खरेतर हि जुनि कथा आहे. पण १ एप्रिल चि आठवण करुन देणारि म्हणुन परत सादर करत आहे. तसा ऊशिरच झला आहे.तरि पण.......
हलकासा धक्का जोरसे लगे
``रावसाहेब, आंत येऊ कां ?``
``कोण ? तुकाराम , आणि हे कोण बरोबर ?``
``रावसाहेब , गेल्या चार दिवसापासून ह्ये म्हातारे आजोबा रोज येतायत. आज बी सकाळपासून त्यांनी काय बी खाल्ल नाही. त्यांच एवढ जमिनिची काय काम आहे ते करुन टाका की ?``
``अस , तु कोण रे ? आं ? हे बघ एका कागदावर ऑर्डर टाइप कर. आणि तुझीच सही करुन ऑर्डर देऊन टाक यांना. काय झाल न मग कांम ? अरे येडा का खुळा ? किती वर्षे झाली तुझ्या सर्विसला ?``
``आता पुढल्या वर्षी रिटायर होणार मी साहेब``.
``तुझ्या डोक्याच्या पांढ-या केसांकडे बघुन जास्त काही बोलत नाही , म्हणून आता माझ्या डोक्यावरच बसायला लागलास ? तु इथे कोण म्हणुन आहेस ?"
`` मी चपराशी साहेब``.
``मग चपराशा सारखच वाग. नाक वर करुन बोलु नकोस. कळल ना ? आता मी तुझ्याकडून शिकू की कोणाच काम करु नी कोणाच नको ?``
``बाबा.जाऊ द्याहो . माझ्यापाई तुम्ही कां बोलनी खाता यांची ? चला बाहेर. ``आजोबा खोकत म्हणाले.
तुकाराम आजोबां बरोबर केबीन बाहेर आले. काय हे साहेब ? गेले सहा महिने झाले इथे यांना ट्रान्सफर होऊन, पण डोक्याला ताप आणलाय. इतकी वर्षे झाली आपण इथे ह्या सरकारी खात्यात नोकरी करतोय पण अस वेडवाकड आपल्याला बोलणारा कुणीच भेटला नाही. बोलायचि काहि यांना पद्धतच नाहि. फक्त कॉन्ट्रक्टर व त्यांची माणस आली की कसे हळुहळु त्यांच्याशी बोलतात. चहापाणी काय, पार्टी काय. अन ही गरीब माणस आली की त्यांना तसच तटकाळत ठेवतात. आपला अपमान करतात ? तरी बर कसबस वाचलय हे बेण. जिह्याच्या ऑफीसमध्ये अँटिकरप्शनवाल्यांनी पकडले. पण हे आहेत इथल्या मिनिस्टर साहेबांच्या बायकोचे भाऊ. त्यांनी कशी बशी ही केस मिटवली. पण ह्यांची इथे तालुक्याला ट्रान्सफर झाली. तोंड एवढ वाईट की नुस्त इंजिनियर मोहन घाडगे -पाटील एवढे नुसते म्हटले तरी शेकडयात 95 टाळकी भडकलेलीच भेटतील. मीच सहा महिन्यांपासून असली बोलणी खातोय. ह्यांना काय तरी धडा शिकवलाच पाहिजे.
``तुकाराम तुकाराम ?``
``काय साहेब, काय काम आहे ? मी विनायक साहेब ."
``अरे तुकाराम कुठ गेलाय सकाळ पासून ?``
``साहेब सकाळीच नाही का काही टपाल घेऊन ते कोल्हापुरला जिह्याच्या ऑफिसात गेले ?``
``काय न सांगता जातात कळत नाही. युजलेस सगळे. जा आधी पाणी आण. आणि हे , हे कसल लेटर टेबलावर आहे ?``
``म्हाईत नाही साहेब``.
``बर जा``.
टेबलावर एक सरकारी कव्हर मधला लखोटा होता. वर लिहिलेल "गोपनीय ". काय असाव बर ? अचानक हे काय आल अस मनाशीच म्हणत घाडगे-पाटील साहेबांनी ते फोडल. आणि आनंदाने ते उडालेच. फक्त त्यांच्याच ट्रान्सफर ऑर्डरच लेटर व तिहि कोल्हापुरला. त्यांनी अधाशासारखे ति परत परत वाचलि .
