रात्रीचे दहा वाजलेत, विलासराव टीवी पाहत बसलेत, पण ते आपलं नावालाच, चालू टीवीकडे त्याचं लक्ष सुद्धा नाहीय, ते नेहमीप्रमाणे आपल्या जुन्याचं आठवणीत गुंग होऊन गेलेत, कामिनीच जाणं हा त्यांच्यासाठी एक धक्का जरी नसला तरी मनातून तिने दिलेली इतक्या वर्षांची साथ त्यांच्या मनावरून आठवणींच एक गोड मोरपिस फिरवून जाते. गेली दोन वर्षे ती पूर्णपणे अंथरुणाला खिळून होती, तिला जाऊन ही आज जवळपास पाच - सहा महिने झाले, मुलगा सुरज त्याच्या व्यापात नोकरीत बिझी आहे पण आपण आता इतका पूर्णवेळ एकटा कसा घालवायचा, नुसतं वाचन तरी किती करणार, घरात बोलायला देखील दुसंर कुणीच नाही इतक्यात दारावरची बेल वाजते, सुरज ऑफिस मधून सुटल्यावर परस्पर खानावाळीतून टिफिन घेऊनचं आत येतो आणि म्हणतो,
"बाबा खूप भूक लागलीय, जेवण गरम-गरम आहे, तोवर पटकन जेवून घेऊया." विलासराव सूरजच्या हातातला डबा घेतात आणि डायनिंग टेबलवर ठेवतात. सुरज आतुन फ्रेश होऊन जेवायला येउन बसतो, सहजच विलासराव सुरजकडे त्याच्या लग्नाचा विषय काढतात,
"मला वाटत सुरज तू आता लवकरच लग्न करावस तसही तुझं अर्पितावर प्रेम आहेच, मलाही ती मुलगी पसंत आहे, कामिनीलाही ती पसंत होती, तशी तुला आता चांगली नोकरीही आहे, अर्पिताही शिक्षण पूर्ण करून नोकरी करतेय, तेव्हा आता उगाचच उशीर करण्यात अर्थ नाही, कामिनीला वर्ष होण्याच्या आत आपण हे लग्न उरकून घ्यायला हवं, स्त्रीशिवाय घराला घरपण नाही म्हणतात ते खरंय, आज कित्येक दिवस आपण साधं घरचं जेवणही जेवलो नाही, बाहेरचं खाऊन-खाऊन कंटाळा येतो अगदी."
पण सुरज नेहमीप्रमाणेच आता नोकरीत पूर्ण स्थिर-स्थावर झाल्या शिवाय मला लग्नच करायचं नाही असं म्हणून विषय टाळतो व उलट विलासरावानाच पुन्हा दुसंर लग्न करण्याविषयी सुचवतो, सुरवातीला विलासराव गोंधळतात आणि चक्क नाही म्हणतात, पण आजची समाजातली अनेक उदाहरणे पाहिल्यावर त्यांनाही हा लग्नाचा प्रस्ताव अगदीच जगावेगळा नसल्याचं पटतं आणि आता आपल्यालाही उतारवयात आपलं सुख-दुख समजून घेणारा एक जोडीदार असावा असा विचार करून ते लग्नासाठी तयार होतात.
इकडे नलिनी आणि प्रमोद यांची देखील चर्चा चाललेली असते, नलिनी अर्पिताच्या लग्नाबद्दल जर जास्तच आग्रही असते ती प्रमोदला म्हणते “आता लवकरच अर्पिताच्या लग्नाबद्दल विलासरावांशी एकदा बोलून घ्यायला हवं, वर्षाच्या आत लग्न उरकून घेतलं नाही तर पुन्हा तीन वर्षे थांबावं लागेल.”
