आमच्या ओळखितल्या एका व्यक्तीने वर्षभरा आधी कोएंबतोर वरुन लिंग-भैरवी नावाचे एक यंत्र आणले होते. त्या यंत्राची किंंमत ऐकून मी चाट पडलो होतो. कारण त्या यंत्राची एक्स-शोरुम प्राईस (कोएंबतोर आश्रम प्राईस) होती रु. ५,००,०००/- ( पाच लाख) व यंत्राचे वजन १६५ किलो, आणि साईज साधारणपणे तीन बाय तीनचा. त्यामुळे चांगले चार पैलवान मिळून हे यंत्र उचलताना हासहुस करुन दमले होते. अशा वजनदार यंत्राची डिलिव्हरी टाटा पिकअपने दिली जाते. त्यामुळे डिलिव्हरी चार्जेस पण चांगलेच पडतात. थोडक्यात साडेपाच सहा लाखाचा चुन्ना लावणारे हे यंत्र आहे.
आता वर्षभरातील एकून घडामोडी पाहता त्या व्यक्तीला या यंत्रपासून लाभ होत असल्याचे जाणवू (किमान वरवर तरी) लागले आहे. त्या शेजार्याची प्रगती होत असेल तर मला आनंदच आहे पण ईकडे माझ्या सौ. ला त्या यंत्राचा मोह होत असल्याचे पाहून मला घाम फुटू लागलाय.
हे भगवान मुझे बचाले
ऋ। ☺☺☺ कोकणात चालगती
ऋ। ☺☺☺
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोकणात चालगती म्हणून प्रकार आहे. तो तंत्रमंत्राशी संबंधित आणि त्याचे रुल्स regulations खूप कडक असतात. जो चालगती घेऊन येतो त्याला ते माहित असतात पण त्याने किंवा त्याच्यानंतर घरातल्यानी जर ते नीट पाळले नाहीत तर पूर्ण घर उध्वस्त व्हायचा धोका असतो. इथे माबोवरच्या शिक्षित लोकांचा विश्वास बसणार नाही पण आमच्या गावी पूर्ण घराणे वर्षभरात लयाला गेल्याची आणि भावकीतले उरलेले उध्वस्त झाल्याची उदाहरणे आहेत. मी विश्वास ठेवत नाही आणि अविश्वासही दर्शवत नाही. काही घटनांचे तात्काळ स्पष्टीकरण मिळत नाही तेव्हा गावचे लोक देवाचे वगैरे शोधायला लागतात आणि त्यातून अशा कथा निर्माण होतात.
ऋ>>
ऋ>>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
ते चालगती आणी बायंगी सेम
ते चालगती आणी बायंगी सेम असावे.
मागे कुठेतरी ५०००० ला बायंगी विकत घेण्याच्या गोष्टी वाचल्या होत्या.ते शत्रूचा नाश करत जाते म्हणे.
श्रद्धेचा भाग आहे.किंमत कळली
श्रद्धेचा भाग आहे.किंमत कळली म्हणून बिचकतायत नाहीतर आवाक्यातले असते तर "घेऊन बघायला काय हरकत आहे" म्हणत घरघरात पोहोचली असती यंत्रं.
तशी इतर यंत्रे आहेत की जी
तशी इतर यंत्रे आहेत की जी आवाक्यातली आहेत आणि चालगतीसारखी त्यांना काळी किनारही नाही. जशी लक्ष्मीयंत्र, श्रीयंत्र, कुबेर यंत्र. वास्तू मार्गदर्शन करणारे ह्या यंत्रांचा उपयोग करून घ्यायचा सल्ला देतात. फायदा होत असावा/नसावा, कल्पना नाही. मी स्वतः असल्या भानगडीत पडले नाही आणि पडणारही नाही.
चालगती आणि बायांगि सेमच असणार, नावे वेगवेगळी.
बायांगि हे यंत्र नसून बाटलीत
बायांगि हे यंत्र नसून बाटलीत बंद केलेले भूत/भूतीन असते ना?
म्हणजे त्या धडाकेबाजमधील गंगाराम सारखे.. माती संपली की चमत्कार बंद.. फरक ईतकाच तो गपगुमान निघून गेलेला, पण बायंगी आपल्या मालकाचीच माती करायला सुरुवात करते.
बायंगीभूत माहिती बरोबर रे
बायंगीभूत माहिती बरोबर रे बाळा.
