वाचण्या आधी नोंद घ्या :
मनात आला तस लिहिल,,
शुद्धलेखनाची अपेक्षा ठेवू नये. शाळेपासुनची सवय आहे, जी तेव्हा बाई सुधरवु शकल्या नाहीत आणि आता तर विचारच सोडा..
शब्दापेक्षा भावना महत्वाची असे कुणीतरी म्हटले आहे. जे माझ्या मनाला पटते म्हणून मी भावना पोहोचवण्याचा मार्ग स्वीकारला आहे पण जर एखाद्या शब्दाने चुकीचा अर्थ लागत असेल तर मात्र कान उघडणी करण्याची मुभा सर्वांना आहे..
==================================================
अजब है दिवाना ना दर्द ना ठिकाना,,
जमी से बेगाना फलक से जुदा..
अजब है दिवाना ना दर्द ना ठिकाना,,
जमी से बेगाना फलक से जुदा..
ये एक तूटा हुआ तारा नजाने किस पे आयेगा,,
है अपना दिल तो आवरा, नजाने किस पे आयेगा..
पंचर साइकल हाताने ओढत आणि कानात इयरफोन टाकून हे गाण ऐकत आणि गुणगुणत अबोली घरी चालली होती. ईतर काही अंदाज यायच्या आतच शेजारचा गाडीचे दार उघडले गेले आणि त्याच्या धक्याने ती थेट साइकल सहित जमिनीवर कोसळली..
“ आई ग ” क्षणभर कळवळली टचकन डोळ्यात पाणीही आले पण लगेच स्वताला सावरत “ आईच्या गावात.. काय यार बाप्पा आधीच ती पंचर होती.. आता तर फॅचर झाले तिला..(साइकलचे हॅन्डल वाकडे झाले होते) सॉलिड ओरडा पडणार आहे आज आईचा..”
तिचा तोंडून “ आईच्या गावात ” हे ऐकून गाडीतून उतरणार्या सुहासला एक क्षण वाटले की झाले,,,, आता ही थेट आपल्याला मालवणीत शिव्या द्यायला सुरुवात करेल.. पण कसले काय ही स्वत:शीच बडबडते आहे.. रस्त्यात एका मुलीकडून शिव्या ऐकण्यापासून वाचलो या गोष्टीने सुखावून त्याने लगेच तिला मदतीसाठी हात दिला..
सुहास: ( हात देत) I’m sorry,, I’m real very sorry.. अहो मी फोनवर बोलण्याच्या नादात न बघताच सरळ दार उघडले.. तुम्हाला बरेच लागलेल दिसतय.. चला मी तुम्हाला डॉक्टरकडे न्हेतो
तिचा हाताला खरचटले होते आणि ढोपर ही आपटले होते बहूतेक.
अबोली: नो नो नो.. मला डॉक्टरची गरज नाही.. मी साइकल रिपेरवाल्याकडे जाईन आता,, त्याची जास्त गरज आहे. ईट्स ओक बाइ.
सुहास: ohk.. than,, मी नेतो रेपैरवाल्याकडे..
अबोली : नाही .. माझी साइकल मी घेउन जाईन ( थोड उद्धटपनेच बोलली)
सुहास: I know ma’m.. पण ती माझ्यामुळे तुटली आहे.. आणि अंधार पडतोय .. त्यात हे गावचे ठिकाण,,, नीट गाडी नाही भेटली तर अजून प्रॉब्लेम होईल.. प्लीज़ ट्रस्ट मी,, माझ ऐका.. साइकल रिपेरला टाकल्यावर तो हि काही ती लगेच देणार नाही .
अबोली: (काहीशी विचार करून) ohk… चला.. आहह्ह..(वेदनेचे चित्कार)
सुहास: पायलाही लागले आहे का?
अबोली: ह्म्म्म थोडेसे
सुहास: kk..
तिला दार उघडून देतो आणि साइकल गाडीवर बॅग ठेवायच्या स्टॅंडवर नीट ठेवून ड्राइविंग सीटवर येवून बसतो.. गाडी स्टार्ट होते आणि सुरवात होते एका प्रवासाची ….
सुहास: तुमचे नाव काय म्हणालात?
अबोली : मी कुठे काय म्हणाले??
सुहास: अम्म्म ओह्ह माझा प्रश्न चुकीचा ठरला,,, काय नाव तुमचे..
अबोली: अबोली
सुहास: ओहक.. nice name मी सुहास देशमुख
अबोली: ह्म्म..
तीच सतत गुढघ्यावर जाणारा हात .. तिची प्रत्तेक हालचाल,, चेहर्यावर शांत पण वेदनेच्या छटा तो बरोबर टिपत होता..
अबोली : वाटेत कुठे रेपैरवाला दिसत नाहीये माझ्या साइडला.. तुमचा बाजूने ही नीट पहा हा प्लीज़
सुहास : ohh Yaa sure ..
थोड्यावेळाने गाडी थांबते,
अबोली: इथे कुठे आहे साइकल शॉप??
सुहास: तुम्ही उतरा तर खर..
दोघही गाडीतून उतरतात
सुहास: या आत जाउया (एका क्लिनिक समोर येउन)
अबोली: डॉक्टर,,,,,, ohh god हे तर गोडबोले काकांचे क्लिनिक आहे,,, मी म्हणाले ना तुम्हाला की मला डॉक्टरकडे नाही जायचे.. तरीही तुम्ही,,,,, (चिढून) माझी साइकल काढा मी जाईन माझा मार्गाने.. thanks for the help पण केलीत तेवढी पुरे ……. आहsss
एवढे म्हणून अबोली घाईत मागे फिरत असते पण पायावर लगेच ताण पडल्याने वेदनेची तिव्र कळ येते..
सुहास: अहो तुम्हाला कळत कस नाही की डॉक्टरकडे जाण जास्त गरजेच आहे जखम किती खोल आहे हे आपण मघाशी नीट पाहिले न्हवते पण आता रक्त फार वाहत आहे..
अबोली: फार खोल नाहीये आणि घरी माझी आई घरगुती उपचार करेल सो प्लीज़,,,
सुहास कडे आता तिला डिवचून बोलण्या व्यतिरिक्त कोणता मार्ग उरला न्हवता,, so त्याने तेच केले
सुहास: ohhh,, अच्छा आत्ता कळले मला, तुम्हाला डॉक्टरची भिती वाटते तर
अबोली: (संतापून) मी माझी आई सोडली तर कुणाचा बापाला ही घाबरत नाही..
या वाक्यावर पुन्हा एकदा सुहास गोंधळला कसली वाक्य टाकते आहे ही मुलगी म्हणे “ कुणाचा बापाला ही घाबरत नाही ” आणि त्यात हे ही सांगते आहे की आईला घाबरते.. या अश्या भाषेवर आश्चर्य कराव की हसाव तेच कळत नाहीये. भलतच विचित्र कॅरक्टर दिसतय ”
सुहार : हो ना,, चला तर मग.. आत जाउया नाहीतर डॉक्टर निघून जातील..
दोघही आत जातात.. फार कुणी पेशंट नसतात. काही वेळाने डॉक्टरांच्या रूम मधे जातात..
डॉ. गोडबोले : (चिडवत) या या अबोली ताई … आज तुम्ही स्वत: आमच्या क्लिनिकला पाय लावायला कश्या आलात त्या ही एकट्या..
अबोली: मला वेड लागलय का काका स्वता इथे यायला ….. हे घेउन आलेत मला “ बळजबरीने ”
सुहास: नमस्कार डॉक्टर तुम्ही ओळखता यांना?
डॉ. हो,, हे आमचच लेकरू आहे.. म्हणजे हिचे वडील माझा मित्र,,, आता तो नाही आमच्यात पण मैत्री आहे..
अबोली: (सुहास ला उद्देशून) मला घरी जायला उशीर होतोय..
सुहास: ओह हा,,
डॉ. ह्म कुठे धडपडलीस,,, चल आत,, बघुया किती लागले आहे ते..
थोड्यावेळाने बाहेर येउन बसत..
डॉ. मी औषध लावून पट्टी केली आहे तिटनेस चे इंजेक्शन ही दिले आहे. जखम थोडी खोल असल्याने जरा रक्त गेले पण.. तशी आमची अबोली फार strong आहेच so होईल एक आठवड्यात बरी.. काही काळजी करण्यासारखे नाहीये.. (अबोली ला उद्देशून) मी गोळ्या देत आहे त्या निदान आठवडाभर तरी घेतल्या पाहिजेत कळे का..
अबोली: मी नाही घेउन जाणार तुमच्या गोळ्या.. राहुद्या तुमच्या कडेच,, कुणा गरजूला उपयोगी पडतील.
सुहास ला काय चालले आहे तेच कळत न्हवते.. काय लहान मुल्लांसारखे सौंवाद kart आहेत हे दोघ असा विचार करत तो मधेच बोलला
सुहास : औषधा शिवाय बरे वाटणार आहे का..
अबोली : मला वाटते बर,, मी औषध खात नाही …. काय हो गोडबोले काका तुमचा घरी काकी किती छान खाऊ देते मला आणि तुम्ही ही कडू कडू औषध देत असता.. याक
डॉ. : पुरे झाले तुझे,, मुकाट्याने ही औषधे घे नाहीतर वहिनीला फोन करेन …
अबोली: ohh god… द्या ती इकडे…(नाटकी स्वरात) I hate u..
असे म्हणत ती सरळ उठून बाहेर निघाली तसा सुहास उठला आणि ती जात असल्या दिशेने पाहू लागला
डॉ. : गोंधळु नका,, आमच हे दर वेळेच असते.. औषधांचा भारी तिटकारा आहे हिला,, मोठ मोठे दुखणे अंगावर काढेल, कितीही बर नसले तरीही स्वताहून कधी कोणत्या डॉक्टरकडे जात नाही.. पण आईचा शब्द मात्र पळते..
सुहास : (स्मित हसत) चला मी ही निघतो आता..
==================================================
गाडीत शांतता होती सुहास मनात विचार करत होता की “ ही काय धड बोलत नाही,, आता आपण ही नाही बोलायचे उगाच ” आणि अबोली खिडकी बाहेर चा निर्मनुष्य रस्ता न्याहळात होती तेवढ्यात,, तिला काही सुचल्यासारखे झाले..
अबोली : खूप उशीर झाला आहे.. तुम्ही मला सरळ घरीच सोडल का
सुहास ला हा अचानक सौम्य प्रश्न ऐकून नवलच वाटले
सुहास: हो,, पण मग ही साइकल??
अबोली : घराजवळ आहे एक दुकान,, मी उद्या सकाळी करून घेईन रिपेर
सुहास: बर,,, … तुम्हाला घरी फोन करून कळवले पाहिजे होते..(थोड सावधपणे तिचा मूड चा अंदाज घेत) म्हणजे अस मला वाटते
अबोली : ह्म,, मी कळवले मघाशी क्लिनिक बाहेर आल्यावर..
सुहास : ohk गुड...
अबोली : अम्म्म,, m sorry.. म्हणजे मी फारच रूड्ली बिहेव केल तुमच्या सोबत.. त्याबद्दल..
सुहास : its ok ,, I understand.. एका अनोळखी व्यक्तीवर सहज विश्वास नाही करू शकत कोणी आणि ते योग्य ही आहे
अबोली : ह्म
सुहास : इथून पुढे कुठे टर्न घेउ.. (त्याला तिच्या घरचा पट्टा कसा माहित असेल ना..)
अबोली : राइट घ्या.. पलांडे वाडी 403, वरदकर निवास
सुहास : ohk.. music?
अबोली: माझी हरकत नाही..
सुहास ने redio on केला
वो अचानक आगाई यूँ नज़र के सामने
जैसे निकाल आया घटा से चांद..
चेहेरे पे झूल्फे बिखरी हुई थी
दिन मे रात हो गयी
एक अजनबी हसिना से यूँ मुलाकात हो गयी
फिर क्या हुआ ये ना पूछो कुछ ऐसी बात हो गयी
थोड्या वेळाने अबोलीने सांगितलेल्या घरा समोर गाडी थांबली,,
अबोली: ह्म,, आले माझे घर .. प्लीज़ जरा साइकल काढून देता
सुहास: हो हो..
दोघ ही गाडी बाहेर उतरले आणि सुहास ने तिला साइकल उतरवून दिली
अबोली: थॅंक्स.. bye.. एन हा नाइस टू मीट यू
सुहास: me too
अबोली घरचा गेट मधून आत गेली आणि सुहास गाडीत बसला.. एक क्षण त्याने गेटच्या दिशेने पाहिले आणि आपल्या मार्गाने निघाला.
==================================================
अबोलीच्या घरी तिची आई, काकी आणि लहान बहिण म्हणजे तिचा काकीची मुलगी शेहाल तिघेही तिची वाट बघत हॉल मधेच बसल्या होत्या..
स्नेहल : काकू ताई आली बघ
आई : किती वेळ ग तुला,, आणि कुठे लागले बघू .. गोडबोले भौजींनी फोने करून सांगितले मला
अबोली : वाह छान,, नाही म्हटले तरी केलाच का काकांनी फोन ..
काकी : ते सोड,, पाय बघू आधी तुझा
अबोली : अग काकू नाही फार लागले.. ठीक आहे मी ..
स्नेहल : ए ताई आलीस ना आता… चाल आधी जेवूया कधी पासून वाट बघतोय आम्ही भूक लागली आहे मला .. आणि जेवताना सांग सर्व कि काय झाले ok
अबोली : हो .. चाल ना आई मला पण खूप भूक लागलीये ..
आई : बर …चाल ग सरे जेवण वाढूया
थोड्या वेळाने सर्व जेवायला बसतात … आणि जेवताना अबोली घरच्यांना आज झालेला सर्व प्रकार सांगते..
स्नेहल : ओSSS तो वो तुझे छोडने घरतक आया था … क्या बात है ताई .. पण तू त्याला घरात का नाहि अनलेस… आम्हाला हि त्याला बघत आले असते ना कि तो दिसतो तरी कसा
आई : (रागे भरत ) स्नेहल….. (मग अबोलीला उद्देशून ) अबोली बेटा पण खरच तू त्याला घरात तरी बोलवायला हवे होतेस .. तुझी एवढी मदत केली त्याने
अबोली : आई बोलवायला काही हरकत न्हवती पण खर तर माझ्या ते लक्ष्यातच नाही आले ..
काकू : अशी कशी ग तू ,, नेमकी गोष्टच तुझ्या लक्ष्यात येत नाही .. एवढे त्याने तुला घरा परेंत सोडले .
