सुख हिरमुसलेले होते, नि वाट वळत होती ,
क्षितिजावर खाली अशी रात उतरत होती ,
दीन वाटत होते सारे नक्षात्राचे तारे ,
जेव्हा तुझी नि माझी ही साथ हरवत होती
निसटत होते हातून माझ्या वाळूचे हे क्षण ,
कोण आसरा देई फुटता दुःखाचे हे घन ,
वाटे नौका वादळा मधली वाट विसरत होती ,
जेव्हा तुझी नि माझी........
दिशादिशातुन शांत होते या सृष्टितील सारे,
आज हरवले आस्मंतातिल लुकलुकणारे तारे,
मला-तुला न ऐकणारी अशी चिर स्तब्धता होती,
जेव्हा तुझी नि माझी........
गजबजनारे रिक्त दिशांनी आकाश चांदण्यांचे,
ऐकू येती तुलाही का आघात स्पंदानांचे ?,
प्रित विरहात सजलेली ही रात सुनी होती,
जेव्हा तुझी नि माझी........
दोन घडीची बात झाली, वारी पुन्हा दुखाची आली,
दोन क्षणांचा उजेड झाला, नि पुन्हा वेदनेची रात आली,
मृगजळे झालेली सारी स्वप्ने आसवात भिजुन होती,
जेव्हा तुझी नि माझी........
मेघ आस्मानी पुन्हा दाटले,
पुन्हा सुर्याने दार लोटले,
पण .............
आज डोळ्यातून ओघळणारी श्रावण बरसात होती,
जेव्हा तुझी नि माझी........
शांत आता का रे वाटती हे रुद्राचे वारे,
नजरेतुनही धूसर होती धगधागनारे तारे,
विरहात तुझ्या जळण्याची आता खरी सुरवात होती,
जेव्हा तुझी नि माझी ही साथ हरवत होती.....
क्षितिजावर खाली अशी रात उतरत होती,
जेव्हा तुझी नि माझी ही साथ हरवत होती.....
- नभ