नवर्याला बायको, बायकोला नवरा, पालकांना मुले, मुलांना पालक, शेजार्यांना पाजारी, मित्रांना मित्र, मैत्रिणींना मैत्रिणी, मित्रांना मैत्रिणी, मैत्रिणींना मित्र, भावाला भाऊ किंवा बहिण, बहिणीला बहिण किंवा भाऊ, माहेरच्यांना सासरचे, सासरच्यांना माहेरचे, शिक्षकांना विद्यार्थी, विद्यार्थ्यांना शिक्षक, साहेबाला सहाय्यक, सहाय्यकाला साहेब, समाजाला राजकारणी, नेत्यांना समाज, धर्मांना परधर्मीय, जातींना इतर जाती, पुरोगाम्यांना प्रतिगामी, डाव्यांना उजवे, जगणार्यांना मरणारे, मरणार्यांना जगणारे!
कोणालाच कोणीच पूर्णपणे कधीच आवडत नसते.
आपण किती हतबल आहोत किंवा किती समर्थ आहोत ह्यावर आपण कोणत्या प्रकारच्या तडजोडीत सापेक्षरीत्या सर्वाधिक समाधानी असू इतकेच प्रत्येकजण बघतो. तेही बघू न शकणे हीसुद्धा एक तडजोडच असते.
भिन्नतेचा संपूर्ण स्वीकार करण्यात अयशस्वी ठरणे हे पूर्णपणे नैसर्गीक आहे.
फक्त 'आपणच' आपल्याला पूर्णपणे आवडू शकतो. जर आपणही स्वतःला काही कारणाने आवडत नसलो तर ते न आवडणेही आवडणेच असते किंवा त्यात 'आपण आपल्याला आवडू' ह्या दिशेने प्रयत्न करण्याची स्फुर्ती लपलेली असते.
मतभेद व्यक्त करण्यातून आपण दुसर्याला आपल्यासारखे किंवा दुसर्याला 'तो आपल्याला आधीपेक्षा अधिक आवडेल' असे बनवण्याचा प्रयत्न करत असतो. किंवा 'आधीपेक्षा कमी नावडेल' ह्याचा प्रयत्न करत असतो. मतभेदांचे स्वरूप 'सुस्कारे' ते 'कटाक्ष' ते 'इतर देहबोली' ते 'हसत हसत दिलखुलास चर्चा' ते 'भीषण हत्याकांडे' ह्यातील काहीही असू शकते.
प्रचंड मोठ्या समुहाच्या विचारांवर आणि आचारांवर सत्ता गाजवणारा बनणे येथपासून ते क्लेषांना कंटाळून आत्महत्या करणे ह्या रेघेवर प्रत्येकजण कोठेतरी असतो.
ह्या रेघेवरचा एक मधला किंवा कोणतातरी भाग 'सर्वसामान्य' म्हणजे नॉर्मल म्हणून गणला जातो. किंवा जवळपास प्रत्येकच भाग स्वतःला 'सर्वसामान्य' समजत असतो किंवा समजू लागतो. रेघेवरील त्या 'सर्वसामान्य' बँडच्या अलीकडचे आणि पलीकडचे कपाळाला आठ्या पाडणारे ठरतात.
गंमत म्हणजे 'हा मधला भाग' प्रत्येकाला 'स्वतःला समाविष्ट करणारा' वाटत असतो आणि त्या मधल्या भागाचे स्थान प्रत्येकाच्या मते वेगवेगळे असते.
प्रत्यक्षात जर बघायला गेले तर कोणताच माणूस दुसर्या कोणत्याच माणसाची परिस्थिती 'अनुभवू' शकत नाही तर तो फक्त कल्पू शकतो. 'अनुभवू' शकणे म्हणजे निव्वळ ती परिस्थिती स्वतःवर आली तर मी कसा वागेन असे बघणे नव्हे तर 'मी जर रेघेवरील त्या माणसाच्या स्थानी असतो तर मी कसा वागलो असतो' हे आहे. म्हणजे, मी सर्व प्रकारे जर त्या माणसासारखाच असतो तर मी कसा वागलो असतो हे बघणे आहे. ह्यात समोरच्याची मनःशक्ती, त्याच्यावर झालेले संस्कार, त्याच्या लहानपणापासून त्याने पाहिलेली आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतीक, धार्मिक, राजकीय, पारंपारीक व प्रादेशिक परिस्थिती कशी आहे, ती कशी कशी बदलत गेली, आज तो कोणत्या वैचारीक वळणावर आहे, हे सगळे पाहणे आले. हे सगळे पाहताना 'मी मुळात मी आहे' हा विचार तात्पुरता बाजूला सारून मग सर्व परिस्थिती समजल्यावर 'आता मी मी आहे म्हणून ह्या समोरच्यासाठी काय करू शकतो' ह्यावर विचार करणे आवश्यक आहे. असे करण्यासाठी समोरच्याने मुळात सगळे पारदर्शकपणे सांगणेच आवश्यक नाही तर आपण स्वतः पारदर्शकपणे स्वतःचे सद्यस्थान विचारांमधून बाजूला सारणे आवश्यक आहे. ह्याला परचित्तप्रवेश असे म्हणतात व परचित्तप्रवेश कोणाकोणाला कशाकशामुळे किती जमतो हेच मुळात ठामपणे सांगता येत नाही.
