24वर्षे क्रिकेट खेळुन 200 कसोटी आणी शेकडो दिवसीय सामने खेळुन 100शतके अन 30हजार धावा केल्या म्हणुन सचिन तेँडुलकरला "देवत्व" बहाल करणारे आपल्या देशात करोडो लोक आहेत.पण 27वर्षात दहा बार लाख कँन्सरग्रस्त रुग्नांना अन त्यांच्या नातेवाईकांना दुपारचे भोजन मोफत देणाऱ्या मुंबईच्या हरखचंद सावला यांना मात्र कोणी ओळखतही नाहि..विषेश म्हणजे त्यांचा फोटो मिळवायला मला पुर्ण एक दिवस लागला..>>
फेसबुकवर बराच काळ फिरत असलेल्या पोष्टीचा हा एक भाग. गुगल गेल्यास सगळी पोस्ट वाचता येईल. मुद्दामून इथे देत नाही.
हरखचंद सावला यांची कामगिरी निश्चितपणे थोर आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे (आणि हे मी माझ्या मूळच्या चिकित्सक स्वभावला दूर ठेऊन, त्या माणसाबद्दल आलेल्या फेसबुकी फॉरवर्डवर बिंधास विश्वास ठेऊन म्हणतोय, तो माणूस खरंच अस्तित्वात आहे का याचीही खात्री केलेली नसताना.) पण याचा अर्थ प्रत्येक वेळी एखादं इतर क्षेत्रात थोर कर्तृत्व असलेलं व्यक्तीमत्व घ्यायचं आणि त्याच क्षेत्रातील कामगिरीबद्द्ल त्याला दिलेल्या एखाद्या पदवीवरुन टोमणे मारायचे आणि लोकांचा तेजोभंग करायचा हा करंटेपणा आता पुरे झाला. आहेच सचिन तेंडुलकर देव, पण त्याला देव म्हणतात ते फक्त क्रिकेटमधेच, त्याला कुणी थोर समाजसेवक म्हणत नाहीत - जरी तो दोनशे अनाथ मुलांच्या जेवणाखाण्याचा, कपड्यालत्त्याचा, व शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलत असला तरी! सचिनने क्रिकेटमधून जो लोकांना आनंद दिलाय, त्याचं वर्णनही करता येणार नाही, मग त्याची तुलना इतरांशी कशाला? आणि हरखचंद महान माणूस असले तर सचिनमधे उणेपणा कसा काय येतो?
मुळात तुलनाच करु नये, पण तुम्हाला तुलनाच करायची हौस असेल, तर त्याच क्षेत्रातला चमकोगिरी करणारा माणूस घ्या आणि बडवा त्याला खुशाल. त्यासाठी apples and oranges यातला फरक समजण्याची कुवत असावी लागते.
दुसरी गोष्ट, जी मला तितकीच धोकादायक वाटते म्हणजे आंतरजालावर सगळीच माणसं एखादी गोष्ट वाचली की खोलात जाऊन विचार करत नाहीत. अशी चुकीची तूलना वाचून एखाद्या सचिनच्या चाहत्याने किंवा ज्याला कुणाला बडवायला घ्याल त्याच्या चाहत्याने समजा हरखचंद यांच्या सारख्या माणसा बद्दल मनात अढी ठेऊन त्यांच्या कार्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं तर? हा त्यांना मिळू शकणार्या मदतीच्या दृष्टीने नुकसानकारक नव्हे का?
तेव्हा हरखचंद सावला यांच्याबद्दल भरपूर लिहा. आपल्या आजूबाजूला असेच प्रसिद्धीपराङ्मुख व्यक्तिमत्वे तुम्हाला दिसली तर त्यांच्याबद्दलही लिहा. आम्ही नक्की वाचू. पुढे ढकलू (फॉरवर्ड). शक्य झाल्यास मदतही करु. पण अशा समाजसेवकांबद्दल लिहीताना सचिन तेंडुलकर किंवा इतर कुठल्या व्यक्तिविशेषाला कमी लेखणारे संदर्भ वापरून मनाचा कोतेपणा दाखवू नका, आणि इतर कुणी तसं करत असेल तर त्याला रोखा ही कळकळीची विनंती. अक्षरशः वात आलाय अशी आचरट तूलना बघून.
-------------------------------------------------------------------------------------------
तळटीपः हा लेख फक्त अशाच तूलनेसंदर्भात बोलतो. यात इतर विषय घुसवू नयेत.
-------------------------------------------------------------------------------------------
माघ शु १२, शके १९३५
अहमदनगरला कुलकर्णी नावाचा एक
अहमदनगरला कुलकर्णी नावाचा एक कार्यकर्ता आहे ज्याच्या आश्रमात एच आय व्ही पिडीत पुर्वकाळी देहविक्रय करणार्या स्त्रीया आहेत.
हरखचंद सावला यांच्याबद्द्ल
हरखचंद सावला यांच्याबद्द्ल आजुन वाचायला आवडेल.
लेखातील मूळ मुद्याशी सहमत
लेखातील मूळ मुद्याशी सहमत आहे.
