संशोधन क्षेत्र आणि स्त्रिया

Submitted by लीलावती on 28 February, 2015 - 00:19

आजच्या चतुरंग मध्ये प्रा रोहिणी गोडबोले ह्यांनी एक लेख लिहिला आहे.
लेखाची लिंक : http://www.loksatta.com/chaturang-news/women-scientist-need-of-time-1076...

त्या WiS ( Women in Science ) तर्फे आयोजित केलेल्या सेमिनार / चर्चा सत्रान्माध्येही ही आकडेवारी , मते नेहेमीच मांडत असतात . मलाही भेटल्या की सतत उत्तेजन देतात .
रोहिणीताई indian academy of sciences च्या WiS उपक्रमाच्या अध्यक्ष आहेत.

त्यांच्या काळापेक्षा आता परिस्थिती बरीच सुधारते आहे परंतु बऱ्याच समस्या तश्याच आहेत . . .

हा लेख सगळ्यांपर्यंत पोहोचावा आणि त्यावर चांगली चर्चा व्हावी म्हणून हा धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

rar,

>> ह्याचाच अर्थ आता ' नॉर्मल बदलण्याची किंवा री-डीफाइन करण्याची वेळ आली आहे' असं नाही का वाटत
>> तुम्हाला?

कुणाचा नॉर्म? माझी स्वत:ची धारणा मी केव्हाच बदललेली आहे. पण उरलेल्या समाजाची बदलायची कुवत आणि इच्छा नाही.

ज्या बायकांना समाजाच्या धारणांची चिंता वाटते त्यांनी चाकोरीबाहेरचे मार्ग खरंच चोखाळू नयेत. ज्यांना चोखाळायचे आहेत त्यांनी समाजाची फारशी फिकीर करू नये. हा दृष्टीकोन पुरुषी आहे. सगळ्या बायकांना अंगिकारता येईलंच असं नाही. पण खूप वास्तवोपयोगी (=utilitarian) आहे. Happy

एक स्त्री म्हणून होणारी कुचंबणा मी समजू शकतो. पण चालू चौकटीत सध्यातरी यावर खरंच काही उपाय नाही. पूर्वी वैदिक काळी ब्रह्मवादिनी संघ वगैरे असंत. अगदी बुद्धकाळातही बायका संघास शरण जात. तशा धर्तीवरचा संघ स्थापन करणे हा कदाचित एक मार्ग असू शकतो.

आ.न.,
-गा.पै.

आता १मार्चला शीर्षक बदलल्याने अगोदरचे काही आक्षेप दुर्लक्षित करावे. पेपरातील चला-पानभरू लेखांचा मागोवा घेऊन अभिप्राय-उत्तरे देता येत नाहीत. ते माध्यम वेगळे आहे. इथे तसे नसते. ज्या मायबोलीकर मुली या क्षेत्रांत पुढे जाऊ इच्छितात त्यांना शुभेच्छा.

उत्तम चर्चा!
रार, व्हेरी इंटरेस्टींग लिस्ट ऑफ स्कीलसेट्स. संशोधनातले माहिती नसले तरी माझ्या क्षेत्रात असे काय वैविध्य आहे याचा विचार करतोय.
<<मला एक आऊटलायर म्हणून नाही तर नॉरमल पॉप्युलेशनचा भाग म्हणून जगायचंय. का म्हणून मी कायम समाजाला बगल मारत, फाट्यावर मारत जगायचं? >> अत्यंत महत्वाचा विचार. या पातळीवर जाण्याची फार गरज आहे. अन्यथा 'मी फाट्यावर मारते' याचा टेंभा मिरवीत तिथेच अडकलेल्याही अनेक आहेत.

अन्यथा 'मी फाट्यावर मारते' याचा टेंभा मिरवीत तिथेच अडकलेल्याही अनेक आहेत.>> +१

ह्या लेव्हल वरून पुढे जाउन पॉवर पोझिशन हासिल करायची असेल तर टीमला त्यातील गणे गंपे गण्या गंप्या सर्वांना बरोबर घेउनच जावे लागते. त्यांचे प्रश्न पेशंटली सोडवावे लागतात. टँट्रम्स सहन करून उत्तरे द्यावी लागतात. तेव्ढा अभ्यास व मॅचुरिटी डेव्हलप करायला लागते. तुमचे जेंडर खरेच बाजूला ठेवावे लागते. बिकॉज नोवन केअर्स रिअली. आगाउ ब्रो यू सेड इट.

