जर्मन-विंग्स

Submitted by रंगसारंग on 20 April, 2015 - 03:53

जर्मन-विंग्स च्या अपघाताबद्दल रोज वाचतोय.....आणि बाहेर येतंय ते एक अतिशय कटू सत्य.....आपण तर आजकाल बिनधास्त विमाने प्रवास करतो - इतके की विमान प्रवासाचे काहीच अप्रूप राहिले नाही. पूर्वी सीटवर बसल्यावर लगेच खुर्चीचा पट्टा कमरेला बांधून मोठ्या दिमाखाने आजूबाजूला बघत बसायचो.......आणि पूर्ण प्रवास मनामध्ये साठवूनच विमानातून बाहेर निघायचो. आता विमानात शिरताना एयर होस्टेस निर्विकार चेहेऱ्याने आपले स्वागत करते आणि आपणही त्याच्या थंडगार स्वीकृतीच्या भानगडीत सुद्धा पडत नाही. सीट वर बसल्यावर मोबाइलशी चाळा, नाहीतर कंटाळून बंद करून ठेऊन २ मिनिटांत घोरणे सुरु करायचे. विमानातील सुरक्षा सूचना सुद्धा कुणी लक्ष देऊन बघत असतील असे वाटत नाही. आजू बाजुच्यांशी चर्चा गप्पा नाहीच शिवाय कुणी रेस्ट रूम कडे जातो म्हटले की ह्यांच्या चेहऱ्यावर अतिशय ताण दिसणार.......त्यामध्येही काही वर्कोहोलीक्स कॉम्प्यूटर काढून आपले उर्वरित प्रेझेन्तेशंस बनवीत बसणार.........कामामध्ये असताना कुणी चहासाठी विचारले किंवा (तुम्ही) तोंड उघडून पेंगत असताना तुम्हाला सीट सरळ करायला लावली तर हा ताण कित्येक पतीने वाढलेला असतो......विमान उतरल्यावर ताबडतोब मोबाइल द्वारे ड्रायव्हरशी फोनवर मोठ्या आवाजात बोलताना (किंवा समजावताना) - आणि विमान स्काय गेट ला उभे झाल्यावर दरवाजा उघडेपर्यंत हे लोकं आपल्या सर्व सामानासकट दाटीवाटीने का उभे राहतात आणि त्यातील अर्धे मान तिरपी करून का कुणाची वाट बघत असतात कोण जाणे...........विमानातून निघताना क्रु कडे एक धन्यवादाचा एक कटाक्ष सुद्धा टाकायला त्यांना वेळ नसतो.......ह्या सर्व बाबीन्मधून एका माणसाचा मानसिक ताण हा दुसऱ्या कडे आपोआपच ओढल्या जातो - म्हणजे आपण एक इझी गोइंग चीयरफुल वातावर तयार न करता सर्वांच्या कपाळावर आठ्या आणतो.........आणि मग त्यातून टे विमानकर्मी कसे वाचतील. त्यांच्या आयुष्याची व्यथा त्याच्या स्मार्ट कपड्यांवरून किंवा मेकप केलेल्या त्या कृत्रिम चेहर्यांवरून करू नये....उलट त्यांच्या अदबीने बोलणाऱ्या पद्धतीतून किंवा स्माइल मधून मागे लपलेला ताण ओळखता आला पाहिजे.....पायलटची तर आपली भेट होत नाही पण त्याचे काम किती महत्त्वाचे असते ते आपल्याला घरी पोहोच्ल्यावरच्या स्वागताने समजायला हवे. शेवटी तेही आपल्यासारखेच जीव.....त्याच्याही आयुष्यामध्ये उंचसखल बदलाव.......चिंता, वैफ़ल्य, अपयश - सर्वच काही. - - - - - - - - आणि एखाद्याला जर का विमानामातल्या कॉकपीट मध्ये बसल्यावर विमान आकाशात ३५००० फुट उंचीवर पोहोचल्यावर जर का आयुष्यातून उठल्याची जाणीव झाली तर..........
जर्मन-विंग्स चा मुख्य पायलट बाहेरून कॉकपीट चा दरवाजा ठोठावीतच राहिला........कारण सह-वैमानिकाने स्वतः बरोबरच शेकडो प्रवाश्यांच्या आयुष्याचा एकतर्फी जुगार खेळला होता........थोड्याच वेळापूर्वी मुख्य वैमानिक जेंव्हा त्याच्या साथीदाराकडे विमानाची जबाबदारी सोपवून गेला होता, त्याला त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागचे दुक्ख किंवा ताण जाणविला नसावा......?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.