शिरीष कणेकरांचं एक वाक्यं
शिरीष कणेकरांचं एक वाक्यं आठवतं,
"एका काळातील ग्रेट हा दुसर्या काळातही ग्रेट म्हणूनच गणला गेला पाहीजे! सचिन तेंडुलकर ग्रेट, सुनिल गावस्कर ग्रेट, विजय मर्चंट ग्रेट आणि ज्याच्याबदल ए जी गार्डनरने लिहीलं होतं, Prince of a small state, but king of a big game तो रणजीतसिंगजीही ग्रेटच!"
त्याच चालीवर,
एका क्षेत्रातील ग्रेट आणि दुसर्या क्षेत्रातील ग्रेट यांची तुलना करु नये! दोघंही आपापल्या क्षेत्रात ग्रेटच असतात!
सचिन तेंडुलकर ग्रेट, अमिताभ बच्चन ग्रेट, आचार्य अत्रे आणि पुलं ग्रेट आणि कॅन्सरग्रस्त रुग्णांना आणि नातेवाईकांना मोफत भोजन देणारे हरखचंद सावलाही ग्रेटच!
लेखातील मूळ मुद्याशी सहमत
लेखातील मूळ मुद्याशी सहमत आहे.>>>> +१००
हरख्चंद सावला ह्यांच्या
हरख्चंद सावला ह्यांच्या धाग्यावर तेंडूलकर ह्यांना आणणे चुकीचेच आहे. हे म्हणजे महात्मा गांधींच्या धाग्यावर एखाद्या सध्याच्या पुढार्याला आणण्यासारखे झाले
सचिन तेंडुलकर देव, पण त्याला देव म्हणतात ते फक्त क्रिकेटमधेच, त्याला कुणी थोर समाजसेवक म्हणत नाहीत - जरी तो दोनशे अनाथ मुलांच्या जेवणाखाण्याचा, कपड्यालत्त्याचा, व शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलत असला तरी!>>>>>> हे तो ज्या संस्थेमार्फत करतो त्या संस्थेची मालकी तुम्हाला माहित आहे का कुणाची आहे ?
सचिनजी पगारेजी, ह्या धाग्याचा
सचिनजी पगारेजी, ह्या धाग्याचा विषय लोक करित असलेली चुकीची तूलना हा आहे. हा लेख केवळ हरखचंद यांच्याबद्दल नाही हे नुकतेच लिहायला वाचायला शिकलेला पहिली-दुसरीतला विद्यार्थीही सांगू शकेल. तेव्हा वर बडबडला आहात तसलं काहीतरी बरळण्याच्या आधी स्वतःचा बुद्ध्यांक वाढवा आणि मग बोला. इतःपर तुमच्या टिप्पण्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष.
लोक करत असलेली तुलना अगदी
लोक करत असलेली तुलना अगदी योग्य वाटते
लेखातील मुळ मुद्दा एकदम पटला.
लेखातील मुळ मुद्दा एकदम पटला. '
अशी तुलना करण खरच पटत नाही.
सचिन बद्द्ल सगळेच
सचिन बद्द्ल सगळेच जाणतात.
हरखचंद सावला यांच्याबद्द्ल माहिती मिळतिय हे योग्य नाही का ?
4वर्षे क्रिकेट खेळुन 200
4वर्षे क्रिकेट खेळुन 200 कसोटी आणी शेकडो दिवसीय सामने खेळुन 100शतके अन 30हजार धावा केल्या म्हणुन सचिन तेँडुलकरला "देवत्व" बहाल करणारे आपल्या देशात करोडो लोक आहेत.पण 27वर्षात दहा बार लाख कँन्सरग्रस्त रुग्नांना अन त्यांच्या नातेवाईकांना दुपारचे भोजन मोफत देणाऱ्या मुंबईच्या हरखचंद सावला यांना मात्र कोणी ओळखतही नाहि..विषेश म्हणजे त्यांचा फोटो मिळवायला मला पुर्ण एक दिवस लागला..>>
हेच तर ह्या देशाचे दुर्दैव ....
मूळ मुद्दा खरंच पटला.
मूळ मुद्दा खरंच पटला.
मूळ मुद्दा खरंच पटला.
मूळ मुद्दा खरंच पटला.
अशा समाजसेवकांचे कार्य
अशा समाजसेवकांचे कार्य निश्चितच पुढे यायला पाहीजे. पण बर्याचदा अशा लोकांच्या पुढे येण्यात राजकारण आडवे येताना दिसते.
<<<<मूळ मुद्दा खरंच
<<<<मूळ मुद्दा खरंच पटला.>>>>> + ११११
तेव्हा हरखचंद सावला
तेव्हा हरखचंद सावला यांच्याबद्दल भरपूर लिहा. आपल्या आजूबाजूला असेच प्रसिद्धीपराङ्मुख व्यक्तिमत्वे तुम्हाला दिसली तर त्यांच्याबद्दलही लिहा. आम्ही नक्की वाचू. पुढे ढकलू (फॉरवर्ड). शक्य झाल्यास मदतही करु.
मग तुम्ही का लिहित नाही हरखचंद सावला यांच्याबद्दल ...
