२ कैर्या ( छिलून छोट्या छोट्या फोडी केलेल्या ),
२ चमचे तेल,
जीर, मोहरी फोडणीसाठी ( सोताच्या मनाने हिंग टाकण्याचा शानपणा करु नये ),
चवीनुसार मीठ ,
पाव चमचा - हळद ,
पाव चमचा - तिखट ,
२ मध्यम आकाराचे गुळाचे खडे ( घरात अगदीच उपलब्ध नसन त जवळच्या किराणा दुकानातुन गुळ घेऊन यावा.. यासाटी घरातल्याच एखाद्या लहान मेंबरवर डोळे काढले तरी काम होऊन जातं ),
पाणी ( प्याचचं घ्यावं.. घरच्यांनी वेळोवेळी दटावल्याचा राग स्वयंपाकावर काढू नये.. आई म्हणते ).
१. घरात सर्व सामान / जिन्नस ( धागीय शब्दात ) हायेत की नै पाहून घ्यावं . नसनं त आणून घ्यावं .
२. छोटी कढई किंवा जरमन च एखादं भांड गॅसवर ठेवावं. खालून गॅस सुरु करायला विसरु नये नै त कैच शिजत नै (स्वानुभव).
३. त्यात सांगितलं तेवढ तेल घालाव.
४. गरम झाल्यावर (भांड आणि तेल दोनीबी .. हात लावून पाहू नये.. हवं त सरावलेल्या (स्वयंपाकाला) व्यक्तीला हाताशी (शब्दशः अर्थ घेऊ नये ) घ्याव. ) त्यात मोहरी , जीर्याची फोडणी घालावी.
५. तडतडल्यावर त्यात कैरीच्या फोडी (घुईटी असल्यास त्या सकट) टाकाव्या .
६. व्यवस्थित हलवून घेतल्यावर (कैरीच्या फोडी.. इथ कुठलेही अंगइक्षेप करू नये. गैरसमज होतो.. इतरांचा..) त्यात तिखट, मीठ, हळद आणि गुळाचे खडे टाकावे .. त्यानंतर त्यात अर्धी वाटी पियाचं पाणी टाकून झाकण ठेवून ५ ते ७ मिंट शिजू द्यावं..
शिजल्यावरचं खावं ..
ते हे असं दिसतं :
राजस्थानी प्रकार हाये. संपादन करताना प्रादेशिक च्या ऑप्शन मंदी राजस्थान दिसलं नै म्हणून मारवाडी अस टाकलं.. राजस्थान मदि लय मारवाडी लोकं राह्यते हा आपला समज (गैरसमज) .. संबाळून घ्या.
अग मी आजच बनवलेली लुंजी,मम्मी
अग मी आजच बनवलेली लुंजी,मम्मी पप्पांनाही आवडली धन्स
अरे वा .. छान
अरे वा .. छान
लुंजी मस्तं झाली. थँक्यू
लुंजी मस्तं झाली. थँक्यू टीना.
जिरं घालाचं भुलूनच गेलो. नेक्स्ट टाय्मला घालू. अगोर्यावानी खाल्लं. तीन डाव पुर्लं.
मॄण्मयी .. फोटू बेश्ट.. मलापन
मॄण्मयी .. फोटू बेश्ट.. मलापन पाहिजे .. मला वाटल इसरले बी असतील लोक्स हि पाकॄ पण नै वाटतं अजुन्तरी ..
वा भारी फोटो.
वा भारी फोटो.
मस्त फोटो. मोहरीऐवजी कलौंजीही
मस्त फोटो. मोहरीऐवजी कलौंजीही चालेल असं एकदम वाटून गेलं.
Pages