“अगं ती जुनी प्रथा झाली, हल्ली इतकं कोणी नाही पाळत, आता जमाना बदललाय आणि अर्पिता-सुरजला जेव्हा लग्न करायचं असेल तेव्हा त्यांना करूदेत, आपण आपल्याकडून घाई करायची नाही, करु दे एन्जॉय दोघांना, पुढे आयुष्यभर एकत्र बंधनातच राहायचय, पण काही म्हण नलिनी अर्पिता लग्न करून सासरी गेल्यानंतर आपण पुन्हा दोघे एकटेच आपल्याला आणखी एखादा मुलगा असता तर घरात सून, मुलं-बाळ घर अगदी भरून गेलं असतं, शिवाय त्याने आपल्याला उतारवयात आधार देखील दिला असता, तशी अर्पिताही आपल्यासाठी आपला मुलगाच आहे, आपली कित्ती काळजी घेते, उद्या जरी सासरी गेली तरी आपल्याला काही अगदीच विसरणार नाही आणि सुरज देखील एक गुणी मुलगा आहे, नेहमी किती प्रेमाने आपली दोघांची चौकशी करत असतो, तो आपला जावई नसून मुलगाच आहे अस आपण मानतोच ना.”
“ पण मानणं आणि प्रत्यक्ष असणं यात फरक आहे आणि तो कायम आयुष्यभर जाणवणारचं, त्याला काही ईलाज नाही.”
सुरज बाबा लग्नाला तयार झाले हि बातमी अर्पिताला देतो, तीही खूप खूष होते पण त्यांना जोडीदार म्हणून बायको शोधायची कुठे आणि कशी असा विचार करून ते दोघं एका वधू-वर सुचक मंडळात विलासरावांच नाव नोंदवतात, दोन-तीन दिवसांतच त्यांना मंडळाकडून एका प्रौढ कुमारिकेचा कुमुद्चा प्रस्ताव येतो, संबंधित माहिती जुळल्यावर ठरवून एके दिवशी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरतो, सुरज, अर्पिता आणि विलासराव हे कुमुद्च्या घरी जातात, विलासराव आपल्या पत्नीच्या निधनामुळे आपण दुसरं लग्न करीत असल्याचं सगळं स्पष्ट कुमुद्च्या घरच्या मंडळीना सांगतात, कुमुद्चा भाऊ कुमुद्च लग्न इतके दिवस का रखडलय ते विलासरावांना सांगण्याचा प्रयत्न करतो पण विलासराव तिचा भूतकाळ जाणून घेण्याबद्दल अनुत्सुकता दाखवून सरळ कुमुद्ला पसंत करतात, लवकरच कोर्ट-विवाह करून कुमुद विलासरावांच्या घरी राहायला येते, कुमुद आता स्वतःच्या परीने विलासरावांना आपण इतकी वर्षे लग्न का नाही केलं हे सांगण्याचा प्रयत्न करते पण प्रत्येकवेळी विलासराव मला आता जुन्या भूतकाळातल्या गोष्टी ऐकण्यात रस नाही आता भूतकाळ विसरून वर्तमानकाळात जगूया असं म्हणून ऐकण्याच टाळतात आणि तिचं पूर्व आयुष्याचं रहस्य तसंच तिच्यापाशीचं राहात.
