" धुक्यातलं चांदणं " …….( भाग पहिला)

Submitted by विनित राजाराम ध... on 4 February, 2015 - 07:38

"Hello, …. आज तरी आहेस का घरी तू ? " ,
" का गं ? " ,
" नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. ",
" मी तर दर रविवारी जातो. ",
" तू नाही रे, आपण दोघे. किती महिने झाले … एकत्र गेलोच नाही आपण. " तसा विवेक हसायला लागला.
" अगं सुवर्णा… तुला माहित आहे ना. रविवार हा फक्त आणि फक्त माझाच दिवस असतो. तुला यायचं असेल तर तूही येऊ शकतेस. " ,
" OK , नको तू एकटाच जा. " ,
" बघ आता …. बोलावतो आहे तर येत नाहीस आणि म्हणतेस कूठे गेलो नाही फिरायला खूप दिवस. " ,
"त्या जंगलात वगैरे मला आवडत नाही. तुला काय आवडते तिथे कळत नाही मला. ", सुवर्णा बोलली.
" तुला नाही कळणार ते, चल … निघतो मी… तुझ्यासोबत नंतर कधीतरी. " ,
" नेहमी असंच बोलतोस…. चल , Bye… उद्या भेटूया. ऑफिस मध्ये. " ,
" Ok… Bye ,Bye… " म्हणत विवेकने फोन कट्ट केला.

विवेक , एक " खुशाल चेंडू " स्वभावाचा मुलगा. जॉबला होता एका कंपनीत, designer होता तो. पण त्याची ओळख एक "All Rounder" म्हणून होती. जास्त लोकं त्याला " लेखक" म्हणून ओळखायचे. त्याची लेखनशैली लोकांना खूप आवडायची. कविता , गोष्टी लिहायचा छान. ;सुरुवातीला त्याच्या मित्रांनाच त्याची लेखनकला माहित होती. त्यापैकी एकाने " स्वतःचा ब्लॉग तयार कर " अशी कल्पना दिली. आणि विवेकचा ब्लॉग अल्पावधीत फ़ेमस झाला. Fan's ची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. रोज कोणाचे ना कोणाचे call यायचे त्याला, अर्थातच Fan's चे. प्रवासात सुद्धा कितीतरी मुलं, मुली त्याच्याकडून सही घ्यायचे, त्याच्यासोबत फोटो काढायचे.

विवेक आता celebrity झाला होता, तरी त्याला तसं राहणं जमायचं नाही. सिंपल राहायचा अगदी. रोज सकाळी ऑफिसला जायचा, संद्याकाळी घरी आला कि वेळात वेळ काढून लेखन करायचा. आणि वेळ मिळेल तेव्हा ब्लॉग टाकायचा. Soft Music ऐकायचा , शांत राहायचा आणि दर रविवारी, कॅमेरा घेऊन कूठेतरी निघून जायचा फोटोग्राफीसाठी. खूप आवड होती त्याला फोटोग्राफीची. महत्वाचं म्हणजे त्याला निसर्गाची आवड होती. शहरातल्या गर्दी पेक्षा विवेक निसर्गात जास्त रमायचा. शिवाय चित्रसुद्धा चांगली रेखाटायचा. मस्त एकदम. इतकं सगळं करून सुद्धा मित्रांसाठी वेळ तर नक्की द्यायचा. मित्रांचा ग्रुप तर केवढा मोठा होता. एवढे छंद असलेला , दिसायला एवढा Handsome नसला तरी कोणालाही सहज आवडणारा होता विवेक.

