२ कैर्या ( छिलून छोट्या छोट्या फोडी केलेल्या ),
२ चमचे तेल,
जीर, मोहरी फोडणीसाठी ( सोताच्या मनाने हिंग टाकण्याचा शानपणा करु नये ),
चवीनुसार मीठ ,
पाव चमचा - हळद ,
पाव चमचा - तिखट ,
२ मध्यम आकाराचे गुळाचे खडे ( घरात अगदीच उपलब्ध नसन त जवळच्या किराणा दुकानातुन गुळ घेऊन यावा.. यासाटी घरातल्याच एखाद्या लहान मेंबरवर डोळे काढले तरी काम होऊन जातं ),
पाणी ( प्याचचं घ्यावं.. घरच्यांनी वेळोवेळी दटावल्याचा राग स्वयंपाकावर काढू नये.. आई म्हणते ).
१. घरात सर्व सामान / जिन्नस ( धागीय शब्दात ) हायेत की नै पाहून घ्यावं . नसनं त आणून घ्यावं .
२. छोटी कढई किंवा जरमन च एखादं भांड गॅसवर ठेवावं. खालून गॅस सुरु करायला विसरु नये नै त कैच शिजत नै (स्वानुभव).
३. त्यात सांगितलं तेवढ तेल घालाव.
४. गरम झाल्यावर (भांड आणि तेल दोनीबी .. हात लावून पाहू नये.. हवं त सरावलेल्या (स्वयंपाकाला) व्यक्तीला हाताशी (शब्दशः अर्थ घेऊ नये ) घ्याव. ) त्यात मोहरी , जीर्याची फोडणी घालावी.
५. तडतडल्यावर त्यात कैरीच्या फोडी (घुईटी असल्यास त्या सकट) टाकाव्या .
६. व्यवस्थित हलवून घेतल्यावर (कैरीच्या फोडी.. इथ कुठलेही अंगइक्षेप करू नये. गैरसमज होतो.. इतरांचा..) त्यात तिखट, मीठ, हळद आणि गुळाचे खडे टाकावे .. त्यानंतर त्यात अर्धी वाटी पियाचं पाणी टाकून झाकण ठेवून ५ ते ७ मिंट शिजू द्यावं..
शिजल्यावरचं खावं ..
ते हे असं दिसतं :
राजस्थानी प्रकार हाये. संपादन करताना प्रादेशिक च्या ऑप्शन मंदी राजस्थान दिसलं नै म्हणून मारवाडी अस टाकलं.. राजस्थान मदि लय मारवाडी लोकं राह्यते हा आपला समज (गैरसमज) .. संबाळून घ्या.
लयं भारी लिवलंय! चटपटीत
लयं भारी लिवलंय! चटपटीत एकदम.. तोंपासु
भारी! रच्याकने मेथांबाही
भारी!![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
रच्याकने मेथांबाही असाच करतात ना?
तुमची रेसिपी लिहायची स्टाइल
करून बघणेत येइल.
योकु, मेथ्यांब्यात मेथ्या
योकु, मेथ्यांब्यात मेथ्या असतात आणि पाणी नसतं.
हो योकु , हा मेथांबाच पण
हो योकु , हा मेथांबाच पण विदाऊट मेथ्या. पण पाकृ आणि लिखाण लई भारी.
हो योकु , हा मेथांबाच पण
हो योकु , हा मेथांबाच पण विदाऊट मेथ्या. पण पाकृ आणि लिखाण लई भारी.
माझी आजी आणि आई थोड्याश्या
माझी आजी आणि आई थोड्याश्या कच्च्या पेरूची पण करतात लुंजी.
अप्रतिम लागते. आवडत असूनही वासामुळे लोणचं फारसं न खाणार्या माझ्या सारख्यांना हे वरदान आहे.
लिहायची स्टाईल लई भारी ..
लिहायची स्टाईल लई भारी :हाहा:.. पाकृ पण आवडली
सर्वांची आभारी आहे.. कृपया
सर्वांची आभारी आहे..
.. एवढा आदर जड जातो ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
कृपया एकेरी बोला .. ते जास्त आवडेल मला
अगोर्यावाणी << म्हणजे काय?