म्हणजे असे, की एखाद्याला पूर्णपणे परचित्तप्रवेश जमण्यासाठी मुळात त्याचे मन समाजातील सर्वात सूक्ष्म मतभेदांच्या पार्श्वभूमींना आणि कारणमीमांसांनाही विचारात घेऊ शकणारे असणे आवश्यक असते. ढोबळमानाने चांगल्या समजल्या गेलेल्या गोष्टी कोणासाठीतरी खूप वाईट असू शकतात किंवा अगदी किंचित वाईट असू शकतात हे समजण्याइतके द्रवणारे मन असणे आवश्यक असते. इतकेच नाही तर त्याला जितका समाज माहीत आहे त्यापलीकडेही समाज असतो व तो त्याने कितीही प्रयत्न केला तरी पूर्णपणे शिकून, समजून घेणे एका मानवी आयुष्यात शक्य नसते हे मान्य असावे लागते.
'रेघे'वर आपण जिथे आहोत तिथून आपल्यामते 'रेघे'वर दुसरा जिथे आहे तिथून त्याला अधिकाधिक आपल्याकडे आणणे हे प्रचंड सापेक्ष आहे आणि अनंत घटकांनी प्रभावित होऊ शकणारे आहे.
एखाद्या स्त्रीला तिचा नवरा रोज मारतो हे त्या स्त्रीला स्वीकारार्ह वाटत असूनही त्याने मुलीचा गर्भ पाडायला लावला हे पटत नसेल तर त्या स्त्रीला 'रेघे'वरील आपल्या बँडकडे आणू पाहणार्या स्त्रीला मुळात कोणाचातरी नवरा त्याच्या बायकोला रोज मारतो हेच मान्य होणार नाही मात्र 'स्वतःचा नवरा आपल्याकडे लक्षच देत नाही' हा प्रॉब्लेम असू शकेल. अश्या परिस्थितीत ही दुसरी स्त्री पहिल्या स्त्रीला 'तुला नवरा रोज मारतो' हेच मान्य करू नकोस असे सांगण्यात वेळ व्यतीत करणार. किंवा, 'तो तुला मारतो हे तुला मान्य आहे म्हंटल्यावर त्याने गर्भलिंगनिवड करायला भाग पाडले हे तू कसे नाकारणार' असे विचारत बसणार. पण स्वतःला काहीच प्र्श्न नाही आहेत हे खोटे आहे हे तिलाही माहीत असणार. किंबहुना, तिच्यासाठी 'जगात कोणीतरी बायकोला मुलीचा गर्भ पाडायला लावला' ह्यापेक्षा आज संध्याकाळी घरी गेल्यावर आपला नवरा आपल्याशी एक अक्षरही बोलू इच्छीत नसेल हा प्रॉब्लेम अधिक क्लिष्ट असेल. हे फक्त 'एक' उदाहरण झाले.
एक माणूस दुसर्याला काही किमान सुधारणेच्या पातळ्या व त्यासाठी आवश्यक असणारी कृत्ये शिकवू शकतो. पण हे सुचवताना त्याला त्याची स्वतःची 'रेघे'वरची पोझिशन सर्वाधिक योग्य वाटत असते. किंवा फार तर, त्या विशिष्ट माणसाच्या तुलनेत स्वतःची पोझिशन 'फार फार बेटर' किंवा 'अॅप्रोप्रिएट टू गाईड हिम/हर' वाटत असते.
दिवस खूपच वेगळे आहेत. अॅन्टिडिप्रेशन पिल्स घेऊन कोणीतरी ब्लूमिंग्टनला आपली मनस्थिती कशी काय शाबूत राखतो हे एखाद्या कर्हाडच्या सुशिक्षित बेरोजगाराला समजू शकत नाही. पण दिवस वेगळे आहेत. तसे होऊ शकते हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध होऊ शकत आहे. आता ह्या गोष्टी सर्वत्र होत आहेत. औषधे देणे हे डॉक्टरचे काम आहे आणी डॉक्टर्सनी 'घासलेली' असते.
औषधे देऊ शकण्यास परवानगी नसणार्यांनी मात्र 'रेघ' आठवावी.
नुसत्या वरवरच्या प्रशिक्षणाने कोणी कोणाचे आयुष्य बदलू शकत नाही असे मला वाटते.
==================
-'बेफिकीर'!
छ्हान
छ्हान
बेफिकीर, शेवटचं वाक्य समर्पक
बेफिकीर,
शेवटचं वाक्य समर्पक आहे. जो मोकळा असतो तोच बद्धाला सोडवू शकतो.
आ.न.,
-गा.पै.