``..... हा आदेश तात्काळ परिणामासह अंमलात येत आहे. संबंधित अधिका-याने कार्यभाग हस्तांतराची स्थानिक व्यवस्था करुन कार्यमुक्त व्हावे व आदेशित पदस्थानाच्या ठिकाणी तातडीने रुजु व्हावे.``
त्यांच्या आनंदाला पारावारच राहिला नाही. तालुक्याच ऑफीस म्हणजे एक तर इथे मानहानी होऊन ट्रान्सफर होऊन आलेले. त्यामुळे इथला प्रत्येक माणूस आपल्याला बोलत नाही, पण आपल्याला बघुन मनात हसतो, हीच भावना सारखी त्यांच्या मनात यायची. शिवाय इथल बजेट ही लहान.
``हॅलो, हॅलो ताई. आबासाहेब आहेत का?``
``कारे ,एकदम आनंदात दिसतोस ``
``अग माझी ट्रान्सफर झाली. परत कोल्हापुरात. आबासाहेब म्हणाले होते की सहा महिने तरी दुर रहा मग बघु. त्याप्रमाणे झाले. सहा महिन्यानंतर पहिल्याच तारखेला ट्रान्सफर."
``हे तर मिटींगला मुंबईला गेलेत``.
``तरीच त्यांचा मोबाईल बंद आहे. मी सारखा लावतोच आहे त्यांना. पण जर त्यांचा फोन आलाच तर त्यांना ही गुड न्युज दे. म्हणजे त्यांना माहीती असेलच , कारण त्यांनी केल म्हणून तर झाल. पण नक्की त्यांना सांग हं ``.
लगेच घाडगे-पाटील साहेबांनी कोल्हापुरच्या ऑफीसात फोन लावला.
``मोठे साहेब आहेत का ? मी घाडगे-पाटील बोलतोय``.
``साहेब तर मिटींगकरता मुंबईत गेलेत. उद्या येतील. ``
``नाही म्हणजे त्यांना मला निरोप द्यायचा होता. कोण बोलतय ?``
``मी पवार बोलतोय.``
``ओहो पवार साहेब ? अहो माझी आजपासून ट्रान्सफर परत कोल्हापुरला झाली आहे. सकाळीच ऑर्डर मिळाली. लगेच र्जाईन व्हायला सांगितलय. म्हटले मोठया साहेबांच्या कानावर घालाव म्हणून फोन केला. मी दुपारपर्यंत येतोच तिथे. मग बोलु``.
" ट्रान्सफर झाली ? बर या."
``विनायक , अरे माझी ट्रान्सफर परत कोल्हापुरला झालीय. दुपारीच मला तिथे जाव लागेल. अस करा तुम्ही दोघ तिघे जण आधी माझ्या घरी चला. तुम्हाला काय आवरा आवरी करुन ठेवायची ती सांगतो. म्हणजे सामान पुढच्या शनिवार रविवारी येऊन येऊन जाईन. पण बांधुन तयार तर ठेऊ.``
आणि साहेबांची ट्रान्सफर झाली ही बातमी वणव्या सारखी ऑफीसभर पसरली. जो तो येऊन त्यांच अभिनंदन करु लागला. तिथल्या कॉन्ट्रक्टरना ही निरोप गेले. तेही लगेच धाऊन आले.
``साहेब तुमची इतक्यात ट्रान्सफर झाली म्हणे``.
``हो आजच जातोय``.
``मग साहेब ते आपल काम ? म्हणजे -"
``अरे ट्रान्सफर कोल्हापुरात झालीय वर नाही, मी काय पळून का जातोय ? आज जाऊन उद्या येतो. बॅकडेटमध्ये तुमची टेंडर्स पास करतो मग तर झाल?``
"साहेब अचानक तुमची ट्रान्सफर झाली. पण आम्ही तुम्हाला असे जाऊ देणार नाही. सेंडॉफ तुम्ही परत कधी येताय त्याच दिवशी करु. पण आज चहा तरी सर्वांनी एकत्र घेऊ``.ऑफिसातले दुसरे साहेब म्हणाले.
