कदाचित आतापर्यंत बहुतेकांनी यूट्यूबवर दिपीकाचा "माय चॉईस" विडिओ बघून झाला असेल.
नाही, तर मग आता बघा.
बस्स ३-४ मिनिटेच लागतील, पण यातच बरेच काही सांगून जाणारा...
https://www.youtube.com/watch?v=KtPv7IEhWRA
फक्त हा विडिओ बघताना तुम्ही मराठी वा महाराष्ट्रीय आहात, शहरातले वा खेड्यातले आहात, भारतीय वा एनआराय आहात वगैरे थोडावेळ बाजूला सारून फक्त एक स्त्री किंवा पुरुष आहात हेच ध्यानात ठेवून बघा.
दोनचार दिवसांतच लाखो हिटस मिळालेल्या या विडिओबद्दल मी तुर्तास ईतकेच म्हणेन,
मला आवडला!
ईतरांचे विचार जाणून घ्यायलाही आवडतील, पण मत मांडायच्या आधी विडिओ जरूर बघा.
असो, त्या निमित्ताने चार शब्द दिपीकाबद्दल.
दिपीका प्रकाश पदुकोन!
स्टार बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोन यांची मुलगी म्हणून माझी तिच्याशी पहिली ओळख झाली.
आजही ती त्यांचीच मुलगी आहे, पण तिने त्याहीपेक्षा मोठी अशी स्वताची ओळख निर्माण केली आहे.
काय, कशी, किती, हे नव्याने कोणायला सांगायची गरज भासू नये. ईतकी मोठी.
पण एक नक्की, हा विडिओ तीच करू शकते, हे विचार तीच मांडू शकते..
तिच्या अभिनयाचा, दिसण्याचा, स्टाईलचा, ड्रेसिंग सेन्सचा, स्मार्टनेसचा.. अॅण्ड येस्स, मी प्रचंड मोठा फॅन आहे ते तिच्या अॅटीट्यूडचा!
बॉलीवूड कलाकार वा सेलिब्रेटींना अफेअर्स काही नवीन नाहीत,. पण त्यातही, आपल्याकडे पुरुषांचे एकापेक्षा जास्त अफेअर्स त्यांना कूल डूड बनवतात तेच स्त्रियांच्या बाबतीत त्यांना कॅरेक्टरलेस ठरवतात., बस्स याच नियमाला ती सर्वार्थाने तडा देणारी वाटली, नेहमीच!
तिचे आजवर ज्याच्या कोणाशी नाव जोडले गेले, त्यात नेहमीच, मला तिचा तो वाटला तिची "माय चॉईस!" ..
तिने आपल्या मर्झीने नाती जोडली, तिने आपल्या सोयीने सारी बंधने दूर सारली. पण ना कसला कलंक ना कोणता दाग. आजही ती बॉलीवूडची ग्लॅमरस डॉल म्हणून ओळखली जाते. सर्वांना हवीहवीशी वाटणारी हिरोईन. कारण तिची डिग्निटी तिने शाबूत ठेवलीय. नव्हे, काय कोणाची बिशाद त्याला धक्का पोहोचवायची.
बस्स, या विडिओमध्ये एक दिपीका पदुकोन होती म्हणूनच हा विडिओ मला तरी कुठल्याही प्रकारचा पब्लिसिटी स्टंट वा ढोंग वा दुटप्पीपणा वाटला नाही.
तिने अभिनयक्षेत्र निवडले म्हणून तिने जे जे केले त्याची चर्चा झाली, पण ईतर कुठल्याही स्त्रीने आपल्या आयुष्यात तिच्यासारखा अॅटीट्यूड आणि कॉन्फिडन्स बाळगून जगायला हरकत नाही. मग क्षेत्र कोणतेही असो.
याचा अर्थ तिने आपल्या आयुष्यात जे केले तेच केले पाहिजे असे मुळीच नाही, ईनफॅक्ट ते जर तुमच्या तत्वात बसत नसेल तर मुळीच करू नका, आफ्टरऑल ईट्स "युअर चॉईस"..
जाता जाता एवढेच सांगेन,
ती अशी आहे जिचा प्रत्येक पुरुषाला हेवा वाटावा,
तो हि ईतका, की जर त्याला पुढचा जन्म स्त्रीचा मिळणार असेल तर त्याने देवाकडे तो दिपीकाचा मागावा.
....................