<<महिलांनी/च शास्त्रज्ञ/च का व्हावे आणि आताच्याच काळाची गरज कशी आहे यावर कोणी प्रकाश टाकेल का?>>
<<आता १मार्चला शीर्षक बदलल्याने अगोदरचे काही आक्षेप दुर्लक्षित करावे. पेपरातील चला-पानभरू लेखांचा मागोवा घेऊन अभिप्राय-उत्तरे देता येत नाहीत. ते माध्यम वेगळे आहे. इथे तसे नसते. ज्या मायबोलीकर मुली या क्षेत्रांत पुढे जाऊ इच्छितात त्यांना शुभेच्छा.>> तुम्ही मूळ लेख वाचला आहे काय? माझ्यामते खूप चांगले मुद्दे मांडले आहेत ह्या लेखात. पण जर पूर्वग्रहदूषित (चला-पानभरू) नजरेने पाहिले तर कळणार नाही!

Srd, ह्या तुमच्या दोन विधानांवरून तुमचे पहिले विधान तुम्ही बहुदा उपहासाने मांडले असावेत असा माझा समज होतो आहे. हा गैरसमज असल्यास तो दूर करावा Happy कारण पहिले विधान हे मला भयंकर खटकले आहे! साधारण १००-१२५ वर्षांपूर्वी स्त्रियांनी का शिकावे ह्या प्रकारची प्रबोधने तत्कालीन समाज सुधारक देत असत. आताच्या काळात स्त्रियांनी का शिकावे असा प्रश्न कोणी विचारू शकत नाही! तो सुदैवाने (किंवा गेल्या शतकात स्त्रियांनी वारंवार स्वतःला सिद्ध केल्याने) irrelevant झाला आहे! तसाच काहीसा हा प्रश्न मला वाटतो आहे! पुरुषांमध्ये असे काय खास अंगभूत गुण असतात की त्यांनी पुरुष असून शास्त्रज्ञच का व्हावे असे स्पष्टीकरण द्यावे लागत नाही आणि स्त्रियांमध्ये आवश्यक ते सर्व गुण असले तरी ह्या प्रश्नांपासून तिची सुटका का होत नाही? The logic is beyond me! You are either a good researcher/scientist or you are not! How does it matter if you are a man or a woman?
I am too upset to even think about the answer! पण रारने सर्व उत्तम मुद्दे मांडले आहेत आणि मी त्यांच्याशी सहमत आहे.
इतर क्षेत्रांप्रमाणे संशोधनाच्या क्षेत्रात देखिल खूप gender disparity आहे. उदा. माझ्या चायनीज सहकारी मैत्रिणीला मी विचारत होते की तू चायनाला परत जाऊन स्वतःची lab काढू शकशील का? तेव्हा ती म्हणाली की एक स्त्री म्हणून तिच्यासाठी ते खूप अवघड आहे. कारण चीनमध्ये networking हे रात्री जेवण्याच्या टेबलावर उशिरापर्यंत दारू पीत पीत होतं. ज्यात बहुसंख्य पुरुष असतात आणि स्त्रिया ह्या अशा प्रकारे socialize होऊ शकत नाहीत आणि networking शिवाय lab चालवणं अशक्य गोष्ट आहे! अनेक वर्षे ह्या क्षेत्रावर पुरुषांची मक्तेदारी आहे and so the game is played by the rules that are inherently biased towards men!
अजून काही मुद्दे आहेत पण सध्या वेळेवर भयंकर रेशनिंग करावे लागत आहे त्यामुळे इथे थांबते! हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद! जवळपास १० वर्षे ह्या क्षेत्रात घालवल्यावर संशोधन कशाशी खातात हे थोडेफार समजू लागले आहे! त्यातला काही अनुभव इथे शेयर करायला आवडेल!

