आज कोणी एक मायबोली सदस्य स्वतःचे सदस्यत्व घालवून बसला. प्रशासनाने हा निर्णय घेताना त्या सदस्याचा कालावधी, त्या कालावधीत त्याने मन लावून केलेले 'अवतारकार्य' व मायबोलीच्या उमद्या प्रवाहाला सोडून निव्वळ विशिष्ट सामाजीक / राजकीय भूमिकेचा प्रसार करण्याची मानसिकता बहुधा मापली.
त्या सदस्याने ही गोष्ट त्याच्या स्वतःच्या मनाला तितकी लावून घेतली नसेलही, कारण त्याला त्याचा अंत कदाचित माहीत असावा. किंबहुना, काही काळ स्वतःच्या भूमिकेचा दबदबा निर्माण करण्याच्या हेतूनेच त्याने सदस्यत्व घेतले असावे. कदाचित, तो येथल्याच कोणाचा आणखीन एक आय डी असेलही!
त्या सदस्याचे सदस्यत्व नष्ट झाल्यावर काही इतरांकडून झालेला उत्सव शिसारी आणणारा होता.
पण मायबोली म्हणजे फक्त राजकीय चर्चा किंवा राजकीय हेतूने आरंभलेल्या चर्चा नाहीत.
येथे अंगभूत कलेला वावही आहे आणि व्यक्तीस्वातंत्र्यही आहे.
मी मायबोलीवर आलो त्यापूर्वी केव्हापासूनच आणि आजतागायतही येथे अनेक प्रकारचे धागे निर्माण होतात.
'मायबोली हे एक उथळ संकेतस्थळ आहे' असे काही इतर स्थळांच्या चालकांकडून ऐकलेले वाक्य मी तिथल्यातिथेच परतवून लावलेले होते. ह्याचे कारण माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार मायबोली तुम्हाला व्यक्त व्हायला कधीही आडकाठी करत नाही. कारवाई झालीच तर ती निव्वळ विशिष्ट हेतूने कार्यरत असलेल्या सदस्यांवर, तेही, जर त्यांचे हेतू निव्वळ वादोत्पादक किंवा अशोभनीय असले तर.
प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेबाबत काही बोलण्याचा ना कोणाला नैतिक अधिकार आहे ना कोणाची ती योग्यता! पण आपण स्वत: 'तूर्त चालू असलेल्या राजकीय उखाळ्यापाखाळ्यांचे अस्तित्त्व' दिसत असूनही मायबोलीवर येणे किती एन्जॉय करतो व का करतो ते कृपया लिहावेत अशी विनंती!
अत्यंत परस्परविरोधी मतांचे लोक येथे येऊन नांदत राहतात, नांदू शकतात. मायबोली राजकीय धाग्यांपलीकडे खूप काही आहे. असे तुम्हाला वाटते का? की आता येथे फक्त तेच तेच चाललेलेल असते असे वाटते?
नम्रपणे मान्य करतो की हा प्रश्न विचारण्याची योग्यता माझी नाही कारण माझ्यापेक्षा दहा, दहा वर्षे आधीपासून येथे असणारे कित्येक सदस्य आहेत. पण तेही इथे अजूनही येतातच.
खूप काही बिनसल्यासारखे आपल्याला तरी वाटत नाही राव! अजूनही अनेक इतर गोष्टींचा आनंद घेता येतो.
कृपया, तुमची उत्स्फुर्त मते येथे द्यावीत अशी विनंती! ही विनंती करतानाही मला प्रशासनाने दिलेल्या स्वातंत्र्याचाच मी एक प्रकारे वापर करत आहे ह्याची नम्र जाणीव आहे. पण मत द्यायचे नाही असे कृपया करू नका. जे काय असेल ते मत द्या!
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
बेफिजी, मी स्वतः, हे मला का
बेफिजी, मी स्वतः, हे मला का आवडतात ह्या धाग्यावरती नमुद केले होते की एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकुन भांडणारे अनेक मायबोलीकर(पण वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी न करणारे) असंच काहीतरी.
