मूव्ह होण्याविषयी

Submitted by वेगळी on 13 March, 2015 - 15:02

आम्ही आयडाहो राज्यातील एका छोट्या गावात रहातो. कंटाळा आला इथे. फार भारतीय नाहित आणि अतिशय बर्फ पडतो. मूव्ह होण्याचा विचार करतो आहोत. ईस्ट कोस्टवर पण फार बर्फ पडत नसेल अश्या ठिकाणांचा विचार करत आहोत. मी व नवरा दोघे सॉफ्टवेर प्रोफेशनल्स आहोत. त्यामुळे नोकरीच्या चांगल्या संधी असतील, चांगल्या शाळा, चांगले हवामान, पण कॉस्ट ऑफ लिव्हींग आटोक्यात, अव्वाच्या सव्वा घरांच्या किंमती नसतील अश्या जागा - असा सर्व विचार करत आहोत. त्या द्रूष्टीने राले/कॅरी - नॉर्थ कॅरोलिना, अ‍ॅटलांटा - जॉर्जिया या ठिकाणांचा विचार चालू आहे. आम्ही बरोबर विचार करतोय का? हे पॅरॅमीटर्स योग्य आहेत का? ह्या जागा कश्या आहेत? नोकरीच्या संधी किती आहेत? याबद्दल तिथे रहाणार्‍यांनी वा न रहाणार्‍यांनी मार्गदर्शन केले तर बरे पडेल

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टॅम्पा.. फ्लोरिडा.... एक अजून पर्याय म्हणून...

राले/कॅरी - नॉर्थ कॅरोलिना आणि तिथून दक्षिणेकडच्या ठिकाणी रहायला जा...

टॅम्पा. पासून एअर कनेक्टिव्हीटी मिळेलच ह्याची खात्री नाही. Mon - Thu करावे लागल्यास.

ATL, ह्युस्टन, डॅलस ह्या जागा त्या दृष्टीने सोयीच्या ठरतील.

राले/कॅरी चांगलं आहे. नोकरी, शाळा, कॉलेज, भारतीय (अजीर्ण होतील इतके) सर्व बाबतीत. राहणीमानही स्वस्त आहे. आम्ही १३ वर्ष होतो आता शारलटला ( तिथून ३ तास) असतो.

मोहना, धन्यवाद! कॅरी बघतोय. सॉफ्टवेअर कंपन्या कोणत्या आहेत वगैरे माहिती जमवतोय. हवामानही बरे वाटतेय तिथले. उन्हाळा फार कडक असतो का? ऊटडोअर्स गोष्टींकरीता (ट्रेकिंग, इतर - नैसर्गिक स्थळे, नॅशनल फॉरेस्टस) कसा आहे, कॅरी परिसर?
नवर्‍याला ट्रेकिंगची फार आवड निर्माण झाल्ये - इथे बरेच ट्रेकिंग ऑप्शन्स आहेत. टेक्सास भाग फारच सपाट असल्याने तो तितकासा उत्सुक नाहीये टेक्सास करीता. टेक्सास ला बाकीही फार काही ऑप्शन्स दिसत नाहीयेत, आ ऊटडोअर्स गोष्टींकरीता परन्तु जॉब opportunities खूप व चांगल्या वाटतायत.

केरीला खूप छान ट्रेल्स आहेत. मराठी लोकांचा ट्रेकींग ग्रुप आहे. मला फेसबुकवर ॲड कर ना. मग तिथल्या ट्रेकींगवाल्यांशी गाठ घालून देते fbvar. मात्र प्रेक्षणीय स्थळं २- ३ तास किंवा ५-६ तासांच्या अंतरावर. जवळ नाहीत.