नरेश ने सांगितला प्रेमाचे प्रपोजल विचारल्यानंतर संगीता तर बहरुनच गेली होती , तिच्या मनात प्रेमाचे अंकुर फुटू लागले होते , त्या क्षणापासूनच संगीता फक्त आणि फक्त नरेशचाच विचार करू लागली होती , तिच्या मनात प्रेम रुपी फुलपाखरू आनंदाने दवडत होते , ती राहून राहून नरेश बद्दलच विचार करत होती , तिला रात्री जेवण पण जाईना का रात्रभर झोप पण आली नाही , सकाळी आनंदी मनाने ती देवाला जाऊन आली आणि पक्का निर्णय घेतला होता कि आपण नरेश ला प्रेमाचा होकार द्यायचा . सांगितला असा प्रस्ताव पहिल्यांदाच आला होता , त्यामुळे हि कदाचित ती भारावून गेली होती , शाळेला जाताना हि जास्त कोणाशी बोलली नाही, अगदी गालातल्या गालात एकटीच हसत राहायची , वहीत काहीतरी आठवून आठवून लिहत होती , त्या आनंदाच्या भरात तिने दुपारचा डबा हि खाल्ला नाही , तहान भूक पूर्णपणे हरवून गेली होती , यालाच म्हणतात का प्रेम , हेच असते का ते प्रेम ज्यासाठी लोक जीव हि द्यायला तयार होतात , असे अनेक विचार स्वताच मनातल्या मनात करत होती , भावांचे वादळ उठले होते मनात , आणि अखेर कशी बशी संद्याकाळ झाली शाळा सुटली, संगीताने जाण्यापूर्वी दप्तरातून आणलेली पावडर तोंडाला माकली , गजर केसात माळला , आणि थरथरत्या मनाने , डोळ्यात नरेश प्रतिबिंब साठवत ती पाण्याचे टाकी कडे जाऊ लागली , जस जसे जवळ जाईल तस तशी तिची भीती वाढत होती पण जाण्याची उत्सुकता पण तेवढीच होती, आणि एकदाची ती नरेश च्या समोर आली .
नरेश जाणून होता कि , जर ती मला भेटायला आली तर तिचा होकार असणार , पण तरीही चातका सारका व्याकूळ झाला होता बिचारा तिचे उत्तर ऐकण्यासाठी , दोघांची नजरा नजर झाली तशी एकदामाशी लाजली होती संगीता , हातांच्या बोटे एकमेकात गुंतवण्याचा खेळ चालू होता तिचा तर मान कधी वर कधी खाली घालून तिने बोलायला सुरवात केली ,
"नरेश , तुला मी खरोखर आवडत्या का रे , "
"व्हा ग लय अवडत्यास"
"नरेश , मला पण तू अवडलायास , काल पासून सगळी कड तूच दिसतोयस , जेवण गेल नाही का झोप आली नाही , मला वाटतंय मी पण तुझ्या प्रेमात आहे , "I Love You " नरेश , माझ पण तुझ्यावर प्रेम आहे "
"व्व्व्वा खरच संगे , नरेश ने तिझा हात , हातात घेतला , आणि म्हणाला, संगे मी तुला खूप खुश ठेवण , राणी सारक ! मला खूप आनंद झालाय , शाळेत पहिला नंबर आल्यावर पण होत नाही एवढा आनंद झालाय मला," संगे मी तुझ्यासाठी एक हातातले घड्याळ घेतलय, माझी आठवण म्हणून , आपण रोज भेटायची वेळ तुला कळेल ना घडाळ्यात बघून म्हणून "
"व्हा का आणि मी जर तुला नाही म्हणाली असती म्हजी "
तरी पण हे तुलाच होते , मी तुझ्यावरच प्रेम केल आहे आणि आयुष्यभर तुझ्यावरच प्रेम करत राहणार , आजपासून तूच माझा जीव आणि जीवन हायस, इथन पुढे माझ्यासाठी तूच सर्वस्व आहेस , "I Love You " संगीता , हे घड्याळ हातात घाल , आणि उद्या शाळा सुटली कि आपण पुन्हा इथेच भेटू "
जाता जाता दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले आणि त्याच वेळी टाकीवर बसलेली एक पारव्याच्या जोडी त्यांच्या प्रेमाची साक्षीदार झाली होती . दोघे जन विलग झाले पण मनाने इतके घट्ट झाले होते कि एकाच मिठीत आयुष्यभराची उब साठवली होती दोघांनी , एक प्रेमी युगुल आपल्या भावी आयुष्याची सुरवात दोन पारव्याच्या साक्षीने करू पाहत होते .