चांगली चर्चा, रार, वरदा, सीमंतिनी खूप मुद्देसूद पोस्ट.
अगदी संशोधन क्षेत्रातला नाही पण आयटीमधली एक माहिती द्यावीशी वाटते. मध्यंतरी रिक्रूटमेंट चालू असताना स्त्री-पुरूष प्रमाण साठ चाळीस असं ठेवावे अशी सूचना मिळाली होती. याला कारण की- वरच्या पोस्टला म्हणजे साधारण ७+ वर्षे अनुभवानंतर कंपनीतले स्त्रियांचे प्रमाण लक्षणीयरित्या खालावते. याला कारणे वर उल्लेखलेलीच लग्न, मुले, नवरा अॉनसाईट इ.इ. त्यामुळे कंपनीचा स्त्री पुरूष रेशो जोरदार ढासळतो. मग ज्युनियर लेव्हलला जास्तीत जास्त मुली हायर करून ते प्रमाण संतुलित करा. पण यात मजा अशी आहे की लॉन्ग रनिंग प्रोजेक्ट्समध्ये अशा मुली फार रिस्की वाटतात कारण कधी लग्न करून नोकर्या सोडतील काही सांगता येत नाही. कंपनी महिलांना शक्य तेवढ्या सुविधा पुरवते. प्रेग्नंसीत, बाळासाठी घरून काम, कामाचे कमी तास वगैरे वगैरे. पण मग तेव्हा त्यांचे काम भरून काढणार्या पुरूष कर्मचार्यांना तेवढे रिटर्न्स मिळतात का? मिळत असले तर या बाईला थोडा setbafk बसतोच आणि मिळत नसले तर - इथल्याच हिंजवडी चावडी लेखात लिहील्याप्रमाणे 'समृध्द नवर्यांच्या बायका' टाईप घाऊक असंतोषाचं धनी व्हावं लागतं. त्यापेक्षा नोकरी सोडलेली बरी या निर्णयावर बहुतांश जणी येतात.
कशासाठी पोटासाठी हे स्त्री पुरूष दोघांचंही चालू असतं. पण स्त्रीच्या पोटातलं गर्भाशय तिला कायम 'कशासाठी?' शीच झुंजत ठेवतं.
* पोस्ट अस्थानी वाटत असल्यास काढून टाकेन, जरूर सांगा.

<<<<पुरुषांमध्ये असे काय खास अंगभूत गुण असतात की त्यांनी पुरुष असून शास्त्रज्ञच का व्हावे असे स्पष्टीकरण द्यावे लागत नाही आणि स्त्रियांमध्ये आवश्यक ते सर्व गुण असले तरी ह्या प्रश्नांपासून तिची सुटका का होत नाही?>>>>

जिज्ञासा +१

<<<<भारतातील आकडेवारी माहिती नाही. एन एस एफ फेलोशिप ही अमेरिकेतील एक कव्हेटेड स्कॉलरशिप आहे. पीचडी करणार्‍या आणि पोस्ट-डॉक करणार्‍या लोकांना मिळते. महिलांना आरक्षण इ नसते. गुणवत्ता असेल तर मिळते. सध्या साधारण ५५% महिलांना मिळते. इतर स्कॉलरशिप्स मध्ये अशाच पद्धतीचे प्रमाण आहे. स्त्रिया ह्या स्तरावर अजिबात कमी पडत नाहीत. >>>>

ही जी आकडेवारी सीमंतीनीने दिलिय ती भारतातही पुरेशी प्रातिनिधिक असावी नाहितर हा लेख लिहिण्याची गरजच पडली नसती. हा "ब्रेन ड्रेन" चा मुद्दा आहे.

मी वरची चर्चा अजून वाचलेली नाही पण माझा अनुभव सांगते. मी नुकतीच पी. एच. डी संपविली आहे. माझा नवरासुद्धा पी. एच. डी आहे आणि येथील विद्यापिठात लेक्चरर म्हणून काम करतो. शिकविण्याबरोबर संशोधनही करित असतो. त्याचे करियर अतिशय व्यवस्थित सेटल झाले आहे. मी नोकरी शोधते आहे. सध्या प्रोग्रामर चा जॉब करते आहे पण मल स्वतःला अजिबात आवडत नाहीये. पण ह्याच शहरात, ह्याच विद्यापिठात पोस्ट-डॉक मिळणे फार फार अवघड आहे. आणि मला वेगळे रहायचे नाही त्यामुळे दुसरीकडे नोकरी शोधता येत नाही. दोघांना चांगली नोकरी हवी असेल तर इथून बोर्‍याबिस्तर गुंडाळावा लागेल. नवरा तयार आहे पण मलाच वाटते त्याचे करियर इथे व्यवस्थित सेटल आहे. त्याला उगीचच नविन ठिकाणी परत सेटल व्हायला वेळ लागेल. परत त्याच्याकडे ५ विद्यार्थी पी. एच. डी करत आहेत आम्ही इथून हललो तर त्यांचे नुकसान. पी. एच. डी करताना नवरर्‍याने भरभक्कम आधार दिला होता. अजूनही देतो आहे. पी. एच. डी. करत होते म्हणून मुल होउ दिले नाही. आता नोकरी शोधते म्हणून ही गोष्ट अजून लांबणीवर टाकणे पटत नाही. पी. एच. डी झालेल्या स्त्रियांना अनेक वेगवेगळ्या परिस्थितिंचा सामना करावा लागतो आणि. त्यातील माझा एक अनुभव.