अबोली : हो काकू पण ते त्याने त्याला गिल्ट राहू नये म्हणून केले … शेवटी त्याच्यामुळेच मला दुखापत झाली ना … पुरे झाले आता त्याचे पुरण.. जेवा आता नित उद्या ऑफिस आहे मला आणि तुम्हाला हि तुमची काम आहेत ना…
तुर्ताच विषय तिथे संपला जेवना नंतर सर आवरून चौघ हि झोपायला गेले . स्नेहल आणि अबोली एकाच खोलीत राहत असल्याने अबोलीला तिच्या बडबडपासून गत्यंतर न्हवते .. तसे तर दोघांना हि बोलण्याचा भारी छंद .. रोज रात्री दोघी हि दिवसभराच्या सार्या गप्पांची कसर भरून काढत , पण आज अबोलीचा मूड ऑफ होता .. तरी सांगणार कुणाला . आज हि स्नेहलची बडबड चालूच होती आणि आज तर तिला एक फ्रेश विषय भेटला होता, तिला सुहास बद्दल बरेच प्रश्न होते पण अबोलीकडे तिच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर न्हवते आणि त्यात इंटरेस्ट हि न्हवता . कसबस स्नेहलला गप करून झोपायला लावले होते . आणि आता स्वत: laptop वर काही काम करत बसिली होती.
अबोलीचा स्वभाव म्हणजे कधी कशाचा काही नेम नसायचा.. ती वेधल्लि होती , बडबडी होती , स्वप्नाळू होती , बालिश होती , भोळी होती , तशीच जबाबदार होती , समंजस होती , तटस्त होती , रागीट होती . एखाद्याला मनात जागा दिली तर शेवटपरेंत त्याला पाकळीसारख जपणारी आणि एखादा जर नीतीने नाही वागला तर जन्माची अद्दल घडवायला हि मागे पुढे ना पाहणारी .. अबोली the RJ AV. . Yes RJ जिल्ह्यातील एकमेव रेडिओ स्टेशन ची अत्यंत लोकप्रिया RJ. जिल्ह्यात तिच्या आवाजाचे तिच्या बोलण्याच्या स्टाइल चे बरेच चाहते होते. खरे पाहता ती अगदी सामन्या होती पण म्हणूनच ती लोकप्रिय होती कारण तिच्या श्रोत्यांना ती आपल्यातलीच वाटायची.
पण तिच्यासाठी स्नेहल, आई आणि काकू हेच तिचे खरे विश्व होते त्यांच्या सुखासाठी ती काहीही करायला तयार असायची.
==================================================
इथे सुहास ही घरी पोहोचला होता आणि अतिशय दबक्या पावलांनी घरात वावरत होता. घरात दिवे बंद होते बहुतेक त्याला आपल्या आईला जागे करायचे नसावे म्हणून त्याने ही ते लावायचे टाळले. त्याने स्वयंपाक घरात प्रवेश केला तसे दिवे लागले अचानक झालेल्या या प्रकरणे त्याच्या चेहेर्यावर चोरी पकडली गेली असे भाव उमटले होते.
सुहास : काय ग आई कितीदा सांगितले आहे तुला की माझी वाट पाहत नको जवुस म्हणून तरी तू काही सुधारणार नाहीस
आई: आधी तू सुधार स्वतला मग मला बोल,, गाढवा आईला उपदेश द्यायला काही वाटत नाही होई तुला
सुहास ; तसे नाही ग,,, पण माझ्यामुळे तू का म्हणून जागरण करून घेतेस एवढेच माझे म्हणणे आहे
आई : अरे आई आहे मी तुझी काळजी वाटते मला म्हणून वाट पाहते ना..
सुहास : बर बाई, आता तू जा झोप मी जेवेन माझ..
आई : नाही माझ्या समोर जेव,, मला माहीत आहे मी गेले की नावापुरते चार घास खाशील आणि जाशील झोपायला..
शेवटी सुहास ने शस्त टाकले आणि जेवायला बसला.. आईच्या सूचना चालूच होत्या हे घे ते खा.. पाणी पी सावकाश जेव वगैरे वगैरे…… जेवण आटपून आईला गुड नाइट म्हणून सुहास आपल्या रूम मधे झोपायला जात होता पण त्या आधी त्याला रोहन च्या रूम मधे डोकवावेसे वाटले.. रोहनला अगदी शांत चित्ताने झोपलेल पाहून त्याला नेहमी समाधान वाटायचे.
5 वर्षा पुर्वी सुहास चे वडील वारले आणि व्यवसाय उद्योगा सोबत जबबदारीचा भला मोठा पसारा सुहासच्या खांद्यावर टाकून गेले. गेल्या पाच वर्षयात वडिलांनी उभ केलेल वैभव सुहास ने दुपपटीने वाढवले. सुहास चे वडील म्हणजे श्री. विश्वास देशमुख यांचा आपल्या आईवार फार जीव होता पण योग्य वेळी योग्य उपचार न मिळाल्याने त्यांना आपले आईचे प्राण गमवावे लागले होते.. आणि मात्र मेडिकल फेसिलिटीस ना उपलब्ध असल्याने आपल्यला आपल्या आईला गमवावे लागले ही खंत त्यांचा मनात कायमची राहिली… म्हणूंच त्यांचे हे स्वप्न होते की त्यांच्या मूळ गावी एक मोठे अड्वान्स हॉस्पिटल उभारावे जिथे प्रत्तेक आजरावर उपचार होऊ शकेल जेणेकरून गावातील कोणालाही वैद्यकीय उपचारा अभावी आपले वा आपल्या प्रियजनांचे प्राण गमवावे लागू नये.. पण ते स्वप्न पूर्ण करण्या आधीच त्यांचा अपघाती मृत्यू झाला... दोन वर्षापूर्वी सुहासने इथे एक इंजिनियरिंग कॉलेज आणि बारावी पर्यंत ची शाळा उभारली होती पण हॉस्पिटल साठी त्याला हवी तशी जागा अजुन मिळत न्हव्ाती. त्याच संदर्भात आज एका पार्टी ला भेटायला गेला होता वडील गेल्या पासून आईने गावी राहण्याचे ठरवले. त्यामुळे त्याला ही सतत गाव शहर अशी ये जा करत राहावी लगे. त्याच्या आईने त्याला मी इथे एकटी अगदी मजेत राहीन माझ्यामुळे तू हा सतत चा प्रवास करायची काही गरज नाही असे सांगितले होते तरीही त्याला ते पटले नाही व आई ला न पाहता फार दिवस राहणे शक्य होत नसल्याने त्याने हा मार्ग निवडला होता.
सुहासचा स्वभाव म्हणजे एकल कोंडा.. मी बरा आणि माझे काम बरे असा होता. कॉलेज संपले आणि एवढ्या जबाबदर्या एकदम अंगावर पडल्यामुळे मित्रांना जपणे त्याला शक्या झाले नाही म्हणूनच त्याचा वाट्याला हा एकटेपणा आला असावा. त्याने पूर्णपणे स्वतला कामाच्या व्यापत गुंतवून घेतले होते. कामाशीवाय त्याला इतर काही सूचायचेच नाही.. पण आज पहिल्यांदाच काहीतरी वेगळे घडले होते त्याचा आयुष्यात. आज त्याला नेहमी पेक्षा वेगळाच उत्साह जाणवत होता. अंथरुणात रेलुन मेल्स चेक करताना तो स्वताशीच हसत वेगळ्याच विचारात हरवला होता.. का कुणास ठाऊक पण त्या विचारात अबोली होती.. तीच ते जमिनीवर कोसळले असताना आकाशाकडे बघून बाप्पशी बोलन, डोक्टरांच्या बोलण्यावर रागवणे, खिडकी बाहेर पाहताना वार्याने चेहेर्यावर विखूरनरे केस्सांना हळुवारपणे काना मागे सारने, आणि चुक कळल्यावर लहान मुलसारखा भोळा चेहेरा करून सॉरी म्हणणे.. तिचे प्रत्तेक वाक्य पुन्हा पुन्हा त्याच्या कानात घुमत होत, डोळ्यांसमोर तिच्या हालचालींची चित्रफिट चालू होती….. स्वाताच्या या वागण्याचे त्यालाच नवल वाटत होते या सार्यात रात्री कधी त्याला झोप लागली कळलेच नाही..
========================================================
सकाळी उठून सुहास मुंबईला निघाला .. ऑफिसला पोहोचला नेहेमीची काम केली. दुपारी एक मीटिंग होती ती झाल्यावर तो आपल्या कॅबीन मध्ये कोणती तरी file चाळत बसला होता .. तितक्यात शेजारच्या खिडकीतून हवेची एक झुळूक येवून त्याला बिलगली ,, त्या वार्याने प्रसन्न वाटू लागले .. सहजच त्याने खिडकी बाहेर पहिले ऑफिस च्या आवारात असलेल्या फुलझाडांना तो न्याहाळू लागला आणि अचानक त्याच्या लक्षात आले “ अरेच्या आपल्या ऑफिस च्या garden मध्ये अबोलीचे रोप का नाहीये ..” साकळ पासून त्याच्या मनात अबोलीचा विचार हि आला न्हवता , जणू काळ रात्रीचे स्वप्न समजून तो तिला विसरूनच गेला होता .. आणि दुसर्याच क्षणी त्याच्या मनात अजून एक प्रश्न आला .. तिने नक्की औषध घेतले असेल ना ??, नाहीच घेतले असणार तिच्या हट्टी स्वभावा वरून तरी तसेच वाटते .. पण आपण का तिचा एवढा विचार करतोय .. दवाखान्यात नेवून मी माझे कर्तव्य पार पाडले .. पुढे तीच ती बघेल ना .. हो ना ….. ohhh god काय हा माझ्या मनाला कालपासून तिचा नाद लागलाय .. विसरेन काही दिवसात .. हो ना बाप्पा …? उफ्फ मी काय तिच्यासारखा वागतोय ….
त्याने बेल वाजवली तसा एक पिउन आला त्याला त्याने एक strong coffee आणायला सांगितली आणि पुन्हा कामात गढून गेला .. म्हणजे निदान तसा प्रयत्न तरी करू लागला होता .
===============================================
दोन दिवसानंतर तो पुन्हा गावाकडे निघाला होता . द्रीवे करेल आवडत असल्याने आत्ता हि सुहास स्वताच गाडी चालवत होता आणि FM वर गाणी ऐकत होता . मधेच त्याला phone आला त्याने गाडी बाजूला लावली आणि phone उचलला
सुहास : हा बोलिये Mr. सिंग
Mr. singh : सुहास मुझे तुम्हे कल कि पार्टी के लिये याद दिलांना था .. निकल चुके हो ना तुम मुंबई से ?
सुहास : हा mr. singh में निकल चुक्का हु मुंबई से रात तक घर पाहोच जावूंगा don’t worry . पर आपने बताया नाही कि इस पार्टी में मेरा अन क्यू जरुरी ही
Mr. singh : ओये तू आ तो तब पत चल हि जायेगा ..
सुहास : ठीक है .. see you.
========================================================
काल ठरल्याप्रमाणे सुहास mr. singh च्या शब्दाला मान देवून त्या पार्टी ला गेला . mr. singh हि एक बिस्स्नेस्मान होते आणि कामा निम्मिताने बर्याचदा सुहास चा त्यांच्याशी संबंध येत असायचा .
Mr. singh : hello सुहास .. thanks for coming
सुहास : क्या mr. singh.. thanks क्यू बोल रहे हे आप .. अच्छा अब तो बताये .
Mr. singh: बताता हु बताता हु .. धीरज रखो ..
Mr. singh स्टेज वर जातात आणि माईक वर बोलू लागतात
Ledies and gental man सब नु राम राम ते सास्त्रीयाकाल .. यहा उपस्थित सर्व माझ्या employ’s ना माहित आहेच हि पार्टी आपल्या redio station ची first birthday पार्टी आहे ,, हान जी ओर ऐसे कायी anniversery’s हम आगे भी मानते रहेंगे येही वाहेगुरू से प्रार्थना है . एक हि साल में आपल्या redio खूप लोकप्रियता मिळाली आहे ये अलग बात है कि इसका कारण शायद से तालुके में अपना redio का हि नेत्वोर्क सबसे clear है (सर्व हसतात ) ,,,, ओर इस पार्टी का दुजा कारण ये है कि मेरे दोस्त के पिता के सपने कि तराफ हमने एक ओर कदम बढाया है … हा सुहास हमे सहानी जी ने finance करणे के लिये हा कहा है .. अब हम जलद हि अपनी कोशिशो को अंजाम दे पायेंगे ..
सुहास ला हे ऐकून फार आनंद होतो तो सरळ स्टेजवर जावून mr. singh ला मिठी मारतो .. “thank you thank you mr. singh आपकी कोशिशो कि वाजेह से ये हो पाया है thank you so much..
mr. singh हि थोडे भावूक होतात “ ओ यार दोस्ती में thank you नै बोलते … चल आता मस्त धमाल करूया ,,, ओये कोई दारू तो लावो ..” असे म्हणत mr. singh आणि सुहास खाली उतरले एक वेटर drinks चा ट्रे घेवून समोर आला .. mr. singh ने एक ग्लास सुहास ला देत
mr. singh: यार आज तो पी
सुहास : नाही mr. singh आप जनते है में शराब नाही पिता ..
mr. singh : चल कोई गळ नै में तुझे फोर्से नै करुंगा ,, एक काम करता हु ,, तेरे हिस्से के भी में हि पी लेता हु
त्यानंतर mr singh चे लक्ष दुसरी कडे जाते आणि कुणाला तरी हाक मारतात
mr. singh : ओ झल्लिये किथ्थे गायब है … जरा इकडे तर ये
सुहास चे हि लक्ष त्या दिशेला जाते आणि तो चित्त हरपल्या सारखा तिथे पाहत राहतो ,,, मागे इतर लोक romantic song वर slow dance करत असतात ,,
हो,, एक लड़की को देखा तो ऐसा लगा
एक लड़की को देखा तो ऐसा लगा
जैसे खिलता गुलाब, जैसे शायर का ख़्वाब
जैसे उजली किरण, जैसे बन में हिरन
जैसे चांदनी रात, जैसे नर्मी की बात
जैसे मंदिर में हो एक जलता दिया
एक लड़की को देखा तो ऐसा लगा
एक लड़की को देखा तो ऐसा लगा
जैसे सुबह का रूप, जैसे सर्दी की धूप
जैसे बीना की तान, जैसे रंगों की जान
जैसे बलखाए बेल, जैसे लहरों का खेल
जैसे खुशबू लिए आए ठंडी हवा
एक लड़की को देखा तो ऐसा लगा
क्रमाश्:
जणू काही हे song सुहाससाठीच वाजत होते,, हो समोरून येणारी ती अबोलीच होती,, तिला पाहून तो मनात विचार करू लागला “ त्या दिवशी jeans आणि blue shirt मध्ये cute teenager वाटणारी आज एकदम या purple long skirts, white top आणि मोकळ्या केसात अजूनच गोड दिसते आहे.. सुरेख ” तेवढ्यात अबोली समोर येऊन उभी असते आणि mr. सिंग तिची ओळख करून देतात
mr. सिंग : सुहास हि अबोली या रेडिओ स्टेशन ची स्टार RJ. आणि अबोली हे सुहास देशमुख माझे खूप चांगले दोस्त .