राजकीय विरोध, कित्येंक गोष्टींवरील आपआपली मतप्रवाहे, प्रगल्भ चर्चा, नविन लेखकांना प्रोत्साहन, थोडीशी मस्करी, एखाद्या सदस्याला मिळणारी मौलिक मदत, अत्यंत गरजेच्या क्षणी उपलब्ध होणारे जिव्हाळ्याचे सल्ले आणि काय सांगु. मला मायबोली त्यामुळे आवडते हे संकेतस्थळ खरंच खुप उपयुक्त आहे त्याच्या अनुभव मला आजच आला. मी ठाण्यातील खादाडी ह्या बाफवर माझी एक पोस्ट टाकली लगेच मला दोन सदस्यांनी मार्गदर्शन केले. अजुन बरंच काही लिहू शकतो पण तुर्तास एवढचं.
आपण इथे असण्याचे कारण ?
आपण इथे असण्याचे कारण ? एकच.हम दिल दे चुके सनम ! भले माझं येणं कमीजास्त होवो, मी इथलीच
कोण ? नाव महत्वाचं नसावं, तरी
कोण ?
नाव महत्वाचं नसावं, तरी पण.
आपण इथे असण्याची कारणे >>>>>>
आपण इथे असण्याची कारणे >>>>>>
मी इथे असण्याचे कारण नक्की सांगता येणार नाही, कारण मी वाट चुकलेल्या वाटसरू सारखा इथे आलो.
पण माझी एक खासियत आहे, मी जिथे जातो तिथलाच होऊन राहतो.
खास करून सोशलसाईटस, ज्याला काही लोक उगाच आभासी जग म्हणून बदनाम करतात तिथे तर जरा जास्तच रमतो.
तुर्तास शिर्षक वाचून इतकेच सुचले, बाकी लेख सावकाशीने वाचून त्यावर (काही लिहावेसे वाटल्यास) उद्या सविस्तर !
आपण इथे असण्याची
आपण इथे असण्याची कारणे>>>>>
मी येथे येण्याच कारण फक्त आपणच आहात श्री बेफिकीर महाराज …। तरी एकदा आपल्या भक्तावर किरिपा करा कि राव…।
एका वाक्यात सांगू? काही चांगल
एका वाक्यात सांगू?
काही चांगल वाचण्यासाठी आणि जमेल तेवढं मोडकं-तोडकं खरडण्यासाठी.
एक अगदी प्रामाणिक शंका...
एक अगदी प्रामाणिक शंका... अचूक उत्तर तुमच्याकडे असेलच याची खात्री नाही, तरीही -
देवपूरकरांचा (शेवटचा) आय डी का मेला?
या धाग्यावर हा प्रश्न विचारण्याचे कारण असे की ज्यावेळी त्यांचा आय डी गेला आणि त्यांच्या रचनांवर अगदी हीन आणि व्यक्तिगत टीका करणार्यांवर काहीही कारवाई झाली नाही त्यावेळी हाच विचार चमकून गेला होता की 'मी इथे का आहे?'
मी ही मानेजींच्या मतांशी
मी ही मानेजींच्या मतांशी पुष्कळ सहमत आहे.
जर आपण कुठल्याही वादात पडलो नाही तर हे अतिशय उपयुक्त संकेतस्थळ आहे. अनेक सुंदर कथा, अनेक सुंदर लेख, आणि उपयोगी पडणारे बरेच काही इथे मला मिळाले.
मतं जर मुक्तपणाने जाहीर करायचीच असतील तर प्रतिसाद झेलायचीही ताकद हवी हे या संकेतस्थळावर स्पष्ट कळले. हा फोरम उथळ नाही पण लोक स्वत:चे अगोचर प्रतिसाद देऊन त्यास उथळ बनवतात. तसेच स्वत:च्या अतिशय परिपक्व विचाराना मांडून अनेकजण नकळत खूप काही शिकवून ही जातात. एवढेच नाही तर अशा अनुभवी सृजनशील लोकांचे अनेक धाग्यांवरील मौन (प्रतिसाद न देणे) सुद्धा खूप काही शिकवते.
मायबोली हे एक उथळ संकेतस्थळ
मायबोली हे एक उथळ संकेतस्थळ आहे
त्यांनी नक्कीच फक्त माझे लिखाण वाचले असावे! इतरांचेच काय, इथल्या काही प्रतिष्ठित, खरोखरच हुषार लोकांचेहि अग्गदी तस्सेच मत आहे.
जेंव्हा मी मायबोलीवर आलो, तेंव्हा काँप्युटरवर मराठी लिहीता, वाचता येते याचा फार आनंद झाला. म्हणून आलो.