``नको नको मला तिथे जायला उशीर होईल. चार्ज लगेच घ्यायचाय``.
``नाही साहेब आम्ही एकणार नाही, अहो जीप बरोबर सावंत ड्रायव्हरला देतो. तासाभरात पोचाल."
"बर अस करतो मि आधि घरी जातो. आपल्या माणसांना जरा दाखवतो कुठले सामान कस बांधायच ते मग येतो. चहा पिईन व लगेच निघेन``.
घाईघाईने घाडगे-पाटील साहेब घरी गेले. विनायक व त्याचे सरकारी तिथे होते त्यांना कुठले सामान कस पॅक करा ते सांगितले. व लगेच ऑफीसात आले.
``तुम्ही जेवलात का ?``
``नाहि. वेळच मिळाला नाही``.
``बर मग हा चहा तरी घ्या. अरे ति बिस्कीट दे बघु. " सर्व इंजिनियर्स एकत्र आले होते.
``तुमचा सहवास आम्हाला खूप थोडाकाळच लाभला पण तुम्ही इथे बरेच नवीन पायंडे पाडलेत बघा``.
``चांगले आहेत नं ?``
``अहो आपल्याकरीता तरी चांगलेच आहेत``, हसत हसत सहकारी म्हणाले.
``पण साहेब तुम्हाला हे सर्व माहीत असाव. कारण फॅमीली तुम्ही कोल्हापुरलाच ठेवलीय. अर्थात एवढी तुमची वट असणारच.``
``छे हो, कसल काय ? बर निघु ?``
एवढयात त्यांच्या मोबाईलची बेल वाजली.
``हॅलो. हॅलो कोण बोलतय ?``
``साहेब ,व्वा. तुमची ट्रान्सफर झाल्याच ऐकल.``
``हो पण तुम्ही कोण बोलताय ?``
``ते महत्वाच नाही हो. ति आधी ऑर्डर नीट पाहिलीत कां ?``
``म्हणजे , हो निट पाहिलीय. कां ?``
``नाही, परत आधी निट पहा एकदा. मी थांबतो फोनवर. "
साहेबांना कळेना, त्यांनी बँगमधून ती ऑर्डर काढली व परत पाहिली.
``का ? काय झाल ?``
``अहो पुढुन पाहिलीत पण मागे काय लिहीलय पहा``.
``ऑर्डरच्य मागे ?``
`` हो हो मागे काय लिहीलय. बघा तर खर. ``
ऑर्डरमागे लिहिले होते....
``तुम्ही आतापर्यंत आम्हा सर्वांनाच फुल केलत . आज आम्हालाही तुम्हाला एप्रिलफुल करु द्या की``.
`` वाचलत ,शिवाय साहेब ऑर्डरवर सही कुणाची आहे निट बघितलीत का ?" फोन चालू होता.
बापरे म्हणजे ही ऑर्डर खोटी आहे ? म्हणजे मला कुणीतरी एप्रिल फुल केलय. हो, आज एक तारीखच आहे. एक एप्रिल.
तेवढयात फोन कट झाला.
साहेब एकदम दिगमुढ झाले. त्यांना कळेना आता काय करु. त्यांनी मोबाईलवरुन तो नंबर परत रिडायल केला.
``हॅलो कोण बोलतय ? कुणाचा नंबर आहे हां ?``
``ओ साहेब ओरडु नका. हा पब्लिक बुथवरचा फोन आहे``.
``अरे आता कोण ह्यावरुन बोलले ?``
``अहो आम्ही काय तुमचे नोकर आहोत कोण कोण फोन करत ते बघायला``.
साहेबांनी फोन ठेऊन दिला. त्यांच्या अंगातली शक्तिच गेली. धप्पकन ते एकदम खुर्चीवर बसले.
इकडे तुकाराम आणि त्याचा मित्र फोन बुथ बाहेर हसत हसतच आले. आता आरामात त्यांनी तंबाखू मळायला सुरवात केली.
मस्त.. बरा धडा शिकवला
मस्त.. बरा धडा शिकवला साहेबाला..
मस्त
मस्त