Submitted by सारिका३३३ on 3 March, 2015 - 01:38
हा प्रश्न अगदी फुटकळ वाटू शकतो पण सध्या आमच्या घरात चिलटां च्या त्रासामुळे मी खूप वैतागलेय . जर काही खाण्याचा पदार्थ उघडा राहिला कि त्याच्यावर, स्वछ घासलेल्या भांड्यांवर , कपड्यांवर सुधा चिलटां चा थवा बसतोय . औषध मारून ,धूप जाळून झालाय . ते एका जागेवरून उडतात आणि दुसरीकडे जावून बसतात . खिडकी उघडी ठेवली तर घरातली चिलट बाहेर न जाता बाहेरचेच घरात येतात . काय करावं ? कोणाला उपाय माहित असेल तर सांगा . बाहेर हुस्क्कून लावण्याचा किवा मारण्याचा .
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या डासान्च्याच रॅकेटने
त्या डासान्च्याच रॅकेटने त्याना हाणता आले तर बघा, प्रयत्न करा.
चिलट म्हणजे काय?
चिलट म्हणजे काय?
चिलटं म्हणजे अगदी मुंगीसारखी
चिलटं म्हणजे अगदी मुंगीसारखी बारकी असतात ती का ?
आमच्याकडे पा़कोळ्या झाल्या होत्या . दरवाज्याच्या बाहेर भिन्त काळी दिसावी इतका थवा बसायचा .
घरातही फार उछ्छाद माण्डला होता . त्यावरही काही उपाय असेल तर सांगा
तुला डास म्हणायचे आहे
तुला डास म्हणायचे आहे का?
कडूनिंबाचा पाला जाळा.
घरात स्वच्छता कमी असली की डास काय कुठलेही किटक घरात येतात.
आधी तुम्ही घर स्वच्छ करा. बाहेर कुठे डबके साचले असेल तर ते निमाकी करा.
घरी कुठे पाणी साचले असेल, ओलसर जागा असेल तिथे ती जागा पुसून कोरडी करा. धुळ बसली असेल तर ब्लोअर वापरा. आणि गोड सांडले असेल तर ते पुसुन तिथे पेपर घाला.
घरातील अंथरुन पांघरुनांना दोन तीन दिवस उन्ह द्या. त्यापुर्वी एकदा धुवुन घ्या.
डास पळून जायला ती वीजेवर चालणारी द्रवरुपी बाटली मिळते. आम्ही ही वीजेवरची बाटलीच वापरतो पुण्यात.
कछवाछाप वापरुन बघा.
मॉस्किटो रीपेलन्ट वनस्पती मिळतात. पण माहिती नाही आपल्याकडे कुठे मिळतील की नाही.
जुन्या पद्धतीचा उपाय
जुन्या पद्धतीचा उपाय आहे.
शेराच्या झाडाची डहाळी /काडी घरात लटकवायची.
हो आसा! पुर्वी असच करायचे.
हो आसा! पुर्वी असच करायचे. आणि तेल लावलेला कागद लाईटाजवळ टान्गुन ठेवतात काही दुकानदार.
डास म्हणजे चिलटं
डास म्हणजे चिलटं नव्हे.
सारिका, तुम्ही औषधे, धूप वापरून पण चिलटं जात नसतील तर हॉटेल्समध्ये असते तशी ब्लू कलरची ट्युब वापरून बघा. घरगुती वापरासाठी लहान आकारात मिळते. तिचे नाव माहित नाही. गुगलावे लागेल.
काला हिट?! चालतेय का ते बघा.
काला हिट?! चालतेय का ते बघा. त्याने सर्व कीटक मरतात. कॉकरोच रिलीफ ट्रीटमेंट वाल्यांना विचारून बघा.
घरातील फरशी डेटॉल किंवा लायझॉल ने पुसून घ्या.
काला हिट. (सर्व प्रकारच्या
काला हिट.
(सर्व प्रकारच्या उडणार्या संधिपाद प्राण्यांसाठी उपयोगी असते. फक्त डासांसाठी नव्हे.)
ट्युबलाईटला खायचे तेल लावलेली
ट्युबलाईटला खायचे तेल लावलेली प्लास्टीक कॅरीबॅग बाधुन ठेवा, त्याला चिटकुन किंवा थैलीत अडकुन मरतील !(ते पाप तुमचे पण
)
हा मामीने सांगितलेला उपाय मी
हा मामीने सांगितलेला उपाय मी कुठल्यातरी धाग्यावर वाचला होता. कुठल्या ते अजिबात आठवत नाही आणि आता सापडतही नाही. ह्या न सापडणार्या दुव्याबद्दल मामीला लाख दुवा(आ)
चिलटांची पैदास सिंकच्या/ बाथरुमच्या ड्रेन्सच्या आत होते. छोटं पातेलंभर पाणी उकळून सिंकच्या, बाथरुमच्या जाळ्यांवर लगेच ओतायचं. दुसर्या दिवशी चिलटं गायब होतात.
