..
"आयुष्यातले... पहिलेवहिले !..
हे दोन शब्द ऐकताच किमान अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना आपले पहिले प्रेमच आठवते!
मग मी तरी त्याला अपवाद कसा ठरू !
पहिले प्रेम!.. जे बरेचदा अजाणत्या वयात होते. काही जण त्या वयाला नादान वय म्हणतात. सहजपणे बहकण्याचे वय म्हणतात. बहुधा म्हणूनच त्या प्रेमाला प्रेम न म्हणता आकर्षणाचे नाव दिले जाते. पण मला नाही तसे वाटत. किंबहुना कित्येकदा तेच खरे प्रेम वाटते, कारण ते कोणत्याही अपेक्षांशिवाय केलेले असते. एकदा का अक्कल आली की मग प्रेमही तोलून मापून केले जाते. पण कोवळ्या वयातल्या पहिल्या प्रेमाचे तसे नसते, ते थेट मनाचे ऐकून केले जाते. बहुधा म्हणूनच ते मनात कायम घर करून राहते. ना ते विसरले जाते, ना त्याची जागा दुसरे कोणी घेऊ शकते. तेच ते पहिले प्रेम, जे माझ्या आयुष्यात यायला सतरावे वर्ष उजाडावे लागले.
ज्युनिअर कॉलेजचे पहिले वर्ष!, काही औरच असते. माझेही तसेच होते. शिस्तीच्या बंधनातून मोकाट सुटलेल्या अपेक्षाही गगनावर होत्या. दहावी आणि बारावी हि दोनच वर्षे आयुष्यातील महत्वाची शैक्षणिक वर्षे हे घरच्यांनी ईयत्ता पाचवीपासून मनावर ठाम बिंबवलेले. मग या दोघांमध्ये अकरावीचे वर्ष खास मौजमजा करण्यासाठीच असते असा माझा समज झाल्यास नवल नसावे. पण हाय रे दैवा!, करीअर करीअर म्हणता म्हणता आपण चुकीच्या जागी आलोय हे आठवड्याभरातच समजून चुकले. आमच्या विज्ञानशाखेला सुंदर मुलींची वानवा आणि याउलट कला शाखेत पेटलेला वणवा. मग ते वर्ष वर्गात कमी आणि कॉलेजच्या कॅम्पसमध्येच ऊंडारण्यात जास्त जायचे होते.
पण दुसर्याच आठवड्यात कट्ट्याचा शोध लागला आणि वर्षभरासाठी मेंबरशिप घेऊन टाकली. बाकी दरवर्षी शाळेला सोबती म्हणून येणार्या जूनच्या पावसाने इथे अगोदरच हजेरी लावली होती. त्यामुळे भिजलेल्या कट्ट्यावर बसायची काही सोय नव्हती. पण त्याचीही आपलीच एक मजा होती. काचेच्या ओल्याचिंब बाष्प जमलेल्या ग्लासामधली कटींग म्हणजे कुडकुडलेल्या जीवांमध्ये जान टाकणारे अमृतच जणू! उरलीसुरली ऊब आसपास बागडणार्या हिरवळीला न्याहाळत डोळे शेकून मिळवायची. पण त्याचवेळी आमच्या चेहर्यावरचे भाव मात्र लाकडाच्या ओंडक्यासारखे असायचे.. येस्स!., अक्षर्रशा प्रत्येक फुलाकडे ऑं वासून बघणारे ज्युनिअर कॉलेजचे ठोकळेबाज भुंगे!. नाही म्हणायला प्रत्येकाने आपापल्या नावे एकेक फूल वाटून घेतले होते. याच वाटणीत फूल ना फुलाची पाकळी म्हणत एखादीचे नाव माझ्याशीही जोडले जाईल या अपेक्षेने मी देखील होतो. पण ईथे आपला क्लेम आपणच लावायचा असतो हे मला न उमगल्याने इतरांना चिडवण्यातच धन्यता मानत होतो,. आणि अश्यातच मग एके दिवशी....
