अकादमी 3: रूटीन अन आयोडेक्स

Submitted by सोन्याबापू on 1 April, 2015 - 01:23


(टिप : ह्या भागात थोड़ी शिविगाळ आहे!!! टिपिकल अकादमी शिव्या)

हॉस्टेल ला आपापल्या रूम्स ना सेटल झाल्यावर आमचे तिसऱ्याच दिवसापासुन "रूटीन" सुरु झाले ! सकाळी 0445 hrs ना बिगुल होणार 0500 hrs पर्यन्त बेड टी घेऊन पीटी यूनिफार्म म्हणजेच पांढरी चड्डी पांढरा राउंड नेक टीशर्ट पायात कैनवास शुज अन सोबत ड्रिलसाठी असलेला खाकी यूनिफार्म व् बूट्स पट्टा अन एक पाण्याची बॉटल इतके पिठ्ठु (बारकी कैनवास ची रकसॅक) मधे भरून घ्यायचे अन हॉस्टेल बाहेर फॉलइन व्हायचे! आमच्या कंपनी चा उस्ताद मग आम्हाला रनिंग ला नेत असे. शर्मा उस्ताद ने पहिल्याच दिवशी गोड बोलत रागवत "बस आधा किमी और" म्हणत 5 किमी ओढले!!!. पुर्या कंपनी च्या तोंडाला फेस यायचा सुद्धा बाकी राहिला नव्हता. मी , समीर, पुनीत सुरु मोठ्या जोशात झालो होतो साढे 3 किमी पर्यन्त काही वाटले नाही नंतर ज़रा थकवा वाटला पण जेव्हा 5 किमी झाले अन बिना रेस्ट परत जायचे ऐसा उस्ताद नामे खविस बोलला तेव्हा मात्र सपशेल गलपाटलो आम्ही!!!परत जेव्हा पीटी ग्राउंड ला आलो तेव्हा आमचे ऑलरेड़ी पांढरे डोळे जे काही पाहिले त्याने तिप्पट पांढरे झाले अन आपण नशीबवान आहोत असे वाटले!! चार्ली कंपनी घामेजलेली उभी होती कंपनी च्या उजव्याबाजुला मोसाय चक्क उताणा पडला होता अन ठो ठो बोंबलत होता

"सरssssss आम्ही से ना होतायsssss आम्ही मर जाबो सरsssss"

मीणा उस्ताद त्याच्यापालिकडे उभा होता तोच चार्ली कंपनी चा उस्तादजी होता आम्ही आवंढे गिळत मोसाय कड़े पाहतच होतो तोवर मीणा उस्ताद कडाडला

"फॉल आउट के ऑर्डर बिना तु बाहेर कैसे आगया बंगाली, पुरी चार्ली कंपनी, परेड ग्राउंड के चक्कर तब तक लगाएगी जबतक ये *मकरा उठ के अपनी फाइनल लॅप पुरी नहीं करता, शूटsssss" चार्ली कंपनी मोसाय कड़े खाऊ की गिळु पाहत होती पण न धावुन जातात कुठे !!! दुड़क्या चालीने 6 चार्ली धावायला लागले त्यांना ती ऑर्डर देताना मोसाय अवाक् होऊन पाहत होता चार्ली कंपनी 100 मीटर पुढे गेली होती तोवर मीणा उस्ताद चा आवाज परत एकदा घुमला "थमsssssss" "पिच्छे मुड़ssssss" आता चार्लीच नाही तर सरदार ची ब्रावो अन आमची डेल्टा धरून बाकी 2 कंपनीजला अवाक करणारा नजारा होता, धडपड़त मोसाय उठून उभा राहिला होता अन चार्लीच्या दिशेने बऱ्यापैकी स्पीड ने धावत होता.