तळटीप - यात कुठल्याही प्रकारचे सर्कास्टिकपणा वा उपरोध शोधायला जाऊ नका.
त्यापेक्षा बघितला नसल्यास विडिओ बघा,
हि घ्या पुन्हा एकदा लिंक - https://www.youtube.com/watch?v=KtPv7IEhWRA
- ऋन्मेष
.
.
गुरूदत्त यांची ती नात आहे हे
गुरूदत्त यांची ती नात आहे हे राहीलं लेखात.
गुरूदत्त वरून आठवलं. दीपीका काहीशी वहीदा रेहमान सारखी आहे, पण वहिदा शंभर पटीने सुंदर होत्या हे मान्यच आहे..
गुरूदत्त यांची ती नात आहे हे
गुरूदत्त यांची ती नात आहे हे राहीलं लेखात. >>> म्हणजे काही कळलं नाही.
गुरु दत्त पदुकोण हे दीपिकाचे
गुरु दत्त पदुकोण हे दीपिकाचे (दूरच्या का होईना ) नात्यात आहेत असं तिच्या एका मुलाखतीत ऐकलं होतं. वयाचा अंदाज घेऊन ती नात असावी असा आपला अंदाज... काका - पुतणी असणे शक्य वाटत नाही.
माय चॉईसला जास्तच ताणलय असं
माय चॉईसला जास्तच ताणलय असं दिसतय व्हीडीओ मधे.
मला आवडला.
मला आवडला.
मलाही आवडला व्हिडीओ..उथळ आहे
मलाही आवडला व्हिडीओ..उथळ आहे आणि त्यात चुकीच्या गोष्टी देखिल आहेत पण तेच तर! मुलींना चूका करण्याचा चॉईस का असू नये? आज आपण चुकू म्हणून काहीही करायला घाबरणाऱ्या मुली आहेत कारण "मर्द करे तो गलती औरत करे तो गुनाह" ह्या विचारसरणीचा समाज आहे आजूबाजूला. जेव्हा दोघांच्या चूका समानतेने तोलल्या जातील तेव्हा खरी समानता येईल!
ओव्हरऑल चांगला आहे, आवडला. ते
ओव्हरऑल चांगला आहे, आवडला. ते "से* आउटसाईड द मॅरेज" आवर्जून सांगणे अनावश्यक होते (विशेषतः भारतात ते कायदा मोडण्याचे समर्थन होईल), कारण ते जनरलाईज करता आले असते, पण तेवढेच धरून सगळा व्हिडीओ डिसमिस करण्याची गरज नाही. एकूण मेसेज चांगला आहे.
>>> गुरु दत्त पदुकोण हे
>>>
गुरु दत्त पदुकोण हे दीपिकाचे (दूरच्या का होईना ) नात्यात आहेत असं तिच्या एका मुलाखतीत ऐकलं होतं. वयाचा अंदाज घेऊन ती नात असावी असा आपला अंदाज... काका - पुतणी असणे शक्य वाटत नाही.<<<<
आँ? ते गुरुदत्त तर बंगाली आहेत . कुठल्या बाजूने नातं?
तिची आई च्या नात्याने तर नाही आणि बाबाच्या पण नाही मग?
जिज्ञासा +१ ! मी काल परवा
जिज्ञासा +१ ! मी काल परवा फेसबूक वर टाकली होती पोस्ट ह्याविषयी तीच इथे परत टाकतो.
I think the comment in the video has not been taken in the right context by the people who are calling the video hypocritical (there was another article about this).
The video talks about a woman's individuality and all the comments she makes should be perceived keeping that context in mind. When she says "It's my choice" it means just that, it's a choice, not right or wrong. The current problem we have in India is women are not free to choose whatever they want.
Man or woman once a person makes a choice what also falls upon them is to accept the consequences that follow.
But to be able to choose whatever they want is a fundamental right.
The different choices the video talks about are just examples of where women are routinely forced to choose differently.
In the example where she says "I have the right to have sex before marriage or outside of marriage" simply means whatever she does is none of anybody else's business but just hers. No one gets to decide what a woman should or shouldn't do just because she is a woman.
The video is specifically about women's fundamental right of choice and not about equal rights. It's targeted towards people (men and women both) who don't understand they do not have the right to decide what a woman should choose.
लेख नेमका दिपीका बद्दल आहे की
लेख नेमका दिपीका बद्दल आहे की व्हिडिओ बद्दल?