ती स्पेशलच होती! लास्ट ईयरची रोज क्वीन. यंदा बी.कॉम. फायनल ईयर, म्हणजे आम्हाला सिनिअर,... नव्हे, तब्बल ५ वर्षे सिनिअर होती. आणि हो, कमालीची सुंदर. त्यामुळे इथे कोणी क्लेम लावायचा प्रश्नच नव्हता. ज्याने धाडस केले असते त्याचे हसे निश्चित होते. तसेच तिच्यात रस घेऊन असलेल्या कोणा सिनिअरने धोपटून काढले असते ते आणखी वेगळेच. पण मग काहीतरी घडले...
पीसीओ!,
बोले तो पब्लिक टेलिफोन..
आमच्या तारा जुळायला यापेक्षा योग्य जागा नसावी.
आमच्या कट्ट्याजवळच्या लाल डब्यावर फोन करायला ती वरचेवर यायची. तेव्हा मोबाईलला नुकतेच मिसरूड फुटले होते. इनकमिंग फ्री झाले असले तरीही आमच्यासारख्या सामान्य घरातील कॉलेजयुवकांना सहज परवडण्यासारखी वस्तू नव्हती. आमच्यासाठी पब्लिक बूथच!, एकेक रुपयांचे कॉईन टाका आणि कॉलटाईम वाढवत न्या.
अशीच ती एके दिवशी पंधरा-वीस मिनिटे बोलल्यानंतर अचानक तिच्या ध्यानात आले की तिच्याजवळची नाणी संपली आहेत, आणि तिला अजून बोलायचे आहे. मदतीसाठी ती इथे तिथे बघू लागताच, तिच्या शेजारच्याच फोनला (उगाचच) चिकटून उभ्या असलेल्या मला ते लगेच ध्यानात आले., कारण माझे अर्धेअधिक लक्ष तिच्यावरच लागले होते. ती कोण्या मित्राशी, बोले तो बॉ’फ्रेंडशी बोलत नसून घरी आईशी बोलतेय याच आनंदात होतो. वेळ न दवडता मी लागलीच हाताला लागेल ते नाणे तिच्या हातात सरकावले. ते देण्याच्या नादात तिच्या हाताचा ओझरता स्पर्शही होऊ नये याची चुटपूट मात्र राहिली. आश्चर्य म्हणजे तिच्या चेहर्यावर देखील तसलेच काहीसे भाव मला दिसले.
पण तसे काही नव्हते. तिच्या चेहर्यावरील चुटपुटीचा उलगडा मला लवकरच झाला... जेव्हा तिने फोन ठेवला.
"अरे एऽऽ, तू मला एकच्या जागी दोन रुपयांचे नाणे दिलेस".. एवढा वेळ ती आईशी बोलत असताना तिचा आवाज मी ऐकत होतो, पण हा मात्र त्यापेक्षा अगदी वेगळाच आणि नाजूक वाटला. कदाचित समकालीन मुलांशी बोलताना ती खास ठेवणीतील आवाज वापरत असावी.
"चालतंय,. दोनच्या नाण्यानेही लागतो फोन" .. मी माझ्या नेहमीच्या आगाऊ आत्मविश्वासात उलटजवाब दिला.
"अरे पण एक रुपया फुकट जातो ना.."
"ईट्स ओके! तुम्ही मला एकच रुपया परत करा.."
येस्स, ‘तुम्ही’ असेच म्हणालो. पाच वर्षे सिनिअर असलेल्या मुलीला पहिल्याच वार्तालापात अरेतुरे करण्याचा प्रश्नच नव्हता.
"म्हणजे.!, तुला माझ्याकडून पैसे हवेयत परत ...(??)"
