फार छान मैत्री झाली होती आमच्यात. नव्याने ओळखू लागलो होतो आम्ही एकमेकांना. मला त्याच्या सवय, आवडी-निवडी, दिनक्रम सारेच कळू लागले होते. तशी तर आधी ही माझ्या दिवसाची सुरुवात त्याच्यापासून आणि शेवट ही त्याच्यापाशीच होत होता पण तेव्हा तो फक्त माझ्या विचारातच असायचा पण आता तो सत्यात आहे, खरा खुरा, आता माझ्या सकाळची सुरुवात त्याला good morning wish करून होते आणि दिवसाचा शेवट त्याचा good night wish ने होतो.
एकदा office मधून घरी जाताना अचानकच आमची भेट झाली शनिवार होता, म्हणून दोघांचे ही office hours लवकर संपले होते.
मी: hi,,, तू ही आज लवकर निघालास?
तो: हो,, Saturday आहे ना..
मी: hmm,,,
पुढे काही सुचलेच नाही.. दोघही शांतपणे वाट चालत होतो. जवळ्च कुठेतरी टपरीवर त्या प्रसंगाला साजेस असेच गाणे वाजत होते. अवघ्या दोनच ओळी माझा कानावर पडल्या पण नकळत मी त्या गुणगुनू लागले...
मी: का रे दुरावा,, का रे अबोला,,
अपराध माझा असा काय झाला..
तो: .अपराध ना माझा,
अपराध ना तुझा,
शब्द झाले परके,,
म्हणूनी ओठांवर हा अबोला..
मी: ए तू जे बोललास ते ह्या गाण्याचा पुढचा ओळी आहेत का?
तो: नाही ग,, मी तर हे song नीटसे कधी ऐकले ही नाही आहे, फक्त तुझ्या गाण्यावरून जे तोंडात आले ते बोललो..
मी: kk,, मग मी पण प्रयत्न करते...
तो: hmmm,, कर कर..
काही क्षणा नंतर,,
मी: .ओठांची कळी खोल जरा,,
मनातले सारे बोल जरा..
संपेल मग मैलोनचा दुरावा,,
ना रहाणार अन कोणताच अबोला..
तो: ए छान होत ग,,, थांब मी पण प्रयत्न करतो, यमक जुळवण्याचा,,
मी: हो ok.
पुन्हा काही वेळा नंतर,,
तो: .बोलताना तुजपाशी,,,
उगा शब्द माझे घुटमळती,
जे जमले ना ओठांना,
नजरा ती कोडी उलगडती..
मी: hmmm nice,,, wait..
तो: hmmm,, लवकर बोल..
मी: हो रे..
मी: मला शब्दात बांधण्याची,,
तुझी अदा निराळी,,
पण ही नज़र कोडी सुटण्या आधी...
गाठ आयुष्याची ना सैल व्हावी,,
भिती ही जाणून घे जी दडली आहे माझ्या आधरी..
तो: hmmm,, थांब जरा
मी: हा हा take your time,, m waiting..
तो: आहेत ही युगायुगांची नाती,
बंध जीवनाचे असे का तुटली???,,
हाती घेउनी हात नेईन तुला दूर देशी,,
एका प्रश्नच उत्तर दे फक्त,,,
होशील का तू माझी....?
हे ऐकून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला, काय बोलवा काहीच कळेना, तो चारोळीतून बोलून गेला पण मला तर त्याचा तोंडून नेहमी हेच ऐकायचे होते.
तो: का काही सुचतय का पुढे,,,
मी: (शब्दांची सर्वा सराव करत अडखळतच बोलले,,) ना, नाही ,, आणि बघ स्टेशन ही आले ट्रेन येईल थोड्या वेळात..
तो: हो खरच की,, बोलता बोलता लक्ष्यातच नाही आले..
थोड्या वेळातच ट्रेन आली, पुन्हा ती गर्दी, पण मी हरवले होते, अजून त्या धक्यातून सावरलेच न्हवते, त्याचा मनात तस काही न्हवतेच, पण एका लहानश्या खेळा मधे नकळतच तो किती मोठी गोष्ट करून गेला.. मी अजून ही विचारात होते तेवढ्यात त्याने हाक मारून मला भानावर आणले.
तो: चल मी निघतो, माझ स्टेशन आले, नीट जा घरी..
मी: hmmm,, bye..
तो निघून गेला आणि मी पुन्हा हरवले...
श्वास थांबला क्षणभर माझा
हृदयाचा ठोका ही चुकला होता..
शब्द तुझा तो भेदून मनाला
काळजात घाव करून रुतला होता..
निरुत्तर केलेस ज्या प्रश्नावर मला
उत्तर त्याचे तू जनतच होतास..
तरीही का असा तू अजाण होऊनी
कोड्यात मला गाठत होतास..
सोमवार परिन्त मी स्वता:ला सावरले होते, मधला सुट्टीचा एक दिवस मी स्वात:ला समजावण्यात घालवला होता की तो जे काही बोलला तसा त्याचा हेतू अज्जीबात न्हवता आणि हे तू चांगलेच जनतेस, म्हणुनच तुझा life चा तो एक क्षण शक्य तितक्या लवकर विसरून जा...
सकाळी ट्रेन मधे तो आला त्याची तीच गोड smile घेउन,, मी सर्व normal आहे अस दाखवण्यासाठी त्याला hii केले,
मी: hii
तो: hii,, so,, how was your Sunday?
मी: hmmm,, normal as usual नेहमी सारखाच,,, आणि तुझा..?
तो: नेहमी सारखाच...
मी: hmmm,, छान ना,, काल संध्याकाळी किती वाजता आलास घरी क्रिकेट खेळून,,, तुला भानच रहात नाही ना खेळताना,,, मग आहे,, रात्री पाय दुखत होते ग..
तो: हाहाहह,, तू कसे ओळखालेस,, खरेच पाय दुखत होते ग,, पण मी काय करू I’m mad for cricket..
मी: hmmm,, I know I know,,, मग आता कसे आहेत,,
तो: hmmm.... ठीक आहे
मी: hahah,, idiot..
मस्त
मस्त
मस्त ग kelly पण आता कथा पुढे
मस्त ग kelly पण आता कथा पुढे सरकू दे
Pudhe kadhi sarkanar .???
Pudhe kadhi sarkanar .???