चढला वेल मांडवावर.

Submitted by सुभाषिणी on 12 April, 2015 - 03:30

माझ्या बागेत अलिकडेच एक गमतीची गोश्ट पाहिली. झालं असं मी दोडक्याचे तीन चार वेल लावले. त्याला चढवण्यासाठी लोखंडी ग्रील नेहमीचीच. वेल वाढला पण ग्रीलला काही पकडेना. मी रोज तयाला ग्रीलला गुनडाळे आणि दुस्र्या दिवशी वेलाने जमिनीवर लोळण घेतलेली असे. काही कळेना.
एकदा संध्याकाळी साधारण पाचवाजता पाणी घालायला गेले. पाण्याचा पाइप सोडताना हाताने ग्रीलला पकडले आणि हाताला चांगलाच चटका बसला. त्या क्षणी डोक्यात प्रकाश पडला वेल ग्रीलला का पकडत नाहीते. आता उपाय काय करायचा? मग सुचले. कारल्याचा वेल तयाचे आउष्य संपवुन सुकला होता. तो कापुन ग्रीलव्ररुन सोडला. आणि काय आश्च्ररय. वेल त्या आधाराने भरभ्रर वाढायला लागला.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी पण हीच चूक होत होती. आता दुधीचा वेल आलाय, करून बघते, आधी गवत पसरते, म्हणजे तापलेल्या लोखंडाचा वेलाला चटका बसणार नाही

आधीचा एखादा वेल त्या मांडवावर असेल आणि त्याचे आयूष्य संपले असेल, तर त्याचे फक्त मूळ कापायचे. त्या वेलांच्या काटक्यांच्या आधाराने दुसरा वेल वर चढतो आणि मांडवाचे लोखंडही तापत नाही.

हो दि.दा आता यापुढे असेच करेन. हे वेल आधीच दुसरीकडे लावले होते त्यामुळे असे करावे लागले.
डि.विनिता गांडुळ खत करवे रोडला एक मेडीकलचे दुकान आहे ते गां. खत ठेवतात विकायला.किरण मेडीकल नाव आहे . राका ज्वेलर जवळ आहे. पण बियाणे, खतांच्या दुकानात मिळते. स्वारगेटला नाइक तसेच शेती वस्तु भांडार येथे. गांडुळे मात्र कुठे मिळतात याची कल्पना नाही.

व्वा छानच. प ट क न ल्क्षात आले तुम च्या. आणि त्यावर उ पाय सु द्धा मिळवलात...
फो टो न क्की ये ऊ द्या ...

वा भारीच्चे हा किस्सा .....

मध्यंतरी आमच्या बागेत रानजाईचा एक वेल बराच वाढल्याने (आणि बहर कमी झाल्याने) छाटला होता. नवीन पालवी फुटून तो वेल आसपास वाढू नये व वरच्या बाजूला वाढावा म्हणून एक दोरी नीट वेलाच्या अगदी मुळाजवळ खाली सोडली होती - पण बरेच दिवस तो वेल दोरी पकडत नव्हता - मी नुसते निरीक्षण करीत होतो - आता एवढ्यातच वेलाने दोरीला ओळखून तिचे सहाय्य घेतले आहे Happy इतके दिवस (एक-दोन महिनेही असतील) तो वेल त्या दोरीला का पकडत नव्हता हे काही मला कळले नाही ....

माझ्याकडला अंगुरचा वेल तर बाजुला अख्खी एक मोठी झाडाची फांदी लावलीय तरी बिचारा बाजुबाजुलाच राहतोय Sad अस का होतय ? कुणाला अंगुर च्या वेलासाठी काही वेगळी काळजी घ्यावी लागते याची माहिती आहे का ? मला सांगा प्लीज ..

सरवांचे आभार. śrd तोंडल्याचा बेल कसा लावलात.कारण पुण्यात बर्याच ठिकाणी हिंडले. पण बी किंवा रोप काही मिळाले नाही. असच पॅशन फ्रुट पण नाही मिळाले. तुमहाला किंवा कोणालाहि माहित असेल तर सांगा प्लिज.

आता जुलै महिन्यात कुठकुठे कुंपणावर तोंडल्याचे वेल दिसतील ,ज्याला भरपूर तोंडली लागलेली दिसतात त्याचा तीन फुटभर तुकडा लावायचा.फक्त फुले येणारा वेल नर वेल असतो त्याला नाही तोंडली येत,करटोलीचा पण असाच रानातून आणि . बिया लावून नर वेलच फार तयार होतात.