मायबोलीवरच वाचलेले. बहुतेक
मायबोलीवरच वाचलेले. बहुतेक नंदिनी यांनी लिहिले असावे. त्या जाणकार आहेत यातील खूप.
ओ ऋन्मेऽऽषराव, असाला टीपी
ओ ऋन्मेऽऽषराव, असाला टीपी करायचा तर वर्जीनल आयडीने करा की. ऋन्मेऽऽष छाप नाहीशी होईल हो अशाने.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
२०१४ ते १६ यंत्र
२०१४ ते १६ यंत्र वापरणार्याची काय प्रगती झाली ?
>>मायबोलीवरच वाचलेले. बहुतेक
>>मायबोलीवरच वाचलेले. बहुतेक नंदिनी यांनी लिहिले असावे. त्या जाणकार आहेत यातील खूप <<.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
नंदिनी जी, वाचता आहात ना तुम्ही...परस्पर तुम्हाला जाणकार म्हणून मोकळा झालाय ऋ
१००/२०० रु ची यंत्रं/१०००० चा
१००/२०० रु ची यंत्रं/१०००० चा पुष्कराज/माणिक चा खडा हे प्लॅसिबो आहेत.(सध्या माझ्या गळ्यात आणि अंगठीत एक एक प्लॅसिबो आहे.
) ते फक्त माणसाला 'हे माझ्याबरोबर आहे, मला जगण्याची हिंमत आहे' इतके मानसिक बळ देत असावेत.
पुष्कराज बद्दल तर किती वदंता आहेत.एखाद्याचा कमाल फायदा करुन झाल्यावर तो हरवतो/आयुष्यातून निघून जातो म्हणे.
सध्या या सगळ्यातून थोडी बाहेर यायला शिकलेय.व्हिसा इंटरव्यू ला जाताना प्लॅस्टिक ची पिशवी तुटली हा व्हिसा न मिळण्याचा ईश्वरी संकेत न मानता कंपनी चक्रम सारख्या कामाला चाललेय असे दाखवते हे समजलेय.
पाच वर्षांपूर्वी मी अशा
पाच वर्षांपूर्वी मी अशा प्रकारची यंत्रं, ब्रेसलेट्स, गळ्यातील कंठे यावर स्टोरी केली होती. स्टार सीजे शॉपिंग चॅनल सुरू झाला तेव्हा त्याचे सीईओ प्रमोशनसाठी आले होते. त्यांना मी अशा अंधश्रध्दा पसरविणाऱ्या वस्तूंबद्दल विचारले होते. तेव्हा त्यांनी यातील उलाढालीची थक्क करणारी आकडेवारी मला सांगितली होती. त्यांचा एक मित्र ज्याला दोन पैसे कमावून घर चालविणे मुश्किल होते, त्याने असेच सुरक्षा कवच बनवून शॉपिंग चॅनलच्या माध्यमातून विकायला सुरुवात केली. अवघ्या तीन चार वर्षांत त्याच्या त्या कंपनीची उलाढाल एक हजार कोटींवर पोहचल्याचे त्यांनी मला सांगितले होते. नेपाळहून अवघ्या पन्नास-साठ रुपयांत अशी वस्तू बनवून भेटते. त्याला आकर्षक पॅकिंग करायचे आणि अडीच ते तीन हजार रुपयांना ते विकतात. अंधश्रध्देची ही बाजारपेठ विस्तारतेच आहे. विशेष म्हणजे त्यावर अंकुश ठेवायला आपले कायदेच तोकडे आहेत. तेव्हा मी नरेंद्र दाभोलकर यांच्याशीही या संदर्भात बोललो होतो. या वस्तू विकताना त्यांनी बरोबर पळवाटा शोधलेल्या असतात. त्यामुळे ते कायद्याच्या कचाट्यातही सापडत नाहीत, असे त्यांनी सांगितले होते.
ते नजर सुरक्षा कवच नावाचे
ते नजर सुरक्षा कवच नावाचे निळ्या रंगाचे डोळ्याचे चित्र असलेले बटबटित ब्रेसलेट बरेच जण घेतात.त्याचा रंग आणि रुप एकंदरच डोळ्याला सहन न होणारेअसल्याने वाईट्/चांगल्या नजरा आपोआप दूर जात असतील.
मी स्वतः देवीच्या देवळाच्या ठिकाणी गुडविल म्हणून(आणि एकंदरच भरपूर टिकल्या जमवायची हौस असल्याने) बांगड्या/टिकल्या घेते.