उकळलेलं पाणी ओतल्यानंतर काही काळ सि़ंक, बाथरुम न वापरलेलं चांगलं. त्यामुळे अधूनमधून रात्री झोपायच्या आधी हा पाणी ओतण्याचा कार्यक्रम करते.
ह्या आधीची जी भिंतीवर बसलेली चिलटं असतात ती केरसुणीने मारुन घ्या कारण ती काही त्या उकळत्या पाण्याने मरणार नसतात.
मी हैराण झाले होते ह्या चिलटांच्या उपद्रवाने. डेटॉलने ओटा/ सिंक पुसून घ्यायचे. फळं / ओला कचरा झाकलेला असायचा तरी चिलटं जात नव्हती. फक्त ह्या एका साध्यासोप्या उपायाने गेली
कुत्रे, ऊंदीर ... आता
कुत्रे, ऊंदीर
... आता चिलट... विनोदी धाग्यात अजून एकाची भर.... असो! रामबाण उपाय - डामराच्या गोळ्या सिंकमध्ये व जिथे जास्त प्रदुर्भाव असतो अश्या ठिकाणी ठेवाव्या.
दिनेशदांनी पण उपाय लिहीले
दिनेशदांनी पण उपाय लिहीले आहेत. मला वाटते युक्ती सुचवा धाग्यावर सापडतील. कुठे तरी पाल किंवा उंदीर मरून पडल्यास हा त्रास होतो असे त्यांनी लिहील्याचे आठवते.
डबल पोस्ट.
डबल पोस्ट.
डास नाही हो . चिलटे . आणि घर
डास नाही हो . चिलटे . आणि घर नवीनच आहे आणि एकदम चकाचक आहे . पण घराच्या बाहेर खूप चिलट आहेत . ती अस्वच्छतेमुळे नाही तर बरीच झाडी असल्यामुळे झाली आहेत . खिडक्या उघड्या ठेवल्यामुळे ती आत आली आहेत .
शेराच्या झाडाची डहाळी /काडी घरात लटकवायची.>>>
हे कुठलं झाड ?
तेल लावलेला कागद पण टांगलाय. पण हि चिलट साली त्याच्या जवळ न जाता नेमकी भांड्यांच्या मांडणीवर जावून बसतात
धन्यवाद अगो उपाय नक्की करून
धन्यवाद अगो उपाय नक्की करून बघीन .मंजूताई जावे ज्याच्या वंशा त्याला कळे . तुम्हाला त्याचा त्रास माहिती नाही म्हणून ह्या धाग्याला विनोदी ठरवून टाकू नका हो
इथे एक पिवळा चिकट कागद मिळतो.
इथे एक पिवळा चिकट कागद मिळतो. खरं तर त्याची गुंडाळी असते, ती गुंडाळी उलगडून टांगून ठेवली तर सर्व चिलटं त्यावर जाउन बसतात आणि तिथेच चिकटतात. २ दिवसात नाहिशी होतात. ( तो चिलटांचा कागद बरेच दिवस चिकट राहतो. )
ड्रेनेज वर रोज गरम पाणी ओतणे यांनी पण फरक पडतो.
नाही गं सारीका - म्हणून
नाही गं सारीका - म्हणून रामबाण उपाय सूचवलाय. ह्या लेखाच्या निमीत्त्याने ते धागे आठवले इतकचं...
सारिका३३३, मी आपल्याला शेर
सारिका३३३,
मी आपल्याला शेर वनस्प्तिबद्दलच सांगणार होतो पण तो उपाय आपल्याला आधीच सांगुन झाला आहे.दुसरे एक करुन बघा जीथे चिलटं अस्तील तीथे कापुराच्या वड्यांची पुड भुर्भुरुन बघा बहुतेक फरक पडेल असे वाटते.(भिमसेनी कापूर असेल तर उत्तम)
खिडक्यांना जाळी बसवलेली नाही
खिडक्यांना जाळी बसवलेली नाही का?
<< खिडक्यांना जाळी बसवलेली
<< खिडक्यांना जाळी बसवलेली नाही का? >>
डास, पाल इत्यादींचा अटकाव जाळीमुळे होईल पण चिलटांना प्रतिबंध करू शकेल इतकी बारीक जाळी बहुतेक ठिकाणी उपलब्ध नसतेच.