अगोर्यावाणी << म्हणजे काय?
मस्तं आहे. घरात सगळे जिन्नस
मस्तं आहे.
घरात सगळे जिन्नस आहेत.
करून खाते.
अदिति >> अगोरी = अघोरी ..
अदिति >>
अगोरी = अघोरी ..
Tina lai bhaaree
Tina lai bhaaree![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वावा..लुंजी जबरी
वावा..लुंजी जबरी लागते.
योकु,
आपल्याकडे भंडार्यांमध्ये असते लुंजी.
अगोर्यावाणी म्हणजे
अगोर्यावाणी म्हणजे हावरटासारखं, जाता येता चरणे बहूतेक.
वा वा! भन्नाट लिहिलीय!
वा वा! भन्नाट लिहिलीय!
>>व्यवस्थित हलवून घेतल्यावर (कैरीच्या फोडी.. इथ कुठलेही अंगइक्षेप करू नये. गैरसमज होतो.. इतरांचा..)![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
>>अगोर्यावाणी खाल्लं त सकाळ, दुपार, संध्याकाळ यकट्याले पुरते.
खालून गॅस सुरु करायला विसरु
खालून गॅस सुरु करायला विसरु नये नै त कैच शिजत नै (स्वानुभव).
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
>>
खालून???
खालून???![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
मी लुंगी वाचलं आधी - मग चष्मा
मी लुंगी वाचलं आधी - मग चष्मा लावला.... मग आहारशास्त्रं वगैरे...
टीना, इष्टाइल जबरी तुझी...
विस्मरणात गेलेले शब्द, हेल
विस्मरणात गेलेले शब्द, हेल वाचून मजा आली!
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
भैताडावानी लिहील ना बे. यात
भैताडावानी लिहील ना बे.:फिदी::दिवा: यात मेथ्या फोडणीत घातल्या की झाला आमचा कायरस उर्फ मेथाम्बा. नो पाणी. कृती व स्टाईल लय भारी.
मी पण आधी लुन्गीच वाचले, म्हणल धुन्द रवि सारखे पाकृमध्ये लुन्गी कुठुन्शान आली.
अकोल्यात पुर्वी लग्नामधे
अकोल्यात पुर्वी लग्नामधे लुंजी हमखास असायची. आता माहिती नाही. हनुमान जयंतीला भंडारा असायची तिथेही लुंजी ठेवत.
प्रचंड आवडीचा प्रकार.
टिना धन्स आठवण करुन दिल्याबद्द्ल आणि कुणाला तरी हा प्रकार माहिती आहे हे वाचून आनंद झाला.
छान लिहिलंय फोटोही छान.
छान लिहिलंय
फोटोही छान.
टीना, मस्तच लिहिल आहे. फोटो
टीना, मस्तच लिहिल आहे.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
फोटो मस्तच, नक्की ट्राय करेन.
lai bhaari livlay.. kairi
lai bhaari livlay.. kairi avadate tyamule karun khaane aalech..
जबरी.. रेसीपी.. अन लिखाणातला
जबरी.. रेसीपी..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अन लिखाणातला नागपुरी.. विदर्भी टच तर क्या कहने!!
अशि कावुन कर्ते.. इलुशीक पाठव न हिकडे!
मस्त लिहिलंय मेथ्या टाकल्या
मस्त लिहिलंय![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मेथ्या टाकल्या की मेथांबा. कैरी ऐवजी पेरु घातला तर पेरुचं लोणच. पेरुचं लोणचं मी 'अगोर्यावाणी' खाते भाजीसारखं.
मस्त रेसिपी ,लिखाण लय भारी.
मस्त रेसिपी ,लिखाण लय भारी.
लेखन भारी. आमच्याकडे कैर्या
लेखन भारी. आमच्याकडे कैर्या आता कुठे यायल सुरूवात झालीये. परसातलं आंबा वेड्यासारखा अजून मोहोरातच अडकलाय. त्याला कैर्या आल्या की हा प्रकार नक्की करणार.
मस्त पाक्रु आन लिखान!
मस्त पाक्रु आन लिखान!
Pages