* अभिनव मोडी लिपी स्पर्धा *
... एकाच दिवशी, एकाच वेळी महाराष्ट्राच्या चार शहरात ...
(१) " सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा "
(२) " शिघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा "
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे २०१५ या दिवशी एकाच वेळी मुंबई, पुणे, नाशिक आणि अहमदनगर या शहरांमध्ये मोडी लिपीची स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
(१) " सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा "
वेळ : सकाळी १०.०० ते ११.०० वेळ मर्यादा : एक तास
यात एक पान देवनागरी लिपीतील उतारा दिला जाईल. त्याचे मोडी लिपीत लिप्यंतर करावयाचे आहे. अक्षर चूका ग्राह्य धरल्या जातील. एका अक्षरास अनेक पर्याय असल्यास कोणतेही पर्याय वापरण्यास मुभा आहे.
सूचना : कागद आयोजक पूरवतील. स्पर्धकांना स्वत:चे पेन, बोरू, टाक, पेंसिल, कोड रब्बर, फूट पट्टी आणि राईटींग पॅड आणावयाचा आहे. �
(२) " शिघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा "
वेळ : सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० वेळ मर्यादा : एक तास
यात १ शिवकालीन आणि १ पेशवेकालीन कागद दिला जाईल दोन्ही कागदांकरिता अर्धा-अर्धा तास दिला आहे. स्पर्धक तो एक तास स्वत:स हवा तसा वापरू शकतात.
सूचना : कागद आयोजक पूरवतील. स्पर्धकांना स्वत:चे पेन, बोरू, टाक, पेंसिल, खोड रबर, फूट पट्टी आणि राईटींग पॅड आणावयाचा आहे.
प्रथम तीन विजेत्यास उत्तम परितोषीक असून इतर सर्वांस स्पर्धे अंती मोडी सरावा करिता साहित्य दिले जाईल. स्पर्धा व निकाल प्रक्रीयेचे सर्व हक्क आयोजकांकडे राहतील.
प्रवेश : एका स्पर्धेचा सहभाग शुल्क ₹ १०० आहे तर दोन्ही स्पर्धेचा सहभाग शुल्क ₹ १५० आहे.
स्पर्धा केंद्र :
(१) मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक
वीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क,
दापर (प), मुंबई - ४०० ०२८
संपर्क क्रमांक : ०२२-२४४६५८७७
(२) अहमदनगर : अहमदनगर ऐतिहासीक वास्तु संग्रहालय
हातमपुरा, कलेक्टर कचेरी शेजारी,
अहमदनगर - ४१४ ००१
संपर्क अधिकारी : श्री.सतोष यादव
संपर्क क्रमांक : ९३७२१-५५४५५
(३) नाशिक : चिंतामणीज मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग
१६६५, ए/२, तिळभांडेश्वर पथ,
दिल्ली दरवाजा, नाशिक - ४२२ ००१
संपर्क अधिकारी : श्री.अरविंद साने
संपर्क क्रमांक : ९८५०७-४६१७२
(४) पुणे :
डी. आर. नगरकर प्रशाला
४४/१३४, नवसह्याद्री सोसायटी, कर्वे नगर
नवसह्याद्री टेनिसकोर्ट शेजारी,
म्हात्रे पूल डी पी रस्ता पुणे ४११०५२
संपर्क अधिकारी : श्री.परेश जोशी
संपर्क क्रमांक : ९८८११-०४३७९
स्पर्धा निष्पक्ष व पारदर्शक ठेवण्याकरिता ठरलेल्या वेळीच प्रारंभ होईल आणि थांबिवली जाईल. तेच कागद चरंही केन्द्रावर दिले जातील आणि वेळेची कटीबद्धता पाळली जाईल.
प्रवेश अर्ज स्पर्धा ठिकाणी शुल्का सहीत सुपूर्द करायचा आहे. काही दिवसात येथे अप्लोड केला जाईल जो डाऊनलोड करून स्पर्धा ठिकाणी नोंदणी पक्की करावयाची आहे. प्रत्येक केंद्रावर स्पर्धक मर्यादा १०० ठेवण्यात आली आहे. प्रथम नोंदणी, प्रथम प्राधान्य या तत्त्वावर.
स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या: https://www.facebook.com/events/403735983140079/
छान उपक्रम व स्पर्धेसाठी
छान उपक्रम व स्पर्धेसाठी स्पर्धकांना शुभेच्छा !
कृपया ते खोड रबर असे करणार का ?
मस्त स्पर्धा स्पर्धेसाठी
मस्त स्पर्धा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्पर्धेसाठी मन:पुर्वक शुभेछा!!!
अशी ही स्पर्धा पहिल्यांदा ऐकत
अशी ही स्पर्धा पहिल्यांदा ऐकत आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा.