अबोली स्मित हस्ते आणि सुहास ला हॅलो म्हणते.
Mr सिंग पुढे बोलू लागतात.
Mr. सिंग : सुहास अबोली यहा काफी सालोसे है. यहा के लोगो को, इस जगाको अच्छेसे जाणती है , तुम्हे आगर कोई help चाहिये हॉस्पिटलके प्लॉट के बरे मे तो तुम इससे बात कर सकते हो , क्यू अबोली करशील ना यांची help..
अबोली : sure sir.
सुहास : तशी तर याची गरज नाही आहे कारण हे गाव माझ्या बाबांचे आहे मी इथे फार काळ राहिलो नसलो तरी त्यांची इथे बरीच ओळख आहे तरी हि काही मदत लागली तर मी नक्की बोलेन ...
Mr. सिंग : अच्छा पुत्तर कुक्कड शुक्कड का बंदोबस्त देख लिया ना तुने .. सब ठीक
अबोली : (स्मित हसत ) जी सर मैने सारा इंतेजाम देख लिया है . आणि वेटर्स ना हि सर्व नीट समजावले आहे .. तुस्सी लोड ना लो.
Mr. सिंग : ओये तू असताना मी चिंता करायची सोडूनच दिली आहे.. हाहाहा
अबोली : बरं सर मैं निकलू..
Mr. सिंग : ठीक है पुत्तर ,, जैसी 'तेरी मर्जी.. पर रुक जाती तो ज्यादा खुषी होती मुझे .
अबोली : जानती हू सर .. पर आप को तो पता है आज का दिन मेरे लिये भी कितना special है ..
Mr. सिंग : हा ..
अबोली : bye , bye Mr. सुहास .. पुन्हा भेटून आनंद झाला ..
सुहास : (घाईत) मला हि
सुहास : mr. सिंग मे भी निकलता हू , मुझे ये news घर पे आई को सुनांनी है.
Mr. सिंग : तू भी चाल दिया.. ठीक है मे समझ सकता हू तेरे जजबात… अपनी माँ से ये खुषी बाटनी है ना..
सुहास तिथून निघून parking मध्ये जातो तर त्याचा car च्या आजूबाजूला बऱ्याच गाड्या उभ्या असतात त्याला आपली गाडी काढायला मार्गच नसतो.. आता काय करावं असं विचार करत असतानाच त्याला गेट जवळ अबोली scooty सोबत निघताना दिसते. तिला पाहून सुहासने मागूनच तिला हाक मारली "EXUSE ME,, hello अबोली ” आधी तिचे लक्ष न्हवते पण आपले नाव ऐकल्यावर तिने मागे पहिले तेवढ्यात सुहास ही चालत तिच्या जवळ येऊन पोहोचला होता त्याला पाहून तिने भुवया उंचावल्या तसा तो पुन्हा म्हणाला “I mean miss अबोली मला एक मदत कराल का ?”
“ohk… बोला आणि फक्त अबोली ही चालेल ..” अबोली
सुहास : Actually माझी कार मी parkining मधून काढू शकत नाहीये आणि पार्टी ही आता चांगलीच जमली आहे so कुणाला त्रास देणं बरोबर वाटत नाही तर तुम्ही मला ड्रॉप कराल ? , अबोली काहीशी विचारात दिसल्या बरोबर तो पुन्हा बोलला "तुम्ही मला फक्त तुमच्या घरपरेंत सोडा .. पुढे बघेन मी माझं ..
अबोली गालातच हसली आणि “its ok सोडते मी ,, wait” असं म्हणत तिने गळ्यातला स्काफ केसांना बांधून केस एका खांद्यावर घेतले, डोळ्यांवर spaces चढवले “ ह्म्म्म बस आता ” असं म्हटल्या बरोबर सुहास तिचा मागे अगदी अंतर ठेवून बसला आणि अबोलीची cutti सुसाट निघाली,,, अबोली एका कानात earphone घालून गाणी ऐकत होती, गुणगुणत होती,, असाच थोडा वेळ गेला आणि अचानक तिला काय झाले .. “ वाह किशोरदा ..” म्हणत ती हि गाऊ लागली
चला जात हू किसीकि धून मे धडकते दिल के तराने लिये
मिलन कि मस्ती भारी आँखो मे हजारो सपने सुहाने लिये ,,
चला जात हू किसी कि धून मे धडकते दिल के तराने लिये ..
ये मस्ती के ,,,,,, नजारे हे ,,,,, तो ऐसे मे ….
संभलना कैसा मेरी कसम .
तू लेहेराती ,,, डगरिया हो …. तो फिर क्यू ना …
चालू मैं बेहेका बेहेका रे .
मेरे जीवन मे , ये शाम आई है ,,
मोहोब्बत वाले , ज़माने लिये ,,, होSSS
चला जात हू किसी कि धून मे धडकते दिल के तराने लिये ..
अबोली मस्त mood मध्ये बिनधास्त सूर ताल लय कशाचीही पर्वा न करता गात scooty चालवत होती आणि तिच्या स्काफ मधून काही केस सुटून सुहास च्या गालाला स्पर्श करत होते, तो मखमली स्पर्शात गुंतत तिचा तो बालिशपणा अनुभवत होता.. तेवढ्यात scooty थांबल्याने तो भानावर आला.. scooty एका caffee shop कम बेकरी समोर थांबली होती
अबोली : मला जरा 2 मिनिटच काम आहे..
सुहास : no problem,, चला ..
दोघं ही आत गेले .. counter समोर पोहोचून
अबोली : जोजो माझी order ready आहे ? लवकर दे ..
जोजो : yes dear,,, wait मी मागवतो …
जोजो हा त्या caffee shop चा मालक
जोजो : जुली अबोलीची order असा ना ,,, मग घेऊन ये लवकर..
जुली जोजोची wife .. ती एक cake box घेऊन counter वर आली .
जुली : ohh dear,, u look so beautiful अबोली .. खूप सुन्दर दिसते आहेस अगदी एखाद्या परी सारखी,,
अबोली : ohh really.. so sweet of you.. thank you जुली.. इस बात पे एक selfee तो बनता है.. है ना ,, come her..
असे म्हणत अबोलीने जुली आणि जोजो सोबत selfee काढला मग जुलीचे कॅफ्फेचा logo असलेली cap स्वतः घालून ते parsal हातात घेऊन वेटर pose मध्ये एक photo काढला.. सुहास दुरूनच हा सगळा प्रकार बघत होता तेव्हा तीच लक्ष सुहास कडे गेलं… लगेच तिने कॅप जुलीला दिली ऑर्डरचे पैसे दिले आणि parsal घेऊन निघाली..
बाहेर आल्यावर ते parsal सुहासच्या हातात देत “ plz हे पकडाल.. काय आहे ना,, त्यात cake आहे म्हणून मी हे डिक्कीत नाही ठेवू शकत खराब होईल ना..”
Suhas : हो का नाही
पुन्हा scooty मार्गाला लागली , अबोलीचे घर यायला थोडा वेळ असताना तिने घरी स्नेहलला call करून गेटवर बोलावले, त्यानुसार स्नेहल गेट समोर उभी होती अबोलीने गाडी थांबवून सुहास च्या हातून ते parsal घेऊन स्नेहल ला दिले “फ्रीझ मध्ये ठेव मी 10 मिनटात येते ..” म्हणत लगेच पुढे निघाली ही.. ही कृती एवढ्या पटापट झाली कि सुहास ला उतरून मी जाईन असे म्हणताच नाही आले.
सुहास : अहो मी गेलो असतो . तुम्ही का …
त्याच वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच
अबोली : माहित आहे ,,, पण काही हरकत नाही मी पोहोचवते , इथून पुढे कुठे turn घेऊ …
सुहास : right ,, पण आज तुमचा घरी काही special आहे ना मग…
अबोली : हो … आज माझ्या बाबांचा वाढदिवस आहे ,, पण थोडा उशीर झाला म्हणून ते रागावणार नाहीत … आणि त्या दिवशी तुम्ही मला नीट घरापरेंत सोडले होते ना .. so आता माझी turn आहे तुम्हाला तुमच्या घरी नीट पोहोचवण्याची ..
सुहास : ohk..
त्याच घर आले तस त्याने scooty थांबवायला सांगितली.. सुहास उतरून तिला thanks म्हणाला .. अबोलीने ही sweet smile देऊन bye म्हंटले आणि u turn घेऊन आपल्या घरी निघाली .
सुहास ती दिसेनाशी होई परेंत त्याच दिशेने पाहत होता .
“दादा ,, वो गायी अब तो अंदर आ जाओ, आता काय तिथेच राहायचे आहे का ” कधीपासून आपल्या रूमच्या खिडकीतून सुहासला पाहणारा रोहन त्याला चिढवण्यासाठी बोलला
“'तेरी तो ,, थांब तुला दाखवतो ” सुहास सरळ रोहनच्या रूम कडे धावला तस रोहन रूम बाहेर येऊन आधीच ओरडू लागला “ आई ,, आई बघ दादा मला मारतोय … लवकर ये .. बचाव बचाव ”
“गाढवा अजून मी तुला हात ही नाही लावला आहे आणि आधीच काय ओरडत सुटला आहेस ” सुहास रोहन च्या समोर येत बोलला
“सेफटीके लिये ” रोहन पुन्हा मस्करी करत बोलला आणि सुहास ने बाजूच्या टेबल वरच्या पपेराची सुरळी करत त्याला मारायला सुरुवात केली,, “सेफटीसाठी काय .. हा ” आणि काही लागत नसताना ही रोहन ओरडायला लागला.. दादा बस हा नाही तर मी आई ला सांगेन तुझं ते secrat ” तस सुहास चमकलाच “ माझं कसले secrat” रोहन पुढे काय बोलायच्या आताच त्यांची आई तिथे आली आणि तिनेच विचारले “कोणत्या secrat बद्दल बोलता आहे सांगा मला ” आणि सुहास रोहन ला इशाऱ्याने गप्प राहायला सांगत होता, पण गप्प राहील तो रोहन कसला
रोहन : अगं तुझ्या सुनेचं secrat,, अजून कसले
आई : गाढवा अजून तुझा मोठा भाऊ लग्नाचा आहे आणि तू तुझा लग्नाची स्वप्ने कसली बघतोयस
रोहन : अगं आई मी त्याच्या बद्दलच बोलतोय, काय तू पण … एक ना आज ना दादाला सोडायला एक मुलगी आलेली
सुहास : रोहन फटके देईन हा तुला,, अगं आई तू याच काही ऐकू नकोस उगाच एवढ्याश्या गोष्टीचा बाहू करतोय .. mr. सिंग कडे काम करते ती,,
रोहन : तीsss हाsss
सुहास : रोहन ….. तर त्यांच्या कडे काम करते , मी त्यांच्या कडेच गेलेलो तर येताना माझ्या गाडीचा प्रॉब्लेम झाला आणि ती ही याच रस्त्याने येत होती म्हणून आलो तिच्या बरोबर ,, बस ..
रोहन : या "ती" ला काही नाव वगैरे आहे कि नाही
सुहास : अबोली,, अबोली तीच नाव.. बस ,,
रोहन : बघ आई एकाच भेटीत तीच नाव ही कळले याला
सुहास : एकाच भेटीत नाही काय ,, ही आमची दुसरी भेट होती
रोहन : बघ आई किती भेटी झाल्या ते ही आठवणीत आहे आणि म्हणे कुणी नाही आहे ती
आई : रोहन पुरे झालं आता ,, आणि सुहास तुला साधी एक मुलगी पटवता येत नाही .. तुझा लहान भावाकडे बघ मुली नुसत्या मुंग्यांसारखा आजूबाजूला असतात सतत ..
रोहन : (अभिमानाने) मग ,,,, अरे माझा भाऊ ना तू तो ही मोठा मग मुलीला bike वर बसवून फिरवायचे कि तू तिच्या मागे बसायचे ,, शी काय सांगणार मी आता माझ्या मित्रांना तुझ्याबद्दल …
आई आणि रोहन दोघे मिळून सुहास चिढवत होते
सुहास : ए पुरे झाले हा आता तुझे ,, आणि आई तू ही .. ठीक आहे मग माझ्याकडे एक आनंदाची बातमी आहे पण आता मी ती तुम्हाला सांगणारच नाही
रोहन : कोणती news,, ए दादा सांग ना ,, बरं sorry बोलतो तुला बस
सुहास : ह्म्म्म आता कसा सरळ झालास ,,, तर .. news अशी आहे कि,, आपले हॉस्पिटल चे काम आता लवकरच सुरु होईल .. बाबांचे स्वप्न येत्या दोन वर्ष्यात पूर्ण होणार .. आई mr. सहानी ने आपल्या प्रोजेक्ट ला ग्रीन सिग्नल दिला …
रोहन : ग्रेट news दादा ,, u did it.. yes,, yeee
आई : काय ,,, किती आनंदाची गोष्ट आहे ही .. आजचा दिवस सार्थ झाला .. तुझा बाबांना खूप आनंद झाला असता बघ
सुहास : हो आई ,, आणि मी दोन प्लॉट पहिले आहेत दोन्ही छान आहेत मला फक्त एक ठरवायचं आहे .. माझी इच्छा होती कि तू ते पहा आणि ठराव
आई : अरे मी काय ठरवणार , तुला योग्य वाटेल ते कर , तुझा निर्णय आम्हाला मान्य आहे
रोहन : हो दादा
देशमुखांच्या घरी आज आनंदी आनंद होता .