मी नुसताच आवंढा गिळला. मला यावर काय बोलायचे हे खरेच सुचले नाही. तेव्हा अडीज रुपयाला कटींग चहा मिळायचा, आणि माझे त्याच्याशिवाय चालायचे नाही. माझा आजचा चहा गेला एवढेच मला समजले. आणि ते मी वेड्यासारखे तिला बोलूनही दाखवले. त्याला ती माझा निरागसपणा समजत हसली, आणि म्हणाली, "तुझा एक चहा माझ्यावर उधार राहिला"
बस्स, असे बोलून निघून गेली.
अर्थात ती मिळायची राहिलीच हे न समजण्याईतका मी दूधखुळा नव्हतो. उद्या तिने मला साधी ओळखही दाखवली नसती. पण माझ्या मित्रांना मात्र त्यात ‘चहा डेट’ची ऑफर दिसली, आणि हे रीतसर माझ्या मनात भरवण्यात आले. गंमत म्हणजे हे सारे कळत असूनही मी स्वखुशीने हरभर्याच्या झाडावर चढलो. जरी ती आमच्यापेक्षा ५ वर्षे सिनिअर असली तरी मी तब्येतीने हट्टाकट्टा होतो. कोवळी का असेना मिशी असलेला, दर चार आठवड्यांनी दाढी करणारा आणि एका दमात पन्नास सुर्यनमस्कार मारणारा, असा आमच्या ग्रूपमध्ये मी एकटाच होतो. एखाद्या फुलावर, ते देखील थेट रोज क्वीनवर माझा क्लेम मी हातपाय न झाडताच लागत असेल तर,... तर - ते - चिडवणे - मला हवेच होते. जरी तिचे माझे सूत जुळायची सूतराम शक्यता नसली तरीही या चिडवाचिडवीने माझा भाव नक्कीच वधारणार होता याची कल्पना मला आली होती.
पुढले काही दिवस चित्रमय होते. तिचे रोज कट्ट्यावर येणे, फोन करणे, मित्रांनी मुद्दाम माझे नाव घेत हाका मारणे, तिचे समजल्यासारखे हसणे... या प्रकारांनी बहरत चाललेल्या नात्यात एके दिवशी तिने मला खरेच चहा पाजला. म्हणजे झाले असे, मी माझ्या चहाचे पैसे चुकवायला जाणार तोच फोन करायला आलेल्या तिनेच पुढे होत पैसे दिले. एक रुपयाचा फोन करायला तिने माझे दोन रुपयाचे नाणे वापरले होते आणि बदल्यात अडीज रुपया परत केला होता. माझा आठाण्याचा फायदा झाला होता आणि तिचे दिड रुपयांचे नुकसान!. बस्स, हाच मुद्दा उचलत मी तिला थेट ‘कॉफी विथ लंच डेट’ बद्दल विचारले. आणि तिनेही समोरून इतक्या पटकन होकार दिला कि क्षणभर माझ्याच मनात पाल चुकचुकली की अरे हिने यासाठीच तर नाही ना अडीज रुपये इन्वेस्ट केले....
वरचा जोक होता हां, त्याक्षणी असले काहीही माझ्या मनात आले नव्हते!.
दुसर्याच दिवशी आम्ही जवळच्या सीसीडीमध्ये फेरफटका मारून आलो. कॉफी हि बीअरपेक्षाही महाग असू शकते हा शोध मला लागला. तसेच मुलगी पाच वर्षे सिनिअर असली तरी बिलाची पुर्ण रक्कम मुलालाच द्यावी लागते, भले तो फ्रेशर का असेना, या आधीच माहीत असलेल्या माहितीवरही शिक्कामोर्तब झाले. असो, पण नुसती बिलाची रक्कमच नाही, तर आमचे जे बोलणे झाले त्यातील शब्द न शब्द माझ्या आजही लक्षात आहे. कारण पुढचा आठवडाभर प्रत्येक मित्राला वेगवेगळे गाठून वृत्तांत सांगितल्याने त्याची कित्येक पारायणे झाली होती. ‘साल्या रुनम्याला जॅकपॉट लागला’, हि भावना आणि त्यातील असूयेची छटा मला प्रत्येकवेळी समोरच्याच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होती. याच उन्मादाने मलाही पागल केले होते. वहीवर, बाकावर, गाड्यांच्या काचेवर,.. संधी मिळेल तिथे "आर-के" अशी आमच्या नावांची आद्याक्षरे कोरणे हा माझा छंदच झाला होता. बस्स हातावर गोंदवायचे तेवढे शिल्लक राहिले होते.