सर्वच प्रतिष्ठित, खरोखरच हुषार असलेल्या सगळ्यांचेच अग्गदी तस्सेच मत झाले नाही, भरपूर गप्पा केल्या, अनेक लोक मित्र झाले, नंतर कित्येकांना प्रत्यक्ष भेटून मैत्री दृढ झाली. अगदी ऑस्ट्रेलिया, मुंबई, पुणे, ठाणे येथील सर्व लोक भेटले. बागराज्यातले तर अनेक जण वारंवार भेटले.
माझ्या अनुभवावरून मी जे लिहीतो ते येथील तरुण, वेगळे अनुभव असलेल्यांना पटणे कठीण. म्हणून सहसा काही लिहीले तरी ते इतरांना पटावे अशी अपेक्षाच नाही. शिवाय कुणि शिव्या दिल्या, नावे ठेवली तरी ती सगळी, काँप्युटरमधेच रहातात, तिकडे लक्ष द्यायचे किंवा ते गंभीरपणे घेण्याचे कारण नाही. तसे तर अनेकदा मला येथून हाकलून द्या अशीहि अनेकांनी मागणी केली होती, पण अजून मी इथे मूळ नावानेच जिवंत आहे.
एकदा "झिंदगी ख्वाब है, ख्वाबमे झूठ क्या और सच भी क्या? सब झूठ है! " असे ऋषितुल्य मोतीलाल यांचे सिनेमा उपनिषदातील तत्वज्ञान कळले पटले की कोण झक्की नि कुणाला, कसल्या शिव्या? सगळी नुसती गंमत! आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे.
तसेहि, इतर अनेक गोष्टी आयुष्यात आहेत, जिथे मन जास्त रमते.
म्हणून मी इथे येतो.
सध्या मायबोलीवर येण्याचे
सध्या मायबोलीवर येण्याचे मुख्य कारण मराठीतून संवाद साधण्याची गरज भागवणे
अर्थात हे दुधाची तहान ताकावर भागवणे आहे. कारण मराठीतून बोलून जितकं समाधान मिळतं तितकं फक्त लिहून/वाचून मिळतंच असं नाही.
दुसरं कारण जे इथे काही काळ घालवल्यावर समजलं आहे ते म्हणजे उपयुक्तता! एकाच विषयावरची वेगवेगळी मतं वाचायला मिळतात. शिवाय अनेक गोष्टींची माहिती मिळते आणि काही सकस साहित्य वाचायला मिळतं.
तिसरं कारण इथले सदस्य! जर मी मायबोलीची वाचक नसते तर केवळ इंटरनेटवरून (प्रत्यक्ष न भेटता) आपली अनोळखी व्यक्तींशी इतकी छान ओळख होऊ शकते ह्यावर माझा विश्वास बसला नसता! आपल्या ज्ञानाची, अनुभवांची आणि विचारांची मुक्तपणे देवाणघेवाण करणारे इथले सदस्य हे मायबोलीचे स्टार्स आहेत!
माझ्यासाठी कालांतराने पहिले कारण नाहीसे होणार आहे त्यावेळी बाकीची दोन कारणे मला मायबोलीवर येत राहण्यास भाग पाडतील असं वाटत
"मायबोली" ने मला कुटुंब
"मायबोली" ने मला कुटुंब दिले....डझनावारी भाचे आणि तितक्याच प्रेमळ मायाळू भाच्या दिल्या....आज "आम्ही कोल्हापुरी" या धाग्याच्या निमित्ताने एकत्र आलेले सदस्य म्हणजे एका घरातील एकाच अंगणात जमून सुखदु:खाच्या गोष्टी बोलत असतो...लिहिण्यातून तसेच फोनवरून आणि प्रत्यक्ष समोरासमोर भेटून असे काही दृढ नाते प्रस्थापित करण्यात यशस्वी झालो आहे की आज मायबोलीशिवाय आमचे पानही हलू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.....आणि ही माया मला मायबोलीने दिली असल्याने ती टिकविण्यासाठी आम्ही इथे येत असतो, येत राहीन.
