वचपा ( भाग ३ )

Submitted by यतिन-जाधव on 5 April, 2015 - 00:52

पुनम : बापरे किती भयानक प्रकार आहे, पण तू त्यांना कोर्टात खेचायचस ना, गप्प का बसलीस ?

सायली : माझ्याही मनात हा विचार अनेकदा आला, पण यात दोन्ही कुटुंबाची बदनामी तर होतीच, शिवाय माझ्या लहान दोन बहिणींची अजून लग्न व्हायची आहेत, त्याचं शिक्षण, त्यांची लग्न यासाठी माझे बाबा तरी कुठून पैसे उभे करणार होते, त्यांनी देखील हा निर्णय अगदी काळजावर दगड ठेवूनच घेतला असणार, नाही तर कुठले आई-वडील आपल्या मुलीच लग्न अशा मुलाशी करून देतील, शेवटी आमच्या गरिबीचा आणि लाचारीचा फायदा त्यांनी घेतला पण त्याचा मोबदला देखील मोजलाय, त्यांना तरी आता दोष देऊन काय उपयोग, जाऊदे मरू दे, सोड ना तो विषय, तू ड्रिंक्स घेशील ना, चल मस्त पार्टी करू.
......................................................................................................... क्रमश .......................

पुनम : म्हणजे तू ड्रिंक्स घेतेस ?

सायली : त्यात काय वाईट आहे, पुरुष घेतात, मग आपण घेतलं तर बिघडलं कुठे ?

पुनम : तसं नाही गं, पूर्वी मी घेत असे, आता ऑकेजनली घेते पण हॅबिट मात्र नाहीय

पुनम आणि सायली दोधीही मस्त पार्टी करतात, खाणं-पिणं होतं

सायली : पुनम, केतन तुला सोडून गेल्याला आता सात-आठ वर्ष झाली पण तू दुसर लग्न तर केलं नाहीस, मग तुला मनातून असं कधी वाटलं नाही का आपलं तारुण्य असंच वाया जातंय, आपणही मौजमजा करावी

पुनम : सुरवातीला मुलीच्या पालन पोषणात मी अगदी पूर्णपणे बिझी होते पण आता मुलगीही थोडी मोठी झालीय, तिचं ती सगळं करते, तेव्हा मनात कधीतरी हा विचार डोकावतो, पण करणार काय त्यासाठी दुसर लग्न करणं मात्र मला जमणार नाही त्या पेक्षा मी आहे तशीच ठीक आहे

सायली : अगं मौजमजेसाठी लग्न-बिग्न करायची गरजच काय ? लग्नाशिवायही हे सगळं विकत मिळतं अगदी घरच्यासारखं निश्चिंत

पुनम : म्हणजेss तूs

सायली : अगदी बरोबर, अगं पैसा फेकला कि सगळी सुख तुमच्यासमोर अगदी हात जोडून उभी असतात

पुनम : पण यात खुप रिस्क आहे ना बदनामीची ?

सायली : अजिबात नाही, अगं दुनिया स्वतःच्या व्यापातच इतकी बिझी असते कि दुसरा काय करतोय हे पाहायला कोणाला एवढा वेळ असतो, बघं तुझी हरकत नसेल तर आज रात्रीss

पुनम : नको नको, मला नाही जमणार, दोन वर्षापूर्वी मी एकदा हा असाच अनुभव घेतला होता माझ्या एका कलीग बरोबर पण नंतर माझी मलाच लाज वाटू लागली, बरेच दिवस मला अपराधी असल्यासारख वाटत होतं, मला नाही पटत हे सगळं

सायली : अगं घाबरतेस कशाला, हा सगळा व्यवहार इतका कॉन्फिडेनशियल असतो, या कानाची खबर त्या कानालासुद्धा होत नाही

पुनम : नको, तरी पण भीती वाटते

सायली : मी आहे ना, मगाशी मी तुला म्हणाले ना कि मी पुण्याहून आठवड्यातून तीन-चारदा मुंबईत येते ती या सुखासाठीच

पुनम : पण तुझं वेगळय, तुला या सुखातून तुझ्या सासरच्या मंडळींना वारस द्यायचा आहे

सायली : छल, वेडी आहेस का ? घरी पुण्याला गेल्यावर दर चार-सहा महिन्यानंतर सासू माझ्याकडे हा विषय काढते, पण मला आता मुळात त्यांना वारस द्यायचाच नाहीय, मला असंच त्यांना तरसवत ठेवून माझ्या फसवणुकीचा सूड घ्यायचाय, बाकी माझं काय, माझं लाईफ मी चांगलीच एन्जॉय करतेय, जाऊदे सोड ना तो विषय.