पण हे सारे करताना मी एक गोष्ट विसरलो होतो...
जन्मपत्रिकेनुसार माझ्या नावाचे आद्याक्षर ‘ड’ आले होते. पण त्यावरून चांगले नाव न सुचल्याने ‘ऋन्मेष’ हे पर्यायी नाव ठेवण्यात आले होते. त्यामुळे मी छापलेल्या "आर-के" या स्टॅंपला देवाने तथास्तु म्हटले असते तरी त्या ‘के’ चा ‘आर’ म्हणजे ‘राजकुमार’ कोणी दुसराच असणार होता...
.........
.....
ऋन्मेष:
cute गोष्ट.... <<प्रेम,
cute गोष्ट....
<<प्रेम, बीअर आणि मंगळ>>>> हिग- पुस्तक - तलवार वाटतय ... :प
मस्त लिहिलंयस.. मजा आली
मस्त लिहिलंयस.. मजा आली वाचायला.
एका पॅरा. मधे पाच ऐवजी चार वर्षं सिनिअर झालंय..
ऋन्मेष झिला, तुका काय काम
ऋन्मेष झिला, तुका काय काम धन्दो नाय का रे? कित्याक येळ घालवतस हिया?:दिवा:
पत्रिकेत ड अक्षर? कर्क राशीचा आहेस का रे? असल्यास कठिण आहे.:फिदी: नवरा ( गफ्रेचा) आणी मुलगा ( आई-बाबान्चा) दोन्ही नाती यशस्वीरित्या राबवावी/ पेलावी/ साम्भाळावी/ झेपावी लागतील.:डोमा:
तुझ्यासाठी गाणे.
मै इधर जाऊ या उधर जाऊ.
चि. ऋन्मेऽऽष, तुमच्या
चि. ऋन्मेऽऽष,
तुमच्या प्रेमकथेला गोविन्दा व कत्रिना कैफ चा पार्टनर चित्रपट आणि बुलेट मोटर सायकलची फोडणी घालून एक मस्त बुलेटची जाहिरात तयार करूयात.
चि. ऋन्मेऽऽष महाविद्यालयात शिकत आहेत. त्यांच्याच महाविद्यालयात त्यांच्यापेक्षा चार वर्षे मोठी असणारी एक डिट्टो कत्रिना कैफ सारखी दिसणारी अब्जाधीश उद्योगपतीची कन्या देखील शिकत आहेत. ही युवती रोजच लांबलचक लिमोझिन मर्सिडीज वाहनाने महाविद्यालयात येते. तिच्यासोबत नेहमीच डोळ्यांवर काळा गॉगल लावलेले व सुटबुट टाय घातलेले बंदुकधारी अंगरक्षक वावरत.
चि. ऋन्मेऽऽष आपल्या मित्रांबरोबर कट्ट्यावर बसलेले आहेत. येत्या व्हॅलेन्टाईन डेला कोण कुणाला गुलाब देणार यावर चर्चा होतेय. प्रत्येक जण आपण कुणाला गुलाब देणार त्या पात्राचे नाव घेतोय. चि. ऋन्मेऽऽष मात्र एकदम गप्प गप्प. सर्व जण त्यांना विचारतात त्यांचा गुलाब कुणाला? अचानक चि. ऋन्मेऽऽष आपण त्या अब्जाधीश उद्योगपतीच्या कन्येलाच गुलाब देणार. सारे जण हे त्यांना जमणार नाही असे सांगतात.