ओळखी दाट होण्याचे कारण अर्थातच शब्दांचा संवादासाठी अतिशय संयतरित्या केलेला वापर. भाषा जितकी मुलायमपणे वापरता येते तितकीच ती जहरसुद्धा फैलावू शकते याचे अनुभव मी वेळोवेळी घेतले असल्याने त्याचे दुष्परिणाम काय होतात त्याची जाण मनी कायम होती. वयाने, अनुभवाने, भटकंतीने मी ज्येष्ठ असल्याने कोल्हापुरी धाग्यावर एकत्र आलेल्यांना सर्वप्रथम मी "मामा" ह्या नात्यानेच ओळख करून दिली आणि जसजसे दिवस उलटू लागले तसतशा तिथे येणार्या सदस्यांची ओळख होत गेली आणि त्यानाही कोल्हापूरच्या मामाच्या संगतीने शाब्दिक देवाणघेवाण (जी घरचीच होती) आनंददायी शाबीत होत गेली. मग दुसरे आणखीन काय हवे असते माणसाला ?
वाचन, संगीत, क्रिडा, आरोग्य, मुलेमुली, शिक्षण, इतिहास, समाज, कुटुंब अशा विषयांवर अथक अगणित बोलता येते आम्हा सर्वांना. विषयाची कमतरता मी कधीच भासू दिलेली नाही. अगदी कटाक्षाने काही गोष्टी संभाषणात तसेच लिखाणात येऊ दिलेल्या नाहीत....त्यात प्रामुख्याने (१) राजकारण, (२) धर्म-जात-दर्जा-उच्चनीचता, मिळकत....या विषयांवरून "मायबोली" ची बोली किती दाहक आणि सर्वसामान्य पातळी सोडणारी होऊ शकते हे आम्ही सर्वांनी अत्यंत व्यथीत मनाने पाहिले आहे, वाचले आहे. मायबोली प्रशासक समिती सदस्यही अशा भाषेपुढे हतबल होत असतील तर आमच्यासारख्या किरकोळांची काय कथा ? बरं, यातून नेमकी काय कमाई होत असेल ? द्वेषाची विषवल्ली फोफावण्यापल्याड त्यातून आणखीन काय उपज होत असते ? संवादाच्या सौजन्याच्या सार्या वाटा बंद झाल्याचे अनुभवायला येऊनसुद्धा कित्येक धाग्यातून वेळोवेळी भाषेचा डौल सांभाळला जात नाही, हे खरे दुखणे आहे. अशावेळी शहाणपणाचा निर्णय घेणे म्हणजे त्या मार्गावर आपण न जाणे...तितपतच आम्ही करू शकतो.....माझ्यापुरते मी जाणले आहे की मला विरोध करता येत नाही. त्यामुळे जमेल आणि झेपेल इथपर्यंतच प्रतिसादाद्वारे आपले मत द्यायचे...ज्याक्षणी समजेल की आता आपली मर्यादा संपुष्टात आली, त्यावेळी शांतपणे तिथे रामराम करणे. मन शांत ठेवण्यासाठी (या वयात) तसे करणे योग्य.
मायबोलीवर असे कित्येक लेखक/लेखिका आजही कार्यरत आहेत की ज्यांचे लेखन वाचायला जाणे हा अतीव आनंदाचा भाग असतो. पण कुठून तरी कुणीतरी त्या ठिकाणी प्रतिसादाच्या रुपाने इंगळी डसल्यासारखी भाषा वापरतो. तसे झाले म्हणजे मग त्या धाग्याला जे वळण लागते ते वाचायला नकोसे होते....हे खेदजनक आहे.
अर्थात सारेच काही बिनसले आहे असे मानण्याचे कारण नाही. चांगल्या विषयांना आजही स्वागताचे प्रेम मिळते. लेखकाला प्रोत्साहन दिले जाते. सदस्य प्रतिसाद देण्यास उत्सुक असतात. नवनवीन लेखकांना उभारी मिळेल असे ज्येष्ठांकडून मार्गदर्शन मिळते....हे चित्रही आशादायक आहे.....हे सारे पाहणे, वाचणे, अनुभवणे...यासाठी मी नित्यक्रमाने "मायबोली" वर हजर असतो....हजर असेन....आनंदाचा हा झरा आहे...अखंडपणे वाहता राहू दे.
>>>या धाग्यावर हा प्रश्न
>>>या धाग्यावर हा प्रश्न विचारण्याचे कारण असे की ज्यावेळी त्यांचा आय डी गेला आणि त्यांच्या रचनांवर अगदी हीन आणि व्यक्तिगत टीका करणार्यांवर काहीही कारवाई झाली नाही त्यावेळी हाच विचार चमकून गेला होता की 'मी इथे का आहे?'<<<
अत्यंत, अत्यंत, अत्यंत चुकीचा समज कोरा!