मोडी लिपी येत नसेल तर? कारण शाळेत आम्हाला तरी फक्त देवनागरी होती. मोडी लिपी नव्हती.
मोडी लिपी लिहिता वाचता येणारे
मोडी लिपी लिहिता वाचता येणारे किती असतील?
खूप छान उपक्रम आहे हा!!
खूप छान उपक्रम आहे हा!! स्पर्धकांना तसेच आयोजकांना शुभेच्छा!!
बी, आमच्या अंकलिपीत मोडी
बी, आमच्या अंकलिपीत मोडी लिपीतले उतारे होते. मी स्वतः बोरु आणि कित्ता वापरला आहे. पण ती लिपी शिकण्याची संधी मात्र मिळाली नाही.
माझे आजोबा, मलकापूरच्या राजवाड्यात कोठावळे होते. त्यांना हि लिपी लिहिता वाचता येत असे. राजवाड्यातल्या व्यवहारात हिच लिपी वापरत असत ते.
उपक्रमास शुभेच्छा...... (मोडी
उपक्रमास शुभेच्छा......
(मोडी येत नसल्याने, व आईकडून कधीच शिकुनही न घेतल्याने, यात सहभागी होता येत नाही याबद्दल खेद आहे.)
अरेरे.. माझे चुलत सासरे मोडी
अरेरे.. माझे चुलत सासरे मोडी लिप्यंतरकार आहेत.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
त्यांनी नुकताच "श्री गजानन विजय" हा ग्रंथ मोडीत लिप्यंतर करून शेगांव येथे दिला.
ते नेमके आत्ता भारतात नाही आहेत.
दिनेशदा, माझे बाबा मोडी
दिनेशदा, माझे बाबा मोडी लिपीतूनच लिहायचे.
माझ्यामते मोडी लिपी म्हणजे ईंग्रजीमधील cursive handwriting. मला ईंग्रजीमधे सुद्धा cursiveमधे लिहिता येत नाही. त्यासाठी ईंग्रजी माध्यमातूनचं शिकावे लागते असे वाटते.
विकीमधील एक लिंक पुरवत
विकीमधील एक लिंक पुरवत आहे:
http://en.wikipedia.org/wiki/Modi_alphabet
ओम नमोजी आद्या.. वाचता आलं कि
ओम नमोजी आद्या..
वाचता आलं कि !
मला ते वाचता आलं कारण ही गणेश
मला ते वाचता आलं कारण ही गणेश वंदना मला माहिती आहे म्हणून. लताबाईंनी गायलि आहे म्हणून. नाहीतर 'ओम' (हे एकाच अक्षरात कसे लिहायचे?) नंतर वाचता आले नसते.
छान उपक्रम!
छान उपक्रम!
मानुषी, मोडी लिपी जाणकार
मानुषी, मोडी लिपी जाणकार भरपूर आहेत आणि संख्याही वाढते आहे. यासाठी वेगळे वर्ग चालवले जातात कारण बर्याच मोठ्या प्रमाणात सरकारी कागदपत्रं मोडीत आहेत. ती देवनागरी लिपीत परावर्तीत करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे.
परेशजोशी१४, स्पर्धेच्या माहितीबद्दल धन्यवाद! ही लिंक इच्छुकांना पाठवली आहे.
मानुषी, मोडी लिपी जाणकार
मानुषी, मोडी लिपी जाणकार भरपूर आहेत आणि संख्याही वाढते आहे. > +१
छान उपक्रम. मी ही मोडी लिपी शिकण्यासाठी किन्ग जॉर्ज मधील श्री. साळगावकर यांच्याशी संपर्क साधला होता. पण तेव्हा विक डेझ मधे वर्ग असल्यामुळे जाता आले नाही. विकेन्ड बॅच असल्यास जायची इच्छा आहे
हो मंजूडी ...... तेच मला
हो मंजूडी ...... तेच मला जाणून घ्यायचं होतं. कारण इथे नगरमधे मोडीचे वर्ग चालतात. पण किती लोक क्लास अटेन्ड करतात माहिती नाही.
आणि हे परेश जोशीही नगरचेच असावेसं वाटतं......( नाही नाही........आत्ताच त्यांचं प्रोफाइल पाहिलं..पुणे आहे.)
छान आहे उपक्रम. शुभेच्छा!
हे बोरू, टाक ई. म्हणजे नक्की
हे बोरू, टाक ई. म्हणजे नक्की काय? गुगल मधे काय सर्च करावे?
quill सारखेच असते का?
हे कुठे बघायला मिळेल / विकत घेता येईल?
हे लाकडाचे असते की पक्षाच्या पिसापासुन बनते?