इथे एक पिवळा चिकट कागद मिळतो
इथे एक पिवळा चिकट कागद मिळतो >>>
कुठं मिळतो हा कागद ? काय म्हणायचं त्याला ? मेडिकल मध्ये मिळतो का ?
हॉटेल्समध्ये असते तशी ब्लू
हॉटेल्समध्ये असते तशी ब्लू कलरची ट्युब वापरून बघा. घरगुती वापरासाठी लहान आकारात मिळते. तिचे नाव माहित नाही.>>>>> त्याला म्हणतात इलेक्ट्रीक फ्लाईंग इनसेक्ट किलर (Electric Flying Insect killer).
सारिका३३३, तुम्ही उकळत्या
सारिका३३३, तुम्ही उकळत्या पाण्याचा उपाय लवकरात लवकर करुन बघा.
हेही केलेले आहे. काही उपयोग झाला नव्हता.
मी डांबराच्या गोळ्या ठेवणे, बाटलीत व्हिनेगर ठेवून त्यात चिलटं पडायची वाट पाहणे
मी अंगोलात आहे. त्याच्यावरचे
मी अंगोलात आहे. त्याच्यावरचे नाव बघून सांगतो ( तेही पोर्तुगीजमधे असणार )
धन्यवाद अगो. तेच लिहायला आले
धन्यवाद अगो. तेच लिहायला आले होते. मलाही आठवत नाहीये कोणत्या धाग्यावर मी तो उपाय लिहिला होता ते. पण घरी पेस्टकंट्रोल करायला आलेल्या माणसानं आम्हाला हा उपाय सांगितला होता. त्याची मी अत्यंत आभारी आहे. बाथरुम्समधली चिलटं कायमची निकालात निघाली आहेत. अधून मधून उकळतं पाणी ओतलं की झालं.
स्वयंपाक घरात तर कुकर झाला
स्वयंपाक घरात तर कुकर झाला आणि आतली भांडी काढली की त्यातलं गरम पाणी सिंकमध्ये ओतून द्यायचं. चिलटं, सिंक तुंबणे वगैरे प्रकार एकदम बंद!
पुण्यात असाल तर कमीत कमी
पुण्यात असाल तर कमीत कमी शब्दात अपमान करा त्यांचा (चिलटांचा)...
जोक्स अपार्ट पण जर बाहेरून चिलटं येत असतील तर जाळीच्या खिडक्या हा एक उपाय आहे.
शक्यतो संध्याकाळच्या वेळेला खिडक्या बंद ठेवणे.
कापूर जाळून घरभर फिरवणे इत्यादी उपाय करून पाहा.
टॉयलेट्स, बाथरूम्स ची दारं नेहेमी बंद असतील हे पाहाणे.
सिंक, वॉशबेसीन्स मध्ये नेफ्थॅलिन पर्ल्स (डामराच्या गोळ्यांचं मराठी रूप) ठेवणे.
दिवसभर जर घर बंद राहात असेल तर सकाळी जी व्यक्ती शेवटी जाते, त्यानी घरभर काळं हीट मारायचं, अन मग घर बंद करून जायचं... त्या स्प्रेचा त्रासही होत नाही, कामंही होतं.
पुण्यात असाल तर कमीत कमी
पुण्यात असाल तर कमीत कमी शब्दात अपमान करा >>> योकु,
चिलटांना *कु का म्हटलं तरी चालेल
(No subject)
*कु का - खिखिखि
*कु का - खिखिखि
अरे चिलटांसाठी खिडक्यांना
अरे चिलटांसाठी खिडक्यांना जाळी बसवायला काय सांगताहेत इकडे? त्यापरीस खिडक्याच सील करून टाका.
चिलटांना रोखणारी जाळी खिडक्यांना लावली तर घरातली माणसं गुदमरून मरतील.
हे चिलीट अतिशय बारिक असतात.
हे चिलीट अतिशय बारिक असतात. वर कोणी तरी लिहिले आहेच कि ते बेसिनच्या सिंक होल जवळपास दिसतात. कितीही स्वच्छता राखा ते येतातच. पण डांबरी गोळीचा उपाय बरा वाटतोय करून पाहिला पाहिजे. थान्क्स.
चिलटांवर प्रेम करा ,आपण
चिलटांवर प्रेम करा ,आपण प्राणीमित्र आहोतच आता किटकमित्र होऊ.
योकु, सिंडरेला, सक्काळी
योकु, सिंडरेला, सक्काळी सक्काळी लै हशीवलंत!
बाथरूम, संडास, सिंक वगैरे वापरात नसतील तेव्हा कोरडे ठेवल्यास चिलटांचा उपद्रव कमी होतो म्हणतात. परंतु ओलसरपणा जरा जरी असेल तरी ही मंडळी मुक्कामी आलीच म्हणून समजा!