व्हिडिओ आवडला. पटला
जिज्ञासा, बुवा +१
<आँ? ते गुरुदत्त तर बंगाली
<आँ? ते गुरुदत्त तर बंगाली आहेत . कुठल्या बाजूने नातं?>
गुरुदत्त यांचं मूळ नाव वसंतकुमार शिवशंकर पदुकोण
झंपी तै तुम्हाला माहीत आहे का
झंपी तै
तुम्हाला माहीत आहे का की गुरुदत्त नक्की मूळचे बंगालचेच म्हणून ? बंगळुरू शी त्यांचा काही संबंध नाही का ?
गुरुदत्त बंगाली नव्हेत कन्नड़ा
गुरुदत्त बंगाली नव्हेत कन्नड़ा आहेत. मुळचे धारवाड हुबली कडचे बहुदा. श्याम बेनेगल त्यांचे नातेवाईक. ते पण बंगाली नाहीत
गुरु दत्त हे नंतर घेतलेले नाव
गुरु दत्त हे नंतर घेतलेले नाव आहे, बंगाली प्रभावामुळे. जन्म बेंगलोरचा असला तरी पुढे वडिलांच्या नोकरीमुळे त्यांचे बालपण कलकत्त्यात गेले आणि त्या संस्कृतीने प्रभावित होऊन नाव बदलले.
गुरूदत्त पादुकोण आहेत पण
गुरूदत्त पादुकोण आहेत पण त्यांचं आणि दीपिकाचं नातं (असलंच तर फार) लांबंच आहे.
गुरूदत्त बंगाली नाहीतर तुळू आहेत. त्यांचा जन्म बंगलोरचा पण मूळ गांव मंगळूरजवळ आहे.
पदुकोणे कुटुंब मूळचे काश्मिरी
पदुकोणे कुटुंब मूळचे काश्मिरी असून ते बंगलूरू मधे स्थायिक झालं असं कल्पना लाझ्मी म्हणतात. लाझ्मी या गुरुदत्त यांच्या नात्यात आहेत.
पदुकोणे नावाचं गावच आहे उडुपी
पदुकोणे नावाचं गावच आहे उडुपी रोडला. पदुकोणे आडनाव नसून त्या पर्टीक्युअलर सबकास्टचं नाव आहे (बहुतेक!! खात्री करावी लागेल) पण तिथल्या बर्याच कुटुंबांचं आडनाव पदुकोणे आहे, पण ते एकमेकांशी नात्यामधे असतीलच असे नाही (नसतील असेही नाही) देवाडिगांप्रमाणे तेही आपापसांत लग्न करत असतील तर सर्वांचीच आडनावं (त्या पर्टीक्युलर सबकास्टमध्ये) पदुकोणेच असणार.
अच्छा. तसंही असू शकेल. इथं
अच्छा. तसंही असू शकेल.
इथं वेगळी माहीती आहे.
http://www.bollywood.com/kalpana-lajmi-wants-work-relative-deepika-padukone
व्याभिचाराचे समर्थन सोडले तर
व्याभिचाराचे समर्थन सोडले तर बाकी व्हिडीओ छान आहे.
<< ईतरांचे विचार जाणून
<< ईतरांचे विचार जाणून घ्यायलाही आवडतील, पण मत मांडायच्या आधी विडिओ जरूर बघा. >>
पाहिला. अर्धवट वाटला. तिने फक्त माय चॉईस काय आहे हे सांगितलंय. तो "चॉईस" बरा-वाईट जसा पण असेल तो निवडण्याच्या स्वातंत्र्याबद्दल मोठ्या गर्जना केल्या आहेत. परंतु तो पर्याय निवडल्यावर होणार्या परिणामांबद्दल काय? ती देखील तिचीच जबाबदारी आहे. आता तिने या व्हिडीओचा पुढचा भाग "इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी" या नावाने काढावा तरच संतुलन साधले जाईल. नाही तर कसंय ती कसेही कपडे घालणार, कुणाबरोबरही, कधीही XXX करणार, आणि काही बरंवाईट झालं तर मग मात्र संपूर्ण समाजाला दोष देणार हे काही पटत नाही.