पण संघर्ष करायची तयारी असेल तरीही आणि घरून आधार असेल तरीही पोस्ट-डॉक ची फेलोशिप मिळणे फारच अवघड असते. परत ती नोकरी परमनंट नसते म्हणजे सतत टांगती तलवार डोक्यावर!! संशोधन क्षेत्रात स्त्रिया नाहीत हा प्रश्न फक्त भारतापुरता मर्यदित नाही. जगभर हिच ओरड आहे.

चर्चा वाचली.

रार, वरदा, सीमंतिनी खूप मुद्देसूद पोस्ट >> +१

पुरुष संशोधक आणि स्त्री संशोधक ह्यांच्या क्षमतेमध्ये काही फरक असतो असे मी म्हणणार नाही. माझी दुखरी नस ही आहे की अनेक स्त्रियांना इच्छा असूनही संशोधन क्षेत्रात करियर करता येत नाही. कारणे अनेक आहेतः घरून आधार नाही, पैशाची गरज, वाढलेले वय आणि स्टॅग्नेट झालेले पर्सनल लाइफ, स्वतःचा गिल्ट, पुष्कळ वेळा स्त्री आहे म्हणून न मिळणारी संधी, इतरही प्रश्न असतील. आठवतील तसे लिहिन.

आशू डी चांगली पोस्ट.

कंपनी महिलांना शक्य तेवढ्या सुविधा पुरवते. प्रेग्नंसीत, बाळासाठी घरून काम, कामाचे कमी तास वगैरे वगैरे. >> ह्या सुविधा म्हणजे फ्रॅक्चर असताना बँड एड देणे! सगळ्यात महत्त्वाची सोय हवी असते ती म्हणजे विश्वासाचे डे केयर. सध्या विद्यापीठे आणि संस्था यांची डे केयर असली तरी त्यात पोस्ट- डॉक व फॅकल्टी ला प्राधान्य नसते. इथेच गळती सुरू होते. जिथे विश्वासाचे डेकेयर आहे (आजी किंवा नवर्याच्या कंपनीचे डेकेयर) तिथे गळतीचे प्रमाण कमी आहे. (रोमात जी जी नोकरीतील सिनीयर अधिकारी मंड्ळी वाचत आहेत त्यांना अगदी पदर पसरून सर्व मेलोड्रामा सहित विनंती - कुठेही काम करीत असा संस्थेत डे केयर मागा/सुरू करून द्या .)

घर जवळ असणे ही दुसरी महत्त्वाची सोय - आज हौसिंग साठी पण पोस्ट- डॉक व फॅकल्टी ला प्राधान्य नसते. क्वार्टर्स सिनीयर व पीएच्डी विद्यार्थ्यांसाठी असतात. हे लवकर बदलणार नाही पण तरी मागत रहा...

अजून जरा वेळाने लिहीन.

जि, कळकळ पोहोचली. सुमुक्ता अच्छे दिन आयेंगे Wink Happy इफ अ‍ॅट ऑल इट इज कंफर्टींग - तू एकटी नाहीस.

रमा थँक्यू.

आशूडी , स्त्री: पुरूष रेशो सुधारला तरी स्त्री पगारः पुरूष पगार सुधारत नाहीये की कंपनीचा. कारण ज्युनियर मुली कमी सॅलरी घेत असतील.

तुमच्या क्षेत्रातील रिएन्ट्री बद्द्ल थोडे लिहीशिल का प्लीज. (का इ.इ. सविस्तर नंतर टाकेन).

जिज्ञासा, स्त्रियांनी शास्त्रज्ञ होणे ही काळाची गरज का आहे या प्रश्नाचा अर्थ मला तू म्हणतेस तसा वाटला नाही.
चला-पानभरू वाल्या कमेंटीने तसा गैरसमज होऊ शकतो.