काही दिवसातच हॉस्पिटलचे काम सुरु होणार होते . जागा नक्की झाली , या दरम्यान सहानी सोबतच्या मिटींग्स mr. सिंग च्याच ऑफिस मध्ये होत असल्या कारणाने ओझरती का होईना पण सुहासची अबोलीशी भेट होतच होती . Mr. सिंगच्या केबिन मधून अबोलीची डेस्क लगेच दिसायची , त्यामुळे मीटिंग दरम्यान त्याच तिच्याकडे लक्ष जायचे आणि ते mr. सिंगच्या चाणाक्ष्य नजरेतून हि सुटले न्हवते. काही दिवसातच कागदोपत्री सर्व कारवाया होऊन बांधकामाला सुरुवात होणार होती त्या आधी सुहास ने भूमिपूजन ठेवले होते Mr. सिंग ना invite करण्यासाठी त्याने त्यांना फोन लावला पण नंबर not reachable होता म्हणून मग त्याने त्यांचा office मध्ये फोन लावला
सुहास : hello mr. सिंग
अबोली : नाही, ते सध्या बोलू शकत नाहीत काही urgent असेल तर मला निरोप द्या मी सांगते त्यांना , किंवा नंतर call करा
सुहास ला आवाज ओळखीचा वाटलं
सुहास : कोण बोलत आहे
अबोली : मी अबोली बोलते आहे
सुहास : ohk,, mr. सिंग ??
अबोली : ते ना,,, washroom मध्ये आहेत ब्रेकफास्ट जास्तच जास्त झालाय बहुतेक
सुहास : हाहाहा ,, बरं… ते हलके झाले कि त्यांना सांग कि उद्या हॉस्पिटल साईडवर भूमीपूजन आहे सकाळी,, सो त्यांना invite करायला मी call केला होता, तू त्यांना सांगशील याची खात्री आहेच पण मी पुन्हा call कारेन सांग …
अबोली : सांगेन मी त्यांना
सुहास : आणि हो तू हि भूमिपूजनाला आलेलं आवडेल मला…
अबोली : I’ll try. Bye
सुहास : bye
दुसऱ्या दिवशी भूमिपूजनाला देशमुख कुटुंबा सहित mr. सहानी आणि बरीच लोक आली होती
“पूजेला सुरुवात करूया ” भडजी विचारात होते
“2 मिनटं थांबा गुरुजी ” भडजींना सांगत सुहास mr सिंग ना call करू लागला तेवढ्यात त्यांची कार समोरून येताना दिसली
“माफ कर सुहास, मला उशीर झाला ना” mr. सिंग गाडीतून उतरत म्हणाले
“ कोई बात नाही ,, आप अकेले आये है ”सुहास कार कडे बघत म्हणाला
“क्यू कोई ओर भी आना था ” mr. सिंग हसत म्हणाले
“नाही , मै तो बस यूही ,,,, चलीये चलते है ” सुहास निमूट चालू लागला
“ ओये मुझे सब पता है ओर कोण आना था, तू जो छुप छुप के उसको देखा करता है ना सब जनता हू मै ” mr. सिंग सुहासचा कानाजवळ येत बोलले
“ शुss शु शुsss क्या बोल रहे हो mr. सिंग पिटवावोगे क्या ,, माँ सामने हि है मेरी ” सुहास तोंडावर बोट ठेवत बोलला
“ चोरी चोरी इश्क करेगा तो पिटाई तो होनी बनती है ” mr. सिंग
“इश्क,,,! mr. सिंग कुछ ज्यादा नाही हो रहा है .. मुझे लागत है आप आज सुबेह सुबेह हि पटियाला चढाके आये हो ”
“तू चाहे कितना भी इन्कार कर पर एक बात जान ले के इश्क ओर मुष्क छुपाये नाही छुपती ” mr. सिंग
“पूजा शुरु करे" सुहास ने आता विषयच सोडला
“हा हा त्यासाठीच तर आलोय ” mr. सिंग
पूजा व्यवस्थित पार पडते आणि विश्वास देशमुखांच्या स्वप्नाची पहिली वीट भक्कम लावण्यात येते .
रात्री सुहासला अबोलीचा मेसेज येतो “ सॉरी, मी प्रयत्न केला पण आज थोडं काम होत , anyways congratulations”
“its ok अबोली & thanks” सुहास
“मीच आहे कस कळले ?” अबोली
“ तुझा नंबर save आहे माझ्याकडे ” सुहास
“ how?? मी तर नाही दिला ” अबोली
“ mr. सिंग … त्यांच्याकडून घेतला ,, पण call or मॅसेज करण्यासाठी कारणच सापडले नाही कधी ” सुहास
अबोली स्वतःशीच हसली “ohk….”
“झोपते आहेस ” सुहास
“ हम्म ,, bye good night” अबोलीच्या या मेसेज ने सुहास चा चेहेरा उतरला “ok good night, sweet dreams” सुहास
त्यानंतर सुहास अधून मधून अबोलीला मेसेज करू लागला , अबोली फक्त त्याच्या मेसेजला reply द्यायची स्वत:हून कधी मेसेज किंवा call नाही करायची… सुहास मात्र तिच्यात गुंतत चालला होता ..
काही दिवसांनी अबोली आपल्या आई सोबत खरेदीला गेली होती . ती आई आणि QT म्हटल्यावर धमाल हि होणारच …
अबोली : आई नीट बस ना ग ,, किती हलशील ,, बॅलन्स गेला ना माझा तर तिघी हि पडू ..
आई : मी कुठे हलते आहे, आणि तुला सांगितले होते ना मी कि तुझ्या या QTवर मला बसता येत नाही,, मग
अबोली : हो बाई माझच चुकले,, बस… पण आता नीट बसशील
म्हणत अबोली सावकाश scooty चालवत होती आणि मागे आई एक दोन खरेदीच्या पिशव्या धरून बसल्या होत्या तेवढ्यात समोरून एक bike स्वार वेगाने bike चालवत दुसऱ्या side ने येत होता . तो इतक्या वेगात पुढे गेला कि वाटेत गवताचा भारा घेऊन चालणारी आजी घाबरून जागीच थिजली आणि दचकून तिचा हातातला भारा कोसळला हे पाहून तो bike स्वार व मागे बसलेला त्याचा मित्र खिदळत पुढे गेले म्हणजे हे त्यांनी मुद्दामून केले हे अबोलीला क्षणात कळले.. ती bike अबोलीला पास होऊन पुढे जाणार इतक्यात अबोली गाडी थांबवत संतापून त्यांच्यावर ओरडली “हराम खोरांनो रस्ता काय तुमच्या बापाचा नाहीये.. समजले ना ” आणि त्या आजी ला सावरायला गेली पाठोपाठ आई हि …
“आजी तुम्ही बऱ्या आहात ना ,, कुठे लागले का ” अबोली त्या आजीची विचार पूस करत होतीच तेवढ्यात ती मुलं अबोलीचा आवाज ऐकून मागे फिरून तिच्या समोर येऊन थाम्बले..
“ काय बोललीस तू ,, हराम खोर, माझा बाप काढलास तू ,, हा .. लय माज चढलाय काय ग ए तुला ” तो bike चालक रागात बोलला
“ एक मिनिटं थांब ” असे त्याला म्हणून अबोली आई कडे वळली “ आई तू त्या झाडाखाली बस ,, chill कर आपण थोड्या वेळात निघू ” तीच ऐकून आई हसली आणि समोरच्या झाड खाली जाऊन निवांत बसली ..
“ हा तर काय म्हणालास तू माज चढलाय मला ,, चल असेल हि पण तुला कसली चरबी चढली आहे रे .. सरळ रस्त्याने जावत न्हवते .. स्वतःच्या जीवाची पर्वा नाही तर जा कुठे तो उलथ पण इथे गरिबांचा जीवावर का उठलायस..” अबोली
“ हे बघ खूप ऐकले हा तुझे ,, मुलगी आहेस म्हणून सोडून देतो .. गप निघ इथून मी माझ्यावर आलो ना तर कुणाला तोंड दाखवण्याच्या लायकीची नाही राहणार तू समजलेस ” त्या bike स्वार चे बोलणे ऐकून अबोली अजूनच संतापली . “ मुलगी आहेस म्हणून ,, म्हणजे काय रे तुला स्वतःच्या पुरुष असल्याची एवढीच लाज वाटते तर घाल बांगड्या , बघ जमतंय का स्त्री जातीच्या पातळीला येन मग बघू काय म्हणतोयस ते ..”
हा वाद बघता आजूबाजूला लोक येऊन जमा झाली होती आणि त्याने अबोलीला दिलेल्या धमकी मुळे अजून काही होऊ नये म्हणून मध्ये पडली . त्यातल्या काही सुजाण नागरिकांनी “ बाई तुम्ही शांत व्हा आम्ही बघतो याना ” असे अबोलीला म्हणत त्या पोरांची गचांडी धरली “ काय रे बाई शी कस बोलतात एवढं हि नाही माहित काय ,,, एक तर नियम मोडता आणि वर तोंड करून वाद घालता होय.. थांब पोलीसच बोलावतो आता ” पोलिसाचे नाव ऐकताच पोर नरमली आणि माफी मागू लागली “ माफ करा दादा पुन्हा नाही होणार असं ” असे म्हणत गया वाया करू लागले त्यावर अबोलीने हि मग त्या माणसांना सांगितले “ सोडून द्या दादा ह्या खेपेला , पोर शिकणारी दिसत आहेत ,, पोलीस स्टेशन ची पायरी चढले तर करिअर खराब होईल .. ” जमावाने हि मग फार ताणून न धरता दोघांना हि ताकीद देऊन सोडून दिले , जाताना त्या bike स्वारने एक कटाक्ष अबोली कडे टाकला आणि निघून गेला . अबोली मग वळून आई कडे पहिले,, आई पिशवीतले चिप्स खात बसली होती “ चला मातोश्री ,, पिचर संपला ,, आता घरी जाऊया ” आई पिशव्या घेऊन scooty वर बसली आणि आधीच वाद continue करत घराकडे निघाल्या ..
आपल्यावर कुणीतरी प्रेम करावं असं प्रत्येकाला वाटते ना ..
पण जेव्हा असं कुणी अचानक आयुष्यात येत आणि म्हणत ,, “ हो माझं प्रेम आहे तुझ्यावर ” तेव्हा आपण बिथरतो ,, त्याच्या शब्दांवर विश्वास होत नाही ,, आपल्याच मनाची घालमेल आपल्याला कळत नाही ,, त्या व्यक्तीचा स्वीकार करावा कि त्याला नाकारावे हा प्रश्न पडतो … कारण समोरची व्यक्ती ओठांनी व्यक्त केलेलं प्रेम मानाने निभावलं कि नाही या दुविधेत आपण असतो .. तो जन्मभर साथ देईल कि चार दिवसात आपल्याला दूर लोटलं याची भीती असते .. हो ना ,,
माझ्या मते ज्याच्यावर प्रेम कराल त्याला ते तुमच्या कृतीतून दाखवा पण शब्दात मांडण्या आधी त्याच्या मनात तो विश्वास निर्माण करा कि तुम्हाला होकार देताना तो क्षणाचा हि उशीर करणार नाही …
सो मित्रहो आजचा special अबोली डोस झालेला आहे आणि आपल्या गप्पांचा कोटा हि संपला आहे ,, उद्या पुन्हा भेटू ,, ऐकुया आज चे शेवटचे गाणे .. bye gn शुभ रात्री ..
लेके पेहेला पेहेला प्यार
भर के आँखो मी खुमार
जादू नागरी से आय है कोई जादूगार 3
हो लेके …
उसकी दिवानी हाये पाहू कैसे हो गायी
जादूगार चला गया मै तो याह खो गायी 2
नैना जैसे हुआ चार गया दिल का करार
जादू नागरी से आय है कोई जादूगार …..
शो संपवून आणि बाकी लहान सहन काम संपवून अबोली स्टुडिओ बाहेर पार्किंग मध्ये आली QT ला चावी लावून निघायच्या तयारीतच होती कि तीच लक्ष्य पंचर टायर कडे गेलं ,, “शीट,, काय यार बाप्पा तुला नेहमी माझीच फजिती करावीशी का वाटते …” अबोली बाप्पाशी भांडण्यात मग्न असतानाच स्टुडिओ बाहेरचा तिचा मित्र भूभू तिच्या दिशेने भुंकू लागतो ,, “ हा कधी माझ्यावर भुंकत नाही ,, नक्कीच काहीतरी गडबड आहे ,,” असा विचार करत अबोली सावध होते “काय झालं भूभू ,, आज माझ्यावर भुंकतोयस ??” अबोली त्याला विचारात असताना तिला कळते कि भूभूचा नजरेचा रोष आपल्याकडे नसून आपल्या मागे आहे म्हणजे नक्कीच आपल्या मागे कुणीतरी अनोळखी आहे , ती मुद्दामून हातातली चावी खाली पडते आणि ती उचलण्यासाठी वाकते , तेव्हा तिच्या मागे कुणाची तरी सावली तिच्या जवळ येताना तिला जाणवते ..