हे सगळे दुरून पाहत असलेला बड़े उस्ताद तोवर ओरडला "बाकी की कारवाई क्यों बंद हो गई!!दौड़ रहा है वो!! मरा नहीं है!!" आम्ही ताबडतोब पीटी फॉर्मेशन मधे आलो !!! मोसाय दातओठ खात शेवटचा राउंड पुर्ण करत होता, तो होताच हे ध्यान मीणा उस्ताद पुढे जाऊन उभे राहिले, अन पीटी थांबवुन बड़े उस्ताद ओरडला

"ओसीज अपने कंपनी के लिए मेहनत करने वाले ओसी सुदीप्तो के लिए ताली बजाओ"

"1....2....123" ह्या ठेक्यावर आम्ही 3 वेळा टाळ्या वाजवल्या अन डे वन चा विजेता सुदीप्तो मोसाय ह्याला आज्ञा झाली "जाओ अपने कंपनी में मिल जाओ" त्या दिवशी अंग खाच्चुन घाम गाळल्यामुळे असेल बरेच हलके वाटत होते! अगदी मोसाय पण बरा वाटत होता!!! दुपारी लंच ला असलेला पुलाव, फिश अन फ्रूट्स पार चट्टामट्टा केले पोरांनी!!! पहिल्या दिवसभर काही नाही जाणवले!! अन मग उगवली ती मनहूस दूसरी सकाळ!!!

0440 hrs चा गजर कानाशी ठेवला होता मी हात मागे वळवुन घड्याळ उचलयचा प्रयत्न केला अन लक्षात आले !! माझे हात पाय दगडासारखे घट्ट झाले होते! पण विस्सल ची भीती होतीच्!! दात ओठ खात उठलो अन शेजारी पाहिले तर समीर ची पण तीच अवस्था!!! अक्षरशः घसटत खुरडत टॉयलेट ला गेलो ते निराळीच् पंचाइत! कमोड वर बसायलाच येइना !! दात ओठ खाऊन वेदना विसरून बसलो ते स्पष्ट बोलायचे झाल्यास आतून बुच मारल्यागत पोट ढिम्म् पाच मिनिटे बसलो!!! ते घड्याळ कोणाच्या बापाचे नसते हे लक्षात आले !! तसाच पुन्हा लंगडत रूम मधे आलो!!! आता एक महत्वाचे मिशन होते!! नाईट पैंट उतरून पीटी ची चड्डी चढ़वणे!!! ती कशी चढवली हे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे!!! तसाच दातओठ खात फॉलइन झालो!! समीर कड़े पाहिले तसे तो हळूच कुजबुजला

"काक्के तेरे भी पॉटी के सियापे हो गए क्या बे???"

"हाँ बे पेट के मसल्स हिल ही नहीं रहे!!"

इतक्यात आमची नजर ब्रावो कंपनी कड़े गेली गिल तंगड्या फासकटुन चालत येत होता सहा फूटी काटकुळा सरदार असा चालताना पाहून आम्ही त्या ही अवस्थेत हसायचा प्रयत्न केला! हो फ़क्त प्रयत्न!! कारण जबड़ा हलवायला गेलो ते बरगड्या बोंबलायला लागल्या होत्या!! त्या दिवशी आम्ही पीटी अन ड्रिल कशी केली हे फ़क्त आम्हीच जाणोत!!! त्या दिवशी ब्रेकफास्ट ला मेस मधे गरम ऑम्लेट्स पानात पडत होती पण ती ही बेचव लगायला लागली!! दुसऱ्या दिवसापासुन आमची वेपन्स अन मैप रीडिंग ची लेक्चर सुरु होणार होती! आज अंग दुखत होते तरी एक बरे होते आज ऑडिटोरियम ला व्हीएस सरांचा ओपनिंग एड्रेस होता, पानात पडले ते गिळून कसे बसे अंघोळीला पोचलो !!! ते हॉस्टेल लॉबी ला बड़े उस्तादजी एक पोते घेऊन हजर , मी पुनीत सोबत खुरडत चालत येत होतो ते पाहून उस्ताद ओरडला "ये दोनों आदमी दौड़ के आ" कसेबसे "दौड़त" पोचलो ते नवीन झ्यांगट

"अकादमी के अंदर हर काम दौड़ चाल में होगा ये जानके भी दोनों पैदल कैसे चले *मकरो??"

आम्ही "......."