असेच एके दिवशी नलिनी आणि प्रमोद अर्पिता-सूरजच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी म्हणून विलासरावांच्या घरी येतात, घरी विलासराव पाहुण्यांचं स्वागत करतात, थोड्या गप्पा-गोष्टी होतात, विलासराव पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी म्हणून कुमुद्ला हाक मारतात, कुमुद आतून ओ देते आणि पडद्याआडून बाहेरच्या पाहुण्यांना पाहते, ओळखते आणि एकदम दचकते आणि विलासरावांनाच हाक मारून आत बोलावते, विलासराव देखील पाहुण्यांना "एक्स्क्युज मी एक मिनिट हं" म्हणून आत किचनमध्ये येतात, आत कुमुद्ला थोड्या घाबरलेल्या, भेदरलेल्या अवस्थेत पाहून विचारतात,
" काय गं, काय झालं, मला असं अचानक आत का बोलावून घेतलस ?" तेव्हा कुमुद त्यांना म्हणते,
“ इतके दिवस मी माझ्याकडून तुम्हाला एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतेय, पण तुम्ही या ना त्या कारणाने ऐकण्याचं टाळताय, पण आज तुम्हाला माझी ती गोष्ट ऐकायलाच लागेल ” असं म्हणून कुमुद आपला पूर्व इतिहास विलासरावांना सांगू लागते,
“ साधारण चोवीस-पंचवीस वर्षांपूर्वीची घटना आहे, तेव्हा मी कॉलेजात होते, आमची कॉलेजची स्टडी टुर औरंगाबाद येथे गेली होती, आमचे दोन जुनियर आणी दोन सिनियर असे चार-चार जणांचे ग्रुप केले होते, माझ्याबरोबर माझी एक मैत्रिण आणि दोन सिनियर मुलं असा आमचा ग्रुप ठरवला होता, दिवसभर आमचे सगळे ग्रुप निरनिराळ्या ठिकाणी फिरून अजिंठा आणी वेरूळ लेण्यांचा इतिहास जाणून घेत होतो,
दुपारनंतर आकाशात अचानक काळे ढग जमू लागले आणी सोसाट्याचा वारा वाहू लागला, लवकरच जोरदार पाऊस सुरु झाला, आम्ही आमच्या इतर ग्रुपपासून दुरावलो होतो, पावसाने तर चिंब भिजलो होतो, समोरच्याच टेकडीवर आम्हाला एक गुहा दिसली, पाऊस थांबेपर्यंत आम्ही सर्वांनी त्या गुहेमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला, पाऊस थांबण्याची काहीच लक्षणं दिसत नव्हती, वातावरणात अंधारही पसरत चालला होता, बराच वेळ झाला, रस्ताही निसरडा झाला होता, आम्ही त्या पावसातच वाट शोधत जाण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग नव्हता, माझी मैत्रिण आणी आमचा एक सिनियर मित्र यांनी आता काहीही करून वाट शोधत हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतला आणि ते अंधारात वाट शोधत निघाले, पण वाट चुकले आणि आमच्यापासून दुरावले,
आता आम्ही खूप घाबरलो होतो, मी मात्र या जंगलात काळोखात वाट शोधत भटकत राहण्यापेक्षा आता त्या गुहेतच रात्र घालवण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही पुन्हा गुहेतच येउन थांबलो, तो माझा सिनियर सहकारी मला मात्र पूर्ण धीर देत होता, आम्हाला अतिशय भूक लागली होती पण जवळ खायला काहीच नव्हत, आता त्या तशाच भिजलेल्या अवस्थेत बसून रात्र काढण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता, त्यातच दुपार पासूनचे ओले कपडे तसेच अंगावर असल्यामुळे मला खुपच थंडी वाजू लागली आणि हुडहुडीही भरली, त्यातही तो सहकारी मित्र मला सतत धीर देत होता, आता पहाटे पर्यंत तिथेच त्याच अवस्थेत थांबण्याशिवाय दुसरा पर्यायाच नव्हता, अशातच आम्ही दोघांनी ती रात्र मनावर एक विचित्र दडपण घेऊन घालवली,
पण त्या रात्री जे होऊ नये तेच घडलं, कळत-नकळतचं आमच्याकडून नैतिकतेच्या सर्व सीमा ओलांडल्या गेल्या होत्या, पहाटे-पहाटे पाऊस थांबला आणि आम्ही दोघेही रस्ता शोधत हॉटेलवर येउन पोहोचलो, तो आता काल रात्री घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत होता आणि माझी माफीही मागत होता, पण चूक त्याची एकट्याची नव्हतीच, मीही त्याच्या त्या चुकीला प्रतिकार न करता अबोल राहून एक प्रकारे मूक-संमतीच देत होते, त्यामुळे झाला गेला प्रकार विसरून पुढे जाण्याचाच निर्णय आम्ही दोघांनीही घेतला, शेवटी दोघांच्याही बदनामीचा प्रश्न होताच,
