Submitted by अत्रुप्त आत्मा on 6 April, 2015 - 10:08
दिवस संपला होता होता झालि संध्याकाळं
संध्येच्या त्या छायेमध्ये झोपे थकला बाळं
वाट वाकडी करून दिसाला संध्या छाया आली
बाळाच्या त्या चर्येवरती मावळणारि लाली
तो ही थकला ती ही थकली सांज वातीला जागा
उद्या पुन्हाही सकाळ होइल तोवरि कसला त्रागा?
मी ही वदतो छोटी कहाणी प्रत्येका दिवसाची
कुठे कुठे ती दिसे पौर्णिमा-बाकी ही अवसेची!
चला गड्यांनो समजुन घेऊ रूपक हे संध्येचे
जुने जाणते जे जगले ते साधे जीवन साचे
-----------------------------
अतृप्त..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा ! सुंदर कविता. गुर्जी,
व्वा ! सुंदर कविता.
गुर्जी, पूर्वीच्या काळी हिरो सगळ्याच क्षेत्रात प्रविण असायचा तसं तुमचे एकेक गुण (उधळणे नाही हो) हळूहळू कळाल्यावर वाटू लागले आहे.
धन्यवाद हो! __/\__
धन्यवाद हो! __/\__
वेगळा आहे विचार.. छान
वेगळा आहे विचार.. छान छंदबद्ध आहे