Submitted by भुईकमळ on 21 March, 2015 - 09:52
शीळ रानात घुमली ,नवी पालवी लाजली
स्वप्नं झुलली गोमटी ,आमराई गर्भारली ∥धृ∥
वज्रटीक करवंदी ,ठुली टेकडी ल्यायली .
तिज घालुन गिरकी, वाट छोटुली निघाली
.रानमोगरीने जिथे जळी रांगोळी घातली ∥१∥
सोनमोहराच्या तळी सोनदुपार निजली
जाग जांभळी फुलांची कांचनात उमलली
मुंडावळी बहाव्यास , अंगा हळद लागली ∥२∥
रंगारी या पळसाने चुनरिया रंगवली
सृष्टीकाया मस्तानीची छंद केसरिया ल्याली
शीळ मोहास भुलली मधुमिठीत फसली ∥३∥
कशी काटेरी शापाला फुले माणकांची आली
पांगारयाची फांदी फांदी गावे पाखरांची झाली
चंचू रुतली मातली उरुसात दंग झाली
इथे महानगरात झाडे दंतकथा झाली
उंच उंच इमल्यात खुजी मने फोफावली
पंख बंद पिंजरयात रानमिठी याद आली ∥५∥
शीळ दुरातून आली ,जीवा पालवी फुटली ........माणिक वांगडे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहाहा शेवटच्या कडव्यात छान
अहाहा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शेवटच्या कडव्यात छान वळण घेतलंय कवितेने.
त्यामुळे केवळ प्रतिमा चमत्कृती न राहता या सगळ्या चित्राला एक गहिरी डूब आलीय!
आवडली
धन्यवाद अमेय !!!तुमचा
धन्यवाद अमेय !!!तुमचा प्रतिसाद वाचुन खुपच छान वाटलं...
अरे मस्तच. देवराईत
अरे मस्तच. देवराईत गेल्यासारखे वाटले.
खूपच सुंदर कविता.. फार आवडली
खूपच सुंदर कविता.. फार आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप खूप आवडली. सुंदर!
खूप खूप आवडली. सुंदर!
खुपच् सुंदर
खुपच् सुंदर
कीत्ती गोड क वि ता... खुप
कीत्ती गोड क वि ता... खुप आ व ड ली...
सुंदर!
सुंदर!
atishay sundar... khup god
atishay sundar... khup god aahe kavitaa. dolyasamor chitra ubhe raahate ekadam
अप्रतिम. उपमा मस्त जमल्यात
अप्रतिम. उपमा मस्त जमल्यात सगळ्या. वाचायला मजा आली. शेवट मनाला भिडला.
केवळ शब्दातून अवघा चैत्र
केवळ शब्दातून अवघा चैत्र डोळ्यासमोर उभा केलात .... क्या बात है ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फारच सुंदर रचना ... शेवटही अगदी वास्तव चितारणारा ...
टण्या, वर्षू नील, मंजूताई
टण्या, वर्षू नील, मंजूताई ,,कविनारायणSayali Paturkar ,बेफ़िजी,साधना
मनीमोहोर आणि शशांकजी सर्व रसिक काव्यप्रेमीना अगदी मनापासुन धन्यवाद!!! स्मित....
वाह सुरेख! पण शेवटच्या ओळींना
वाह सुरेख! पण शेवटच्या ओळींना सुरेख म्हणता येत नाही![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
धन्यवाद प्रतिसादाबद्दल
धन्यवाद प्रतिसादाबद्दल जिज्ञासा !!!
पण शेवटच्या ओळींना सुरेख म्हणता येत नाही>>>पण ते कटु वास्तव आहे .अजुन काही काळानंतर आजी नातवाला गोष्ट सांगताना सांगेल आमच्या लहानपणी अशा प्रकारची झाडे फुलत असत ...
जगणे म्हणजे उत्सव करून
जगणे म्हणजे उत्सव करून टाकणारी कविता !
अहा ! किती छान आहे.
अहा ! किती छान आहे.
भारतीजी ,खूप धन्यवाद !!!
भारतीजी ,खूप धन्यवाद !!! तुमच्या प्रतिसाद मिळाला नाही तर कवितेत कुठेतरी काहीतरी कमीय अस वाटत रहात पुन्हा एकवार धन्यवाद!
नवीन प्रतिसादकर्त्या प्रिंसेसचेही मनापासून आभार.
भुईकमळ ! >>तुमच्या प्रतिसाद
भुईकमळ ! >>तुमच्या प्रतिसाद मिळाला नाही तर कवितेत कुठेतरी काहीतरी कमीय अस वाटत रहात पुन्हा एकवार धन्यवाद! >> कृपया असं वाटून घेऊ नका, माझं येणं थोडं अनियमित असल्याने काही सुटतही असेल अभावितपणे, कवितांच्या बाबतीत तरी असं होऊ नये असा प्रयत्न असतो तरी ..