लागणारा वेळ - कधीच मोजला नाही.
लागणारे जिन्नस:
-> चिंच
-> वाळलेल्या लाल मिरच्या (किती तिखट आवडत त्याप्रमाणे ज्याचे त्याने ठरवावे)
-> १ मोठा कांदा बारीक चिरुन
-> ५ ते ७ लसणाच्या पाकळ्या
-> छोटा अर्धा चमचा जीरपूड
-> मीठ चवीसाठी
-> गुळ - किसुन घेतला तर बरा.. चवीसाठी
-> सांभार (कोथिंबीर)
गुळ कुठाय नै विचाराच .. तिथ ठेवायला विसरली
क्रमवार पाककृती:
-> मुठभर चिंच थोड्या कोमट पाण्यात भिजू घालायची. अर्ध्या एक तासात आग्गाऊचे सटरफटर काम आटपुन घ्यायचे. त्यातल्या बिया (असल्या तर) बाजुला करुन मिक्सी मधुन फिरवून घ्यायचं ( १ २ ३ - ३ २ १ असं .. माझा मिक्सी तसाच आहे म्हणून मी तसच फिरवते .. तुम्च्याकड जो प्रॉडक्ट असेन त्याप्रमाण तुम्ही हात साफ करु शकता ). चाळणीतन ते गाळून घ्यायचं ( हो! चाळणीतनचं गाळायचं .. गाळणीतून गाळू किंवा चाळू नये .. शेफ चे सर्व हक्क अबाधित आहे.. नसत्या शंका नको. ).
->आता त्यात बारीक चिरलेला कांदा + जीरपूड + खलबत्त्यात कांडलेल्या लसणाच्या पाकळ्या ( मिक्सी वाली यकसारखी पेश्ट नाय ) + मीठ + गुळ + वाळलेल्या लाल मिरच्यांचे फ्लेक्स ( डॉमिनोज वाले देतात त्यापेक्षा थोडूशे मोठे. परत का कस नै पुसायचं ) + बारीक चिरलेला सांभार सगळं टाकायच आणि कालवून घ्यायच.
फुल्सु तयार.. फ्रिजमधे ठेवली तर आठवडाभर पुरते फक्त खायच असेल तेव्हाच लसण आणि कांदे घालावे .
फुल टु धमाल लेखन !
फुल टु धमाल लेखन !
रेसीपी पेक्षा लिखाण भारी आहे
रेसीपी पेक्षा लिखाण भारी आहे
लिहाण आवडले. सांभार चिरायचे
लिहाण आवडले.
सांभार चिरायचे म्हणजे?
सांभार नाही संभार! केशसंभार,
सांभार नाही संभार! केशसंभार, पर्णसंभार, पुष्पसंभार मधी संभार.
कृती मस्त आहे आणि चिंच मला जेवणात आवडते.
बारीक चिरलेला सांभार सगळं
बारीक चिरलेला सांभार सगळं टाकायच आणि कालवून घ्यायच.
ओके बी आता समजल. धन्स.
सॉलिड आहे लिखाण आणि डिश
सॉलिड आहे लिखाण आणि डिश पण.
खायचं कशासोबत हे? फक्त तोंडीलावणं आहे का?
रेसीपी पेक्षा लिखाण भारी
रेसीपी पेक्षा लिखाण भारी आहे:P>>>>>> अगदी अगदी.
आणि पाककृतीचे नावही भारी आहे.:)
बी >> आम्ही सांभार च म्हणतो
बी >> आम्ही सांभार च म्हणतो अमरावती यवतमाळ मधला फरक म्हणूया
मस्तच लिहीलय.
मस्तच लिहीलय.
खायचं कशासोबत हे? फक्त
खायचं कशासोबत हे? फक्त तोंडीलावणं आहे का? >> हो तोंडीलावणं .. पण आम्ही भाकरीसोबत पन खातो .. तिखट तेवढ जास्त लागतं मग ..
Sambhar / saambhaar /
Sambhar / saambhaar / saambaar mhanje kothimbeer.
रेसीपी पेक्षा लिखाण भारी > +१
रेसीपी पेक्षा लिखाण भारी > +१
जागू, सांभार म्हणजे
जागू,
सांभार म्हणजे कोथिंबीर!
विदर्भातला शब्दं आहे.
लय भारी लिखाण ! विदर्भातल्या
लय भारी लिखाण ! विदर्भातल्या खास उन्हाळ्यासाठीचा खास प्रकार!
साहित्य वाचत असताना अचानक
साहित्य वाचत असताना अचानक जिगळ्या आठवल्या. किती दिवसांत केल्याच नाहीएयेत
टीना, १००% विदर्भ!! मिक्सी,
टीना, १००% विदर्भ!!
मिक्सी, सांभार, आग्गाऊची सटर फटर कामे
मस्त प्रकार.
धन्यवाद लोक्स
धन्यवाद लोक्स
टीना मस्तच लिखाण आहे.
टीना मस्तच लिखाण आहे.
फोटो मस्त दिसतोय... थोडक्यात
फोटो मस्त दिसतोय...
थोडक्यात चिंचगुळाच्या चटणीत बा.चि.कां+को+ल. घालायची आहे.
मंजूडी >> मिरच्या राहिल्या ना
मंजूडी >> मिरच्या राहिल्या ना .. अस कस ..
लेखन आवडले!
लेखन आवडले!
मस्त रेसिपी. भाकरीबरोबर मस्त
मस्त रेसिपी. भाकरीबरोबर मस्त लागतच असेल कारण आमच्याकडे आई http://www.maayboli.com/node/6556 ही भाकरीबरोबर करते. मूळ रेसिपी कुठची ही कल्पना नाही पण कदाचित तुमच्या बाजूचीच असावी.
सायो रेसिपी मस्तच .. पण मी या
सायो रेसिपी मस्तच .. पण मी या पद्धतीने नै करत कांद्याची चटणी .. पोह्यासाठी कापतात तसे कांदे कापुन मग साध्या भाजीत टाकतो तेच तिखट मीठ मसाला टाकुन बनवते .. गावं तेवढ्या चटण्या असं म्हणाव लागेल वाट्टे
पाककृती लिहिताना सगळे एकदम
पाककृती लिहिताना सगळे एकदम दमातच घेतात हल्ली :फिदी:. हा प्रकार मस्त आहे :).
मस्त प्रकार. रेसिपी
मस्त प्रकार. रेसिपी लिहिण्याची पद्धत आवडली
संपदा >> चुकली, मला नै जमली,
संपदा >> चुकली, मला नै जमली, टेस्ट कहा है अस बोलुन आपल्या नावानं शंख फोडायला ऩको म्हणून
धन्यवाद
टिना खुप भ न्ना ट लिखाण.. आ
टिना खुप भ न्ना ट लिखाण.. आ णि पा कृ ...
:खोखो पा कृ डोक्यात शिरलीच
:खोखो
पा कृ डोक्यात शिरलीच नाही.. फ़क्त लिखाणाचि ईस्टाएइल वाचलि आधी झक्कास आहे
अरे हो पा कृ पण मस्त!
धन्यवाद लोक्स ..
धन्यवाद लोक्स ..
रेसीपी अन त्याच लिखाण पण
रेसीपी अन त्याच लिखाण पण भारी.
Pages