तसे करू जाल तर कळेल की तो लेख अनेकानेक लोकांनी वाचायला हवा असेल तर अमीताभ / लता / सचीन यांसारख्या दिग्गज लोकांबद्दल काहीतरी / काहीही लिहिले की वाचक वर्ग वाढतो. (असे करणे योग्य की अयोग्य हा वेगळा मुद्दा )
अर्थातच सचीन बद्दल कोणीही काहीही म्हटले तरी त्याला उणेपणा कसा काय येऊ शकेल. सुर्यावर थुंकण्यासारखेच ते.... खुश्शाल थुंकू द्यावे. सचीन तो सचीनच
मूळ मुद्दा ही मान्यच पण दृष्टीकोन विशाल करून हा ही एक पैलू असू शकेल की काय ही शक्यता लक्षात घ्यावी असेही वाटते.
हर्पेन >> + १
हर्पेन >> + १
सहमत, सर्वात डोक्यात जाणारी
सहमत,
सर्वात डोक्यात जाणारी तुलना सीमारेषेवर लढणारे भारतीय जवानांशी.
एक ऊदाहरण - देशासाठी नव्हे तर स्वताच्या प्रसिद्धीसाठी आणी विक्रमासाठी एक यंकिश्चित (तो पण ब्रिटीशांचा) खेळ खेळणारा सचिन पैसा कमावतोय म्हणत देशासाठी जीवाची बाजी लावणारे जवान मात्र उपेक्षित.
दुसरे उदाहरण - बॉलीवूड सुपर्रस्टार शाहरूख हा केवळ पडद्यावरचा हिरो पण त्याचे असंख्य चाहते, मात्र सीमेवर लढणारे रीअल हिरो मात्र दुर्लक्षित.
या अश्या उदाहरणांवर मग समोरच्याने आर्गुमेंट केले की त्याच्या देशप्रेमावर शंका.
पण मी नाही घाबरत अश्या शंकाना,
वर जी दोन उदाहरणे दिली आहेत ते दोन्ही माझे लाडके आहेत, आणि त्यांच्यासाठी मी अश्या केसेस मध्ये फेसबूकावर अश्या उदाहरणांवर माझ्या स्टाईलने भांडलोही आहे.
अजून एक प्रकार - मेरी कोमने
अजून एक प्रकार - मेरी कोमने आयुष्यभर बॉक्सिंग खेळून जेवढे पैसे कमावले तेवढे प्रियांका चोप्राने तिचे काम करून कमावले. त्यापुढे उगाच उपहासात्मक प्राऊड टू बी ईंडियन ?? असे लिहिणे..... निरर्थक प्रकार आहे खरे तर हा देखील.
मुद्दा लक्षात आला आणि असे
मुद्दा लक्षात आला आणि असे अनेक वेळा केले जाते हे खरे आहे. पण मला नेहमी असे वाटते की कशाने का होईना त्या इतके चांगले काम करणार्या लोकांची माहिती लोकांना यामुळे होत असेल तर तुलनेने हा प्रॉब्लेम छोटा आहे.अशा पोस्ट वाचताना त्यातला तो "तुम्हाला तो तुमचा हीरो माहीत आहे, पण..." टोन अनेकदा डोक्यात जातो हे मात्र खरे.
पण यात कोणीतरी यांच्या जीवनकथा लोकांसमोर आणणे आवश्यक असते. आता डॉ प्रकाश बाबा आमटे चित्रपटामुळे गेले २-३ महिने त्यांचे नाव चर्चेत आहे. तसेच 'खरेखुरे आयडॉल्स' नावाचे एक पुस्तक आहे त्यातही अशा अनेक लोकांचा उल्लेख आहे.
या फॉर्वर्ड बद्दल माहीती
या फॉर्वर्ड बद्दल माहीती नाही. इथे जो काही कट पेस्टचा भाग आहे त्यात सचिनला दोष दिला जातोय असं न वाटता भारतियांच्या मानसिकतेला दोष दिला जातोय असं वाटलं. सेलेब्रिटीजना महत्व मिळणं हे नैसर्गिक आहे, त्याबद्दल चीड नको. पण चांगले काम पुढे येत नसेल तर ते दुर्दैव आहे. अशा प्रकारचे सेवाभावी काम करणे यासाठी मुळातच रक्तात वेगळ्या प्रकारचा जीन असावा लागतो. पण त्याला सर्वांचा येणकेण प्रकारेन हातभार लावणे गरजेचे आहे.
पण 27वर्षात दहा बार लाख
पण 27वर्षात दहा बार लाख कँन्सरग्रस्त रुग्नांना अन त्यांच्या नातेवाईकांना दुपारचे भोजन मोफत देणाऱ्या मुंबईच्या हरखचंद सावला यांना मात्र कोणी ओळखतही नाहि..विषेश म्हणजे त्यांचा फोटो मिळवायला मला पुर्ण एक दिवस लागला >>>
या कार्याबद्दल सावला यांना सा. नमस्कार !
त्यांच्याबद्दल वाचायला आवडेल.
हरखचंद सावला यांच्या कार्याला
हरखचंद सावला यांच्या कार्याला सलाम