शक्य तितक्या लवकर हा चुकीचा पूर्वग्रह बदललात तर बरे पडेल. देवपूरकरांनी येथील गझलकारांना सळो की पळो करून सोडले होते. एखाद्या नव्हे, येथील कोणत्याही, रीपीट, कोणत्याही गझलकाराला विचारा.
अत्यंत चुकीची तुलना!
जर बाकीचे गझलकार तसे असते तर आज गझलप्रांत इतका शांत नसताच. ह्याउप्पर ह्या विषयावर बोलत नाही कारण धागा भलतीकडेच जाईल. पण तुमच्या मनात ही असली काहीच्या काहीच्या काही तुलना असली तर तो एक महान विनोद आहे.
एक से एक उत्तम
एक से एक उत्तम प्रतिसाद!
सर्वांचे आभार!
कृष्णतारा - कसचं कसचं!
मामाश्री +१००१
मामाश्री +१००१
ईमेलमधुन आलेल्या लिंकवरुन
ईमेलमधुन आलेल्या लिंकवरुन मायबोलीवर आले ते मस्त लेखन, कथा नि विचार वाचण्यासाठीच! वेगवेगळ्या वैचारिक वादविवादातुन बरीच माहिती मिळाली.. हळुहळु मित्रमैत्रिणी मिळाले नि वैयक्तिक परिचय झाला .. दोन्हीवेळच्या उसगाव ट्रिपमधे मराठीची गरज मायबोलीनेच भागवली .. बागराज्यात तर गटगही झालं..
बाकी मामांच्या प्रतिसादाला +१
पण आजकाल राजकीय गोष्टींवरुन चिखलफेक ज्या-त्या धाग्यावर सुरु होतोय.. कितीही इग्नोर केलं तरी त्याचा कंटाळा आलाय..
मी राजेश्वर (भाऊ) याचे
मी राजेश्वर (भाऊ) याचे सांगण्यावरुन आलो आणि रमत गेलो. कित्येक मित्र, मैत्रीणी मिळाल्यात याचा आनंद आहे. काहीशा वादविवादामुळे ते दुरावले असले तरी अजुनही मैत्रीला पुरक असल्याने येतोच, शिवाय वाचन चालुच असते.
मायबोली 'आपली' वाटते. चांगलं
मायबोली 'आपली' वाटते. चांगलं वाईट जे काय आहे ते सगळं आपलंच आहे. सोडून जाणार कुठे?
बेफींच्या कथेच्या लिंकवरुन
बेफींच्या कथेच्या लिंकवरुन माबोवर प्रवेश झाला.
ते मी इथलीच झाले.
मायबोली कधीच उथळ वाटली नाही. अगदी डु आयड्याच्या वादावादीमुळे, राज्कीय मतमतांतरे, चिखलफेक, काही आगाउ आयडी देत अस्लेल्या आगाउ वैयक्तिक प्रतिसादामुळे सुद्धा माबो कधीच उथळ किंवा कंटाळ्वाणी वाटली नाही.
जिथे, ज्यात जीव रमतो ते वाचलं की झालं. न आवडणार्या (उदा. राजकारण) गोष्टीत लक्ष घालुन, वाचुन इतरांच्या वादावादीचा त्रास करुन घेण्याची गरजच वाटली नाही.
माबोवरच्या काही वर्षांच्या वावरावरुन मी ही बर्याच सदस्यांना ओळखु लागलेय. प्रत्यक्ष नाही. (माण्सं जोडणे, लग्गेच मैत्री करणे, नंबर एक्ष्चेंज करणे, भेटणे ह्या गोष्टी काही माझ्याच्याने लग्गेच होत नाहीत.)
काही खरंच अतिशय सम्जुतदार, काही उगीच स्वतःला शहाणे समजणारे, काही उगीच अॅटीटुड वाले. आपल्याला सगळ्यातलं सगळं समजत असेही काही, काही विनाकारण खवचट प्रतिसाद देणारे, काही अगदीच बालिश बुद्दीने (म्हणजे तसे नसले तरी दाखवतात ब्वा तसे :-)) वाद घालणारे, काही खरंच मदत करणारे (खरेतर मदत करणारेच जास्त) , तर ह्या सगळ्याला व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणुन पुढे व्हावे झालं.