सारीका, समर मध्ये घरात अशीच
सारीका, समर मध्ये घरात अशीच भयाण प्रमाणावर चिलटं झालेली... नेटवर वाचून केलेला प्रयोग - जो बर्याच अंशी यशस्वी झाला - अॅपल सायडर व्हीनेगर (हे देशात मिळतं का माहीती नाही. ) एका उंच बाटलीत अर्ध भरून त्यात थोडासा लिक्वीड सोप टाकायचा. अॅपल सायडर व्हीनेगारच्या गोड-आंबुस वासाने चिलटं तिथे आकर्षित होतात आणि आत पडतात नी मरतात. ओंगळंवाणं दिसतं...पण उपाय लागू पडतो. १-२ दिवसानी ते फेकून परत नविन भरून ठेवायचे. अॅपल सायडर मिळत नसेल तर नुसत्या व्हिनेगरमध्ये थोडा अॅपल ज्युस मिसळा. गोडसर वासावर ते आकर्षित होतात. मुख्य म्हणजे फळं वगैरे उघड्यावर ठेऊ नका सध्या. फ्रीजमध्ये ठेवा.
अॅपल सायडर व्हीनेगारच्या
अॅपल सायडर व्हीनेगारच्या >>>केक शॉप मध्ये मिळते.
चिलटं घालवायची असतील तर अगदी
चिलटं घालवायची असतील तर अगदी बेस्ट उपाय म्हणजे एका पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीत पाणी भरावे आणि त्यात एक रुपयाचे नाणे घालून पिशवी घट्ट बांधावी. खिडकीला लटकवून ठेवा. दोन तीन दिवसात चिलटं गायब होतील.
एक रुपयाचं नसेल तर पन्नास
एक रुपयाचं नसेल तर पन्नास पैशाची दोन चालतील का?
चाराणे दुर्मीळ झालेत म्हणून
चाराणे दुर्मीळ झालेत म्हणून आठाणे चालायला हरकत नसावी.
तिकडे पालींचे तुम्ही काय करता असा धागा आहे तिथून पाली उधार घेऊन या.
नवरात्रात जेऊ घातल्याचे पुण्य पण गाठीशी जमा होईल.
खिडकी उघडा. तिथे बाहेर बाण
खिडकी उघडा. तिथे बाहेर बाण काढून एक्झिट असे मोठ्या अक्षरात लिहा. कंसात चिलटांसाठी.
ज्यांची दृष्टी अधू आहे, किंवा चष्मा आहे अशी चिलटं नंतर समजूत काढून बाहेर काढता येतील.
खिडकीबाहेर खूप पिकलेलं केळं
खिडकीबाहेर खूप पिकलेलं केळं ठेवा.सगळी चिलटं तिथे जातील,मग धाडकन खिडकी बंद करा म्हणजे चिलटांचा पोपट होईल.
धाडकन खिडकी बंद करा म्हणजे
धाडकन खिडकी बंद करा म्हणजे चिलटांचा पोपट होईल. >> मग पोपटांचा बंदोबस्त कसा करावा यासाठी एक नवा धागा उघडावा लागेल

मग पोपटांचा बंदोबस्त करायला
मग पोपटांचा बंदोबस्त करायला मांजर पाळावी लागेल.
मांजर म्हणजे कोण??? ती कुत्री
मांजर म्हणजे कोण??? ती कुत्री!!!!
अधून मधून स्ट्रेस बस्टर
अधून मधून स्ट्रेस बस्टर म्हणून electrocution करून आनंद मिळवण्यासाठी थोडी चिलटे, थोडे डास, दोन चार हाऊस/फ्रूट फ्लाईज... असू द्याव्यात घरात.
खासकरून चिलटे... एक तर ती अतिशय बारकी असतात आणि चपळ सुद्धा... त्यामुळे जास्त आनंद देऊन जातात.
मांजर म्हणजे कोण??? ती कुत्री
मांजर म्हणजे कोण??? ती कुत्री!!!! >>> मला माहितेय याचा संदर्भ!!
प्लीज ते शीर्षक जरा बरोबर
प्लीज ते शीर्षक जरा बरोबर लिहा ...! " चिलटांन वर उपाय"...... अगाया.......... काय हे !!!
मांजर म्हणजे कोण??? ती कुत्री
मांजर म्हणजे कोण??? ती कुत्री!!!! >>>

मांजर/कुत्री सध्या शी करत
मांजर/कुत्री सध्या शी करत नाही.गेले 3 दिवस.
वरदा च्या सल्ल्याने भरपूर हिट मारते रात्री.☺️☺️
Pages