काळाची किंवा समाजाची ही गरज का की स्त्रियांनी शास्त्रज्ञ झाले पाहिजे किंवा संशोधन क्षेत्रात उतरले पाहिजे हे मला तुझ्या पोस्टवरून समजत नाहीये.

तुमच्या सगळ्यांच्या अनुभवांबद्दल, लढ्याबद्दल आदर आहेच. संशोधन क्षेत्र हे स्त्रियांसाठी अजून अजून सुकर होवो.
म्हणजे संशोधन सुकर वा सुलभ नाही तर व्यवस्था या दृष्टीने.

वरती कुणीतरी संशोधन क्षेत्रातील स्त्रियांनी ब्रह्मवादिनींसारखा गट तयार करावा असे काही म्हणले आहे ते मला काळाची गरज का या प्रश्नापेक्षा जास्त ऑफेंडिंग वाटले.

पुरूष संशोधक गृहस्थाश्रमात राहून संशोधन करू शकतो पण बाईने मात्र गृहस्थाश्रमाचा त्याग करायचा आणि ब्रह्मवादिनी बनून रहायचे संशोधन क्षेत्रात जाण्याकरता हे म्हणणे लैच्च विनोदी.

having said that... संशोधन क्षेत्र ही आर्थिक गरज भागवण्यापुरती केलेली नोकरी नाही तर ही पॅशन आहे. आणि आपल्याला सगळ्याच गोष्टी आपल्या सोयीने मिळत नाहीत विशेषतः आपण काहीतरी प्रवाहाविरूद्ध करू पाहतो तेव्हा नाहीच.
संशोधन क्षेत्रातील स्त्रिया हा प्रवाह का असू शकत नाही असे एक आर्ग्युमेंट येऊ शकते पण बुद्धिमत्ता, दृष्टी, पॅशन, जिद्द या सर्व गोष्टी एकत्र येऊन तयार होईल ते रसायन अल्पसंख्यांकच असणार ना?

बुद्धिमान स्त्रियांच्या विषयामधे याहून बोलण्याची बुद्धी नाही तेव्हा मी गप्प बसणे बरे Happy

हो लिहीते मला असलेल्या माहितीनुसार.
तू मांडलेला मुद्दा क्र. १ डे केअरचा.
कंपनीचे स्वत:चे डे केअर असण्याकरता हवा असलेला फोर्स नाही. कसे काय? मुळात लहान मुले व त्यांची काळजी हा अत्यंत सेन्सिटीव्ह विषय आहे. यात फूड, हेल्थ, ह्यूमन सगळी डिपार्टमेंटस येतात. मुलांच्या बाबतीत फूड पॉईझनिंग हे एक उदाहरण म्हणून घेऊयात. कोणत्याही कारणाने झाले अगदी दुधाच्या कपात दुसर्या मुलाने पेन्सिल टाकली तरी. तर कंपनीच्या नावाने केवढा मोठा गहजब होईल! बदनामी निस्तरण्यात कंपनीची सगळी टॉप लेव्हल खर्ची पडेल. बरं, हे करावे तर कंपनीत स्त्रिया किती, त्यात विवाहित किती, त्यात लहान मूल असणार्या किती हे लगेच दाखवले जाते. किती छोट्याशा कर्मचारी वर्गासाठी कंपनीने ही रिस्क घ्यावी का? का? शिवाय हिंजवडीच्या जंगलात रोज मुलाला आणणे किती योग्य हा दुसराच मुद्दा. तर हा पण चिकन एग प्रॉब्लेम आहे. डे केअर सुरू करूनही ते वापरण्यास निरिच्छ स्त्रियाही आहेत की ज्यामुळे कंपल्सरी अॉफिसला येऊनच काम करायची बांधिलकी वाढेल, ते नको! Happy
यातली खोच लक्षात आली का, डे केअर हे फक्त कंपनीच्या स्त्री कर्मचार्यांनाच लागणारी सुविधा आहे हे गृहीतक. बहोत दूर जाना है.
त्यामुळे इन हाऊस डे केअर या विषयावर सध्या माझ्यापुरता मी पडदा टाकलाय. पुढच्या मुद्द्यांवरही लिहीते.

Bharatatlya sarakari prayogshaLanmadhye gender-based pagaar nahit. IT shi sanshodhan kshetrachi pratyek babateet tulana hou shakat nahi.
Bhaaratat striyanna muLat sanshodhanachi sandhi nakarali geli, he anekda ghaData. Mulinna PhD sathi guide karayala nakaar denare mothe shastradnya mi pahile ahet. PhD kelelya muli 'sansarakade अधिक लक्ष देतील', हे कारण समोर करून अनेकदा लायकी असूनही नोकरी नाकारली जाते.