दीपिकाचं ठीक आहे. ती सेलिब्रिटी आहे. ती तोकडे कपडे घालून समाजात बिनधास्त वावरू शकते कारण ती तिच्या महागड्या वातानुकूलित वाहनात बसून बंद काचाआड प्रवास करणार आहे. तिच्या सोबत तिच्या संरक्षणाकरिता तिचा वाहनचालक, व्यवस्थापक आणि अंगरक्षक देखील असतील. तिला कसला त्रास होणार देखील नाही. परंतु तिचं अंधानुकरण करण्याच्या नादात सामान्य तरूणी तसे कपडे घालून, उपनगरी रेल्वेतून फिरतील. तेव्हा त्यांना समाजकंटकांकडून त्रास झाला तर त्या स्वतःचा बचाव कसा करणार? उंच टाचेच्या पादत्राणांमुळे तर पळता देखील येणार नाही. अशा वेळी काही गैरप्रकार घडला तर समाजाला दोष द्यावा का? म्हणजे जर त्यामुळे काही गैरप्रकार घडला तर त्याचं समर्थन मी नक्कीच करत नाहीये. त्या महिलेशी त्यावेळी गैरवर्तन करणारा तो समाजकंटक दोषी आहेच पण त्या महिलेने त्या विशिष्ट समाजकंटकाविरोधात निश्चितच गुन्हा नोंदवावा आणि उचित कायदेशीर कारवाईची अपेक्षा करावी हे देखील रास्तच. परंतु संपूर्ण समाजाला दोष नक्कीच देऊ नये. आपल्या "चॉईस"चे परिणाम आपणच भोगावे लागतात, नव्हे ती आपली "रिस्पॉन्सिबिलिटी"च असते.
स्वातंत्र्याच्या हक्काच्या जाणीवेसोबतच जबाबदारीच्या कर्त्यव्याची जाणीव देखील असायलाच हवी.
या संदर्भात मुंबईतील एका मॉडेलचं उदाहरण इथे आवर्जून मांडावंसं वाटतं. तिने एका पोलिस उच्चाधिकार्यासमवेत संबंध ठेवलेत. त्याच्यासोबत कुठल्याशा सदनिकेवर अनेकदा गेली. त्याच्याकडून भेटीदेखील स्वीकारल्या. नंतर त्यांचं बिनसल्यावर मात्र तिने त्या संपूर्ण समाजाला किंवा पोलिस दलाला देखील दोष न देता केवळ त्या विशिष्ट पोलिस उच्चाधिकार्याविरोधात गुन्हा नोंदविला, पुरावे सादर केले आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली. गैरप्रकारांना बळी पडणार्या स्त्रियांनी संपूर्ण समाजाला दोष देण्यापेक्षा अशा प्रकारे पावले उचलण्याची अपेक्षा आहे.
<< माय चॉईस "दिपीका"
<< माय चॉईस "दिपीका"
>>
धाग्याच्या शीर्षकातून वेगळाच अर्थ निघतोय. ऋन्मेऽऽष यांची निवड आता सई नसून दीपिका आहे असं वाटतंय.
धाग्याच्या शीर्षकातून वेगळाच
धाग्याच्या शीर्षकातून वेगळाच अर्थ निघतोय. ऋन्मेऽऽष यांची निवड आता सई नसून दीपिका आहे असं वाटतंय. >>> रुन्मेश आता एक मोठ्ठा लांबलचक प्रतिसाद लिहायला घे बघू![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
हो , आणि प्रतिसाद पुन्हा हेडर मधे टाकायला विसरू नकोस.
धाग्याच्या शीर्षकातून वेगळाच
धाग्याच्या शीर्षकातून वेगळाच अर्थ निघतोय. ऋन्मेऽऽष यांची निवड आता सई नसून दीपिका आहे असं वाटतंय. >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
धन्य आहात ..
असो.. मुळात दिपीका अज्ज्याबात आवडत नसल्या कारणाने विडीओ बघीतला नै.. लोक बघ बघ म्हणून अती हॅमरिंग करतील ऑर चुकुन कदी नेट ची स्पीड बर्यापैकी मिळाली तर शायद विचार करेल ..
बाकी लेख म्हणजे परत एकदा व्यक्तीपुजेचा नमुना वाटला . ती व्यक्ती चांगलीच असेल प्रश्नच नै पण खुप खुप खुप खुप खुप जास्त उदो उदो केला कि जीवावर येत एवढचं ..