इतक्यात -
बॅकग्राऊंडला तगडे म्युझिक वाजते आणि पाठोपाठ एक दमदार आवाज (अमिताभ बच्चन / कबीर बेदी / नाना पाटेकर यांच्यापैकी एकाचा) येतो - मिस %^&*को गुलाब का फुल देना यह हर किसी के बस कि बात नही | ठीक वैसेही जैसे नयी रॉयल एन्फिल्ड बुलेट चलाना| सौ / सव्वासौ सीसीकी आठ या दस हॉर्सपॉवरकी बाईक तो कोईभी नौजवान चला सकता है| लेकिन ३५० सीसी, १८ हॉर्सपॉवरका दमदार ईन्जिन और २०० किलोग्रॅम वजन वाली नई बुलेट सिर्फ वही चला सकते है जिनमे है दम|
विवेचन चालु असताना मध्येच काळीकुळकुळीत बुलेटचे सर्व अंगांनी क्लोज्अप्स पडद्यावर दिसतील आणि मध्येच तब्येतीने हट्टाकट्टा, सॅन्डो बनियान घालून एका दमात पन्नास सुर्यनमस्कार मारणारा, कोवळी का असेना मिशी असलेला, दाढी करणारा अशा श्री. ऋन्मेऽऽष (आता चि. नाही बरं का) यांचे क्लोज् अप्स दिसतील.
मग हे सगळं संपलं की पुन्हा आपल्या महाविद्यालयाच्या आवारात आपल्या मित्रांबरोबर घोळक्यात उभे असलेले श्री. ऋन्मेऽऽष दिसतील. सर्वांनी आपापल्या प्रेमपात्रांनी लाल गुलाब देऊन झालेले आहेत. फक्त श्री. ऋन्मेऽऽष हेच एकटे हातात लाल गुलाब धरून वाट पाहताहेत. इतक्यात नायिका - अब्जाधीश उद्योगपतीची कन्या महाविद्यालयातून आपल्या स्ट्रेच लिमो मर्सिडिझ मधून आपल्या अंगरक्षकांसह घरी परतण्याकरिता निघालीय. लगेचच श्री. ऋन्मेऽऽष हे बुलेटवर मोठ्या स्टाईलमध्ये बसलेत, त्यांनी डोक्यावर शिरस्त्राण (पक्षी हेल्मेट) चढविले असून ते शर्टाच्या खिशात लाल गुलाब घेऊन बुलेट वरून नायिकेपाशी जायला निघालेत. मित्र त्यांना असे करण्यापासून परावृत्त करत आहेत परंतु तरीही मोठ्या आत्मविश्वासाने निघाले आहेत. मित्र हताश अवस्थेत हे दृश्य बघत आहेत. श्री. ऋन्मेऽऽष यांनी फटाफट गिअर्स बदलत बुलेटला वेग दिलाय आणि अगदी थोड्याच अंतरावर जाऊन लगेच स्ट्रेच लिमो मर्सिडीजला कट् मारून तिच्यापुढे आपली बुलेट तिरकी उभी करीत साईडस्टँडला लावीत थांबविली आहे आणि डोक्यावरील हेल्मेट काढून ते उजव्या आरशावर डौलात उभे केले आहे. मग तितक्याच हळुवारपणे खिशातील लाल गुलाबाचे फुल काढून हातात घेतले आहे आणि बुलेटवरून सावकाश उतरत मर्सिडीजच्या दिशेने रुबाबात पावले टाकीत आहेत. इकडे मर्सिडीजचे दार त्वरेने उघडत बंदुकधारी व गॉगल सुटबुट टाय धारी अंगरक्षक श्री. ऋन्मेऽऽष यांच्या दिशेने निघाले आहेत. परंतु नायिकेने अंगरक्षकांना अडवित स्वतःच श्री. ऋन्मेऽऽष यांच्यापाशी धाव घेतली असून त्यांचा लाल गुलाब मोठ्या प्रेमाने व लाजेने चूर होत स्वीकारला आहे.