ती उठून उभी राहणार तेवढ्यात ती व्यक्ती मागून तीच तोंड हाताने बंद करते जेणे करून ती ओरडू शकू नये आणि दुसऱ्या हाताने तिचा हात पकडते ,, एकूणच अबोली त्याच्या पकडीत येते ,, तस तो व्यक्ती बोलू लागतो “ मला बांगड्या भरायला सांगत होतीस ना ,, आता दाखवतो तुला तुझी जागा ..” भूभू भुंकतच असतो ,, क्षणभर त्या व्यक्तीला वाटते कि आपण अबोलीवर विजय मिळवला आहे ,, तिला काबीज केलं आहे ,, पण अबोली इतर मुलींसारखी चुईमुई न्हवती ,, तिने क्षणात त्याचा भ्रम तोडीस काढला ,, आपल्या दातांनी त्याच्या हाताचा चावा घेतला पायाने त्याच्या पायावर जोरात प्रहार केला .. वेदनेमुळे त्याने लगेच आपला हात तिच्या तोंडावरून बाजूला केला ,, हाताची पकड हि सैल जाली ,, अबोलीने त्याच्या तावडीतून स्वतःला सोडवले . मागे वळून लाथेने त्याला एक जोरदार धडक दिली , तो मागे ढकलला गेला ,, “come on भूभू come here” जणू भूभू अबोलीच्या इशार्याचीच वाट बघत होता तिचा एक आवाजावर तो त्या व्यक्तीवर धावून गेला ,, घाबरून तो व्यक्ती जमिनीवरच कोसळला ,, अबोली त्याच्या छातीवर गुढगा रोवत बसली ,, आपला स्काफ त्याचा मानेला सैल सर गुंडाळून त्याला बधडु लागली . रागाने तिचा चेहेरा लाल झाला होता , स्टुडिओच्या पार्किंग मध्ये त्यावेळी इतर कुणीच न्हवते ,, पण पार्किंग रस्त्याला लागूनच असल्याने ,,, भूभूचा आवाज रस्त्यावर हि ऐकू जात होता … तो आवाज ऐकून स्टुडिओच्या गेट समोर एक गाडी थांबली ,,, नेमकी ती सुहास ची गाडी होती .. हा कुत्रा इतका का भुंकतो आहे हे पाहण्यासाठी तो लगेच गाडीतून उतरून आवाजाच्या दिशेने जाऊ लागला ,,, आणि समोर चे दृश्य पाहून तो थक्कच झाला ,, तो लगेच अबोलीकडे धावला “अबोली सोड त्याला काय करते आहेस ,, मारेल तो ” त्या व्यक्ती पासून अबोलीला दूर करू लागला .. पण अबोली खूप रागात होती तिला भानच न्हवते ,, ती त्या व्यक्तीशीच बोलत होती “ रस्त्यात झालेल्या भांडणाचा बदल घ्यायला आलेलास ,, माझ्या अब्रूवर वार करून स्वतःचा पुरुषार्थ दाखवायला .. हा … काय समजता काय रे तुम्ही मुलीना .. एवढी लेचीपेची वाटली काय रे मी तुला जो एकटा आलास …” त्या मुलाच्या नाका तोंडातून रक्त येत होत . अबोली त्याला सोडायला तयार नाही हे पाहता सुहास ने तडक पोलिसांना फोन करून बोलावले “त्यादिवशी लहान आहेस म्हणून सोडून दिल ,, तर तुला जास्तच समज आली आहे असं दाखवायला निघालास … काय रे ए बोल ना ” अबोली स्काफ ने त्याचा गळा सावध पणे आवळत होती जेणेकरून त्याला मरण येऊ नये पण ते काय असते हे कळावे ,, “ तुझा जीव घ्यायला हि मागे पुढे बघणार नाही मी ,, खर तर तुझ्यासारख्या माणसांना … शी ,, माणूस काय म्हणते आहे मी … तुझ्यासारख्या नराधमांना मरणाचीच शिक्षा झाली पाहिजे … स्त्रीला पायातलं खेटर समजणारे ,, नालायक तुम्ही .. जगण्याचा हक्क नाही तुम्हाला ” अबोली रागातच त्याला उद्देशून बोलत होती ,, त्या दिवशीचा तो bike स्वार तिच्यावर पाळत ठेवून होता ,, रस्त्यात एवढ्या लोकांसमोर एका मुलीने आपली लाज काढली असे त्याला वाटत असल्याने तो अबोलीला अद्दल घडवायला आला होता .. सुहास शक्य तो प्रयत्न करत होता अबोलीला सावरण्याचा “ अबोली बस झाले , मी पोलीस बोलावले आहेत ,, त्याला शासन होईल .. त्याच्या रक्ताने तू तुझे हात माखू नकोस ,, तुझ्या घरच्यांचा तरी जरा विचार कर ” सुहास च्या शेवटच्या वाक्याने अबोली भानावर आली .. ती तडक उठली पण त्याच्या छातीवर एक पाय ठेवूनच उभी होती ,, केस विखुरलेली ,, चेहेरा रागाने पेटलेला ,, डोळ्यात आग .. अगदी अवतारात होती ती .. तेवढ्यात पोलीस आले आणि तेव्हा काय ते अबोलीने त्या bike स्वारला मुक्त केलं … “ तुम्ही काजळी करू नका मॅडम आम्ही बघतो याला ..” असे म्हणत पोलिसानी त्याचा ताबा घेतला ,, सुहास शी काही महत्वाचे बोलून झाल्यावर इन्स्पेक्टर निघून गेले . एव्हाना पोलिसाच्या साइरेंमुळे स्टुडिओ मध्ये कामानिम्मित थांबलेले काही जण पार्किंग मध्ये आले ,, त्यातील रिया अबोली जवळ येत “ अबोली relax हो ,, पाणी पाहिजे का तुला ..” अबोली मानेनेच नाही असे म्हणाली .. “ मग चल मी घरी सोडते तुला ” रियाचे बोलणे ऐकून मग सुहासच म्हणाला .. “ नको, खूप उशीर झाला आहे ,, तुम्हाला हि घरी जायला उशीर होईल .. मी यांना घेऊन जातो आमचा मार्ग एकच आहे ” रिया ने एक क्षण अबोलीकडे पाहिलं अबोलीने हि पापण्या मिटून संमती दर्शवली तसे रिया म्हणाली “ ok मग जा तू यांच्या सोबत , पण घरी पोहोचल्यावर मला कळव ठीक आहे ” पुन्हा अबोलीने मानेनेच होकार दिला आणि चालू लागली ..
सुहास ने पुढे होऊन अबोली समोर गाडीचे दार उघडले अबोलीने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि गाडीत येऊन बसली . दार लावून सुहास हि ड्रायविंग सीटवर येऊन बसला . अबोली शांत समोरच्या काचेतून बाहेर बघत होती . सुहास ने पाण्याची बाटली उघडून तिचा समोर धरली , “ घे पाणी पी आणि राग हि .. बर वाटेल तुला ” अबोलीने पाण्याची बाटली घेत घडाघडा पाणी पीत असताना सुहास तिच्या ओठावरून निसटून हनुवटीवर ओघळत गळ्यावर विलीन होणाऱ्या पाण्याचा थेंबाचा प्रवास पाहण्यात दंग होता , त्या थेंबाचा जणू त्याला हेवा वाटत होता . पाणी पिऊन झाल्यावर काही क्षण तिने डोळे मिटले आणि तेव्हा तिचा डोळ्यातून अश्रुंचे दोन थेंब तिच्या गालावर ओघळले, ते पाहून सुहासला असे वाटले कि तिचा आजच्या रागामागे फक्त तो मुलगा नसून अजून हि काही तरी आहे पण सध्या तो तिला ते विचारू शकत न्हवता . अबोली ने डोळे उघडले तसे लगेच त्याने आपली नजर बाजूला केली ,, अबोलीने बाटलीचे झाकण लावून ती बाजूला ठेवली ती नॉर्मल झाली आहे असे सुहास ला वाटले तरी तिला रिलॅक्स वाटावे म्हणून तिला छेडत म्हणाला “त्या दिवशी मला वाटले होते कि तू परी सारखी दिसतेस पण आज मला तुझ्यात देवी दिसली ” अबोली हि उसने हसत म्हणाली “कोणती देवी ” त्यावर सुहास डोळे मोट्ठे करून म्हणाला “चंडिका ” सुहास च्या या शाब्दांवर ती मनापासून हसली तीच नेहेमीच हसू पाहून सुहासला बर वाटले “चला हसलीस ना आता घरी जाऊया .. निघूया ना .. अबोलीने होकाराथी मन हलवली सुहास ने गाडी स्टार्ट केली तसेच तिला काहीतरी आठवले ,, “ अरे थांब थांब माझ्या मित्राचे आभार मानायचे तर राहूनच गेले आजचा हिरो ठरला आहे ना तो ” असं म्हणत तिने गाडी बाहेर पहिले तर गेट समोर भूभू तिलाच पाहत बसला होता . त्याला पाहून ती गाडीतून उतरली ,, त्याच्या पायाचा पंजा हातात घेत “ ह्ये भूभू थँक्यू सो मच .. you are my real hero.. मित्र असावा तर तुझ्यासारखा… उद्या तुला माझ्याकडून treat done.. मातोश्रींना specially तुझासाठी आलू पराठे करायला सांगेन ok आणि काय खाणार तू ,, fish or chicken?? Chicken ना .. ठीक आहे .. आता जा शांत झोप आपण उद्या भेटू byeeee” अबोली . ..
सुहास तिचे हे त्या कुत्र्याशी संभाषण गमतीने पाहत होता थोड्या वेळाने अबोली गाडीत येऊन बसली ,, भूभू हि गेट च्या आत जाऊन झोपला आणि गाडी आपल्या मार्गाला निघाली . सुहास गाडी चालवत होता त्याचा मनात अबोलीबद्दल बरेच प्रश्न होते पण तो शांतच होता . अबोली हि बाहेरचा अंधार पाहण्यात व्यस्त होती . थोड्या वेळाने सुहास ने आपल्या मनातल्या गोंधळ आणि प्रश्नां पासूनचा सुटकेसाठी रेडिओ लावला, रियाचा शो चालू होता आणि गाणे संपत आले होते ,,
मूसकाता ये चेहरा
देता है जो पेहरा
जाणे छुपात क्या दिल का समंदर
औरों को तो हरदम साया देता है
वो धूप मे है खडा खुद्द मगर
चोट लगी है उसें,
फिर क्यूँ मेहसूस मुझे हो राहा है
दिल तू बता दे क्या है इरादा तेरा
मैं परिंदा बेसबर
था उडा जो दरबदार
कोई मुझको यूं मिला है
जैसे बंजारे को घर
==============================================================
सुहास अबोलीला तिच्या घरा समोर सोडून निघतो पण , त्याची गाडी पुढे जाताच अबोली पुन्हा गेटबाहेर येऊन समोरचा तळ्याकडे निघाली.. सुहास ने ते त्याच्या कारच्या आरशातून पहिले.. थोडा विचार करून तो गाडी तिथेच उभी करून मागे आला आणि तळ्याकडे निघाला
खूप अंधार होता तिथे. अबोलीचा घराकडून जो प्रकाश येत होता तेवढाच काय तो उजेड होता. अबोली एकटीच तिथल्या गवताच्या भाऱ्याला टेकून आकाशाकडे एकटक पाहत बसली होती..
“इथे काय करते आहेस, घरी नाही गेलीस अजून?” सुहास
अबोलीने क्षणभरच मागे वळून पहिले.. अन पुन्हा आकाशाकडे पाहत म्हणाली..
“तू गेलेलास ना,,, पुन्हा का आलास”
“तुला इथे येताना पहिले ना म्हणून ”सुहास
“छान शांत वाटते इथे, मिट अंधार, मंद वारा, सोबतीला संथ तळ्याचे पाणी,, चांदण्यांनी भरलेलं आभाळ, त्या क्रूर जगापासून एक वेगळी जागा..”
“हो , निवांत वाटते खार इथे ,, कधीतरी स्वतःसोबत वेळ घालवावासा वाटलं तर छान जागा आहे,, पण ठराविक वेळे नंतर हीच जागा आपल्याला भकास वाटू लागेल.. थोडा एकांत मागणे आणि एकट्याने जगणे यात खूप फरक आहे. आणि ते जग कितीही क्रूर असले तरी आपल्याला त्याला सामोरे जाणे भाग आहे” सुहास
“ठाऊक आहे मला ,, म्हणूनच ,,,,?”अबोली
“म्हणूनच काय ? बोल .. मन मोकळं कर … मघाशी मी काही विचारले नाही कारण ती वेळ योग्य न्हवती .. पण आता सांग “ सुहास
“काय सांगू ,,, सांगण्यासारखं काही आहेच नाही … चल निघते मी आजच्यासाठी एवढा एकांत पुरे झाला मला ,,, तू हि निघ तुझी आई वाट बघत असेल घरी ..” अबोली
अबोलीच्या चेहेर्याची छटा पुन्हा बदलली होती ,, कळत होत सुहास ला कि ती विषय टाळते आहे ,
“सांगण्यासाठी बराच काही आहे तुझ्याकडे.. पण कुणावर विश्वास नाही आहे तुझा म्हणूनच आतल्या आत स्वतःचीच झगडत आहेस ,, हो ना !” सुहास
“चित्रपट जास्त पाहतोस कि कथा कादंबऱ्या वाचण्याचा छंद आहे,, नाही म्हणजे बराच पुस्तकी बोलत आहेस ना म्हणून विचारले…” अबोली
अबोली जात असताना त्याने तिला मधेच अडवले,,
“तुझा छंद जडला आहे मला, कथा कादंबऱ्या नाही पण तुला बऱ्यापैकी वाचू शकतो मी सध्या. साफ कळते आहे कि तू विषय टाळते आहेस ,” सुहास
“मी काही विषय वगैरे टाळत नाहीये ok,, ” अबोली चिढून म्हणाली
“ तू कितीही चिढ , काही हि बोल मला फरक पडत नाही, कारण मला माहित आहे तू हे मुद्दाम करते आहेस… तुझ्या मनातले गूढ कुणाला कळू नये म्हणून तू तुझ्या चेहेऱ्यावर वेगवेगळे मुखवटे चढवत असतेस,, कधी रागाचा तर कधी हास्याचा..” सुहास
“तुला वाट्टेल ते समाज, मला फरक नाही पडत आणि तुझा या चित्र विचित्र प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाही कारण त्या प्रश्नांशी माझा काही संबंधच नाही” म्हणत अबोली घराकडे निघाली, पण सुहास ने तिचा हात धरला आणि पुन्हा तिला थांबवले
“मी उगाच काहीही बोलत नाही आहे,, मान्य आहे कि त्याला शिक्षा झालीच पाहिजे पण तुझं ते वागणं एखाद्या normal मुलीसारखं न्हवते.. तुला पाहून असं वाटत होते कि तू तुझा मनातला साचलेला राग त्याच्यावरच काढत आहेस.. आग ओतत होते तुझे डोळे, जणू दुर्गा संचारली आहे तुझ्यात , एवढा राग का ? तो फक्त त्या मुलावर न्हवता ,, हो ना … का आधी हि कुणी तुला ,,,,,,“ सुहास बोलत असताना अबोलीचा त्याचा हातातून आपला हात सोडवण्याचा प्रयत्न चालूच होता शेवटी सुहासच्या कानाखाली एक चपराख देऊन तिने त्याला गप्प केले त्याच क्षणी सुहासच्या हाताची पकड सैल झाली
“नॉर्मल मुलीसारखं माझं वागणं न्हवते ,, म्हणजे तुला म्हणायचे काय आहे .. इतर मुलींसारखं मी हि ते सहन केलं पाहिजे होत कि कुणीतरी येऊन मला वाचवेल या आशेवर मुळूमुळू रडत बसायला हवे होते , नाही सुहास सहन करायला मी कमकुवत राहिले नाहीये , माझं रक्षण आता मी स्वतः करू शकते .. मला कुठल्याही पुरुषाच्या आधाराची गरज नाही ..” अबोली तिथून निघून गेली … आणि सुहास तिथेच उभा राहिला स्तब्ध ….