जाता जाता एवढेच सांगेन,![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ती अशी आहे जिचा प्रत्येक पुरुषाला हेवा वाटावा,
तो हि ईतका, की जर त्याला पुढचा जन्म स्त्रीचा मिळणार असेल तर त्याने देवाकडे तो दिपीकाचा मागावा. >> का कुणास ठाऊक माझ्या दादाला (पूर्ण परिवारालाच खर तर) माणशा (माणसासारखी) वाटते
वर नंदिनी यांनी
वर नंदिनी यांनी म्हटल्याप्रमाणे पदुकोणे (की पडुकोणे-पडुकोने-पदुकोने?) हे गावाचे नाव आहेच. मला वाटते चित्रापुर सारस्वतांमध्ये हे आडनाव असते कारण सारस्वतांपैकी चित्रापुर सारस्वतांत गावाचे नाव हेच आडनाव लावण्याची पद्धत आहे. गोव्यामध्ये आणि महाराष्ट्रात गावाच्यापुढे 'कार' किंवा 'कर' लावतात. पण आडनावात गाव नसलेलेही रेगे, घुमे, लवंदे, भांडारे, नाडकर्णी, पै, कामथ आणि कामत वगैरे लोक जी एस बींमध्ये असतात. चित्रापुरवाल्यांमध्ये मात्र फक्त ग्रामनाम असते. उदा. पडबिद्री, भटकळ, गुलवाडी, हट्टंगडी, कुंदापुर, मंजेश्वर, बलसे, बसरूर, बैलुर, कल्याणपुर, वकनळ्ळी, हेज्जमाडी, हेम्माडी, शिराली, कार्नाड, कासारवल्ली, नायमपळ्ळी, कुमठा, मल्लापुर वगैरे.
पडुकोणेप्रमाणेच 'गंगोळी' हेही नाव गुरुदत्तांच्या संदर्भात ऐकले आहे. त्यांची आई वासंती पडुकोणे ह्या गंगोळी होत्या का लग्नापूर्वी?
कोण नक्की कोणत्या जातीचा हे
कोण नक्की कोणत्या जातीचा हे चघळण्याची सवय, अॅज इंडियन, अवर चॉईस नव्हे, तर मजबूरी झालिये![102.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u35881/102.gif)
व्हिडिओ आवडला. पटला
व्हिडिओ आवडला. पटला
Iblis, 1000+
Iblis, 1000+
धाग्याच्या शीर्षकातून वेगळाच
धाग्याच्या शीर्षकातून वेगळाच अर्थ निघतोय. ऋन्मेऽऽष यांची निवड आता सई नसून दीपिका आहे असं वाटतंय.
>>>>
वेगळाच नाही, तर आणखी एक अर्थ निघतोय असे म्हणा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि हो येस्स,
लिहिताना मी आधी शीर्षक "माय चॉईस - दिपीकाची की आधुनिक स्त्रीची?" असे शीर्षक दिले होते.
पण लिहून झाल्यावर ध्यानात आले की दिपीकाही मला आवडते, ती माय चॉईस आहे, मी तिचा चाहता आहे, म्हणून असे आणखी एक अर्थ निघणारे शीर्षक मुद्दामहून दिले.
आता यावरून आपण काढलेला निष्कर्श - "ऋन्मेऽऽष यांची निवड आता सई नसून दीपिका आहे असं वाटतंय." .. हा पुर्णपणे या गृहीतकावर आधारला आहे की "एका पुरुषाची आवडती नटी एकच असावी!" जे मुळातच चुकीचे आहे. किंबहुना तशी माझ्यावर सक्ती केल्यास ते निसर्गाने एक मनुष्य म्हणून मला दिलेल्या मूलभूत हक्कांवर गदा आणण्यासारखे होईल. मला सई आवडते, शाहरूख आवडतो, स्वप्निल आवडतो आणि येस्स दिपीकाही आवडतेच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इथे भरेच जणांनी व्यभिचाराचा
इथे भरेच जणांनी व्यभिचाराचा मुद्दा उपस्थित केलाय. या विडीओला विरोध करणार्यांनी तर तोच मुद्दा उचलून धरलाय. तसेच काही समर्थन करणार्यांनीही सेफ गेम खेळत त्याला वगळून समर्थन दिलेय.
त्यामुळे इथे "व्यभिचार म्हणजे काय?" हा वयात आल्यापासून किंबहुना त्याही आधी अक्कल आल्यापासून मला पडणारा प्रश्न पुन्हा डोक्यात रेंगाळू लागलाय. पण तुर्तास तो स्वतंत्र्य धाग्याचा विषय मला वाटत असल्याने इथे ते डोक्यातले रेंगाळणारे विचार उतरवत नाही..
Pages