नंतर काही महिन्यांनी मला साधारण प्रेग्नन्सीची चाहूल लागायला लागली आणि मी घाबरले, मी माझ्या मैत्रिणीसोबत तिच्या वाहिनीकडे गेले, ती डॉक्टर होती, तिने मला गर्भपात करण्याची वेळ टळून गेल्याच सांगितलं आणि मी पूर्णपणे कोलमडले, माझ्या आईला साधारण माझा हा प्रकार लक्षात आला, ती खूप चिडली, रागावली पण तिनेच शेवटी यातून एक मार्ग शोधून काढला, तिने मला तिच्या एका दूरच्या मावस बहिणीकडे गावाला पाठवून दिले,
काही महिन्यातच मी त्या एवढ्याशा खेड्यात एका गोंडस मुलाला जन्म दिला, त्याचं नाव मिहिर, आता माझी ती मावशी आणि तिची विधवा मुलगी त्या मुलाचा सांभाळ करू लागले, मी मात्र डिलिवरीनंतर पंधरा दिवसातच मुंबईला परत आले आणि इकडे काही घडलच नाही असं आपलं रुटीन जीवन सुरु केलं, पण माझं मन मात्र गावी माझ्या मुलामध्ये गुंतलं होत, आता त्याच्या पुढच्या भविष्याचा विचार करून मी त्याला कधीही न भेटण्याचा निर्णय घेतला, तशी सतत दोन-तीन वर्षातून एकदा मी त्याला गावी जाऊन भेटत असते, पण तो मला एक लांबची मावशी म्हणूनच ओळखतो, तोही आता मोठा झालाय, चांगल्या कोलेजात शिकतो, हुशार आहे, त्याला त्याचे आई-वडील कोण आहेत हे अजूनही ठाऊक नाही, त्याच्या शिक्षणासाठी मी गावी दर महिन्याला एक ठराविक रक्कम पाठवते, माझी मावशी आता वारली, पण माझी ती विधवा बहिण अजूनही अगदी आपल्या सक्ख्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ करते."
" ते सगळं ठीक आहे गं, पण त्याचा आता इथे काय संबंध."
" संबंध आहे ना, त्या मुलाचे, मिहीरचे वडिल म्हणजेच जे आता आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले अर्पिताचे वडिल प्रमोद हेच आहेत, कदाचित ते मला कुमुद म्हणून ओळखतील ही, पण अचानक हि गोष्ट एका परक्या व्यक्तीकडून समजण्यापेक्षा आधी मी तुम्हाला सांगतेय इतकंच. " इतक्यात बाहेरून प्रमोद विलासला हाक मारतो,
" काय विलासराव बाहेर या की, इतक काय बायकोबरोबर फ़ुसुर-फ़ुसुर करताय ?" तेव्हा विलास आणि कुमुद दोघेही बाहेर येतात, प्रथम प्रमोद कुमुद्कडे पहातच राहतो, थोडा खजिल होतो, पंण विलास आणि कुमुद इतक्या लाईटली घेतात की तो थोडा रील्याक्स होतो, आणि पत्नी नलिनी समोर कुमुदची पुन्हा एकदा माफी मागू लागतो, आणि नलिनीला म्हणतो,
" मी तुला माझ्या पूर्वायुष्यातील एका चुकीबद्दल सांगितलं होतं ना, तिच हि कुमुद, तिने खूप भोगलय माझ्यामुळे,"
" पण चूक तुमची एकट्याची नव्हतीच, मीही नकळत तुम्हाला साथ दिली होती, खरी चूक होती ती त्या परिस्थितीची," इतक्यात विलास कुमुद्ला मध्येच थांबवत प्रमोद-नलिनीला म्हणतो,
“ तुम्हाला नेहमी वाटत ना कि आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणार आणि आपण एकटे पडणार, तर आता तसं काही होणार नाही प्रमोदराव, तुमची हरकत नसेल तर तुम्ही अजूनही पूर्वी नकळत घडून गेलेल्या चुकीच प्रायश्चित्त घेऊ शकता, तुम्हाला कदाचित माहित नसेल, पण कुमुदला तुमच्यापासून एक मुलगा झालाय, मिहिर त्याचं नाव, आणि तो आता चांगला मोठाही झालाय, कोलेजला जातो, मी त्याला इकडे माझ्याकडे, त्याच्या स्वतःच्या आईकडे आणणार आहे, तुमची हरकत नसेल तर तुम्ही त्याला एक वडील म्हणून तुमच्याकडे घेऊन जाऊ शकता, पण त्याला आता एक हक्काचं घर मिळायलाच हवं, नव्हे तो त्याचा अधिकारच आहे."
