दुसर्या दिवशी स्टेशन वर वेळेवर पोहोचले पण संभ्रमात पडले, वाटले लडिज कॉमपार्टमेंट सोडून पुन्हा त्याच डब्यात चढाव का? कदाचित पुन्हा केशवशी भेट होईल,, मनात थोडी हुरहुर होत होती मग तेच केल जे मन सांगत होत.. म्हणजे ट्रेनचा डबा चेंज केला.. गर्दीतून वाट काढत मी एक कोपरा पकडून उधी राहले. कधी एकदाच गोरेगाव येताय अस झाल होत मला, नज़र अगदी ट्रेनचा दारावर खिळून राहिली होती. एक क्षण वाटले की मी काही मूर्खपणा तर केला नाही ना मुद्दाम जेंट्स कॉमपार्टमेंट मधे येउन.. आणि दुसर्याच क्षणी जर तो आलाच नाही तर,,,हा प्रश्न मनात डोकावून गेला..
ओळखीचा शहरात अनोळखीपणे वावरणारी ,,
लोकांच्या गर्दीत सैर-वैर तुला शोधणारी ,,
असेल जी एक नज़र तुझ्यासाठी पाणवणारी ,,
ती,, फक्त तुझी तुझी तुझीच कादंबरी..
कदाचित त्या दिवसात देव माझ्यावर जरा खुश होता असावा,,, कारण गोरेगाव स्टेशन आले आणि लोकांचा गर्दीतून वाट काढत आत येताना मला पुन्हा तो दिसला आणि माझ्या काळजाचा ठोका पुन्हा चुकला... पाहिले त्याने ही मला, आणि तो माझ्याकडेच येत होता..
तो: hi,, आज पुन्हा उशीर झाला तुला ?
मी: hii.. amm,, नाही आज मुद्दामच ह्या डब्यात चढले,, पुन्हा कुणी ओळखीच भेटेल या आशेवर.
तो: ohk,,बराच काव्यात्मक बोलायला लागली आहेस
मी: hmmm,, तस नाही सहजच बोलून गेले...
तो: ohk,, so कसा गेला कालचा दिवस?
मी: good.. छान गेला.. आणि तुझा दिवस कसा गेला?
तो: चांगला.. hahah,, मी हा प्रश्न तुला मुद्दामच विचारला.. कसली घाबरली होतीस काल आणि तरी ही पुन्हा आज या डब्यात एकटी चडलीस म्हणजे मानले पाहिजे तुला
मी: त्यात काय नवल आहे, नेहमीच थोडे तसे नग भेटतात. आणि मी काही घाबरले वगैरे न्हवते हा, फक्त जरा अस्वस्थ झाले होते एवढच..
तो: काहीही हा,, नाही स्वताशी बोल खोट हव तर पण माझ्याशी बोलु नकोस, पकडली जातेस.. तुझे डोळे तुझा शब्दांची साथ देत नाहीत..
मी: ohh असे का...! असो,,, पण तू ही काव्यात्मक बोलून गेलास की आता..
तो: hmmm,,, तुझ्या संगतीचा परिणाम ना मग अजून काय होणार
मी: ओहक.. 2 दिवसात माझा संगतीचा परिणाम झाला तर तुझ्यावर..
तो: haha,, तास नाही ग,, मस्करीत बोललो,, तू भांडणारच आहेस का आता माझ्याशी
मी: haaa :0 (आश्चर्य),,, मी कुठे भांडत आहे तुझ्याशी,, तुच माझी थट्टा करतोयस माघापासून ..
तो: ohk ohk,, आता नाही करणार बर तुझी थट्टा.. पण कसली लहान मुल्लांसारखी रुसतेस, आणि गाल फुगवून बसतेस.. म्हणून मजा वाटते तुला चिडवाईला
मी: हो का..
तो: हो..!
Hahahahahaha,,,, दोघही खळखळून हसलो,, आणि दादर स्टेशन आले देखील... किती लवकर वेळ निघून जाते त्याचासोबत... मला त्याच वेड लागल होत,,, नाही ! ते तर आधीपासूनच होत ना.. बहुदा आजार वाढलाय माझा
ऐय वक़्त रुक जा,, थॅम जा टेहेर जा,,
वापस जरा दौड पीछे...
मैं छोड आई खुद को जहाँ पे,,
वोह रेह गया मोड पीछे..
कहाँ मैं कहाँ तू,, ये कैसा है जादू..
स्वत:शीच गुणगुणत राहावस वाटत होते.... खूप छान सरत होते दिवस... एकदा आम्ही दोघ ट्रेन चा दारा जवळ्च उभे राहिलो, छान वारा लागत होता आणि नकळतच माझ्या ओठतून गाण्याचे बोल निघाले..
मी: तुम्हारी नज़र क्यु खफा हो गयी,
खता बक्ष दो गर खता हो गयी..
हमारा इरादा तो कुछ भी ना था..
तुम्हारी खता खुद सज़ा हो गयी..
तो: सज़ा ही सही आज कुछ तो मीला है
सज़ा मे भी एक प्यार का सिलसिला है
मोहब्बत का कुछ भी अंजाम हो
मुल्लाकात की इबतेदा हो गयी..
मी: पुढे
तो: hmm,, पुर्ण गाण ऐकायचे आहे?
मी: हो,, म्हणजे अरे काल ना मैने प्यार किया movie मधील अंताक्षरी मधे ऐकले होते मी हे, छान वाटले,, पण मला तेवढेच येते ना..
तो: hahaha,, बर भेट कधी मोकळ्या वेळात मग ऐकवेन...
मी: ohh,, बर, बार..
खडुस कुठचा पण फार छान गातो..
_क्रमश:
जरा मोठे भाग टाका ना.. खुप
जरा मोठे भाग टाका ना.. खुप मस्त लिहिताय..
<जरा मोठे भाग टाका ना.. खुप
<जरा मोठे भाग टाका ना.. खुप मस्त लिहिताय..> +१
भाग १ चि लिन्क द्या
<जरा मोठे भाग टाका ना.. खुप
<जरा मोठे भाग टाका ना.. खुप मस्त लिहिताय..> +१+1
मस्त
मस्त
<जरा मोठे भाग टाका ना.. खुप
<जरा मोठे भाग टाका ना.. खुप मस्त लिहिताय..> +१+१+१
मस्त
मस्त
आभारी,, आणि पुढे चुका दुरुस्त
आभारी,, आणि पुढे चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करे..