(रोमात जी जी नोकरीतील सिनीयर अधिकारी मंड्ळी वाचत आहेत त्यांना अगदी पदर पसरून सर्व मेलोड्रामा सहित विनंती - कुठेही काम करीत असा संस्थेत डे केयर मागा/सुरू करून द्या .)>> मी फ्ले क्झिबल वर्किंग अवर्स आणि विमेन फ्रेंडली वर्क एन्वरॉनमेंट साठी पॉइंट लिहून दिले आहेत. पा ठ पुरावा करते आहे माझ्या लेव्हल वर. डेकेअर, शॉपिन्ग साठी अर्धा तास, ( घरगुती शॉपिन्ग) महिला कर्मचार्‍यांना ब्युटी पार्लर ची / स्पा कुपने इन्सेंटिव्ह म्हणून मिळा वीत, ( जेणे करोन त्यांचा कामा संबंधित ताण कमी होईल - हेड किंवा फुट मसाज ने) स्त्रियां ची क्रिएटिवीटी पूर्ण एक्स्प्रेस व्हावी व बुद्धी चे अल्टिमेट फलित त्यांना व त्यांच्या वर्क फिल्ड ला मिळावे या साठी पोषक परिस्थिती व सिस्टिम निर्माण करणे ही रेस्ट ऑफ द समाजाची जबाब्दारी आहे. असे मला मनापासून वाट्ते.

केवळ आकडेवारी बघून मनात विचार आला का, की संशोधन क्षेत्रात स्त्रिया कमी?
स्त्रियांचे लक्ष इकडे वळवून त्यांना संशोधन क्षेत्रात जाण्यासाठी उद्युक्त करावे म्हणून इथे लिहीले का?

तसे असेल तर, स्तुत्यच आहे.

पण इतर मुद्दे असे की,
याच समाजात, इतर क्षेत्रात, जसे राजकारण, संगणक, उद्योगधंदे, वैद्यकी इ. क्षेत्रात स्त्रियांचे प्रमाण वाढते आहेच ना? तिथेहि त्यांना मूल, लग्न, संसार, पुरुषप्रधान संस्कृति इ. ला तोंड द्यावेच लागते ना? तरी त्यांना जमते ना?

मग संशोधन करावे असे वाटत असेल तर त्या करतीलच. भारतात नाही तरी अमेरिकन कंपन्यांमधे, इतर देशातल्या कंपन्यातून करतील. भारतातच करायला पाहिजे असे कुठे?

नाहीतरी संगणक क्षेत्रात तरी भारताने काय संशोधन केले?, पण आज भारतीय लोक त्यावर इतर देशातून पैसे मिळवत आहेतच ना? मग स्वतः संशोधन करायची भारताला गरजच काय? आणि जे हवे असेल ते स्त्रियांनीच केले पाहिजे असे कुठे आहे?

>> PhD kelelya muli 'sansarakade अधिक लक्ष देतील', हे कारण समोर करून अनेकदा लायकी असूनही नोकरी नाकारली जाते.

पण बायकांना स्वतःलाच गिल्ट कुरतडत असतो वगैरे वरचे मुद्दे कन्सिडर करता ती भीती अनाठायी नाही असंही वाटत नाही का?

मूळ लेख वाचला नाही म्हणून इथे लिहायचं टाळत होते, जराशाने सविस्तर लिहिते.

शॉपिन्ग साठी अर्धा तास, ( घरगुती शॉपिन्ग) महिला कर्मचार्‍यांना ब्युटी पार्लर ची / स्पा कुपने >>> अमा, सिरियसली? त्या स्त्रिया आहेत म्हणून शॉपिंग , स्पा / ब्यूटी पार्लर कूपन्स ? मग पुरुषांनी काय घोडे मारलेय ?

