काळजी

Submitted by अभिजित चोथे on 25 March, 2015 - 03:24

समीर झोपेतुन अचानक जागा झाला. सकाळचे ८ वाजले होते. रात्रभर तयाला झोप लागली नव्हती .
सुभाश आणी अमितचे बोलणे त्याला सतत आठवत होते,पण आपण एकले ते खरे का खोटे याबदल तो साशंक होता. अचानक त्याची नजर समोरच्या कॅलेंडर वर गेली . " दोन दिवस बाकी" असा तो पुटपुटला.
"कशाला रे दोन दिवस बाकी ?" बेडरूम मध्ये येतच त्याच्या आई ने विचारले .
" अ. ...काही नाही" थोडासा अडखळत तो बोलला आणि बेडवरून उतरून सरळ बाथरूम मध्ये घुसला जेणेकरून आईचे पुढचे प्रश्न टाळता येतील .
आज नाश्त्यावर हि त्याचे लक्ष नव्हते. चमचा हातात धरून तो गूढ विचारात होता. आईने त्याला काळजीच्या स्वरात पुन्हा विचारले " काय झाले समीर ? काही प्रोब्लेम आहे का?
" काही नाही ग , झोप झाली नाही निट " थोडस चिडून तो बोलला.
जबरदस्तीने नाश्ता पोटात कोंबून तो उठला. मोबईल घेऊन टेरेसवर गेला.
शिल्पा माज्यावर विश्वास ठेवेल का? हा प्रश्न त्याला पडला . तो बैचैन होऊन इकडे तिकडे फेऱ्या मारू लागला. त्याला विश्वास होता कि आपली गोष्ट कोणालाच पटणार नव्हती , अगदी त्याच्या घरातल्यांना सुद्धा .तो स्वत त्या अर्धवट ऐकलेल्या गोष्टीवर साशंक होता.
थोडा विचार करून तो थांबला . मोबाईल मधून त्याने शिल्पाचा नंबर ओपन केला आणि थरथरत्या हातानी तिला फोन लावला .
शिल्पा त्याची बाल मैत्रीण होती त्याचे एकमेकांच्या घरी सतत येणे जाने असल्याने त्याच्या कुटुंबातही चांगले सं बंध निर्माण झाले होते.समीरचा स्वभाव खूप काळजी करणारा होता, तर शिल्पा बिनधास्त मुलगी होती.
फोन ची रिंग व्हायला लागली तशी त्याच्या छातीत धडधड व्हायला लागली. त्याची जीभ जड झाली .
फोनवर होणार्या रिंग प्रमाणेच संपूर्ण शरीरभर कंपने होऊ लागली.
"बोल समीर " शिल्पा म्हणाली .
समीरला काही सुचत नव्हते . त्याच्या तोंडून शब्दच निघत नव्हते. थोडा वेळ शांततेत गेला.
" अरे समीर बोल ना . कशाला फोन केला आहेस?"
शांततेचा भंग करत शिल्पा बोलली.
डोळे गच्च मिटून आणि शब्दांची जुळवाजुळव करून " मला तुला एकांतात भेटायचे आहे " असे तो बोलला.
"ए फ़्लर्ट करतोयस ?येऊ का मम्मी पप्पांना भेटायला? "मस्करीच्या स्वरात शिल्पा म्हणाली.
"न ....नको" असे बोलून त्याने फोन ठेवला.
कसे सांगू या बयेला! तो पुटपुटला.
त्याने पुन्हा मोबाईल मध्ये डोके घालून म्यासेज बॉक्स ओपन केला.
"१ तारखेला तू फिरायला येऊ नकोस असा म्यासेज लिहून त्याने शिल्पाला पाठविला.
शिल्पाच्या मोबाईलची म्यास्येज बीप
वाजली. पुस्तक वाचत बसलेल्या शिल्पाने हात लांब करून फोन उचलला. संदेश वाचून तिने स्मितहास्य केले.तिने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले, पण तिला माहित नव्हते कि ते दुर्लक्ष तिला खूप महागात पडणार आहे.
मधल्या दोन दिवसात समीर खूप डिस्टर्ब होता .