इथे मी माझ्या मातृभाषेसाठी येते, माझा जीव रमवायला येते, अनेक विषयाबद्दल नवीनच कळतं, माहीतीत, ज्ञानात भर पडते, अगदी क्लास कथा कादंबर्या, कविता, गझला(जरी कळत नसल्या तरी त्या क्लास आहेत हे मा वै म :-)) वाचायला मिळतात, अतिशय सुंदर चर्चा वाचायला मिळतात. एक प्रकारे सामाजिक चर्चा वाचुन सामाजिक भान येतं असं म्हणल्यास वावगं ठरु नये.
मला मायबोली आवडते. माबोचं व्यसन आहे खरंतर. बरंच लिहावसं वाटतयं, लिहायचंही आहे. पण मला तितकं चांगल्या प्रकारे लिहिता येत नाही, एक्ष्प्रेस्स होता येत नाही म्हणुन बास करते.
मायबोली 'आपली' वाटते. चांगलं
मायबोली 'आपली' वाटते. चांगलं वाईट जे काय आहे ते सगळं आपलंच आहे. सोडून जाणार कुठे? >>>आशुडी +१
मी ईथे का आहे याचे नक्की कारण
मी ईथे का आहे याचे नक्की कारण माहित नाही, पण जवळ जवळ वर्ष झाले मायबोलीवरील लेख वाचत आहे आणि बहुतेक विचार मला माझ्यासारखेच वाटतात त्यामुळे कदाचीत....
मी इथे आले ते काही नविन
मी इथे आले ते काही नविन गोष्टी शिकण्यासाठी.. इथे फक्त बघायला आले, आणि इथलीच झाले.. मराठी टाईपिंग मुळे अजुन नीट व्यक्त होता येत नसले तरी आता मायबोली शिवाय एक दिवससुद्धा जात नाही..
मी इथे आहे ते १. बेफीच्या कथा
मी इथे आहे ते
१. बेफीच्या कथा वाचण्यासाठी
२. विशालच्या थरारक गोष्टी अनुभवण्यासाठी
३. नंदिनी यांचे लेख वाचण्यासाठी
४. मामी यांचे धागे वाचण्यासाठी
५. जुने धागे परत परत वाचण्यासाठी
६. काही धमाल धागे वाचून निखळ हसण्याचा आनंद लुटण्यासाठी
७. सामाजिक चर्चा वाचून थोडे फार अशी माहिती कळते ज्याबद्दल मी अनभिज्ञ असतो (उदा. अरविंद केजरीवाल आणी आप) त्यामुळे आपसूक स्वतःला अपडेट ठेवण्यास मदत होते.
आणी लास्ट बट नॉट लिस्ट
८. अनेक लेखकांचे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी
मायबोलीच्या काही सदस्याशी फोनवर बोलण्याची संधी मिळाली. त्यानी ज्या प्रकारे आधार दिला व मदत केली त्यामुळे एक मानसिक आधार मिळाला.
पण आताशा काही गोष्टी खटकायला लागल्या आहेत.
जसे खवचटपणे दिले गेलेले प्रतिसाद, केवळ करण्यासाठी केला गेलेला विरोध, कंपुगिरी, वगैरे.
मला असे वाटते की प्रत्येक जण तुमच्या मताशी असे नाही, अरे पण सोडून द्या न राव.
पण तरीही काही झाले तरी मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मायबोली वर येताच जाईन.
शुद्धलेखनात काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व.
एक मायबोलीकर
एका वाक्यात सांगू? काही चांगल
एका वाक्यात सांगू? काही चांगल वाचण्यासाठी आणि जमेल तेवढं मोडकं-तोडकं खरडण्यासाठी.>>>>१००% सहमत
केवळ आणि केवळ वाचण्यासाठी .......इथे जे काही वाचायला मिळते ते खरच कुठेच मिळू शकत नाही. पुस्तकी वाचन हे माझे आवडीचे पण या साईटवर आल्यापासून केवळ मनोरंजन नाही तर मार्गदर्शन मिळाले आहे. माझ्या ओळखीतले जितके ऑफिसे कलीग आहेत ते सर्व मायबोलीचे वाचक आहेत. मी मात्र थोडे पुढे होवून सभासदत्व मिळवले.
पण आताशा काही गोष्टी खटकायला लागल्या आहेत.