सुवर्णाची ओळख ऑफिस मधली. शेजारीच बसायचे ना दोघे. शिवाय घरी जाण्याची आणि येण्याची वाट एकच. त्यामुळे Friendship झाली दोघांमध्ये लगेच. सुवर्णा जरा चंचल होती, फुलपाखरासारखी. एका गोष्टी वर तिचं मन जास्त रमायचं नाही. कामात सुद्धा धांदरट पणा करायची. बॉस तरी किती वेळा ओरडला असेल तिला. विवेक मग सांभाळून घ्यायचा. ती मात्र बिनधास्त होती. दिसायला छान होती. त्यामुळे ऑफिस मधली बरीच मुले तिच्या " मागे " होती. सुवर्णा त्यांच्याकडे पहायची सुद्धा नाही. तिचा खऱ्या प्रेमावर विश्वास होता आणि विवेककडे तसं सगळं होतं,जे तिने मनात ठरवलं होतं. म्हणून सुवर्णाला विवेक जरा जास्तच आवडायचा. Friendship होऊन २ वर्ष झाली होती. परंतु विवेक आता जरा जास्तच बिझी होऊ लागला होता, कामात आणि लेखनात सुद्धा. शिवाय , त्याला येणारे त्याच्या Fan's चे call, specially… मुलींचे call तिला आवडायचे नाहीत.

त्यादिवशी, असाच call आला आणि विवेक मोबाईल घेऊन बाहेर गेला. १०-१५ मिनिटांनी जागेवर आला.
" जा … बसू नकोस, सरांनी बोलावलं आहे तुला." ," Thanks ", म्हणत विवेक पळतच बॉसच्या केबिन मध्ये गेला. थोडयावेळाने आला जागेवर.
" ओरडले ना सर… " सुवर्णा बोलली.
" कशाला ? ",
" आजकाल तू खूप वेळ बाहेरच असतोस . फोनवर, म्हणून. " ते ऐकून विवेक हसायला लागला. त्याने तिच्या डोक्यावर टपली मारली.
" पागल… त्यासाठी नाही बोलावलं होतं, त्याचं काम होतं म्हणून बोलावलं होतं जरा." सुवर्णाचा तोंड एवढसं झालं.
"आणि सर माझ्यावर रागावणारचं नाही…. " ,
" तू काय त्यांचा लाडका आहेस वाटते. " ,
" आहेच मुळी !! ". सुवर्णाने तोंड फिरवलं आणि कामात गुंतून गेली. विवेक सुद्धा जागेवर बसला. ५ मिनिटे गेली असतील.
" कोणाचा call होता रे ? " , सुवर्णाचा प्रश्न.
" अगं, हि Fan मंडळी असतात ना, ते सारखं विचारत असतात, Next story कधी, कोणती , विषय काय ? मग सांगावं लागते काहीतरी. त्यात जर Fan , मुलगी असेल तर विचारू नकोस. कुठे राहता , काय करता , single or married…. बापरे ! या मुलींचे प्रश्नचं संपत नाहीत. " ,
" म्हणजे आता मुलीसोबत बोलत होतास … " ,
" अगं , Fan होती माझी. " ,
" तरी पण…. एका अनोळखी मुलीसोबत एवढा बोलतोस . माझ्या सोबत तरी बोलतोस का कधी फोन वर एवढा.",
" तू तर रोज भेटतेस ना ऑफिसमध्ये, मग कशाला पाहिजे फोन वर बोलायला. हम्म… कूठेतरी जळण्याचा वास येतोय मला. " म्हणत विवेक हसायला लागला.
" एक फाईट मारीन तुला. गप बस्स. मला काय करायचंय … कोणाबरोबर पण बोल , नाहीतर त्यांना घेऊन फिरायला जा. फक्त वाटलं म्हणून बोलले. तर म्हणे जळण्याचा वास येतोय. मी कशाला जळू ? " , रागात बोलली सुवर्णा, फुगून बसली.
" काय हे सुवर्णा … जरा मस्करी केली तरी चालत नाही का तुला, पागल कूठली " ,
" पागल नको बोलूस … समजलं ना. " ,
" बोलणार मी… पागल… पागल… पागल… " ,
"थांब हा … मारतेच तुला." म्हणत ती त्याच्या मागे धावत गेली. विवेक आणि सुवर्णाची मैत्री famous होती ऑफिसमध्ये.

(पुढे वाचा.
http://vinitdhanawade.blogspot.in/2015/02/blog-post.html

आवडली तर नक्की share करा. )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

comments साठी आभारी आहे …आणि मी एवढा मोठा नाही कि माझा कोणी " पंखा " व्हावं…. तरी सुद्धा आभारी आहे तुमचा.