माणसाला आयुष्याच्या अप्स आणि डाऊन्स मध्ये जगायला कॉन्फिडन्स पाहिजे असतो.तो हरप्रकारे मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असतो.कधी व्हॉटसअॅप १० जणांना शेअर करुन,कधी संकटात देवळात महापूजा/महाअभिषेक घालून तर कधी हे दागिने घेऊन.
जोवर याचं व्यसन बनत नाही/कवडी नसताना कवडी यावर खर्च केली जात नाही,बाकी प्रायोरिटी सांभाळून यात पैसे घातले जातात तोवर हे फक्त हॉबी मध्ये येतं.
पण यावर नीट प्रबोधन होणं खूप गरजेचं आहे.निदान सिगरेट विकणार्या कंपन्यांप्रमाणे या प्रॉडक्टांची स्काय शॉप असतात तेव्हा सुरुवातीला ठळक अक्षरात 'आम्ही सक्सेस ची हमी देत नाही/रिझल्ट व्हेरी फ्राँम पर्सन टु पर्सन' ही चेतावणी देणे खूप गरजेचे आहे.
>>>> त्यामुळे ते कायद्याच्या
>>>> त्यामुळे ते कायद्याच्या कचाट्यातही सापडत नाहीत, असे त्यांनी सांगितले होते. <<<<
ग्रहांचे खडे अशा स्वरुपात कित्येक वर्षांपूर्वी (४०?)"पटवर्धन अॅस्ट्रॉलॉजिकल्स" (किंवा दुसरे कोणते नाव आहे का?) वाल्यांनी २० रुपयात खडे विकायला सुरुवात केली होती.
तर या खडेवाल्या पटवर्धनांना भारी पिडले होते अंधश्रद्धा पसरवतो म्हणून असे ऐकिवात आहे. कोर्टकचेर्याही झाल्या होत्या म्हणे. पण "खडे विकणे' हा गुन्हा होत नव्हता/होत नाही. मग नंतर त्याच्या किंमतीवरुन बरेच रण पेटवायचा उद्योग केला होता म्हणे... पण तो देखिल टिकला नाही.
असो.
आपल्याला काय बोवा खड्याबिड्यातले फारसे कळत नाही.
बायदिवे, आजच्या एका दिवसात "पटवर्धन" हा शब्द दोनदा वापरला.... एक तो "हस्ताक्षरावरुन स्वभाव" संदर्भात, दुसरे हा...खड्यांच्या बाबत.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हायला असे आहे काय ? मग मी
हायला असे आहे काय ?
मग मी काळा दोरा (गाठी मारलेल्या असणारा) विकायला सुरुवात करतो ऑनलाईन. जितके तुमचे शत्रू असतील त्यांच्या तितक्या गाठी मारून मिळतील. असे सांगायला सुरुवात करतो. प्रत्येक गाठी मधे एक देवाचे छोटेसे लॉकेट सुध्दा लावतो.![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
बक्कळ कमाई होईल
>>>> मग मी काळा दोरा (गाठी
>>>> मग मी काळा दोरा (गाठी मारलेल्या असणारा) विकायला सुरुवात करतो ऑनलाईन. <<<![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
हरकत नाही, मात्र आधी "अॅप्रेन्टीसशीप" /सराव म्हणून चौकात उभारुन तारेत ओवलेले लिंबु/मिरची/बिब्बा विकायला सुरुवात करा...... काये ना, एकदम मोठ्ठी झेप घेऊ नाई...... शून्यातुन सुरुवात करावी....तुम्ही लिंबुमिर्चीपासुन करा सुरुवात.... तसेही शनिवारी सुट्टीच असेल तर वेळ रिकामा का घालवावा म्हणतो मी?
उद्य, एक आयड्या.एक स्पेशल
उद्य,
एक आयड्या.एक स्पेशल अभिमंत्रित अंगठी विकायची.तुमच्या आसपास शत्रू असतील आणी वाईट प्रभाव असेल तर अंगठी काळी पडेल असं सांगायचं.
हा प्रभाव असेल तर काढण्यासाठी एक दिव्य केमिकल विकायचं.त्याने रेशमी सोवळ्याच्या रुमालाने अंगठी पुसल्यास जर ती परत चमकली तर दुष्ट प्रभाव नष्ट झाला.