रात्री खूप उशिरा सुहास घरी पोहोचला , त्याची आई वाट बघत हॉल मधेच झोपली होती .. त्याने तिला उठवले ,,
“आई उठ चल रूम मध्ये झोप ” सुहास
“आलास तू ,, आज इतका उशीर कसा झाला रे ,, चल जेवून घे आधी ..”आई
“नको भूक नाहीये .. वाटेत मी खाल्ले आहे .. आता तू झोप चल .. आणि तुला किती वेळा सांगितलं आहे माझी अशी वाट नको बघत बसूस ,, का ऐकत नाहीस तू माझं ”सुहास
“भूक नाही आहे ,,, कधी खाल्लेस .. तू स्वतः हुन कधी बाहेर जेवून घेत नाहीस ,, काय झालं आहे चेहेरा का असा पडला आहे ”आई
“कुठे काय ,, झोप आली आहे मला म्हणून असं वाटत असेल तुला ”सुहास
“सुहास , आई आहे मी तुझी , तुझ्यापेक्षा जास्त चांगली ओळखते मी तुला , माझ्याशी खोटं बोलता येत नाही तुला , मी तुझी वाट बघत असते हे माहित असताना तू बाहेर खाऊन येऊ शकत नाहीस .. आता सांगशील मला काय टेन्शन आहे ते ” आई
सुहास आईच्या मांडीवर डोकं ठेवून फरशीवर बसला
“….काही कळत नाही आहे ग ” सुहास
“कशाबद्दल ?” आई
“अबोली,, अबोली बद्दल … खूप दुख्खात आहे ती ,, कोणत्या तरी गोष्टीचा खूप त्रास होतो आहे तिला ,, पण कोणत्या तेच कळत नाही ”सुहास
“तू एकदा जिच्याबद्दल सांगत होतास ती अबोली ,,,,?” आई
“हो ” सुहास
“अरे पण तू जे तिच्याबद्दल सांगत होतास त्यावरून तर मला ती दिलखुलास वाटली .” आई
“मलाही तसच वाटत होत ,, पण तिच्या याच दिलखुलास वागण्यात ती स्वतःचा त्रास झाकण्याचा प्रयत्न करते आहे .” सुहास
“ मग विचार तिला ” आई
“मी प्रयत्न केला ,, पण ती काही सांगायलाच तयार नाही ,, तिचा विश्वासच नाही आहे कुणावर ” सुहास
“मुली अश्याच असतात रे , सहज कुणावर हि विश्वास ठेवत नाहीत … तुला तो विश्वास निर्माण करावा लागेल ” आई
“ह्म्म्म ,, ” सुहास
“ बर आता मला सांग तिच्या दुःखाचा तुला इतका त्रास का होतो आहे ” आई
“त्रास वगैरे नाही ग ,, मला फक्त तिची काळजी वाटते इतकंच ” सुहास
“तेच तर ,, का काळजी वाटते तुला तिची ”आई
आईच्या प्रश्नाने सुहास गोंधळाला ,, त्याने मान वर करून आईकडे पहिले
“ का म्हणजे ,,,”सुहास
“का म्हणजे का ,,” आई
“आई ,,,, “
“काय ”
“मला नाही माहित ,, ..”सुहास
“खरंच ?,,,,”
“……”
“ह्म्म्म ,, मला माहित आहे का ते ,, तुला आवडते ना ती ??”
“…हो ”,,
“so my boy I’m sure तुला तुझा प्रश्नाचे उत्तर लवकरच कळेल फक्त तू तिला विश्वासात घेतले पाहिजे now good night, sweet dream” म्हणत आई आपल्या रूम मध्ये झोपायला गेल्या आणि सुहास सोफ्याला टेकून विचार करत बसला ..
सकाळी उठून सुहास ऑफिस ला निघाला ,, वाटेत अबोलीच्या घरासमोर क्षणभर थांबला तर ,, अबोलीची scooty न्हवती ,, म्हणजे ती रेडिओ स्टेशन ला गेली असेल असं समजून तो पुढे निघाला तर अबोली रेडिओ स्टेशन च्या गेट मध्ये भूभूला पराठे खाऊ घालत होती .. सुहास तिच्या जवळ गेला
“राग गेला का ,,? नसेल तर अजून मारू शकतेस तू मला ,, मी काहीच बोलणार नाही ” सुहास
अबोली काहीच न बोलता आत निघून गेली ,,, आणि सुहास पुन्हा तिला जाताना पाहत राहिला ,, ऑफिस मध्ये पोहोचल्यावर हि तो तिचाच विचार करत होता … थोड्यावेळाने त्याने कुणाशी तरी फोन वर बोलून झाल्यावर तो कमला लागला ..
रात्री 10 ला आपला शो संपवून अबोली पार्किंग मध्ये आली ,,
“ohh god…again,,, what the… “ अबोली
अबोलीच्या scooty चा टायर पुन्हा पंचर होता .. वैतागून ती गेट बाहेर आली तर समोर सुहास ओठावर हसू घेऊन तिची वाट बघत उभा होता .. तिने त्याला फक्त एक नजर पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि पुढे लिफ्ट साठी एखाद्या गाडीच्या शोधात निघाली ..
“ए hello,, मी तुझी वाट बघत इथे उभा आहे आणि तू काय मला नाझरे आड करून जाते आहेस ”
…… अबोली काहीच बोलली नाही
“अबोली ,,, मी तुझ्याशी बोलतो आहे ”
“I know,, पण मला तुमच्याशी बोलण्यात काडीचा हि इंटरेस्ट नाहीये ..”
“listen ,, m sorry.. please गाडीत बस मी घरी सोडतो तुला ”
“ओह्ह ok सो या वेळी तू माझ्या गाडीचे टायर पंचर केले तर ,,,”
“…..अम्म ,, हो .. त्या शिवाय मला अजून काही सुचले नाही ,, मला तुझ्याशी बोलायचे आहे .. आणि उगाच तर तू माझ्या गाडीत बसणार नाहीस ना सो …”
“मला तुझ्याशी काही एक बोलायचे नाही ,,”
“मी सॉरी म्हणालो ना ,, खरंच सॉरी …but I care for you,, that’s why मी तसा वागलो ”
“तुला माझी care करायची गरज नाही आहे ”
“गरज म्हणून तुझी काळजी नाही करत मी मला वाटत म्हणून करतो ,,”
…… अबोली काहीच बोलली नाही
“खर तर कालपरेंत मला हि माहित न्हवते कि मी तुझी काळजी का करतो ,, खूप विचार केला आणि realize झालं कि ,,, कि मला तू आवडतेस .. तुझं रूप , दिसन , हसन नाही तर तू जशी बोलतेस बिनधास्त ते मला आवडते तू जशी चिढतेस रागावतेस ते मला आवडते घरचेच नाही तर mr. सिंग असो व जुली ,, किंवा भूभू असो प्रत्येकाला जशी जपतेस ते मला आवडते .. मला तू आवडतेस ..” सुहास बोलण्यात इतका गुंग झाला कि अबोली तिथे नाही आहे हे त्याच्या लक्षातच नाही आले . ती रिक्षा ने निघून गेली होती , त्याने लगेच गाडी स्टार्ट केली आणि तिच्या घराकडे पोहोचला ,, ती रिक्षाचे भाडं देऊन घरात जाताच होती …
“अबोली please थांब यार ,, किती हट्ट करशील .. मी काहीतरी मनापासून सांगत होतो तुला आणि तू न ऐकताच निघून आलीस ”
“माझा घर समोर तमाशा नको आहे मला ,, जा आता तू ”
“माझं बोलणे पूर्ण झाल्या शिवाय मी इथून कुठे हि जाणार नाही ,,”
“ठीक आहे राहा इथेच ,,” म्हणत अबोली घरात निघून गेली
रात्रीचे दोन अडीज वाजत आले होते तरी अबोलीला झोप लागत न्हवती , न राहाहून तिने खिडकी बाहेर डोकावून पहिले तर सुहास गेट बाहेरच्या सायकल रिपेअर वालाच्या बाकड्यावर बसून होता , थंडीचे दिवस त्यात तिथे मच्छर हि फार होते . सायकल रिपेअर वाला आतमध्ये टल्ली होऊन पडला होता . थोड्या वेळाने सुहास शुद्ध हरपल्यासारखा तळ्याच्या दिशेने चालू लागला , अबोली लगेच खाली उतरली आणि त्याच्या हाताला धरून त्याला मागे ओढले तसा तो तिच्या अंगावर कोसळला ,, अबोली गोंधळली ,,
“सुहास , इकडे बघ , उठ ,, तू दारू प्यायला आहेस ? बोल सुहास ” अबोली
सुहास नशेत होता ,, नशेतच तो अडखळत बोलू लागला ..
“नाय अबो अबोली मी नाय प्यालो दारू ,, मला तहान लागली होती ना म्हणून मी त्या सायकलवाल्याच्या बाटलीतले पाणी प्यालो ,, बस … तुला तुला माहित आहे ना मी मी नाय पिट मग .. हा पण तू हे आईला नको सांगुस हा ,, please तिला खूप वाईट वाटणार ”
“ओह्ह god… काय करून बसला हा ,, आता एवढ्या रात्री कुठे घेऊन जाऊ याला ” अबोली स्वतःशीच बडबडत होती
“तू टेन्शन नको घेऊस अबोली मी जाईन घरी मागच्या दराने ” सुहास
“हो का, कुठे जातोयस हे तरी कळत आहे का तुला ? या दिशेने गेलास तर पुढच्या जन्मी घरी पोहोचशील ” अबोली
“ओह ,, हो काय .. नाय मग एवढा वेळ नाही माझ्याकडे ..” सुहास
“इकडे ये ,, सांभाळून " अबोली त्याला सावरत तळ्याकडे घेऊन आली , त्याच्या तोंडावर पाणी मारले , तर पलटून सुहास हि तिच्यावर पाणी उडवू लागला
“थांब ,, काय करतो आहेस , पाणी का उडवत आहेस माझ्यावर ” अबोली
“तू पण तर उडवते आहेस ना माझावर मग ” सुहास
“देवा ,,, मी तुझी दारू उतरावी म्हणून पाणी मारते आहे ” अबोली
“ओह्ह असे काय , मला माहित न्हवते ,, शोल्ली ” सुहास
“का असं वागत आहेस तू ,, मी जायला सांगितले होते ना मग तू घरी का नाही गेलास ”अबोली
“कारण कारण मला बोलायचे आहे ना तुझ्याशी ,, पण तू माझं ऐकतच न्हवतीस मग मी काय करणार म्हणून मी नाय गेलो घरी ” सुहास
“मला माहित आहे तुला काय बोलायचे आहे आणि म्हणूनच मला ते नाही ऐकायचे ” अबोली
“नाहींईईई ,, तुला नाय माहित मला काय सांगाय ,, सांगायचे आहे ते … मला तुला सांगायचे आहे कि मी तुला नाय , माझं तुला नाय ,, मी तुझ्यावर प्रेम करतो … हा मी तुझ्यावर प्रेम करतो ”सुहास
अबोली हताश चेहेर्याने मान झुकवून डोळे मिटून बसली होती
“मला ना तू तू खूप आवडतेस , इतकी कि माझ्या ऑफिस च्या गार्डन मध्ये पण मी तुझी झाड लावलीत , मला तर माहीतच न्हवते कि मी तुझ्यावर कधी प्रेम करायला लागलो , ते तर त्या दिवशी आईमुळे कळले मला ,, आणि आता तुला पण कळले ना , मग आता आपण लग्न करूया मी उद्या आई ला घेऊन येतो तुझ्या घरी ok.. आता मी जातो घरी ’’ एवढं म्हणून सुहास जो घरी जाण्यासाठी निघाला होता तो थेट खाली कोसळला
“सुहास ,, are you ok,,,तू ठीक आहेस ना ” अबोली सुहास ला गदागदा हलवत विचारात होती पण सुहासला धुंदीत काहीच कळत न्हवते ,, मग तिने त्याला नीट गवताच्या भऱ्यावर टेकवून झोपवले ..
“मला तुझे प्रेम कळत होते ,, पण मी ते नाही स्वीकारू शकत ,, मी तुझ्यासाठी योग्य नाहीये म्हणूनच मी अशी तुटक वागत आहे . मला विसरण्यातच तुझे हित आहे ” अबोली एकटीच बोलत होती आणि मागच्या रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रक मध्ये गाणं वाजत होत
सिने मे उठते है अरमान ऐसे
दारिया मे आते है तुफान जैसे
कभी कभी खुद्द हि माझी कष्टी को दुबोती है
ए दिल दिल कि दुनिया मे ऐसा हाल भी होता है
बाहेर कोई हसता है , अंदर कोई रोता है
ए दिल,,,,, कोई पेहेचाने नाही किसी ने ये जन नाही
दर्द छुपा है कहा ….
सकाळी सुहास ला जग आली तेव्हा त्याला तो अबोलीच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपला होता, अबोलीने त्याचा हात आपल्या हातात घट्ट धरला होता . त्याने एक हाताने तिचा गालावर आलेले केस हलकेच मागे सारले , कदाचित त्या स्पर्शाने अबोलीला जाग आली ..
“गुड मॉर्निंग ” सुहास
“तुला जे बोलायचे होते ते बोलून झाले आहे ,, आता निघ इथून ” असं म्हणत अबोली आपल्या घरी गेली
“काय म्हणाली हि ,, तुला जे बोलायचे होते ते बोलून झाले आहे ,,,,! म्हणजे मी बोललो तिला … एस एस finally मी बोललो तिला …. पण ती काय बोलली हे कोण सांगणार ,,, शीट आणि माझं डोकं का एवढं दुखत आहे ”
घरी जाऊन सुहास ऑफिस साठी रेडी होत होता . खूप खुश होता तो आज चक्क गाणं गुणगुणत होता ..
