व्यथा

Submitted by _हर्षद_ on 5 January, 2015 - 07:32

तासाभरात गावाचा काश्मिर झाला
हातभर गारांचा सडा पडला
साहेब गाडीत बसुन आला
शेतात फिरता फिरता घामान निथळला
आन म्हणाला
" कसल ओसाड वाटतय ना ?????"
त्याला कस , अन कोण सांगणार
काल झाडाच पान न पान लढल
आता तर
झाडाच मुळपण गोठल

नक्षत्रापार नक्षत्र सरली
भुई कोरडी ठाक राहीली
हिम्मत नाय हारली
उसणवारीची धुळपेर केली
पालवी नाय त नायच फुटली
साहेब गाडीतच बसला
शेतात न फिरताच म्हणाला
" बाहेर फारच उकडत नाही?????"
त्याला कस , अन कोण सांगणार
पाउस इकड यायचाच विसरला
आता तर
सगळ काही सुकल

भर श्रावणातच अत्यावश्यकची संक्रांत आली
उरली सुरली हिम्मत गणपती बाप्पान सोबत नेली
राख सावडताच दुबारीची लगबग केली
त्याच्या आशीर्वादान धरणी हिरवीगार हरखली
गोड गोड स्वप्नातच अवकाळीन धाड घातली

यावेळेस साहेबाला
ना ओसाड वाटल असत
ना उकडल असत
पण
सडलेल्या शेताच्या घाणीत
बिचार गुदमरल असत

उधारी फेडण्याची ताकतच सरली
म्हनुन अश्रुंच दानच माघितल
मुर्दाड मनावर तेव्हडच वाहील
बापाच्या वेळेसच राहुन गेलेल
मनसोक्त रडुन घेतल

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही शेतकरी आत्महत्येचा विचार का करतात याची जाणीव झाली...
अपयश, अपयश , अपयश आणि पाचवीलाच पुजलेल सततच अपयश

माझ घर शेतीवर अवलंबुन नाहीये तरीपण खुपच खचल्यासारख झालय. यातुन कधी बाहेर पडेल काय माहीत.

नविन वाचक मी साधा माणुस आहे हो. शेतात्ल्या सततच्या अपयशाने आणि जवळच्या माणसाच्या जाण्याने डिप्रेशन आल होत ते अस बाहेर आल.

हर्षद.:अरेरे: खचुन जाणे स्वाभावीक आहे. मी शेतकर्‍यान्चे जीवन जवळुन पाहीलेय त्यामुळे फार वाईट वाटते. अन्नदात्यावर असा प्रसन्ग ईश्वरानेच का आणावा? आडते, दलाल याना का शिक्षा होऊ नये? खूप प्रश्न आहेत. पण बाहेर पडा यातुन. ईश्वराने एक दरवाजा बन्द केला म्हणून काय झाले? दुसरे दरवाजे उघडे असतीलच.

अवघड आहे.

यावर काय उपाय?
म्हणजे पाऊस येणार हे दोन दिवस आधी समजले तर कांदे आहेत त्या परिस्थितीत काढून पातीचा कांदा म्हणून बाजारात आणणे?

कोकणातील शेतकरी सुद्धा शेती करतात पण ते का नाही आत्महत्या करत.>>गारपीट होते का कोकणात?>>>>>>>>>>>.फक्त गारपीट हेच कारण आहे का ??? दरवर्षी होते ?

अवेळी पाऊस कोकणातही पडतो शेतात हत्ती घुसून पिकांची नासधूस करतात. आंबे, काजू/फणस/केळी यांच्या लागवडीवर कीड पडते, शिवाय आणि इतर हि काही होतेच कि. मी शेतीतज्ञ नाही पण जे कॉमन आहेत ते सांगितले.

बाकी वर विचारलेल्या प्रश्नामुळे हर्षद तुमचा धागा बघा कसा active झाला. Happy

हर्षद. खचुन जाणे स्वाभावीक आहे. मी शेतकर्‍यान्चे जीवन जवळुन पाहीलेय त्यामुळे फार वाईट वाटते. अन्नदात्यावर असा प्रसन्ग ईश्वरानेच का आणावा? आडते, दलाल याना का शिक्षा होऊ नये? खूप प्रश्न आहेत. पण बाहेर पडा यातुन. ईश्वराने एक दरवाजा बन्द केला म्हणून काय झाले? दुसरे दरवाजे उघडे असतीलच.>>>>>>>सहमत.

अवेळी पाऊस कोकणातही पडतो शेतात हत्ती घुसून पिकांची नासधूस करतात. आंबे/केळी यांच्या लागवडीवर कीड पडते, शिवाय आणि इतर हि काही होतेच कि>>नक्कीच!