जसे खवचटपणे दिले गेलेले प्रतिसाद, केवळ करण्यासाठी केला गेलेला विरोध, कंपुगिरी, वगैरे. >>>> याही गोष्टीशी सहमत. जरी नवीन असले तरी नियमित वाचक असल्याने मलाही हे प्रकर्षाने जाणवू लागले आहे. बाकी राग आला असेल तर क्षमस्व !!!
सस्मित +१ मायबोलीने मला काही
सस्मित +१

मायबोलीने मला काही अशी माणसांशी ओळख करून दिलीये की त्यांकरिता मी मायबोलीची जन्मभर ऋणी आहे
काय बेफिकिर ..... तुम्च्या
काय बेफिकिर .....
तुम्च्या नावाचा जप करून बाकी देव प्रसन्न झाले …. पण तुम्ही काय आशीर्वाद देईनात बुवा ….
आपण इथे असण्याची कारणे>> माझं
आपण इथे असण्याची कारणे>> माझं फक्त एकच कारण आहे लिखाण वाचण्यासाठी.
बेफिकीर, उत्तर मिळाले,
बेफिकीर, उत्तर मिळाले, धन्यवाद.
गैरसमजाबद्दल म्हणाल, तर मी कुठलाच समज करून घेत नाही. शंका असेल तिथे प्रश्न विचारणे, आणि इतर वेळेस शांतपणे दर्जेदार (आणि/अथवा मनोरंजक) लिखाण वाचणे, असाच खाक्या ठेवण्याचा प्रयत्न असतो.
पुनःश्च, संयमाने आणि वेळ काढून उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.
अवांतर : शक्य तितक्या लवकर हा
अवांतर :
शक्य तितक्या लवकर हा चुकीचा पूर्वग्रह बदललात तर बरे पडेल. देवपूरकरांनी येथील गझलकारांना सळो की पळो करून सोडले होते. एखाद्या नव्हे, येथील कोणत्याही, रीपीट, कोणत्याही गझलकाराला विचारा.
>>
फक्त गझलकारांनाच?
पूनम च्या क्लिक या कथेची लिंक
पूनम च्या क्लिक या कथेची लिंक एकाने पाठवली आणि माझा मायबोलीप्रवेश झाला. तेव्हापासून मी माबो ची फॅन आहे. मी इथे फक्त वाचनमात्र. पण रोज इथे आल्याशिवाय चैन पडत नाही.
एक कथा आठवली, एक माणूस असतो
एक कथा आठवली,
एक माणूस असतो ज्याला कामाच्या ठिकाणी मनासारखं बोलायला (व्यक्त व्हायला) मिळत नाही म्हणून अस्वस्थ असतो. सहकार्यांशी बोलायचा प्रयत्न करतो पण जे ते आपले म्हणने रेटत असतात. त्यात याला बोलायचे ते राहूनच जाते. मग घरी जाताना सहप्रवाश्यांसोबत बोलण्याचा प्रयत्न करतो पण ट्यूनिंग जमत नाही. घरी गेल्यावर बायकोशी बोलावं म्हणतो तर तीच आपलं दु:ख सांगत बसते. म्हणजे याला जे बोलायचे आहे ते राहूनच जाते. पुढचे सगळे व्यक्त होतात असे वाटले तरी त्या प्रक्रियेमुळे ते मुक्त होतात हे एक सत्य आहे. हा मात्र व्यक्त न होता आल्यामुळे अस्वस्थ होत जातो. सगळी लोकं येऊन यालाच सांगत असतात पण याला जे बोलायचे आहे/सांगायचे आहे ते ऐकायला कोणीच मिळत नाही.
मग जेवण वगैरे झाल्यावर हा घराच्या बाहेर पडतो, आणि रस्त्यानी चालताना एक घोडा बांधलेला दिसतो. हा जाऊन चक्क त्या घोड्याशी गप्पा मारायला सुरुवात करतो. जे जे बोलायचे व सांगायचे होते ते घोड्याला सांगतो अशी ती कथा होती. कुठे वाचली आता आठवत नाही पण तेंव्हा प्रचंड आवडली होती. कथेचा सार हा होता की व्यक्त होणे किती गरजेचे असते वगैरे.
मायबोली नावाची वेबसाईट त्या कथेतील घोडा आहे!
-----
ही कथा कुणाकडे असल्यास लिंका द्याल का, परत एकदा वाचायला आवडेल.
Pages