बहुतांश लोक दारावर जो येतो तो भाजीपाला घेतात किंवा तो खरेदी करण्यासाठी बाजारात किंवा मंडईत जावे लागते. बहुतांश वेळा हा भाजीपाला दुय्यम दर्जाचा असतो. कारण प्रथम दर्जाचा माल बाजारसमितीतून इतर राज्यांत किंवा परदेशांत जातो. त्यामुळे जो मिळेल, तोच भाजीपाला बहुतेकांना खावा लागतो. यासाठी माझ्या डोक्यात गेल्या सहा-सात वर्षांपासून शेतकऱ्यांकडून घेऊन ताजा भाजीपाला ग्राहकांना घरपोच देण्याची कल्पना आहे आणि यात जम बसल्यास हाच व्यवसाय पुढे वाढविण्याची इच्छा आहे. सध्या माझ्याकडे अर्धा दिवस वेळ असतो. पुढे मी पूर्णवेळ त्यात उतरण्याचे ठरविले आहे. कारण भविष्यात भाजीपाल्याची मागणी कधीच कमी होणार नाही. नाशिकमध्ये याआधीही एका कंपनीने असा प्रयोग सुरू केला आहे. पण लोकांची वाढती संख्या आणि मागणी पाहता यात खूपच स्कोप असल्यासारखे वाटते. भाजीपाल्याची ऑनलाइन किंवा व्हॉट्स अॅपवर माहिती नोंदवून तो घरपोच पोहचविण्याची योजना आहे. असा व्यवसाय याआधी कुणी केला असल्यास त्यातले फायदे, तोटे, धोके काय आहेत, याविषयी चर्चा करता येईल. तसेच या व्यवसायाला पुढे खरेच किती स्कोप आहे, यात आणखी काय नवीन करता येईल याबद्दलही जाणकारांकडून माहिती मिळू शकेल. कृपया यासंदर्भात मायबोलीकरांनी आपले अनुभव शेअर करावेत, सल्ला द्यावा.
घरपोच भाजीपाला व्यवसाय- सल्ला हवा आहे
Submitted by टोच्या on 28 January, 2015 - 06:17
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घरपोच भाजी पाठविण्यासाठी
घरपोच भाजी पाठविण्यासाठी कामगार मिळवणे अवघड असते.
यूपी,बिहारी लोक त्यांच्या गरीब गावातील अतिशय गरीब माणसं आणून त्यांचा वापर करतात.
अगदी कमी पगार आणि जेवणावर.
मराठी लोकांचे असे contact नसतात.
नशिबाने महाराष्ट्रात अतिशय गरीब लोक कमी आहेत.
ज्ञानेश्वर बोडके यांचे उदाहरण
ज्ञानेश्वर बोडके यांचे उदाहरण प्रसिद्ध आहे. दोन वेळचे अन्न मिळणे मुश्किल ते वर्षिक कोट्यावधीचा सेल हा चमत्कार यांनी इतर शेतकर्यांच्या सहकार्याने घरोघरी भाजी पुरवुन केलेला आहे. त्यामुळे इच्छा असेल तर(च) मार्ग मिळतोच मिळतो.
टोच्या यांनी गेल्या सात वर्षात धाग्याच्या विषयसम्दर्भात काय प्रगती केली ते वाचायला आवडेल.
Pages