याउलट, डे केअर पेक्षा कंपनीने इन हाऊस डी मार्ट वगैरे चालवावे. इन्फोसिस मध्ये आहे बहुतेक. म्हणजे घरी, वीकेंडला जो वेळ अतोनात खर्ची पडतो तो अॉफिसच्या लंच, टीटाईम मधे सहज भरून निघू शकतो. असो.
पगाराचा मुद्दा.
ज्युनियर मुलींना कमी पगार व ज्युनियर मुलांना जास्त पगार हे मी आजतागायत पाहिले नाही. पगार ते ज्युनियर असतात म्हणून कमी (?!) असतो शिवाय इंटरव्ह्यू व शैक्षणिक पात्रतेवरही. त्यात लिंगभेदाचे कारण दिसत नाही. हां, पण पुढे जाऊन हा फरक स्पष्ट दिसू लागतो कारण स्त्रीने घेतलेली कन्सेशन्स! वर मी उल्लेखलेला setback हाच. तुम्हाला काम पण स्वत:च्या सोयीने करता येणारं हवं आणि पगारवाढही हवी असं म्हणणं मला तरी Rational वाटत नाही. मग इथे तुम्ही स्त्री आहात त्याची किंमत चुकविणे वगैरे येतं. I know it gets crude here, पण तुम्हीही स्त्रीत्व एंजॉय केलंत, करताय. पुरूषाला ते स्वस्तात पडतं हे मान्य केलंय आपण. वैसे भी हम महँगी चीजों का शौक रखते है म्हणायचं आणि पुढे जायचं. Happy

PhD kelelya muli 'sansarakade अधिक लक्ष देतील', हे कारण समोर करून अनेकदा लायकी असूनही नोकरी नाकारली जाते>>>>>> Lol म्हणजे काय नेमकं? पी एच डी त्यांनी संसारशास्त्रात केली तरच हे वॅलिड आहे ना? Proud

अम्हाला पण मसाजचे वगैरे कूपनं येऊ द्यात! Lol (ओन्ली किडिंग. Happy )

डेकेअर ठिके पण शॉपिंगसाठी वेळेत सवलत, पार्लरसाठी इन्सेंटिव्ह वगैरे हे माफ करा पण अंमळ जरा अति आहे हां.
बाकी कॉर्पोरेट स्ट्रक्चरमधे तुम्ही वरच्या स्तरावर असाल (स्त्री वा पुरूष) तर ग्रूमिंग अलावन्स वगैरे असतोच की. अजून बायका म्हणून त्यात काही वेगळे हवे म्हणणे हे मला गमतीशीर वाटतेय.

स्त्रिया वा पुरूष कुणालाही विकेंडचा वेळ कॉम्पेनसेट करून वीकडेला घरगुती अर्जन्सीजकडे (प्लंबर, सुतार, ग्रोसरी वगैरे टाइप्स) लक्ष द्यायला वेळ मॅनेज करता यावा हे जास्त न्याय्य वाटते.

चिन्मय, एखादीला गाईड करण्यास ती स्त्री म्हणून नकार देणे हे विचित्र आणि निराशाजनकच आहे.
कदाचित अश्या पार्श्वभूमीवर तो 'काळाची गरज' हा मुद्दा आला असावा. माहिती नसल्याने लक्षात आला नाही.

डेकेअर, शॉपिन्ग साठी अर्धा तास, ( घरगुती शॉपिन्ग) महिला कर्मचार्‍यांना ब्युटी पार्लर ची / स्पा कुपने इन्सेंटिव्ह म्हणून मिळा वीत, ( जेणे करोन त्यांचा कामा संबंधित ताण कमी होईल - हेड किंवा फुट मसाज ने) >>>> Lol भारी आहे हे !!

मग पुरुषांनी काय घोडे मारलेय ?
असे कसे म्हणता? स्त्रीविषयक कुठलाहि मुद्दा मांडताना सर्व दोष पुरुषांनाच द्यायचा असतो हे माहित नाही का? Wink Light 1

अम्हाला पण मसाजचे वगैरे कूपनं येऊ द्यात! हाहा (ओन्ली किडिंग. स्मित )
किडिंग कशाला? घ्या कूपने नि द्या बायकोला, बहिणीला, आईला. (गर्ल फ्रेंड म्हणणार होतो, पण तुमचे शिक्रेट इथे फोडले तर तुम्ही रागवाल म्हणून लिहीले नाही)

>>शॉपिन्ग साठी अर्धा तास, ( घरगुती शॉपिन्ग) महिला कर्मचार्‍यांना ब्युटी पार्लर ची / स्पा कुपने इन्सेंटिव्ह म्हणून मिळा वीत,>> अमा, मी भारतात नोकरी करत असताना ट्रेनमध्ये आरबीआय, एम्टीएनएल वगैरे मधल्या बायकांच्या तोंडून ऐकलं आहे की गणपतीच्या दिवसात लंच टाईम संपला की कलिग्जच्या घरी गणपती दर्शन किंवा फोर्टमध्ये साड्यांचा सेल लागला की तिकडे चक्कर टाकणं वगैरे.. त्यामुळे स्ट्रेस इज टेकन केअर ऑफ असं वाटतं..

