Submitted by सुभाषिणी on 6 February, 2015 - 05:25
गोडाचे रताळे
महाशिवरात्र जवळ आलेली आहे म्हणुन उपासासाठी एक पदार्थ देते. अगदी साधा पटकन होणारा. याचे नाव खरेतर माहीत नाही. तुम्ही काहीही म्हणा.
साहीत्य-दोन मोठी रताळी, बारिक चिरलेला गुळ-तीन चार मोठे चमचे, साजुक तुप -दोन चमचे ,भाजुन सोललेले शेंगदाणे-एक मुठभर
क्रती-रताळी स्वच्छ धुवुन त्याच्या चकत्या कराव्यात. कढईत तुप घालुन रताळ्याच्या चकत्या घालुन जारासेच परतावे. झाकण ठेवुन वाफवुन घ्यावे. चकत्या शिजल्या असे वाटले की चिरलेला गुळ शेंगदाणे घालुन हालवावे गॅस लागेचच बंद करावा.
स्त्रोत- सासुबाई.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कृती सोपी आणी मस्त आहे
कृती सोपी आणी मस्त आहे सुभाषिणी.:स्मित: माझ्या साबा करतात अश्या पद्धतीने. बदल हाच की की तुपात जिर्याची फोडणी करुन, हिरवी मिर्ची घालुन करतात. बाकी सेम. पण माझा आवडता पदार्थ आहे, धन्यवाद.:स्मित:
मी ही करते, साजुक तुपावर
मी ही करते, साजुक तुपावर लवंगा फोडणीस घालुन मग रताळी आणि मग साखर घालुन परतवते. थोड्या क्रिस्पी करते. कुडकुडीत. यम्मी लागतात.
आमच्याकडे दर आषाढी /
आमच्याकडे दर आषाढी / कार्तिकी ला होतो. गूळ न वापरता साखर वापरतात. याचे नाव आमच्याही घरी माहित नाही. रताळ्याचं गोड असेच म्हणतात.
माझी मैत्रिण फार मस्त करते हा
माझी मैत्रिण फार मस्त करते हा प्रकार. त्याचीच आठवण झाली एकदम
आमच्यात हे दुधात घालुन खातात
आमच्यात हे दुधात घालुन खातात
एकदम आवडतात. आम्हीपण
एकदम आवडतात. आम्हीपण रताळ्याच गोड असंच म्हणतो आणि साखर टाकतो. गोल चकत्या न करता पातळ काचऱ्या करतो, म्हणजे पोळीशी खाता येतात.
आम्ही याला रताळ्याच्या
आम्ही याला रताळ्याच्या काचर्या म्हणतो. सर्व उपासांना हमखास पदार्थ! मी तुपात वेलदोड्याचे दाणे टाकते फोडणीसारखे. आणि गुळातच करते.
छान अन् सोपी पाकृ. मस्तच.
छान अन् सोपी पाकृ. मस्तच. धन्यवाद.
कुठलाही गोड पदार्थ वेलची
कुठलाही गोड पदार्थ वेलची शिवाय होऊच शकत नाही. मानुषी +१
आमच्याकडे आई पण गूळ घालून
आमच्याकडे आई पण गूळ घालून करते. आम्ही रताळ्याच्या फोडी म्हणतो. खरं तर चकत्या असतात पण म्हणताना फोडीच म्हणतो. आई करते त्या छान खुटखुटीत खमंग असतात.
आम्ही रताळ्याच्या काचर्या
आम्ही रताळ्याच्या काचर्या म्हणतो! गुळाच्याच करते आईपण! गरम भारी लागतात.
रताळ्याचे गोड काप
रताळ्याचे गोड काप शिजतानाच गुळ / साखर घातली की खुटखुटीत होतात. तेच जिर्याची फोडणी मिरची घालून केले तरी चांगले लागतात.
आमच्या कडे मॉम साखरेच्या
आमच्या कडे मॉम साखरेच्या पाकात करते.
आम्ही रताळ्याचे गुलाबजाम म्हणतो.
र ता ळ्या च्या च क
र ता ळ्या च्या च क त्या....आम्ही पण गुळातच करतो...
छान पाकॄ. करून बघणार
छान पाकॄ.
करून बघणार नक्की!
रताळे नावाने टॅग करणार का? शोधामध्ये येत नाहीये.