आता बॅकग्राऊंडला एकदम आनंदी संगीत वाजतेय. तिकडे दुरून हा सोहळा याचि देही याचि डोळा पाहणारे मित्रदेखील खुष झालेले आहेत. इतक्यात पाठीमागून पुन्हा एक दमदार आवाज (अमिताभ बच्चन / कबीर बेदी / नाना पाटेकर यांच्यापैकी एकाचा) येतो - पेश है नयी ३५० सीसी १८ हॉर्सपॉवर रॉयल एन्फिल्ड बुलेट. लगेचच श्री. ऋन्मेऽऽष यांची नायिका त्यांच्या गळ्याभोवती हात वेढत त्यांच्याकडे मोठ्या कौतुकाने पाहत कत्रिना कैफ प्रमाणेच आंग्ळाळलेल्या हिंदी सुरात म्हणतेय - "यॅह हॅर किसी कॅ बॅस की बॅत नॅही|"
नायक नायिका हसतमुखाने पडद्यावर दर्शन देत असतानाच जाहिरात समाप्त.
सुहास्य, धन्यवाद प्रेम आले.
सुहास्य, धन्यवाद
प्रेम आले. बीअर आणी मंगळ यायचेय, पुढच्या भागात येतील.
वर्षू नील,
चूक सापडली.. सुधारतो.
जर माझी याद्दाशे मेमरी दगा देत नसेल तर आपला माझ्या धाग्यावरचा पहिलाच प्रतिसाद
पत्रिकेत ड अक्षर? कर्क राशीचा आहेस का रे?
>>>>>>
साष्टांग दंडवत माते. आम्ही स्कूलमध्ये सायन्सवायन्स करत होतो तेव्हा तुम्ही ज्योतिषवोतिष करत होता का.. अगदी अचूक.. मी कर्क राशीचा तर आहेच आहे, सोबत त्यातील सर्व गुणधर्मांचे आदर्श उदाहरण आहे. शप्पथ वेगळा धागा बनेल यावर.
चेतनजी,
भारी
तुमचा प्रतिसाद पाहून मी पुढच्या भागात सत्यकथा न लिहिता फिल्मी ट्रॅकच घुसवू की काय असा मोह होऊ लागलाय
बाकी आता इथे कोणीतरी पुन्हा तुमच्या प्रतिसादाच्या लांबीवर टिप्पणी करणार हे नक्की
बोंबाईलचा इन्कमिंग फ्री होऊ
बोंबाईलचा इन्कमिंग फ्री होऊ लागण्याच्या काळात कालेजांच्या जवळ सीसीडी होते, अन तिथे बियरपेक्षा महाग कॉफी मिळायची, असे ज्ञानामृत पिऊन चिंग झालो.
धन्यवाद!
अडीचला कटिंग? नक्की कधीपासून
अडीचला कटिंग? नक्की कधीपासून कॉलेजात आहेस रे?
.
.
इब्लिस तुम्ही तर कुमार
इब्लिस तुम्ही तर कुमार ऋन्मेशच्या वयाची पार सालं काढलीत.
तुमच्या आणि रमडच्या थियरीनुसार कुमार ऋन्मेश किमान ३० चा तरी असावा, हो की नाही ?
>>दुसर्याच दिवशी आम्ही
>>दुसर्याच दिवशी आम्ही जवळच्या सीसीडीमध्ये फेरफटका मारून आलो.<<
सीसीडी म्हणजे काय रे भाऊ? चार्ज कपल्ड डिवाय्स?
तुमच्या आणि रमडच्या
तुमच्या आणि रमडच्या थियरीनुसार कुमार ऋन्मेश किमान ३० चा तरी असावा, हो की नाही ? >> चाळीस.
सचिन तेंडूलकर आणि फरहान अख्तर बघत वाढलेली पिढी असं नाही लिहीणार. नायतर फार लहान गावातला असावा.