दोघांचे शाळेत एकत्र जाने येणे चालू झाले , रोज नरेश तिच्या दारावरूनच यायचा , नरेश तिच्या घरी वारंवार येऊ लागला , तर संगीता हि साउ ला भेटण्याच्या निमित्ताने नरेश च्या घरी येऊ लागली . दोघांची हि दहावी चालू झाली होती , तरी पण दोघे कधी डोंगराजवळच्या मंदिरात तर , कधी नदीच्या काठावर , कधी रेल्वे स्टेशनच्या बाकड्यावर तर कधी टाकीजवळ , असा भेटणे बोलन चालू होते , फक्त आणि फक्त प्रेम आणि प्रेमच हेच समीकरण झालेले दोघांच्या आयुष्याचे , अनेक वचने घेतली दिली जाऊ लागली होती दोघाकांडून , बघता बघता वर्ष संपले , दहावीची परीक्षा जवळ आली तसे दोघांनी स्वतः हून भेटण्यावर निर्बंध लादले आणि सध्या अभ्यास करून चांगली गुणांनी दहावी पास होऊ मग पुढे आपलेच आयुष्य आहे या निर्णयावर दोघांनी पूर्ण महिनाभर दोघांना भेटणे टाळले होते , आणि कसे बसे दिवस गेले पुढे दोघांनी हि दहावीची परीक्षा दिली होती , नरेश हा खूप हुशार व नंबरात येणारा विध्यार्थी होता त्यामुळे घरच्यांनी त्याला इंजिनिअर बनवायचे ठरवले होते , तर संगीताच्या घरच्यांनी तिचे लग्न करून देण्याचे ठरवले होते. नरेश चा बराच वेळ भेटण्यात आणि आठवणीत गेल्यामुळे अभ्यास नीट झाला नव्हता व या वेळी त्याला स्वतः हि नंबरात येण्याची खात्री नव्हती .
महिना , दोन महिने असेच गेले , आणि निकालाचा दिवस उजाडला (त्यावेळी online सुविधा नव्हती ) , नरेश सकाळी लवकर उठून दिवा बत्ती करून , आजीच्या पाया पडून , निकाल आणायला गेला होता तर त्यावेळी पण दोघे पण एकत्र होते . निकाल पत्र हातात पडले तसे दोघांच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते , नरेश पास झाला होता पण त्याचा वर्गात तिसरा नंबर आला होता १० वर्षात पहिल्यांदाच त्याचा नंबर खाली घसरला होता ८२ % नि पास झाला होता नरेश , तर संगीता अगदी काठावरच ३८ % टक्यांनी पास झाली होती .
घरातल सर्वांनी नरेश ला खूप सुनावले , चीड चीड केली , अगदी त्याचेच दहा वर्षाचे सर्व निकाल वाचून दाखवले , पण आता काही उपयोग नव्हताच त्या परीस्तीतीत हि तो संगीताचा विचार करत होता.
या सर्वाचा व्हायचा तोच परिणाम झाला , घरच्यांनी नरेश ला पुढील शिक्षणासाठी पुण्याला पाठवायचे ठरवले . यावर नरेश ने भरपूर विरोध केला , रुसवे फुगवे करून दाखवले , जेवण सोडले , घरात जास्त बोलणे बंद केले पण कोणाच त्याची बाजू घेईना, शेवटी दुसर्या दिवशी त्याने नरेश आणि संगीता नेहमीच्याच ठिकाणी नदीच्या काठावर भेटले . दोघांनी खूप गप्पा मारल्या , नरेश ने त्याच्या शहरात पाठवण्याबद्दल सांगितले तशी संगीता नाराज झाली , नरेश हि खूप नाराज होता , पण काहीच उपयोग होत नव्हता , दोघेही शून्यात डोळे करून एकमेकाशी बोलत होते , काय होईल , कसे होईल , दुरावा सहन होईल काय , अश्या अनेक गोष्टी चालल्या होत्या पण संगीता थोडीशी समजूतदार होती , तिनेच नरेश ची समजूत काढली .
"अरे माझ्या राज्या , तू जर शहरात जाऊन शिकलास , मोठा हफ़िसर झालास तर मलाच अभिमान वाटल कि , माझा नव्हारा मोठा हाफिसात काम करतोय , तू जावा सूट बूट घालून येशील तवा मलाच सर्वात जास्त आनंद होईल , फक्त त्यावेळी तू मला वासरू नको म्हजे झाल "
"अग संगीता वेडी आहेस का तू , तुला मी कधीच विसरणार नाही , तू माझा श्वास आहेस, मी कितीबी मोठा माणूस झालो तरी तूच माझी बायको होणार आणि जर तू माझी बायको झाली नाही तर दुसरी कोणच माझी बायको नाही होणार ," "तू बी मला वचन दे तू फकस्त माझीच आहेस , तू इतर कोणाचीच होणार नाहीस ," आपण कितीबी लांब राहिलो तरी एकमेकांचेच राहणार ."
