"Flame of the Forest" - किंशुक आणि परिभद्र

Submitted by जिप्सी on 16 February, 2015 - 07:23

पळस (Butea monosperma)

पयसाची लाल फुलं, हिरवे पान गेले झडी
विसरले चोची मिठू, गेले कोठी उडी

पाच पाकळ्यापैकी एक मोठी कळी व ती थेट पोपटाच्या चोचीसारखी बाकदार असते. या झाडाकडे बघुन शुकच कि काय, असा प्रश्न पडला असेल म्हणुन याचे संस्कृत नाव, किंशुक. ( किं शुकः ?) आणि म्हणुनच कि काय कवियत्री बहिणाबाईंना वरील ओळी सुचल्या असाव्यात.

होळीच्या सुमारास जंगलात गेलात तर पळसाची अनेक झाडे चंदेरी भगव्या फुलानी सजलेली दिसतात. याचे झाड तसे लहानखुरेच असते. फांद्या काळ्या रंगाच्या आणि वेड्यावाकड्या वाढलेल्या असतात. एरवी जाडसर त्रिदलीय पानानी बहरलेला वृक्ष डिसेंबरमधे मात्र वेड्यावाकड्या काळ्या फांद्यांमुळे अगदीच कुरुप दिसतो. जानेवारीच्या शेवटी यावर जाडसर काळ्या कळ्या येतात, आणि फ़ेब्रुवारी मार्चमधे हे सगळे झाड फुलानी भरुन जाते. याच्या पाकळ्यावर सुक्ष्म लव असते, त्यामुळे या केशरी रंगाला एक चंदेरी छटा येते, आणि त्याचमुळे काहि कोनातुन बघितल्यास हे झाड चमकते. या फुलातला मकरंद चाखण्यासाठी शिंजिर, सुर्यपक्षी, मैना आदी पक्ष्यांची लगबग चाललेली असते. त्यावर येणार्‍या मधमाश्या खाण्यासाठी वेडा राघु पण ईथे घुटमळत असतो. आणि या सगळ्यांच्या गोंगाटानी हे झाड गजबजत असते. फुलांच्या पाकळ्याचा सडा झाडाखाली पडलेला असतो. या पाकळ्या रात्रभर पाण्यात ठेवुन कुस्करल्या कि सुंदर केशरी रंग तयार होतो. कपडे रंगवायला तो उपयोगी असतोच, पण नेमके रंगपंचमीचे निमित्त साधल्याने, नैसर्गिक आणि सुरक्षित रंगहि मिळतो.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८
पांगारा ( Erythrinaa variegata)
पळसाच्या आगेमागे जंगलात परिभद्र फुलत असतो. या झाडाचे इंग्लिश नाव एरिथिना इंडिका. एरिथ्रिनाचा अर्थच मुळी रक्तवर्णाचा, असा होता. इंडिका म्हणजे भारताचा. याचे शास्त्रीय नाव Erythrinaa variegata . ग्रीष्माचा दाह जाणवु लागला. सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरले, झाडांच्या पानाना मरणकळा लागली, कि नेमका पांगारा फ़ुलु लागतो.
आपल्याकडे अगदी नैसर्गिकरित्या वाढतो हा. या झाडाचे खोड पांढरट रंगाचे असते, आणि पाने पळसासारखीच त्रिदलीय. पण त्यापेक्षा पातळ. याची हिरवीपिवळी नक्षीची पाने असलेली एक जात आता शोभेसाठी लावली जाते. ती मुद्दाम तयार केलेली नाही. निर्गातच ती तयार होते. तिला ओरिएंटालिस किंवा पार्सेली असे म्हणतात. एरवी याच्या पानाना तितकी शोभा नसते. तरिही हे झाड कायम नीटनेटके दिसते. अगदी पानगळ झालेली असली तरीही निष्पर्ण फांद्याहि सुरेख दिसतात. असे रुप फार दिवस नसतेच. लगेच हे झाड लालभडक फ़ुलानी भरुन जाते. इंदिरा संतानी त्यांच्या मृदगंध कवितेत, याला सुर्योपासक म्हंटले आहे. याच्या फ़ुलात तशी एकच पाकळी मोठी असते. बाकिच्या चार अगदीच छोट्या. यातले पुंकेसरहि तसेच लालभडक.