"दोनों आदमी 20 20 पुशप अभी"

तिरिमिरित आम्ही वाकलो अन 20 पुशप मारुन मी उठून उभे राहायची अगळीक केली!!!

"उठने की करवाई क्यों की!, पोजीशन फिरसे, मराठे तु 20 पुशप और , पंडितजी आप प्लांक पोजीशन में वैसे ही !!"

"जल्दी शुरू करोssssss"

मी जीव लावुन पुशप करायला लागलो पण पुनीत ची ही अवस्था भयानक होती, जिम् मधे ऐब्स चे रूटीन केलेल्या लोकांस "प्लांक" पोजीशन काय असते ते चांगलेच ठाऊक असेल!!! पुशप करुन मी तसाच पोजीशन मधे होतो तेव्हा उस्ताद म्हणाला "खड़े होss"

उभे राहिल्यावर पुढचा आदेश ऐकून जीव अर्धा झाला!!

"ये नमक का बोरा है! उठा के बाथरूम के दरवाजे में रखो! और सब को बोलो आज नहाने के पानी में एकएक मुठ्ठी डालो बदन दर्द ठीक होगा"

कणहत कुथत आम्ही ते 50 किलोचे पोते ठेवले अन तेवढ्यात उस्तादजी ने स्वतःच सारी पोरे फॉलइन करुन त्यांना मिठाची काशी करायला सांगितले आम्ही सूटल्यासारखे मटकन बसलो पण लगेच उठलो!!न जाणो ह्या सैतानाच्या परत नजरेला पडलो तर बोंबला!!!

त्या गोंधळात दोन ओसीज एका मागे एक आले बाथरूम मधे अंघोळीला , मोठी मजेशीर ध्याने होती दोघेही, एक काळाकुळकुळीत अंगात जानवे इतक्या वेदनेत ही जवळ आला अन म्हणाला

"वनक्कम आम एस दिवाकर,अल्फा कंपनी, मदुरई तमिळनाडु ,बाई थुड़ी एल्प करदो"

मला पाच मिनट सुधरना हा कोण काळू? माला बाई का म्हणतो??? पण कळले तेव्हा मी वेदनेच्या तिरिमिरित उठलो अन म्हणले

"क्या हेल्प होना अन्ना??"

"बाथरूम का फ्लोर पर मग पड़ती !! आम उठा नै सकती मग उठा के देता क्या बाई?"

माझे टाळके हलले म्हणले "अबे गांx जान लेगा क्या बच्चे की निकल यहाँसे भोसड़ीके" खाली मान करुन तो निघुन गेला , त्याच्यामागे एक चीनी दिसणार ध्यान आले! नीमा सांगे, राहणार सिक्किम,आधीच गोरेभरड त्यात रगड्याने लाल तोंड झालेले माकडा सारखे !! मी हसु दाबत म्हणले "हॅलो" तर म्हणाला "dont talk to me man u marathas harass my bros in your state"
च्यायला म्हणले हा काय भिकारचोटपणा
"निकल भोसड़ीके" अस्मादिक!

एका आयुष्यभरच्या घट्ट मैत्री ची सुरवात अशी झाली होती!!! अर्थात त्यात कोणाचाच दोष नव्हता!! सगळे वेदनेत होते प्रत्येकाच्या स्नायु मज्जा चेता लसुण कांदे प्रत्येक भागात तोबा दर्द होता!!! तिकडे मोसाय पारच हेंदरला होता मुटकुळ करुन बसला होता बोxखाली उशी घेऊन!! गिल बरा होता पण तो ही "वक्रतुंड" होता त्याने शक्य तितकी धावपळ केली होती मोसाय साठी , मोसाय जरा स्टेबल भासत होता पण हायहुई करत होता!! त्याच्या रडण्याला कंटाळून गिल ओरडला
"ओ भोसड़ीवाले नी होती है मेहनत तो आया क्यों फ़ौज में!!! गांx बंगाली खोत्या" ते ऐकुन मोसाय ने ही तोंड फिरवले!!! आज वेदना मैत्रीवर भारी पडत होती! पण नियती अन उस्तादवृंद सोडुन कोणालाच माहिती नव्हते की आम्हाला सोबत प्रेस करुन एक केले जाते आहे

*मकरा :- कामात अळंटळं करणारा ट्रेनी , मकरे त्याचे अनेक वचन!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही मालिका फार भारी चालू आहे! म्हणजे एकूण पिक्चरमधे दाखवतात तसं खरंच असतं तर! सलाम आहे तुम्हा सगळ्यांना!