(या वस्तू: चांदीची पाणी दिलेली अंगठी: १५० रु.रुपेरी ची बाटली: ६० रु.विक्री किंमतः ५००० रु.माझे कमिशनः २०% ऑफ विक्री किंमत)
लिंब्या ती काम तुलाच शोभतात
लिंब्या ती काम तुलाच शोभतात .. त्यामुळे तुच कर![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अनु. नक्की नक्की. आपण अॅमेझोन वर विकू.
मग मी काळा दोरा (गाठी
मग मी काळा दोरा (गाठी मारलेल्या असणारा) विकायला सुरुवात करतो ऑनलाईन. जितके तुमचे शत्रू असतील त्यांच्या तितक्या गाठी मारून मिळतील. असे सांगायला सुरुवात करतो. प्रत्येक गाठी मधे एक देवाचे छोटेसे लॉकेट सुध्दा लावतो.
बक्कळ कमाई होईल खो खो>>
आपण अॅमेझोन वर विकू.>>
ऑनलाइन बाजारात काहीही विकले जाते, हे खरेच आहे. मागे एकदा काळी हळद ओएलएक्सवर विकायला होती. चक्क दीड लाख रुपयांना. गुगलभाऊवर सर्च करून पाहिले तर लक्षात येईल की, कासवे, काळी हळद, मांडूळ साप, जादूटोण्याच्या वस्तूंच्या शोधात अनेकजण असतात.
विकणारे काहीही विकतात कोणी ना
विकणारे काहीही विकतात
कोणी ना कोणी मिळते
मी तर शेगडीवर निखार्यावर भाजलेला मका सुध्दा बघितला आहे.![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
साधारण ४० वर्षांपूर्वी
साधारण ४० वर्षांपूर्वी आलेल्या रथचक्र कादंबरीमध्ये देखील तिचा दीर असे टुकार तावीत विकून श्रीमंत होतो असं वर्णन आहे.
नंदिनी जी, वाचता आहात ना
नंदिनी जी, वाचता आहात ना तुम्ही...परस्पर तुम्हाला जाणकार म्हणून मोकळा झालाय ऋ
>>>
अहो ते आदरानेच लिहिलेय. जसे चित्रपट किंवा कथालेखन या विषयांवर त्या जश्या चांगले लिहितात तसेच यावरही (कोकणातल्या भूताखेतांच्या प्रकाराबद्दल) बहुधा माहितीपुर्ण लिहिलेले, म्हणून म्हणालो. उगाच आपल्या पोस्टने कोणाचा गैरसमज व्हायचा माझ्या हेतूबद्दल.
काळी हळद??विकत का घ्यायची?सरळ
काळी हळद??विकत का घ्यायची?सरळ तव्यावर जाळू...
ऍमॅझॉन वर शेणी पण मिळतात काउडंग केक म्हणून.त्याचे रिव्यू वाचा
http://www.amazon.in/gp/aw/reviews/B016S1J8KW/ref=cm_cr_dp_mb_see_rcnt?i...
कोकणात चालगती म्हणून प्रकार
कोकणात चालगती म्हणून प्रकार आहे. तो तंत्रमंत्राशी संबंधित आणि त्याचे रुल्स regulations खूप कडक असतात. जो चालगती घेऊन येतो त्याला ते माहित असतात पण त्याने किंवा त्याच्यानंतर घरातल्यानी जर ते नीट पाळले नाहीत तर पूर्ण घर उध्वस्त व्हायचा धोका असतो. इथे माबोवरच्या शिक्षित लोकांचा विश्वास बसणार नाही पण आमच्या गावी पूर्ण घराणे वर्षभरात लयाला गेल्याची आणि भावकीतले उरलेले उध्वस्त झाल्याची उदाहरणे आहेत. >>> +१११
चालगती किंवा बायंगी हे नक्की काय कसं आहे कल्पना नाही पण यांच्यासारखेच एक अघोरी साधन म्हणजे मांढरदेवीच्या काळूआईचे 'चेडेगोटे.' जवळपास सगळ्यात डेंजर! चेटूक, भानामती, करणी करण्याचं एक बहुमोल(?) साधन. हे मांढरदेवीच्या गडावर बनवून मिळतात. गोल गरगरीत लहानलहान दगड असतात त्यावर विशिष्ट विधी करून बनवून दिले जातात. अर्थात् मोबदला घेऊन. मोबदल्याची रक्कम ज्याला हे घ्यायची इच्छा असते त्याच्या आर्थिक क्षमतेवर ठरवली जाते. जे बनवून देतात त्यांना घेणार्याची आर्थिक स्थिती त्यांच्यासमोर गेल्याबरोबर लगेच समजते. एकदा ती 'वस्तू' तुम्हाला देऊन उपासनेचा विधी समजावला की देणार्याची जबाबदारी संपते. तुम्ही त्या वस्तूचा वापर करायला मोकळे!