सीसीडी म्हंजे चकन्या चंदूचा
सीसीडी म्हंजे चकन्या चंदूचा ढाबा वगैरे असू शक्तं हा
किंवा चिकण्या चमेलीचा डेरा...
किंवा चिकण्या चमेलीचा डेरा...
बी पन्नाशीचे आहेत म्हणजे
बी पन्नाशीचे आहेत म्हणजे ऋन्मेष निवृत्त तरी असावेत.
बोंबाईलचा इन्कमिंग फ्री होऊ
बोंबाईलचा इन्कमिंग फ्री होऊ लागण्याच्या काळात कालेजांच्या जवळ सीसीडी होते, अन तिथे बियरपेक्षा महाग कॉफी मिळायची, असे ज्ञानामृत पिऊन चिंग झालो.
>>>>
लेख/कथा कशीकाय असेन, हे वरचे वाक्य मात्र खरे आहे. मी आयुष्यात पहिल्यांदा सीसीडीमध्ये गेलो तेव्हा मोबाईलचे इनकमिंग फ्री नुकतेच झाले होते (२००३ जानेवरी). उभ्या आयुष्यात तोवर एक फुल चहा आणि सिगरेट एकट्याने प्यायली नव्हती. दोन-तीन जण पैसे जमा करूनच प्यायलो होतो एक कप आणी एक कांडी. सीसीडीतल्या किंमती बघून डोळेच गरगरले. एका कॉफीच्या किंमतीत विल्सचे २०चे पॅक येते असाही हिशोब झाला (तोवर विल्सचे दहाचे पॅक पण कधी विकत घेतले नव्हते). मग त्यातल्या त्यात स्वस्त म्हणुन ३० रुपयाला एक्स्प्रेसो कॉफी दिसली ती मागवली. आम्हाला भटाकडची एक्स्प्रेसो माहिती: कॉफी त्यात दूध बरेच फेसाळून अगदीच लहर असेल तर स्टीम वगैरे सोडून. इथे च्यामारी एका छोट्या कपात तळाशी काळी ढोण दोन घोट कॉफी आणून दिली गेली. ३० रुपये आणि वर टॅक्सपण दिला होता बहुतेक!
प्रतिसादाण्चे धन्यवाद, आज जरा
प्रतिसादाण्चे धन्यवाद,
आज जरा बिजी असल्याने संबंधितांना उत्तरे पटकन देऊ शकणार नाही, सहकार्य अपेक्षित
सहकार्यच चाललेले आहे गेले
सहकार्यच चाललेले आहे गेले कित्येक महिने
बोंबाईलचा इन्कमिंग फ्री होऊ
बोंबाईलचा इन्कमिंग फ्री होऊ लागण्याच्या काळात कालेजांच्या जवळ सीसीडी होते, अन तिथे बियरपेक्षा महाग कॉफी मिळायची, असे ज्ञानामृत पिऊन चिंग झालो.>>>>>>>>>> +१
आय्यो इब्लि, मी पण हाच विचार केला नी लिहणारच होते.
ऋ, तु अकरावीला असताना सीसीडी त जयचास????? आम्हाला बै हल्लीच १ -२ वर्षापुर्वी सीसीडी कळालय. गेले मात्र १-२ दाच.
वरच्या सीसीडी संबंधित काही
वरच्या सीसीडी संबंधित काही प्रतिसादांवरून सीसीडी म्हणजे लुंग हाँग फाँग रेस्टॉरंटस किंवा अमेरिकन थाय मजेटो सारखे आहे की काय असा भास होतोय. कमॉन गाईज इटस जस्ट सीसीडी!!! २००५-२००६ साल माझे ज्युकॉचे पैले शैक्षणिक वर्ष. तरी वर पदार्थांच्या किंमतीवरून जो उहापोह होतोय त्यासंबंधित सविस्तर भावफलक मी सवडीने प्रकाशित करेनच.
बी पन्नाशीचे आहेत म्हणजे ऋन्मेष निवृत्त तरी असावेत.
