नाही म्हणायला बोराची झुडूप
तेव्हडी होती आणि त्यालाही हिरवी बोर
होती .त्यामुळे पोट काही भरत नहूतं पण त्याचे
दात तेव्हडे आंबट झाले होते .त्यामुळे
ती बोरही त्याला खाऊशी वाटत नहूती .
आता जर काय खाल्ल नाही तर आपलं काही खरं
नाही या विचारात असतानाच त्याला एक
मेलेला ससा दिसला .
इतर वेळी त्याने विचार
केला असता कि ससा कसा काय मेला पण
आता भुकेमुळे त्याने कसलाही विचार न
करता थोडी लाकड जमवून तो ससा भाजून
खाल्ला .आता त्याला थोडी हुशारी वाटत
होती .आता तो बाहेर पडण्याचा विचार करु
लागला .
त्याला आता खात्री झाली होती की या जंगलात
आपण फार आत आलो आहोत आणि हे जंगल फार
मोठे आहे पण जर आपण कोणत्याही एकाच दिशेनं
सतत चालत राहिलो तर या जंगलातून बाहेर पडू
याची त्याला खात्री होती .
त्याला आता सुचलं
कि पूर्व बाजूला फार दूर जंगल नाही .म्हणून
आता आधी पूर्व दिशा शोधायची व मग
त्या दिशेने चालायला सुरूवात करायची असे त्याने
मनाशीच योजले .
पोट भरल्यामुळेच आता त्याच
डोक थोडं फार काम देऊ लागल होतं .आता या जंगलात सुर्योदय
किंवा सुर्यास्त तर दिसू शकत नहूता पण एक
तळच अस ठिकाण होतं जिथं त्याला बरचस
मोकळं आकाश दिसणार होतं व तिथं
सुर्याचा प्रवास पाहून तो दिशा ठरवणार
होता .आता तो उत्साहानं सकाळ होण्याची वाट
पाहू लागला .
रात्र सरली दिवस
उगवला .तो तळ्याच्या काठी जाऊन
बसला .त्याने काही वेळ सुर्याच होणार
मार्गक्रमण पाहिलं व पूर्व दिशा ठरवून त्यानं
चालायला सुरुवात केली .दोन दिवस झाले
तो चालतच होता .
आता त्याच्यातले त्राण
संपत आले होते पोटात काही नसल्यामुळे इतर
काही सुचत नहूतं .आता काही खाल्ल्या शिवाय
पर्याय नाही हे लक्षात आल्यावर त्यानं
काहीतरी खायला मिळते आहे का ते
पहायला सुरुवात केली .
बराच शोध घेतल्यावर
त्याला थोडी कंदमुळ सापडली .पण
ती शिजवण्याइतका वेळही त्याच्याकडे
नहूता म्हणून त्यानं ती कच्चीच खायला सुरुवात
केली .
त्याच्या पोटाला थोडासा आधार तर
आला होता पण आता काहीतरी चांगलं पोषक व
भरपूर आहाराची गरज असल्यामुळे त्याने
त्या दिशेनं प्रयत्न चालू ठेवले व त्याला त्यात
यशही मिळत होत .पण या पोटाची भुक
भागवण्याच्या नादात त्याला जंगलातून बाहेर
जाण्यापासुन मात्र अडवून ठेवलं
होत.
....... क्रमशः
छान आहे पण मोठे भाग टाका
छान आहे पण मोठे भाग टाका