>>अहो मी मोबाइल वर लिहितोय त्यात जितके मॅक्स लिहिता येईल तितके लिहेन इतके सांगतो तुर्ता>>
मानलं तुम्हाला. मोबाईल वरून लिहित असाल तर जवढं लिहिताय ते सुद्धा खुपच आहे.

चिवटपणा हा आर्मीचा गुण तुमच्या रक्तात खरेच उतरलाय . मोबाईलवर एवढं करताय म्हणजे.
आजारीपणाचे सोंग करणार्‍या एका ट्रेनीला , उस्ताद नाना पाटेकर डॉ. माथुरकडे पाठवतो . डॉ माथुर त्याला असा काही 'जमालगोटा " देतो बस ..
दुसृया दिवशी नाना विचरतो तबीयत कैसी है? 'बहुत अच्छी सर'डोक्टर माथुर कैसे लगे? बहुत अच्छे सर! फिर जाना चाहोगे ? बिल्कुल नही सर !

सोहोण्याबाहापु आपलेही असले अनुभव असतीलच तेही येऊ द्या .. Happy

सही आहे.. खरोखर प्रहार आठवतोय.. जेवढे आठवेल लिहावेसे वाटेल तेवढे लिहित सुटा.. शिव्या बिव्या हातच्या राखू नका.. ईंटरेस्टींग आहे.. मस्त लिहित आहात.. Happy

अवांतर - तुमच्या मोबाईलवर लिहीण्याच्या मेहनतीची कदर करायला मी देखील मोबाईलवर वाचून मोबाईलवरच रिप्लाय देत आहे.. Happy

रॉबिनहुड,

चिवटपणा असणारच !! असयलाच पाहिजे!!! काम आहे ते माझे!!!

ऋन्मेष आपला आभारी आहे!!!!

मंडळी प्रहार टाइप ट्रेनिंग अजुन दुर आहे !!! हे "बेसिक" ट्रेनिंग आहे!!! पंधरा सोळा हजार फूटावर वर्षाचे नऊ महीने ड्यूटी करायची तर हेच "बेसिक्स" शिकावे लागतात

सोन्याबापू तुमचे याच्यावर काय मत आहे ? सैनिकांना demoralize करत आहेत असे वाटते ..

Older Army was sluggish in Kargil, Narendra Modi government tells Supreme Court

http://timesofindia.indiatimes.com/india/Older-Army-was-sluggish-in-Karg...

सोन्याबापूंना असे प्रश्न विचारू नयेत असे वाटते. हे राजकीय स्वरूपाचे प्रश्न आहेत. लेट अस एन्जॉय हिज स्पॉन्टॅनिअस रायटिंग्ज...

ज्याला जे बोलणे उचित वाट्ते त्याने सुप्रीम कोर्टात वाटेल ते बोलावे! मला एकच समजते , the chaps were given a duty and they did it damn well!!!

मोराल वगैरेची चिंता आम्हाला नसते! कारण न्यू यॉर्क टाइम्स चा वॉर कोरेस्पोंडेंट क्रिस हेजेस म्हणतो तसे
"The rush of a war is a potent and lethal addiction, for war is a drug"

आम्ही (आर्म्ड फोर्सेज, पैरामिलिटरी इत्यादी सशस्त्र दले) इतके सेंटी होऊ लागलो तर काम नाही होणार

हम हमेशा मौज में ही रहते है साहेबान

भारी, भारी!!

"बाथरूम का फ्लोर पर मग पड़ती !! आम उठा नै सकती मग उठा के देता क्या बाई?">>>>> Lol
प्रहार मधला "मेरे नाक पे मख्खी बैठी है उसे उडा दे यार..." डायलॉग आठवला.

Pages