अधुरी कादंबरी... सुरुवात एका प्रेमाची..

Submitted by Kally on 4 January, 2015 - 05:59

माझ्या स्वप्नात तू,,
प्रत्येक श्वासात तू,,
हृदयाचा स्पंदनात तू,,
नाहीस तर फक्त जीवनात तू..

त्याला आवडलेली ही माझी पहिली चारोळी होती. केशव त्याचे नाव आणि मी राधिका. आम्ही बरीच वर्ष एकत्र शिकलो, पण तेव्हा त्याला माझी ओळख होती का नाही हे माहित नाही पण मी पहिल्याच नझरेट त्याचात गुंतले होते. अतिशय हुशार सगळ्याचा आवडता आणि गोड smile असलेला मुलगा. सगळ्यांशी त्याची मैत्री होती सगळ्यांमधे मिळून मिसळून रहायचा. कुणाचा ही मनात त्याचा बद्दल द्वेष असूच शकत न्हवता. माझा आणि त्याचा समोरासमोर बोलण्याचा योग तसा कधी आलाच नाही. College संपले आणि आमचा त्या ना होऊन होणार्या भेटींचा काळ ही संपला. चार वर्ष झाली गोरेगाव सोडून मीरा रोडला शिफ्ट झाले होते मी आणि माझी family. पण या चार वर्ष्यात त्याची ती गोड छवी मनातून कधीच नाहीशी झाली नाही. अंतर फार न्हवते पण भेटीचा योग कधी आलाच नाही. कित्तेकदा मी काही ना काही कारणाने गोरेगाव गाठत होते पण प्रत्येक वेळी प्रत्येक वळणावर फक्त त्यालाच शोधणारी माझी भिरभिरी नज़र हताश होऊन परत आली होती.
एकदा माझ्या आजोबांची प्रकृती जरा खालावली होती, त्यांना पहायला म्हणून मी पुन्हा एकदा गोरेगावला गेले होते. फार काही नाही वयानुसार होणारा सांधे दुखीचा त्रास. तरी माझ्या मनात त्यांचा व्यतिरिक्त ईतर काहीच विचार न्हवते. गेल्या चार वर्ष्यात जे झाले नाही ते आता का होईल असा विचार करून मी नाका समोरची वाट धरुन चालत होते. पण यावेळी देवाने काहीतरी नक्कीच योजले होते असावे. मी नज़र वर करून पाहिले आणि समोर तो उभा होता. आपल्या मित्रांचा घोळक्यात, त्याला असे अचानक पाहून माझ्या आनंद मनात मावतच न्हवता क्षणभर तर माझा श्वासच थांबला होता, मुर्खासारखी मी एक टक फक्त त्याला बघत राहिले होते.. कदाचित तो ही मला ओळखण्याचा प्रयत्न करत होता, त्याचावर खिळलेल्या माझ्या नझरेने त्याचे ही लक्ष वेढले असावे..
तो तिथेच उभा होता आणि मी पुढे निघून गेले,, पण फक्त त्या वळणावरच,,,, कारण आयुष्यात मी पुढे कधी जाऊच शकले नाही….

तुला जेव्हा भेटतो तेव्हा,,
तुला पाहतच राहावस वाटते,,
अन् क्षणभर हे आयुष्य,,
पुन्हा पुन्हा जगावसे वाटते..

त्याने लिहिलेली ही पहिली चारोळी कुणासाठी होती हे माहित नाही पण आमच्या त्या भेटीचा तो क्षण आठवला की नकळत त्याची ही चारोळी माझ्या ओठांवर रेन्गाळू लागते.. माझ्या आयुष्यातला तो एक अविस्मरणीय क्षण,, माझ्या अधुर्या कादंबरीची सुरुवात ठरला…

क्रमश

Group content visibility: 
Public - accessible to all site users