱ्यालाच डोक्यावर घेऊन नाचायची घाणेरडी वृत्ती सोडा आता. हरलेला देखील तितक्याच तयारीचा असतो. १९-२० एवढाच फरक जिंकणाऱ्या आणि हरलेल्या खेळाडूला असतो आणि हे त्यांनाही माहीती असते. त्यामुळे खरा खेळाडू किंवा क्रीडाशौकीन कुठल्याही खेळाडूला कमी लेखत नाही. भले ते हरत असतील पण त्यांनीही तितकीच मेहनत घेतलेली असते. उलट मी त्यांच्या जिद्दीला सलाम करतो. हरत असूनही पुन्हा तितक्याच उत्साहाने पुढच्या स्पर्धेच्या तयारीला लागणे यासाठी खूप पॅशन लागते.
तुम्हाला हे समजेल अशी आशाच नाही.
जाउद्या हो एक मिर्झा आणि एक
जाउद्या हो
एक मिर्झा आणि एक नेहवाल
अजुन ही तुम्हाला फरक कळला नाही का ?
~ All posts on this thread
~ All posts on this thread edited due to them not being conformant to popular opinion ~
~ या धाग्यावरील सर्व पोष्टी लोकप्रिय मताशी फटकून असल्याने संपादित ~
ती महान, सर्वोत्कृष्ट आहेच.
ती महान, सर्वोत्कृष्ट आहेच. प्रत्येक खेळाडूच त्याच्या परिने असतो. त्याला डोक्यावर घेऊन नाचलेच पाहिजे असे नाही पण किमान त्यांनी जे कष्ट घेतले आहेत किमान त्याचा आदर करायाला शिका.
आणि तुम्ही शुद्धलेखनाचे फार भोक्ते आहात असे ऐकून होतो. माझे नाव आशिष फडणीस आहे. लिहा बरे पाच वेळेला पाटीवर
इवान - अगदी पटले हेच कारण आहे बाकी काही नाही. कारण मागे पण भाग मिल्खा भाग च्या वेळी पाकिस्तानने त्यांना फ्लाईंग सिख पदवी दिल्याबद्दल काहींचा जाम जळफळाट झाला होता.
~ All posts on this thread
~ All posts on this thread edited due to them not being conformant to popular opinion ~
~ या धाग्यावरील सर्व पोष्टी लोकप्रिय मताशी फटकून असल्याने संपादित ~
मिल्खासिंगला अंडर अचिव्हर
मिल्खासिंगला अंडर अचिव्हर म्हणणारे कोण होते मग....
माझी स्मरणशक्ती दगा द्यायला लागलीये बहुदा
Pages