" काय सांगताय विलासराव तुम्ही तर माझ्या मनावरच एक ओझं हलक केलंय, अर्पिता लग्न होऊन तुमच्या घरी आल्यावर आम्हाला काळजी लागली होती कि आता पुढचं आयुष्य आपण दोघानीच असं एकट कसं काय काढायचं, तुम्ही तर आम्हाला आमच्या पुढच्या आयुष्यात जगण्याची एक नवीन उमेद मिळवून दिलीत, चला आता उद्याच सकाळी आपण सगळेजण गावी जाऊन मिहिरला इकडे मुंबईला घेऊन येऊया,”
“ आणि कुमुद तू खरचं आम्हाला एक इतक गोड बक्षिस दिलं आहेस, मिहीरच्या येण्याने आपल्या प्रत्येकाला एक वेगळं नविन नातं मिळणार आहे, तुझे उपकार आम्ही दोघे कधीच विसरणार नाही,”
“ खरंच तुम्हा दोघांचे अगदी मनापासून धन्यवाद.”
कुमुद तू खरचं आम्हाला एक इतक
कुमुद तू खरचं आम्हाला एक इतक गोड बक्षिस दिलं आहेस, मिहीरच्या येण्याने आपल्या प्रत्येकाला एक वेगळं नविन नातं मिळणार आहे, तुझे उपकार आम्ही दोघे कधीच विसरणार नाही,” >>>>>> नोर्मल आयुष्यात हे इतक सोप्प असत का ?
इतक सोप आणि सहज कधीच काही
इतक सोप आणि सहज कधीच काही स्वीकारलं जात नाही ....... अगदी जुनी मैत्रीही खुपत असते .
नोर्मल आयुष्यात हे इतक सोप्प
नोर्मल आयुष्यात हे इतक सोप्प असत का ? नोर्मल आयुष्यात हे इतक सोप्प असत का =+ १
मिहिरच्या मनाचा काही विचार ?
मिहिरच्या मनाचा काही विचार ? अचानक आई-बाबा कळल्यावर त्याची काय रिएअॅक्शन होईल ?
खर्या जीवनात इतकं सगळं सोपं असतं का ?
इतक सोप आणि सहज कधीच काही
इतक सोप आणि सहज कधीच काही स्वीकारलं जात नाही .......खर्या जीवनात
दवणीय अंडे
दवणीय अंडे
इतक सोप आणि सहज कधीच काही
इतक सोप आणि सहज कधीच काही स्वीकारलं जात नाही .......खर्या जीवनात.++++++++१००
कसलाच कश्याला ताळ्मेळ नाहि अस वाटतय वाचताना
एक भाबडी कथा! लिहीण्याचा
एक भाबडी कथा! लिहीण्याचा प्रयत्न छान आहे. पुलेशु!