"व्हय रे माझ्या राजा "
दोघांच्या या भेटीनंतर अगदी पाचव्याच दिवशी नरेश चे पुण्याच्या एका कॉलेज मध्ये अडमिशन झाले होते आणि होस्टेल ला हि नाव दिले होते त्यामुळे नरेश ने जाण्यापूर्वी एकदा संगीताच्या घरी जाऊन तिला होस्टेल चा नंबर दिला होता आणि एक अखंत विश्वात समाधान देणारी मिठी मारली होती सांगितला , त्यादिवशी पहिल्यांदा संगीता व नरेश दोघेही डोळ्यात स्वप्ने साठवण्याच्या नादात अश्रू आले होते .
डोळ्यात तिची छबी साठवून , तिच्या सोबत घालवले आनंदी क्षण मनात साठवून नरेश त्याच्या भविष्य घडवण्याच्या मार्गावर मार्गक्रमण झाला होता , पुण्याला गेल्यानंतर त्याचे मन तिकडे अजिबात लागत नव्हते , प्रत्येक क्षणाला संगीताची आठवण येत असे , आणि इकडे संगीताची हि अशीच काहीशी व्यथा होती . मन लागत नसे , वारंवार नरेश चा भास होत असे , जेवण जात नसे का झोप येत नसे , अशेच दिवस जात होते त्यातूनच एकदा दिवशी दोघांचा फोन वरून संवाद व्हायचा तो हि "साउ" च्या मदतीने
आणि तेवढ्यातच या प्रेमी युगुल समाधान मानायचे हे ठरवले होते , नरेश ने संगीताची आठवण म्हणून तिची एक ओढणी सोबत नेली होती तर संगीता कडे नरेश दिलेले घड्याळ होते हेच काय ते दोघांना बांधून होते .
दिवस असेच जात होते आणि बेंदूर सण जवळ आलेला त्यामुळे दिन्या कुंभार ला काळ्या मातीची गरज होती पण ती माती गावाच्या बाहेर वेशीजवळ रमेश पवार नावाच्या एका मोठ्या इसमाचा माळा होता तिते मिळत असे , बैल बांधण्यासाठी हि माती उपयोगी पडत असे त्याला आणि ती माती कायम सविताच आणत असे पण या वेळी सविताची ताब्यात बिघडली होती तर दिन्याच्या पायाला कुरूप झाले होत, त्यामुळे त्याने सांगितला माती आणायला सांगितली होती , रम्याच्या मळ्यातून .
"रमेश पवार - गावातील एक मोठ नाव ,पण म्हणतात ना "नाव मोठे आणि लक्षण खोटे " या प्रकारचा इसम होता हा , अतिशय , धूर्त , लबाड, कायमच वासनाधीन , आज पर्यंत गावातील किती तरी स्त्रियांना भोगले असेल त्याने , त्याच्या मते जगातील प्रत्येक स्त्रीला एकदा ना एकदा भोगलेच पाहिजे , खूप कामुक्ष नजरेने तो स्त्री कडे पाहत असे . त्याच्या मळ्यावर कायमच दोन गाडी कामाला असायचे , आणि अश्या नराधम रमेश पवार च्या मळ्यात माती आणण्यासाठी सांगितला जावे लागले होते .
संगीता मळ्यात पोहचली , हळूच रानात जाऊन बुट्टीत माती भरू लागली , मनात एक वेगळीच भीती वाटत होती तिला , थरथरत्या हातानी तिने माती भरली आणि बुट्टी डोक्यावर उचलणार तेवड्यात तिच्या कानावर आवाज आला .
"ये पोरी , कोण ग तू आणि काय करत्यास रमेश मालकाच्या वावरात ,"
"मी , मी संगीता , दिन्या कुंभाराची लेक , जरा काळी माती पाहज व्हती म्हणून घेत होतो ."
तिकडून संगीताचा मृदू आणि कोमल आवाज ऐकून कामेश्वर उर्फ रमेश , लगेच तिकडे आला नि सांगितला पाहून पाहताच राहिला , त्याच्या सुप्त मनाला त्या कोमल कळीत एक यौवन संपन्न , अशी सुंदर स्त्री दिसली , आणि जागेवरच त्याने आपल्या घाणेरड्या नजरेने तिच्यावर बलात्कार केला होता .त्याच्या मनात उथळ पुथळ चालू झाली होती, कधी एकदा या पोरीला आपल्या बाहू पाशात घेतो आणि कधी हिला भोगतोय असा झाले होत रमेश ला .
कथा खुप मस्त
कथा खुप मस्त आहे........
पुढच्या भागाच्या प्रतीकषेत..............
पुढच्या भागाच्या
पुढच्या भागाच्या प्रतीकषेत..>>>> पुढचा भाग लवकरच पोस्ट होईल
पुढचा भाग कधी ???????
पुढचा भाग कधी ???????