“काय मग कळली का तुझ्या प्रश्नांची उत्तरे ” आई
“हम्म सगळ्या नाही पण तू विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले .”सुहास
“गुड , म्हणजे महत्वाचं प्रश्न सुटला आता बाकीचे प्रश्न शुल्लक आहेत सुटतील ते हि हळूहळू ..” आई
“त्यासाठी मला आता निघायला हवे ,, चल bye”सुहास
“bye have a great day” आई
सुहास घाई घाईत अबोलीला भेटायला निघाला ,, पण As usual ती आज हि निघून गेली होती . त्याने गाडीची speed वाढवली आणि रेडिओ स्टेशन ला पोहोचला तर ती पार्किंग मध्ये हि न्हवती शेवटी संध्याकाळी भेटेल अशी स्वतःची समजूत काढत तो ऑफिसला गेला . दिवसभर तो फक्त अबोलीचाच विचार करत होता आणि तिचा भेटीच्या ओढीने व्याकुळ होत होता, त्याच्यात एक वेगळाच उत्साह संचारला आहे असं जाणवत होत . संध्याकाळी उगाच अबोलीची आणि आपली चुकामुक होऊ नये म्हणून वेळेवर काम आटपून तो ऑफिस मधून निघाला आणि रेडिओ स्टेशन बाहेर निघताना त्याला अबोली दिसली ..
“hye wait… अबोली ,, मला तुझाशी बोलायचे आहे" सुहास
“आता अजून काय बोलायचे बाकी आहे ” अबोली
“ पहाटेच्या तुझ्या बोलण्यावरून हे तर कळले कि मला जे सांगायचे होते ते मी सांगून झालो आहे पण त्या वर तू काय बोललीस हे मला माहित नाही so,,, u know??” सुहास
“मी काहीच बोलले नाही ,, आणि मला काही बोलायचे हि नाही आहे ,, खूष !!! आता please माझ्या मागेमागे करणे बंद कर ” अबोली
“पण का ,, तुझ्या या अश्या वागण्याचं कारण मला कळने गरजेचे आहे ” सुहास
“मला कळत नाहीये तुझी problem काय आहे ,,, चार दिवस पूर्वी तर तू ठीक होतात हे अचानक काय झालं" अबोली
“अचानक काही झाले नाही मला माझ्या मनातल्या भावना आता कळल्या एवढच , पण त्या तुला कळत नाही आहे हा माझा problem आहे ” सुहास
“ठीक आहे आता स्पष्टच बोलते , ……. मला माहित आहे तुला मी आवडते , तुझा feelings मला कळल्या … पण … पण तुझ्या बद्दल मी हि तेच feel करत नाही जे तू माझ्याबद्दल करतोस . Clear ? so आता हा नाद सोड & now bye” अबोली
“तू खोटं बोलते आहेस हे तुझ्या डोळ्यात मला साफ दिसते , मी लहान नाही आहे ,, खऱ्या खोट्यातला फरक मला कळतो ” सुहास
“हद्द झाली आता तर ,, एकदा सांगून तुला कळत नाही तर वाटेल ते समज ” अबोली
“तुझ्या हट्टीपणाची हि हद्द झाली , पण मी हि काही कमी नाहीये .. एक ना एक दिवस तुझ्या प्रेमाची कबुली तू नक्की देशील , माझा शब्द आहे ”म्हणत सुहास गाडीत जाऊन बसतो आणि अतिशय वेगाने गाडी चालवत घरच्या दिशेने गेला .
अबोली खूप disturb झाली होती , त्याच्या गाडीचा वेग पाहून तिला त्याची काळजी वाटू लागली होती . लगेचच ती हि त्याच्या मागून घरच्या दिशेने निघाली . वाटेत एक ठिकाणी रस्त्याच्या एक कडेला तिला माणसांचा जमाव दिसला बहुतेक accident झालेलं असावं म्हणून अबोलीने जस्ट एक कटाक्ष टाकला आणि पुढे निघून गेली पण क्षणात थांबली कारण तिला scooty च्या आरशातून त्या जमावात सुहास ची गाडी दिसली .. ती घाबरून त्या दिशेला धावली . तर सुहास तिथे न्हवता फक्त गाडीचं होती . गाडीची अवस्था पाहता चालकाला खूपच दुखापत झालेली दिसते अशा प्रकारच्या लोकांच्या बोलण्यावरून आणि त्या गाडीची अवस्था पाहून ती अजूनच घाबरली . तिला आता सुहास ची खूप काळजी वाटत होती . तिने लगेच जमावाला विचारले कि accident झाले मग रुग्णाला कोणत्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यात आले आहे . तिथल्या लोकांनी सांगितल्या प्रमाणे अबोली त्या हॉस्पिटल मध्ये पोहोचली . Reception ला विचारल्यावर कळले कि त्या रुग्णाला आताच ओप्रेशन थिएटर मध्ये नेण्यात आले आहे हे ऐकून अबोली अजूनच कासावीस झाली . सुहास बरा असेल ना त्याला फार लागले नसेल ना त्याच्या accident ला आपणच जबाबदार आहोत का असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात येत होते . शेवटी एकदाच ओप्रेशन थिएटर चा दिवा वीजला आणि डॉक्टर बाहेर आले .
“डॉक्टर, सुहास कसा आहे आता ? त्याला फार लागले नाही ना ? तो लवकर बरा होईल ना ? मी त्याला भेटू शकते ?” अबोली
“शांत व्हा , हे पहा त्यांना डोक्याला जखम झाली आहे आणि हाताला फॅक्चर आहे , आता ते शुद्धीवर नाहीत तुम्ही थोड्यावेळाने त्यांना भेटू शकता आणि दोन दिवसांनी घरी हि घेऊन जाऊ शकता ओक .. by the way तुम्ही यांच्या कोण ?” डॉक्टर
“………….मी ,, मी .. यांची मैत्रीण ” अबोली
“ओह्ह ,, anyways आजची रात्र त्यांना इथे राहावं लागेल तुम्ही यांच्या घरच्यांना कळवा ” डॉक्टर .
डॉक्टरांचे बोलणे झाल्यावर अबोली सुहास च्या रूम कडे निघाली ,, तो अजून हि बेशुद्ध होता . ती आत गेली आणि सुहास चा हात हातात घेऊन म्हणाली ,
“सॉरी ,, मला माफ कर … माझ्यामुळेच तुझी हि अवस्था झाली ना ,,”
तिच्या स्पर्शाने सुहास ला जाग आली असावी ,, त्याने तिचा हात हातात धरला ..
“नाही ग ,, गाडीचा ब्रेकचं लागला नाही ऐनवेळी म्हणून झाला accident. आणि बघ मला फार काही लागले हि नाही मी एकदम फिट आहे .”सुहास
“मी डॉक्टरांना बोलावून आणते ” असे म्हणत अबोली त्याचा हात सोडत बाहेर जाऊ लागते पण सुहास तिला रोखतो
“तुला माझ्या accident बद्दल कसे कळले ”सुहास
“वाटेत तुझी कार पहिली ” अबोली
“आणि तू मला शोधात इथे आलीस ” सुहास
“हम्म ” अबोली
“ का ” सुहास
“का म्हणजे ,,” अबोली
“का म्हणजे का ” सुहास
“…… ” अबोली
“ओक नको सांगुस ठीक आहे , आता तू जा मी सकाळी जाईन घरी ,, bye” सुहास
“ohkk,, मी तुझ्या घरी कळवते कि तू इथे आहेस म्हणजे तुझी काळजी घ्यायला कुणीतरी येईल ” अबोली
“त्याची काही गरज नाहीये ,, मी आईला फोन करून सांगेन कि मी आज ऑफिस मध्ये थांबतोय ,, अपघाताचे कळले तर तिला चैन पडणार नाही उलट तिचीच काळजीने तब्बेत खराब होईल ” सुहास
“ok,, मग मी आहे इथेच " अबोली
सुहास काहीच बोलला नाही ,, अबोली समोरच्या सोफ्यावर जाऊन बसली दोघांमध्ये एक वेगळीच शांतात होती .. क्षणाक्षणाला होणारी नजरा नजर ,, या नाझरेतल्या भाषेतून दोघे काय बोलत होते कुणास ठेवून . थोड्यावेळाने अबोलीच्या घरून फोन आला
“hello आई मी रियाकडे आहे , उद्या सकाळी येईन घरी , आज मला काही महत्वाचे काम आहे , काळजी करू नकोस , bye” एवढा बोलून तिने फोन ठेवून दिला .
“गोष्टी सहज लपवता येतात तुला सुहास
“तुझ्याच प्रमाणे मला हि माझ्या आईची काळजी आहे ,,,, तिला जर मी सांगितले असते कि मी हॉस्पिटल मध्ये आहे तर पुढचे काहीही ऐकून न घेता तिघी हि इथे हजर झाल्या असत्या ” अबोली
“तिघी म्हणजे अजून कोण कोण आहे तुझ्या घरात ” सुहास
“मी , आई , काकू आणि काकूंची मुलगी म्हणजे माझी बहीण स्नेहल ” अबोली
“ohk, आणि तुझे बाबा ” सुहास
“ते नाहीयेत ,, माझ्या लहानपणीच ,,,” अबोली
“ohh,, m sorry.. आणि काका ?” सुहास
“he is dead” अबोली
तेवढ्यात सुहास साठी जेवण घेऊन एक वॊर्डबॉय आला , सुहास समोर ताट ठेवून गेला . बराच वेळ सुहास खाण्याचं प्रयत्न करत होता पण फॅक्चर मुळे त्याला जमत न्हवते , शेवटी अबोली त्याच्या जवळ आली आणि त्याला घास भरवू लागली ..
पहिला घास खाताच सुहास “दुसऱ्याच्या हाताने खाण्याची मजा वेगळीच असते ” असं म्हणाला .. पण ती काहीच बोलली नाही हे पाहून तो पुन्हा पुढे म्हणाला “ आणि जर ते हात एखाद्या सुंदर मुलीचे असती तर हॉस्पिटलच्या जेवणाला हि एक वेगळीच गोडी येते .”
“जेवायचे आहे कि नाही ” अबोलीने विचारलं तसा सुहास गालातच हसला .
जेवून झाल्यावर “तू हि जा हॉस्पिटलच्या कॅन्टीन मधून काही तरी खाऊन ये ” सुहास
“मला भूक नाहीये , तू झोप ..” अबोली
“ कधीतरी कुणाचं तरी ऐक ” सुहास
या वेळी अबोली हि हसली ,, आणि ती बॅगेतील समोसे काढून खाऊ लागली
“अअअ मी तुला कॅन्टीन मध्ये जाऊन खायला सांगितले तू तर इथेच सुरु झालीस, आणि जर तुझ्याकडे समोसे होते तर मला हॉस्पिटल चे बेचव जेवण का जेवायला लावलेस ” सुहास
“हाहाहा ,, पण तुझा बोलण्यावरून तर असं वाटले कि तुला ते जेवण खूप आवडले ,, मग आता काय झालं ” अबोली
“हसू नकोस ,, दे मला पण समोसे ” म्हणत सुहास बेड वरून उतरत अबोली जवळ येऊ लागला
“no,, no सुहास तुला तेलकट खान काही दिवस तरी बंद आहे so मी तुला हे देणार नाही ” म्हणत अबोली सामोसे घेऊन उठली आणि सुहास तिचा हातून ते घेण्याचा प्रयत्न करू लागला … शेवटी तो यशस्वी झाला
“सुहास just one,, तुला जर हे असले खाणे खाताना डॉक्टर ने पहिले तर आधी ते मला ओरडतील आणि मग तुला .” अबोली
“कुणी नाही पाहणार ग ,, पण तुझ्याकडे हे आले कुठून ” सुहास
“आमच्या कॅन्टीन मधून घेतलेले स्नेहल ला आमच्या कॅन्टीन मधले समोसे खूप आवडतात .. पण ती तर आता खाऊ नाही शकत ,,, n by the way तू कधी पासून असा लहान मुलांसारखा वागू लागलास , हट्ट करू लागलास ” अबोली
“ मी ,,,, मी असाच होतो ग पण businessman बनता बनता माझ्यातले लहान मूल हरवून गेले होते , तुझ्यामुळे ते पुन्हा सापडले .. तुझ्या संगतीचा परिणाम अजून काय …” असा सुहास हसत मुखाने तिला म्हणाला
“ohk,, मग नको राहूस माझ्या संगतीत नाहीतर अजून वाईट सवयी लागतील ” अबोली गंभीरपणे म्हणाली
“काही हरकत नाही ,, मला आवडते तुझ्या सहवासात राहायला .. तुझामुळे मी पुन्हा आयुष्य enjoy करायला शिकलो ” सुहास
अबोली काहीच बोलली नाही पुन्हा एक शांतता पसरली त्या रूम मध्ये ..
“अबोली गप्प का झालीस ,” सुहास
“काही नाही , झोप आता तू, तुला आरामाची गरज आहे ” अबोली
“मला झोप नाही येत आहे , आपण एक Game खेळूया ” सुहास
“पण मला येते आहे ,, so plz झोप ” अबोली
“ ऐकून तर घे सरळ नाही काय म्हणतेस ” सुहास
“ok,, काय आहे गेम ” अबोली
“आपण एकटक एकमेकांकडे पाहायचे पाहूया कुणाच्या पापण्या आधी मिटतात ,,”सुहास
अबोली स्मित हसून म्हणाली “प्यार किया तो डरना क्या ?”
“वोई तो …”सुहास
“हे तू ढापलेली आयडिया ज्या मूवी madhe आहे तीच नाव ”अबोली
“I know ,, but चलता है .. आता गेम स्टार्ट करूया ” सुहास
“हम्म ,, ok.. ” अबोली
गेम स्टार्ट होतो दोघं हि एकमेकांच्या डोळ्यात एकटक पाहत असतात ,, थोड्या वेळा नंतर सुहास पापणी हि न हलवता अबोलीशी बोलू लागतो
“किती गहिरे आहेत तुझे डोळे , या नजरेत आकंठ बुडून जावस वाटते ,,”
“ flirt करतोयस ” अबोली
“तुला हवं ते समज पण मी खर तेच बोलतो आहे ” सुहास
“बरं ,,” अबोली
“ जे तू शब्दांनी सांगत नाहीस ते तुझ्या नजरेत साफ लिहिले आहे ”सुहास
“काय ” अबोली
“कि तुझं माझ्यावर प्रेम आहे ” सुहास हे एवढं बोलतो आणि अबोलीच्या डोळ्यातून अश्रूंची धार ओघळते, तिच्या पापण्या मिटतात
“मी हरले , you win.. आता झोप ” असं म्हणत अबोली बॅड वरून उठून जाऊ लागते पण सुहास तिचा हात धरून तिला थांबवतो .