सायली आता पूनमला तिच्या स्पेशल बेडरूम मध्ये घेऊन जाते व धीर देत तिथेच थांबायला सांगते आणी बाहेर येउन मोबाईलवरून हळू आवाजात फोन करते व त्यांना ठरलेल्या वेळी नेहमीच्या ठिकाणी घेण्यासाठी गाडी पाठवते, साधारण तासाभराने गाडीतून दोन तरुण अरमान आणि निषाद बंगल्यावर येतात आणि सायलीला गुड इव्हिनिंग करून नेहमीप्रमाणे एकालाच न बोलावता अचानक एकाच वेळी दोघांना एकत्र बोलावल्याबद्दल आपली उत्सुकता व्यक्त करतात, सायली त्यांना तिच्यासोबत आज एक मैत्रीण देखील असल्याचं सांगते आणि दोघांपैकी एकाला तिच्यासोबत शैय्यासोबत करावी लागणार असल्याचं सांगुन निषादला आपल्या बेडरूम मध्ये घेऊन जाते व अरमानला पूनमच्या रुममध्ये पाठवते, साधारण एक दीड-दोन तासानंतर सायली आणि निषाद रूममधून बाहेर येतात, सायली निषाद्कडे एक गिफ्ट बॉक्स आणि पैशाचं पाकीट देते आणि अरमान अजून कसा बाहेर आला नाही हे पाहण्यासाठी पूनमच्या बेडरूमजवळ जाते, तेव्हा तिला आतून काहीतरी खुसुर-फ़ुसुर बोलण्याचा आवाज ऐकू येतो, ती जवळ जाऊन ऐकण्याचा प्रयत्न करते, पण तिला नीटसं काही ऐकू येत नाही, सायली आता दरवाजावर हलकीशी थाप मारून अरमानला हाक मारते थोड्या वेळाने पुनम आणि अरमान दोघेही एकमेकांच्या कमरेत हात घालून दरवाजा उघडून बाहेर येतात सायलीला काहीच बोध होत नाही ती खुणेनेच पूनमला विचारते काय झालं व्यवस्थित ना सगळं इतक्यात अरमान हातानेच सायलीचं बोलणं थांबवतो आणि पुढे येउन मागे लांब उभ्या असलेल्या निषादला म्हणतो, निषाद तू पुढे निघ, मी नंतर येतो, निषाद निघून जातो आता अरमान आणि पुनम दोघेही बाहेर सोफ्यावर येउन बसतात सायली त्यांना आता विचारते

सायली : अरमान, पुनम हा सगळा काय प्रकार आहे

पुनम : सायली आज तू मला खूप मोठं गिफ्ट दिलंयस आणि तेही अगदी अनपेक्षित

सायली : काय ? कसलं गिफ्ट अरमान काय म्हणतेय ही

पुनम : अगं हा अरमान नसून केतन आहे, माझा नवरा

सायली : कायsss ?

केतन : सॉरी मॅम, इतके दिवस मी माझी ओरीजनल आइडेंटिटी लपवली होती, या आधीही मी इथे तीन-चारदा येउन गेलोय, पण मी माझं नाव तुम्हाला अरमान असंच सांगीतलं होतं, तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या या अशा व्यवहारात काही सिक्रेट्स तर पाळावीच लागतात, पण इतक्या वर्षांनी आज अचानक पूनमला भेटून आम्हाला दोघांनाही सुरवातीला आम्ही पूर्वी केलेल्या चुका आठवल्या आणि त्याचे परिणाम देखील आम्ही दोघांनीही अगदी पुरेपूर भोगलेत

सायली : मग आज हा इतका आनंदाचा महत्वाचा क्षण तुम्ही एन्जॉय केला की नाही

पुनम : अगदी मनापासून, थॅंक्स सायली

केतन : आज मी जे दोन तास पुनम बरोबर घालवले, ते माझे हक्काचे आणि खऱ्या प्रेमाचे होते त्यात कोणत्याही प्रकारचा भाडोत्री कामाचा भाग नव्हता, आता आम्ही दोघांनीही पूर्वीच सगळं विसरून जाउन पुन्हा एकदा एक नवीन आयुष्य सुरु करण्याचा निर्णय घेतलाय, मलाही माझ्या मुलीला कधी एकदा पाहतोय अस झालंय बहुतेक उद्या सकाळीच आम्ही बॅंगलोरला निघू, थॅंक्स वन्स अगेन.

पुनम आणि केतन दोघेही आता परत जायला निघतात, पुनम येउन सायलीला मिठी मारते आणि तिचा निरोप घेऊन निघते, सायली त्या दोघांकडेही अगदी प्रेमभराने पाहते आणि विचार करू लागते, अगदी अचानक पुनमची भेट झाली आणि अनपेक्षितपणे तिला तिचा नवराही पुन्हा परत मिळून त्यांचा विस्कळीत झालेला संसार पुन्हा मार्गी लागला, पण आता आपल्या आयुष्यात आपल्याला हवा असलेला तो क्षण अनपेक्षितपणे केव्हा येईल त्याची वाट पाहत बसण्यापेक्षा आपण एक नवीन व्होडका संपवणचं इष्ट, असं म्हणून सायली पुन्हा कपाटातून एक नवीन अख्खी बॉटल काढून उघडते आणि चियर्सss म्हणत तोंडाला लावते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनपे क्षित शेवट. सायली व पूनमची गोष्ट अजून पुढे का रंगवली नाही? ( क्रमशः दिसले नाही म्ह्णून हाच शेवट असावा असे ग्रुहित धरले आहे.