तडका - संमेलनं

Submitted by vishal maske on 6 April, 2015 - 23:40

संमेलनं,...!

कुणी रूसलेले असतात
कुणी फूगलेले असतात
तर संमेलनाचे चटकेही
कुणी भोगलेले असतात

कधी संमेलनाच्या बाहेरचेही
संमेलनात फरफटले जातात
अन् टिका आणि वादांमध्ये
संमेलनं गुरफटले जातात,..!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी कविता छान आहे, पण

<< संमेलनं गुरफटले जातात,..! >>

याऐवजी "संमेलनं गुरफटली जातात,..!" अशी रचना हवी होती.

@ असं व्याकरण
वगैरे पाळलं, तर यमकं कशी जुळणार? >> Lol खरं आहे अगदी! Lol

वाट्टेल ते झालं तरी , यमकं जुळायला हवी
आत आशय कशाला?,मी तर नवा कवी

कविता म्हणजे काय शेवटी , दोन टोका चा हार
लिंबु नसे ना का पाण्यात , वाटलं पाहिजे ग्गार!

टाका पाहू वरतून आता चार बर्फाचे खड़े
अरे!! आता यमक कोणत? अय्या गडे! इश्श गडे!!! Lol

हाहाहा....... बरंय करमणूक चांगली होतेय तडका फडका खडका सडका भडका कडका मुळे

<< चेतनभाऊ,
काहीही सांगता तुम्ही! असं व्याकरण वगैरे पाळलं, तर यमकं कशी जुळणार ? >>

जुळेल की. तसं कशाला? मीच इथे जुळवून दाखवतो हे पाहा:-

कधी संमेलनाच्या बाहेरचीही
संमेलनात फरफटली जातात
अन् टीका आणि वादांमध्ये
संमेलनं गुरफटली जातात,..!

जुळलं की नाही? शिवाय बाहेरची हा शब्द आल्यामुळे कवितेला एक वेगळंच वजन प्राप्त झालं आहे.