“I know मी जिंकलो आहे आता जिकंण्याचे बक्षीस म्हणून तुला माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील ”सुहास
“ गेम स्टार्ट व्हायच्या आधी असं काही ठरले न्हवते सो मी तुझ्या कोणत्या हि प्रश्नाला उत्तर वगैरे देणार नाही ” अबोली
“तुला उत्तर द्यावी लागतील , खूप झाला शब्दांचा खेळ आता मी स्पष्टच बोलतो ,, माझं तुझ्यावर प्रेम आहे मला तुझ्याशी लग्न करायचं आहे ” सुहास
“पण मला नाही करायचे आहे तुझ्याशी लग्न ” अबोली
“तू खोटं बोलते आहेस हे मला माहित आहे ,, तरीही जर तुझा नकार असेल तर त्या नकारच कारण जाणण्याचा हक्क मला नक्कीच आहे ” सुहास
“what कारण ,, I jss don’t love you,, that’s it” अबोली
“ohh really,, do you think m a full, तुला काय वाटते मला कळत नाही ,, जर तस असते ना तर तू आता इथे नसतीस ” सुहास
“problem काय आहे तुझा ,, का असे वागत आहेस ,, तुला कळतंय का त्रास होतो आहे मला तुझ्या अश्या वागण्याचा ” अबोली
“तुझा काय problem आहे ,,, तुझा त्रास कमी करण्यासाठीच मी तुला विचारतो आहे , सांग मला काय टोचते आहे तुझ्या मनाला , का दूर होऊ पाहते आहेस माझ्यापासून ” सुहास
“मी तुझ्यासाठी योग्य नाहीये सुहास ,, तू नाही लग्न करू शकत माझ्याशी ,, इनफॅक्ट मला कुणीही पत्नी म्हणून नाही स्वीकारणार ,, आणि तू तर खूप चांगला मुलगा आहेस ,, तू एखादी खूप चांगली मुलगी deserve करतोस .” अबोली
“आणि तुला असं का वाटते कि ती मुलगी तू नाही होऊ शकत ,,, बोल ” सुहास
“ कारण मी खुनी आहे ,, माझ्या काकाला मारले आहे मी ,, पण मला त्याचा जराही पाश्च्याताप नाही ,, खरतर त्याला याहून हि मोठी शिक्षा झाली पाहिजे होती , माझ्या अब्रूवर घाला घातला होता त्याने माझ्या आयुष्याची माती केली ,, शरीरावरच न्हवे तर माझ्या मनावर हि आयुष्यभरासाठी एक बोचरी जखम केली आहे त्याने ,, कळले तुला आता ” अबोली आक्रोश करत सुहास ला हे सांगत होती आणि सुहास स्तब्ध झाला होता थोड्या वेळाने त्याने अबोलीचे अश्रू पुसले तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवत तो म्हणाला “शांत हो अबोली , शांत हो ” त्याच्या मायेच्या स्पर्शाने नकळत ती त्याच्या मांडीवर विसावली , सुहास हि तिला लहान मुलीसारखा गोंजारत होता , अबोली पुढे सांगू लागली
“12 वर्ष्याची होती मी , माझ्या बाबांची लाडकी लेक , खूप जीव होता त्यांचा माझ्यावर ,, मला म्हणायचे बेटा भरभरून आयुष्य जग , आनंद वाट आणि आयुष्याच्या लहान मोठ्या लढाया जिद्दीने लढ ,, शत्रूसमोर कधीच हार मनू नकोस आणि हे हि जान कि प्रेमाचा माणसाशी जिंकण्यात शौर्य नाही , खूप शूर हो .”अबोली
“तू शूर आहेस अबोली ,, खूप शूर आहेस तू ” सुहास
“पण आयुष्याच्या रणभूमीवर मला आणि आईला सोडून अचानकच निघून गेले रे ते , त्यांच्या जाण्याचे दुःख शमले हि न्हवते . आणि नियतीने आयुष्याचे करडे रंग माझ्यावर उधळायला सुरुवात केली , त्या रंगांनी नखशिखान्त विद्रुप करून टाकले मला ,,,
“बाबा असतानाचे दिवस फार छान होते , शाळेतून दंगा मस्ती करत उशिरा घरी पोहोचायची मी , आणि आई माझ्या वाटेकडे डोळे लावून दाराबाहेर बसलेली असायची , मग शाळेतल्या गमतीजमती सांगत आईने केलेला स्वयंपाक चवीने खायचा , संध्याकाळी बाबा येताना रोज माझ्यासाठी माझ्या आवडीचा खाऊ आणायचे अभ्यास आणि जेवण झालं कि मी आणि बाबा कधी अंगणात तर कधी तळ्याकाठी चांदण्यांच्या सावलीत बसून गप्पा मारायचो , या आभाळातल्या कित्तेक चांदण्या माझ्या , बाबांचा , आईच्या नावे झालेल्या आहेत . पण बाबा गेल्यानंतर आमचा दिनक्रमच बदलला होता . घर खर्चासाठी , माझ्या शिक्षणासाठी पैसे लागत होता आणि ते कमावण्यासाठी आईने नोकरी करायचे ठरवले . आता रोजचा दंगा नसायचा , माझी वाट पाहायला आई हि घरी नसायची , आणि बाबा तर ,,,,,,,
आम्ही आमचे घर असताना हि काकाकडे आश्रितासारखे राहत होतो , का तर आई एक अबला स्त्री घरात कुणी पुरुष माणूस असावा जो आमचे रक्षण करू शकेल असं समाजाचं म्हणणे म्हणून ,,, पण कोणाला माहित होत कि ज्याला त्या समाजाने आमचा रक्षक म्हणून नेमले तोच एक दिवस भक्षक होऊन दौंष करेल .
त्या दिवशी आई कामाला गेली होती आणि मी शाळेतून नुकतीच घरी आले होते , काकू स्नेहल ला घेऊन माहेरी गेली होती संध्याकाळपरेंत परतणार होती . मी माझं सर्व आवरून अभ्यासाला बसणार इतक्यात दार वाजले , मी आतूनच कोण आहे असं विचारले तर “मी आहे ग अबोली ” अशी ओळखीची हाक कानी आली तो काका होता मी दार उघडले आणि त्याच्यासाठी पाणी आणायला आत गेले तेवढ्यात त्याने दार लावून घेतले आणि एखाद्या जनावरासारखा माझ्यावर तुटून पडला , त्या वयात त्याला प्रतिकार करण्या इतकी माझ्यात ताकत न्हवती . मला वाचवायला हि कुणी न्हवते तिथे . समोर उभा असलेला नराधम माझा काका, माझ्या वडिलांचा सख्खा भाऊ आहे ह्यावर विश्वासच बसत न्हवता , एकाच आईचा पोटी माझ्या बाबांसारखा देव माणूस आणि दुसरा राक्षस कसा जन्माला येऊ शकतो हेच कळत न्हवते , मी गुदमरत होते .. श्वास कोंडला होता माझा , शरीरात असंख्य वेदना होत होत्या पण त्याला माझी जरा हि दया आली नाही . त्याची वासना भागवून झाल्यावर कुणाला सांगितलेस तर तुला आणि तुझ्या आईला ठार कारेन अशी धमकी मला देऊन तो बाहेर निघून गेला .
चार दिवस मूकबधिरा सारखी वावरत होते मी .. मनात साठलेलं दुःख कुणाला सांगू हि शकत न्हवते . एकाच घरात आम्ही दोघे हि वावरत होतो , मला भीतीने भेदरलेले पाहून त्याला आसुरी आनंद मिळत होता , घरच्यांच्या नकळत त्याच कुत्सितपणे हसणे मला अजूनच डिवचत होत . माझं हरवल्यागत राहणं पाहून आईला माझी काळजी वाटू लागली म्हणून माझं मन वळवण्यासाठी आणि देवीच्या दर्शनाला म्हणून तिने मला घेऊन गावच्या जत्रेला जाण्याचे ठरवले . देवीचे दर्शन घेऊन आम्ही मंदिर आवारात फिरत होतो आई नि काकू तिथल्या रस्त्यावरील दुकानात खरेदी करत होत्या. मी जवळच एक दिशेकडे पाहत शून्यात हरवले होते तितक्यात अचानक काकाने माझ्या मानेभोवती आपल्या हाताचा विळखा घातला , मी पुरती भेदरली होते , त्याच्या स्पर्शाने अंगाची लाही लाही होत होती आणि एका क्षणी मी माझ्यातले सर्व त्राण एकवटून त्याला माझ्यापासून दूर ढकलले . तो बेसावध असल्याने त्याचा तोल गेला आणि तो थेट रस्त्यावर ढकलला जाऊन मागून येणाऱ्या ट्रॅक खाली पूर्ण चिरडला गेला , पुरता चिरडला गेला तो सुहास … मी मारले त्याला . खुनी आहे मी , खुनी ” अबोली रडत रडत सुहास ला हे सगळे सांगत होती , भावनेच्या भरत ती कधी सुहासचा मिठीत पोहोचली दोघांना हि कळले नाही . सुहास तिला शांत करत समजावू लागला ..
“अबोली जे झालं त्यात तुझी काहीच चूक न्हवती , तो फक्त अपघात होता . देवानेच तुझा काकाला शिक्षा दिली ” सुहास
“तो मेला, त्याचा मृत्यू माझ्या मुळे झाला याची खंत नाहीये मला पण माझ्यामुळे काकूने तीच सौभाग्य गमावले स्नेहल ने तिचे वडील आणि मी हे कधी त्यांचा समोर कबुल हि नाही करू शकले . समंजसपणा आल्यावर मीच हट्ट करून ते घर सोडून पुन्हा आमच्या घरी यायला भाग पाडले आईला आणि काकूला हि, आई सोबत त्याही आता माझी जबाबदारी होत्या . आजवर मी पुरेपूर प्रयत्न केला आहे कि यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये , स्नेहल चा प्रत्येक हट्ट पुरवला . कळत नकळत कधी तिचा बाप झाली मी कळलेच नाही . तुझं प्रेम नाकारण्याची दोन करणे आहेत . लग्न नंतर मी माझ्या जबाबदारीत कमी पडेन अशी भीती आहे मला आणि दुसरे म्हणजे एका अशुद्ध , खुनी मुलीला तुझे घरचे , तू स्वीकारशील का हि भीती होती “ अबोली
“ काय बोलते आहेस तू अबोली , अगं तू खुनी नाहीयेस तो एक अपघात होता पाप करणाऱ्याला देवाने शिक्षा केली आता उगाचच भूतकाळातल्या जखमांना गोंजारण्यात काही अर्थ नाहीये त्याचा त्रासच होईल तुला आणि तुझ्या घरच्यांना हि,,, काय म्हणालीस मघाशी तू कि तुझ्यामुळे तुझा काकूला तीच सौभाग्य स्नेहलला तिचे वडील गमवावे लागले ,, अगं असल्या माणसाशी सौंसार करण्यात कसले आले सौभाग्य आणि कशावरून तुझ्यानंतर तो साप स्नेहल ला डसल्या वाचून राहिला असता , अश्या माणसांना नाती कळत नाहीत . तू आजपरेंत हे गुपित मनात ठेवून कुढत होतीस आता ते मनातल्या अंधाऱ्या कोठडीत पुरून टाक , कुणाला काही सांगायची गरज नाहीये , आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुझ्या शरीरावर नाही तर तुझा मनावर प्रेम केलं आहे . आणि कुणाच्या वाईट स्पर्शाने तू अशुद्ध होत नाहीस . मुळात अशुद्ध, अपवित्र असे शब्द तुझा तोंडी शोभतच नाहीत मी प्रेम केलेली अबोली बिनधास्त बेधडक आहे आणि मला तीच आवडते हि पुळचट विचारांची भेदरलेली अबोली माझी नाही .” सुहासच्या बोलण्याने अबोली सुखावली , तिच्या चेहेऱ्यावर समाधान आले इतक्या वर्षाचा गुंता आज सुटला होता तिने सुहास ला मारलेली मिठी अजूनच घट्ट केली तसे तिच्या लक्ष्यात आले कि ती कितीतरी वेळ सुहासला बिलगून बसली होती ती क्षणात त्याच्यापासून वेगळी झाली पण सुहास ने पुन्हा तिचा हात धरून तिला समोर बसवले तिचे डोळे पुसले आणि तिचा कपाळावर आपले ओठ टेकवले .
“या पुढे तू कधी हि असे रडायचे नाही . मी नेहेमी तुझी साथ देण्यासाठी असेन. सर्व नीट होईल ,, नाही आता सर्व नीट झाले आहे .” सुहास
“हम्म ,, झोप आता तू तुला आरामाची गरज आहे खूप उशीर झाला आहे ” अबोलीने त्याला पांघरून घातले आणि समोरच्या सोफ्यावर जाऊन बसली एकमेकांच्या नजरेत हरवून गेले होते दोघे आणि रात्र सरू लागली नव्या पहाटेच्या दिशेने , बाहेर कुणीतरी वॉर्डबॉय ट्रांजिस्टर वर गाणं लावून बसला होता .
जी हमे मंजूर है आपला ये फैसला
केह राही है हर नजर , बंदा परवर शुकरीया
हंसके अपनी जिंदगी मै , कर लिया शामिल मुझे
दिल कि ऐ धडकन ठेहेर जा , मिल गई मंजिल मुझे
आपकी नझरो ने समझा प्यार के काबील मुझे ..
***समाप्त***
सुरूवात तर एकदम मस्त झाली
सुरूवात तर एकदम मस्त झाली आहे...
पु.ले.शु.
waiting for next part...
waiting for next part... Chaan suruvat ahe..
मस्त
मस्त
आभारी... याच धाग्यावर पुढे
आभारी...
याच धाग्यावर पुढे पोस्ट करेन..
chan aahe ....next part
chan aahe ....next part kadhi?????????
शुद्धलेखनाकडे लक्ष दया.
शुद्धलेखनाकडे लक्ष दया.
मस्त
मस्त
RJ AV म्हणजे
RJ AV म्हणजे काय??
शुद्धलेखनाकडे लक्ष दया.
RJ AV mhanaje hi katha radio
RJ AV mhanaje hi katha radio var sangat aahe as kahitari asanar ...
sorry bt mi majhya "sudha
sorry bt mi majhya "sudha lekhanache" kahi karu shakat nahi... n hya chuka kadachit marathi font mule jast hot astil..
par ab jo bhi jaisa bhi hai.. bas yehi hai...
waiting for next part
waiting for next part