झक्कींना (नेहमीप्रमाणेच! :P) अनुमोदन.
पुरुषांनी अर्थार्जनाच्या / संशोधनाच्या / करिअरच्या 'नादात' घराकडे दुर्लक्ष 'केलं' (म्हणजे हे स्वखुशीनेच केलेलं असतं असं गृहितक) की ती प्रिविलेज आणि बायकांना ते 'करावं लागलं' की ती फाट्यावर मारण्याची 'सक्ती' हे काय लॉजिक आहे?

शिवाय नवरा वयाने आपल्याहून मोठा असला तर आपोआपच त्याची दिशा आधी ठरणार नाही का?

आपल्या प्रायॉरिटीज आपण ठरवायच्या असतात. 'अन्याय झाला हो!' म्हणून कुढण्यात काय हशील आहे?

ओके बाकीचे जाऊद्या बर्‍याच कामाच्या ठिकाणी ही गोष्ट दुर्लक्षित असते स्त्रियांच्या बाबतीत ती म्हणजे स्वच्छ आणि किमान बेसिक सोयी असलेले टॉयलेट.
संशोधन क्षेत्रामधे काय प्रकरण आहे याबाबतीत?

ह्युमॅनिटीज रिलेटेड विषयांच्या संशोधन क्षेत्रात या संदर्भात अजिबात स्त्रियांना योग्य असे वातावरण नाही असे ऐकून आहे.
विद्यापिठांमधे अजूनही या बेसिक व्यवस्था भल्या नाहीत.

इफ अ‍ॅट ऑल इट इज कंफर्टींग - तू एकटी नाहीस.>>> थँक्स सीमंतिनी Happy

स्त्रियांना फॅमिलि फ्रेंड्ली वातावरण मिळावे ह्याबाबत दुमत नाही पण महिला कर्मचार्‍यांना ब्युटी पार्लर ची / स्पा कुपने इन्सेंटिव्ह म्हणून मिळावीत हे थोडं जास्त होत नाही का?

कोर्पोरेट्क्षेत्र आणि संशोधन क्षेत्र ह्यात तुलना करणे चुक आहे. ह्या दोन्ही क्षेत्रांचे फायदे आणि तोटे ह्यांची तुलनाच होउ शकत नाही. संशोधन क्षेत्रात करियर करता येणे मुळातच प्रचंड अवघड आहे. अगदी पुरुषांसाठी सुद्धा!!!! अत्यंत हुशार पण पर्मनंट जॉब न मिळालेले पुरुष सुद्धा संशोधन क्षेत्र सोड्ताना मी पाहिलेले आहेत. स्त्रियांच्या निरनिराळ्या प्रश्नांमुळे त्यांच्यासाठी ह्या क्षेत्रात प्रवेश अजूनच कठीण आहे.!!

राजकारण, संगणक, उद्योगधंदे, वैद्यकी इ. क्षेत्रात स्त्रियांचे प्रमाण वाढते आहेच ना >> संगणक, वैद्यकीय ठीक आहे पण राजकारण आणि उद्योगधंदे ह्या क्षेत्रात स्त्रियांचे प्रमाण हातावरच्या बोटावर मोजण्याइतकेच आहे.

हीतरी संगणक क्षेत्रात तरी भारताने काय संशोधन केले?, पण आज भारतीय लोक त्यावर इतर देशातून पैसे मिळवत आहेतच ना? मग स्वतः संशोधन करायची भारताला गरजच काय? >> का नाही? आता चीनसारखे देश संगणक क्षेत्रात पुढे येत आहेत त्यामुळे जेवढा पैसा संगणक क्षेत्रात आजपर्यंत होता तेवढा पुढे राह्णार नाही. मग सर्विस इंडस्ट्री राह्ण्यात काय फायदा. कधीतरी भविष्याचा विचार नको का करायला??

आणि जे हवे असेल ते स्त्रियांनीच केले पाहिजे असे कुठे आहे? >> स्त्रियांनीच केले पाहिजे असे अजिबात नाही पण स्त्री आहे म्हणून संधीच मिळू नये हे अन्यायकरक आहे

Pages