घरी आणल्यावर विधीपूर्वक त्यांची स्थापना करून दर अमावस्या-पौर्णिमेला त्यांचे भोग चढवावे लागतात. नाहीतर तुम्ही, तुमचं सगळं कुटूंब उध्वस्त करतात. दिवसा दगडगोटे दिसतात पण रात्री कोंबडीच्या पिल्लांसारखा आकार घेऊन सजिव होतात. (हो सजिव!!!) यांचा चिवचिवाट ऐकायला येतो. उपासना करणार्याशी बोलतात. सांगितलेलं कुठलंही काम करतात. (कु ठ लं ही ) दुसर्यांचं वाईट करण्यात माहिर असतात. दररोज यांना काम पुरवावंच लागतं. नाही पुरवलं तर मग उपासना करणार्याला हैराण करून सोडतात. जर पलटले तर होत्याचं नव्हतं करून टाकतात. संपुर्ण घरादाराचं आणि कुटुंबाचं वाटोळं! उपासना करणार्याला अक्षरश: कुरतडून खातात. सडवतात. कोणीच वाचवू शकत नाही मग. ना कुठले वैद्यकीय उपचार, ना कुठला देव, ना कुठला चमत्कार..
२, ३, ५, ७ अशा संख्येने असतात. टाकून दिलेले कुठे सापडले तर यांना हाताळणं जिवावर बेतू शकतं. समजा कुणाला असं काही सापडलं तर ते वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं असतं.
(असले चेडे एकदा सापडले असता त्यांना हाताळण्याचा मी स्वत: एक थरारक अनुभव घेतलेला आहे, जो येथे मांडता येणार नाही.)
माबोपरीवारातील बहुतांश सदस्यांचा अशा गोष्टींशी संबंध नाही, परीचय नाही आणि विश्वासही नाही. पण असं बरंच काही आहे, असतं; जे आश्चर्यकारक आणि अनाकलनीय असतं. मला वाटतं वरील लिंग भैरवी हा सुद्धा असाच प्रकार असावा.
लिंगभैरवी हा एजुकेटेड श्रीमंत
लिंगभैरवी हा एजुकेटेड श्रीमंत उच्चभ्रूंचा सुतियापा आहे.
ते जाउद्या, तुम्ही चेड्यांबद्दल सांगा. फोटो बिटो टाका, सावध करा जनतेला.
असले चेडे एकदा सापडले असता
असले चेडे एकदा सापडले असता त्यांना हाताळण्याचा मी स्वत: एक थरारक अनुभव घेतलेला आहे, जो येथे मांडता येणार नाही.)
माबोपरीवारातील बहुतांश सदस्यांचा अशा गोष्टींशी संबंध नाही, परीचय नाही आणि विश्वासही नाही.
>>
त्या चेडेगोट्यांविषयीचा तुमचा अनुभव त्या अमानवीय धाग्यावर लिहा. वाचायला आवडेल.
{सांगितलेलं कुठलंही काम करतात
{सांगितलेलं कुठलंही काम करतात. (कु ठ लं ही ) दुसर्यांचं वाईट करण्यात माहिर असतात. दररोज यांना काम पुरवावंच लागतं. }
आपण उगाच आपल्या लाखो सैनिकांचे जीव धोक्यात घालतो. फक्त १० उपासकांची टीम आपल्या देशाचं रक्षण करायला सक्षम होईल. जेव्हा आपल्या देशाचे प्रॉब्लेम संपतील तेव्हा बाकी जगातून दहशतवाद नाहीसा करू. हाकानाका
>>बाकी जगातून दहशतवाद नाहीसा
>>बाकी जगातून दहशतवाद नाहीसा करू<<
नशिब या टेक्नॉलॉजीचं गुपित कोकणा बाहेर आलेलं नाहि. कल्पना करा, नॉर्थ कोरियाच्या हातात हे पडलं तर तो येडा काय करेल...
आरारारा रा रा रा रा. यल्ला
आरारारा रा रा रा रा. यल्ला यल्ला यल्ला यल्ला यल्ला. प्रतिसाद लै बाबौ आहेत.
Pages