>>>>>>
शक्यतो तुलना करताना येथील इतर सभासदांचे नाव टाळा, आपला हेतू तसा नसला तरी मागेही एके ठिकाणी यावरून वाद झाला होता म्हणून हि विनंती.
माझे म्हणाल तर, येस्स.. माझ्या लाईफचा हाच फंडा आहे..
आयुष्य एकतर लहान मुलासारखे उडाणटप्पू जगावे किंवा निवृत्त माणसासारखे स्वच्छंदी
हाईला... आमचं पण जन्म नाव 'ड'
हाईला... आमचं पण जन्म नाव 'ड' वरुनच... कर्केचेच आम्ही पण... जन्म नाव ठेवलेले असले तरी आम्ही ते वापरत नाही... 'डिगंबर' असं ते नाव असंल तर आजकाल्च्या जमान्यात ते वापरणारा विरळाच..नाही का?
डिगंबर पेक्षा डिसेंबर चांगले
डिगंबर पेक्षा डिसेंबर चांगले
बादवे, माझे नाव 'डेमाजी' ठेवण्याचा प्लान होता
लुंग हाँग फाँग रेस्टॉरंटस
लुंग हाँग फाँग रेस्टॉरंटस किंवा अमेरिकन थाय मजेटो >>>>>>>>>>>> बाब्बो!
अरे म्हणजे... तर......
पीसीओवरुन तर आम्ही आमच्या कॉलेजच्या दिवसात बोलायचो. अगदी सुट्टे संपेपर्यंत. मला पीसीओ उल्लेखावरुन वाटलं तु सुद्धा त्याच दरम्यान कॉलेजात असशील मग. म्हणुन सीसीडी तेव्हा नावालाही नव्हती. (म्हणजे असेल पण आम्हाला माहीत नव्हती) म्हणुन मी तसा प्रतिसाद लिहिला.
२००५-२००६ साल माझे ज्युकॉचे पैले शैक्षणिक वर्ष. >>>>>>>> तर मग माझा रीलेव्हन्स अगदीच ....
डेमाजी >>>> छान आहे की.
मस्तय..
मस्तय..
ड वरून किती छान नाव आहे.
ड वरून किती छान नाव आहे. तुमचं नाव देखील डेबुजी ठेवलं असतं तर तुम्ही देखील संतांच्या पंक्तीत जाऊन बसला असतात.
एडीटेड.
एडीटेड.
*
*
सस्मित, बाब्बो वगैरे काही
सस्मित, बाब्बो वगैरे काही नाही, तोंडाला सुचतील ते शब्द घुसवून बनवलेली काल्पनिक नावे आहेत ती .. मुद्दा स्पष्ट करायला..
चेतनजी, ते डेमाजी नाव मी शाळेतल्या मित्रांना सहज सांगितले होते तेव्हा सहा-आठ महिने मला डे मा जी, डेमा जी, डे माजी असे तालासुरात चिडवले जायचे.
मजेदार लिहीले आहे ऋन्मेष, ती
मजेदार लिहीले आहे
ऋन्मेष, ती फोनवर आईशी बोलत असल्याबद्दल वाचून डॉन मधली प्रत्यक्षात पोलिसांशी बोलत असलेली पण अमिताभने पाहिल्यावर "लेकिन ऑण्टी!!!" म्हणून ओरडणारी हेलन आठवली
फारएण्ड, डॉनच्या त्या सीनची
फारएण्ड, डॉनच्या त्या सीनची पर्यायाने चित्रपटाची बरीच पारायणे झालेली दिसताहेत .. मागेही त्याचा एक डायलॉग मारला होता .. पण इथे मात्र ती आईशीच बोलत होती, माझ्याशी कश्याला लपवेल
लव कर मुद्द्यावर ये रे
लव कर मुद्द्यावर ये रे लेखकबाबा
पहिलेवहिले आणि बिअर बद्दल कळाले,
मंगळाचे काय ?
Pages