Submitted by सुमुक्ता on 23 January, 2015 - 05:51
कधी स्वच्छंद नदीसारखे
कधी गंभीर डोहासारखे
कधी पारदर्शी निर्झरासारखे
कधी अथांग सागरासारखे
कधी नवीन पालवीसारखे
कधी शिशिरातील वृक्षांसारखे
कधी तेजस्वी सूर्यासारखे
कधी मिट्ट काळोखासारखे
कधी वाळूच्या कणाएवढे
कधी अनंत आकाशाएवढे
कधी मायेची उब देणारे
कधी आधारस्तंभासारखे
कधी अगदी माझ्यासारखे
कधी मलाच परके करणारे
कधी मनात गर्दी करणारे
कधी मला एकटे सोडणारे
कधी शब्दांनी अलंकारिलेले
कधी निराकार जाणीवेसारखे
कधी होतील अर्पण समिधेसारखे
तादात्म्य ईश्वराशी पावणारे?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Last couplet is noteworthy. I
Last couplet is noteworthy. I mean shewatchi dwipadi bhawalee.
धन्यवाद बाळ पाटील!!
धन्यवाद बाळ पाटील!!