२-३ वेळा शिल्पाच्या घरीही गेला, पण काहीही न बोलता माघारी आला. शिल्पा त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात हसायची.
आज फिरायला जायचे असल्याने समीर सकाळी लवकरच उठला होता. समीर च्या घराची बेल वाजली. समीरच्या पापांनी दरवाजा उघडला .
बाहेर शिल्पा , सुभाष आणि अमित होते.
"गुड म्योर्निंग काका" तिघे एकदम बोलले.
" या या मुलानो " स्मितहास्य करतच ते बोलले.
सुभाष आणि अमित समीरचे कोलेज मित्र होते.
समीर मुळे शिल्पाचीही त्याच्याशी ओळख झाली होती. सुभाष आणि शिल्पाचे पहिल्यभेटितच प्रेम झाले, मात्र ते व्यक्त व्हायला थोडा वेळ गेला. आता त्यांच्या प्रेमाच्या अंकुराचा वटवृक्ष झाला होता. या
चोघांची मैत्री एवढी घट्ट होती कि, त्यांच्या आसपासचे लोक मैत्रीच्या बाबतीत या चार जणांचे उधाहरण देऊ लागले होते.
सर्वांनी नाश्ता केला आणि लोणावळ्याला जायला बाहेर पडले. सुभाष ने त्याची गाडी आणली होती. सुभाष आणि शिल्पा पुढे ,तर समीर आणि अमित मागे बसले होते. गाडी रस्त्याला लागली. गाडीत कोणी कोणाशीच बोलत नव्हते. शेवटी अमितच शांततेचा भंग करत बोलला.
" ए सम्म्या ढापण्या ! काय झालंय ? बोलना ! एवढा चुपचाप का आहेस?आपण फिरायला निघालोय तुज्या सासर्याच्या मयताला नाही".
" तू चूप बस ,मला तुज्याशी काही काही बोलायचे नाही". एकदम चवताळून तो बोलला.
" अरे मी काय केलंय ?" अमित बोलला.
" काही केल नाहीस, पण काय करणार आहेस मला माहित आहे आणि मी ते होऊ देणार नाही ." समीर म्हणाला.
सुभाष आरशातून अतिशय तुच्च नजरेने त्याच्याकडे पाहत होता.
"परवा रात्रीचे तुमचे बोलणे मी एकलय" .अस समीर बोलल्यावर मात्र दोघे सावध झाले.
अमितने सुभाषला गाडी बाजूला घ्यायची इशारत केली. त्याने निसर्गरम्य पण निर्जन ठिकाणी गाडी बाजूला घेतली.
पावसाळा नुकताच संपल्याने निसर्गाने हिरवाईची शाल पांघरली होती. वातावरणात वेगळीच प्रसन्नता होती. थंड वाऱ्याची झुळूक सर्व ताणताणाव विसरायला भाग पाडत होती.
" व्वाव ! किती सुंदर!" शिल्पाच्या तोंडून आपसूक शब्द बाहेर पडले. ती लगेच गाडीचा दरवाजा उघडून खाली उतरली . धावतच पुढे असलेल्या दगडापाशी गेली .थोडा प्रयत्न करून त्या दगडावर चडली . दगडावर चडताच तिने दोन्ही हात पसरून येणाऱ्या वाऱ्याला आपल्या सर्वांगात सामाऊन घेतले, आणि "ह्यलो " असा शब्द मोठ्याने उच्चारला . काही क्षणात त्याचा प्रतिध्वनी तिला एकू आला त्यामुळे ती जास्तच खुश झाली.
शिल्पा बरोबर समीरही बाहेर आला. तो बाहेर येताच सुभाष आणि अमितने थोडीशी कुजबुज केली आणि तेही बाहेर आले. अमित समीरच्या मागे गेला आणि सुभाष दरीच्या वाटेवर जाऊन थांबला.
" शिल्पा मला तुज्याशी बोलायचे आहे". काळजीच्या स्वरात समीर बोलला.
" काय रे समीर , नंतर बोलू ना ." शिल्पा बोलली.
" नाही मला आत्ताच बोलायचे आहे." असे म्हणत समीरने तिला खालीच ओढले.
शिल्पा संतापली तिने त्याच्या हाताला झटका दिला अन सुभाषला जाऊन बिलगली. समीरला खूप वाईट वाटले. हे पाहून सुभाष बेरकीपणे हसू लागला.