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३
(वरील संपूर्ण माहिती दिनेशदा यांच्या खजिन्यातुन साभार) Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी... मस्त!!! मस्त!!! मस्त!!!......... फोटो तर लाजवाब आहेतच पण माहिती सुद्धा एखाद्या वनस्पतीतज्ञाप्रमाणे लिहिलीयेस!! ब्रॅव्हो!!.....ग्रेट!!.............:स्मित:

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!!
पण माहिती सुद्धा एखाद्या वनस्पतीतज्ञाप्रमाणे लिहिलीयेस!! ब्रॅव्हो!!..>>>>>अगदी बरोबर शांकली. माहिती दिनेशदांकडुन (वनस्पतीतज्ञ) साभार आहे. Happy Happy

बाहेर स्नो पडतोय आणि स्क्रीनवर पळस आणि पांगारा फुललेत. Happy नेहमीप्रमाणेच मस्त फोटो!

मस्त! सहावे आणि शेवटले प्रकाशचित्र डोळे निवणारे आहे.
शेवटच्या चित्रातले दृश्य कुठे पाहायला मिळेल? गोरेगावला आरे वसाहतीत एक दोन दिसतात पण ते मुख्य रस्त्यापासून जरा आत आहेत आणि इतके दाट नाही फुलत.
कुणाकडे पिवळ्या बहावाची प्रकाशचित्रे आहेत का? १०-१५ वर्षापूर्वी मालाड पुष्पा पार्क हायवेवर ४-५ बहावा होते. इतके डोळे निवायचे त्यांच्याकडे बघून आणि एक दिवस अचानक रस्ता रुंदीकरणासाठी जमीनदोस्त झाले! Sad

माहिती दिनेशदांकडुन (वनस्पतीतज्ञ) साभार आहे.>>>>> ओके...:स्मित:
आणि तू तळटीप दिलीयेस ती मी वाचलीच नाही आधी!

अतिशय सुरेख छायाचित्रण ,,निसर्गाच्या अनेक चमत्कारांपैकी हा रंगांचा चमत्कार अप्रतिमच.शिवाय महिती ही अभ्यासपूर्ण..अभिनंदन!!!

Awesome

अप्रतिम फोटो जिप्स्या.

पांगाराचे फोटो पाहून मन पुन्हा बालपणात गेले. मी बर्‍याचदा लिहिले आहे आता परत लिहिते.

पांगार्‍याची फुले लालभडक होळीच्या दरम्यान फुलायची. पूर्वी ९ दिवस आधीपासून हावलूबाई म्हणजे छोट्या होळ्या लागायच्या. ती पुजायला सगळी लहान कंपनीच असायची. होळीच्या हारासाठी मी ह्या पांगार्‍याच्या पाकळ्यांचा हार करायचे. तसेच नखे म्हणूनही नखावर लावायचे. ह्याच्या बिया एकमेकांवर घासल्यावर अंगाला लावल्या की तापलेल्या तव्यासारखा चटका लागतो. तो दुसर्‍याला देण्याचा खेळ तेंव्हा आम्ही खेळायचो. Lol

जखम झाल्यावर त्यावर लावण्यासाठी आम्ही कधीच कुठले औषध वा मलम आणले नाही. लागले की आजी ह्या पांगार्‍याचा पाला काढायची, हातावर चोळून त्याचा रस डायरेक्ट जखमेवर टाकायची. रक्त लगेच थांबायचे. तसेच पुन्हा दोन-तिन वेळा लावले की जखम लगेच भरून यायची.

जिप्सी, फोटो मस्तच!

जागू, हो त्या लाल-गुलाबी बिया आम्हीही गोळा करायचो. दगडावर घासल्यावर चांगला चटका बसायचा. Proud

अश्याच प्रकायच्या चटका द्यायच्या आणखी एका प्रकारच्या बियाही असतात. त्यांचा आकार काहीसा चपटा गोल असे. रंग गडद तपकिरी. स्पर्शाला अगदी गुळगुळीत. त्या बियांच्या आतही आणखी एक बी (?) असायची कारण चिमटीत घेऊन ती बी हलवल्यावर खुडखुड असा आवाज येई. त्या कसल्या बिया?

मस्त!

धन्यवाद जिप्सी. चेंबुर्/घाटकोपर परिसरात पांगार्‍याची भरपुर झाडे आहेत्(होती?). पळसाचा संबंध "पळसाला पाने तीनच" ह्या म्हणी व्यतिरिक्त कधी आला नाहि... Happy

Pages