पालक राईस

Submitted by गोपिका on 15 January, 2015 - 13:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. २ कप पालक प्युरी (कच्चा पालक)
२. १ कप तांदूळ
३. ३ पाकळ्या लसूण,बारीक केलेला
४. मिरे पूड - १/२ चमचा
५. तेल - २ चमचे
६. मीठ चवीनुसार
७. काजू (हवे असल्यास्,मे वापरले नाहित)

क्रमवार पाककृती: 

वर दिलेली वेळ - भातासाठी लागणारा वेळ ह्यात धरूनये

१.भात करून घ्यावे.भात किति मोकळा हवा हे तुमचावर अवलंबून आहे.लहान मुले किंवा वयस्क माणूस खाणार असेल तर मऊ करू शकता.गार होण्यासाठी ठेवावा.
२. एका पसरट पॅन मध्ये तेल गरम करून त्यात लसूण्,काजू ,मीठ व पालक पुरी घालावी
३.मध्यम आचेवर परतवून झाकण लावावे.पालक शिजतो आणी पाणी आटल्यामुळे दाट ही होतो.
४.मिरे व गार झालेला भात सोडवून तो पॅन मध्ये घालावा व सगळे व्यवस्थित मिसळून घ्यावे.आच थोडी कमी असूदे.
५.पालक सगळी कडे व्यवस्थित लागला आहे ह्याची काळजी घ्या.
६.आच मंद करून ५ ते १० मिनिटे झाकून ठेवावे.
७.तसेच खायला हि छानच लागतो हा भात पण तूप किंवा आवडीचा भाजी बरोबर खाऊशकता

वाढणी/प्रमाण: 
२ ते ३ जण - पण एकट्यनेच सगळे खाल्ले तर...
अधिक टिपा: 

१.आपल्या आवडीप्रमाणे मिरे आणी पालकाचे प्रमाण कमी जास्त करू शकता...
FotorCreated.jpg

माहितीचा स्रोत: 
आमाचा बेळगाव कडे प्रसिद्ध आहे...माझी पद्धत वापरली
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users