" दोघा एवजी तिघे मजा करू यार ! चिल!" पाठीमागून येत अमित समीरच्या कानात पुटपुटला.
अमित असे बोलताच त्याला खूप राग आला. त्याचे सर्वांग गरम झाले.
त्याने सुभाष कडे पहिले. तो आणि शिल्पा तिथे नव्हते. त्याचा जीव घाबराघुबरा झाला. मागे पाहिले तर अमितही गायब होता. त्याचे अंग थरथरू लागले. हृदयाची धडधड वाढली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याची नजर दरीकडे तिघांचा शोध घेऊ लागली , तेवढ्यात त्याला दरीच्या वाटेवर हालचाल दिसली. ते शिल्पा , सुभाष न अमितच होते. तो दरीच्या वाटेवर आला. इकडे तिकडे पाहत तो काहीतरी शोधू लागला.थोड्याच अंतरावर त्याला हातात मावेल असा दगड दिसला,त्याने तो उचलला आणि दरीत उतरू लागला.
निम्म्या वाटेवर आल्यावर त्याला झाडीत संशयास्पद हालचाल दिसली.पाठोपाठ शिल्पाच्या ओरडण्याचा आवाज आला तसा त्याला दरदरून घाम फुटला. त्याचा दरी उतरण्याचा वेग दुप्पट झाला. तो मोकळ्या मैदानात आला.त्याने सभोवताली नजर टाकली. एका झाडीत त्याला काहीतरी दिसले. तो धावतच तिकडे गेला.ती शिल्पाच होती. तिची अवस्था पाहून तो खूप घाबरला. त्याच्या हातातील दगड आपोआप गळून पडला. शिल्पाचा ड्रेस रक्ताने माखला होता. तिला जराही हालता येत नव्हते. सुभाष व अमित आजूबाजूला दिसत नव्हते. यावरून त्याला अंदाज आला कि, आपण त्यांचे अर्धवट ऐकलेले बोलणे खरे होते.
" शिल्पा मी आलोय . घाबरू नकोस! " तिच्या शेजारी गुड्ग्यावर बसत तो म्हणाला.
" समीर मला माफ कर. मी तुज्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला नको पाहिजे होते". कन्हतच आणि अडखळत ती बोलली.
" ते जाऊदे ! नंतर बोलू त्याच्यावर!" समीर बोलला.
एवढी चढण चढून शिल्पाला उचलून वर नेणे शक्य नसल्याने तो मदतीसाठी रस्त्याच्या दिशेने जाऊ लागला. निम्मे अंतर झाल्यावर अमित न सुभाष त्याला अचानक आडवे आले.सुभाषच्या हातात रक्ताने माखलेला चाकू होता. समीर समजायचे ते समजला . तो मागे फिरला आणि सर्व ताकत एकवटून जीवाच्या आकांताने धाऊ लागला.उतार असल्याने पायाची गती जास्तच वाढली. तो शिल्पा जिथे होती तिथे आला . ते दोघेही मागोमाग आले. समीर ला काही करावे सुचत नव्हते. अचानक त्याला मोठ्याने हसण्याचा आवाज एकू आला.तो शिल्पाच्या बाजूने येत होता .त्याने तिकडे पहिले तर चक्क शिल्पाच हसत होती. हसत हसत ती उठली . तोपर्यंत सुभाष न अमितही त्या हसण्यात सामील झाले. ते तिघे एकमेकांना टाळ्या देऊ लागले.
थोडा विचार केल्यावर समीरच्या डोक्यात प्रकाश पडला . आज १ एप्रिल आणि आपण फुल बनलोय.
त्याच्या चेहऱ्यावरचे टेन्शन गायब झाले.शेजारी पडलेली काठी त्याने उचलली आणि तो तिघांच्या मागे लागला आणि सारा आसमंत चोव्घांच्या आवाजाने व्यापला.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे हे पहिलेच लेखन आहे. आवडले किंवा काही चुकीचे वाटले तर प्रतिक्रिया द्या. तुमच्या प्रतिक्रिया मला लेखनासाठी प्रोत्साहन देतील.
धन्यवाद.

छान आहे प्रयत्न. Happy

आता पुढे काय होणार या विचाराने घाबरलेली असतानाच कथा संपली.

मलाच एप्रिल फुल बनल्यासारखं वाटलं. Happy