कडेलोट............

Submitted by अमोल परब on 25 December, 2014 - 04:09

"हेलो.......

हेड कॉन्सेटेबल जाधव बोलतोय चारकोप पोलीस स्टेशन"

"......... "

"कधी??????"

"............."

"तुम्ही कोण बोलताय?"

"............."

" ठीक आहे तिथेच थांबा, आम्ही पोहचेपर्यंत कुणालाही बॉडीला हात लावू देऊ नका. आणि हो तुम्हीसुद्धा लांब उभे रहा"

"बिल्डिंगचे नाव काय???"

"................"

"ठीक आहे पोहचतो पंधरा मिनिटात"

एव्हढ बोलून जाधवांनी धाडकन फोन आपटला.

"भोXXच्यांना रात्री दिड वाजता सुसाईड करायची काय हुक्की येते. काय माहित?? चला चव्हाण गाडी काढा. सगळ्यांना सांगा तयार व्हायला. मी आलोच इन्स्पेक्टर सायबांना फोन करून"

LA VIEW ही ह्या परिसरातली एक उच्चभ्रू इमारत होती. वीस माळ्याची ही टोलेजंग वास्तु बघताना एका नजरेत ठरायची नाही. ह्या इमारती मध्ये स्वत:चे घर असणे हे तेथील लोक्यालिटीमध्ये स्टेटस सिम्बोल मानले जायचे. ह्या इमारतीच्या दोन्ही बाजुला समुद्र होता. समोरच्या बाजुला एक रस्ता होता आणि उरलेल्या बाजुला पालिकेचं उद्यान, ज्याचं सध्या नगरसेवक निधीतुन नुतनीकरण सुरु होतं. एव्हढं प्राईम लोकेशन असुनही येथे लोक तसे कमीच रहायचे आणि त्यातही बरेचसे फ्लेट भाड्यानेच दिलेले. कारण अस काही विशेष नाही पण बहुतेक आजुबाजुचा डाउन मार्केट परिसर कारणीभूत असावा असा अंदाज होता. अश्या ह्या शांत, सोफ़िस्टिकेटेड LA VIEW बिल्डिंगमध्ये पोलिसांच्या दोन जीप मध्यरात्री एखादया धटिगंणासारख्या रोरावत घुसल्या.

रात्रीची वेळ असुनही LA VIEW च्या कंपाऊंड मध्ये बघ्यांची बर्यापैकी गर्दी झाली होती. ड्युटीवर असलेले दोन वॉचमन्स गर्दीला आवरण्याचा अटोकाट प्रयत्न करत होते. पोलीसांनी आल्या आल्या सगळ्या परिसराला वेढा घातला.

"चला व्हा मागे, काय सुरेखा पुणेकर नाचतेय का इथं?????"

कॉन्सटेबल जाधवांनी गर्दी पांगवायला सुरुवात केली. गर्दी पांगल्यावर समोरच जमीनीवर एका तरुण मुलाची बॉडी पडलेली दिसत होती. बहुधा 30-32 वर्षाचा असावा. साधारण पाच-साडेपाच फ़ुट उंच होता. अंगावर जीन्सची पेंट वरती चेक्सच शर्ट घातलेलं. कपडे फाटलेले. उंचावरून खालच्या कॉंक्रीटच्या पेव्हमेंटवर जोरात आपटल्यामुळे बॉडीची कवटी फुटुन सगळीकडे रक्ताचा सडा पडला होता. त्या रक्तामुळे त्या बॉडीच्या अंगावरचा मूळचा निळा शर्टही अर्ध्याच्यावर लालेलाल झालेला होता. डोक्याच्या आजुबाजुला तीन चार फ़ुटापर्यंत चिंगमसारखे काही पदार्थ विखुरलेले होते. जवळ जाउन निरखून पाहिलं तर ते मेंदुचे तुकडे होते. बॉडिचे हातपाय पुर्ण फ़िरलेले होते. लहान मुलाने आपलं खेळणं उंचावरुन खाली फ़ेकावं, आणि मग तेव्हा जशी त्या खेळण्याची अवस्था होईल त्याहीपेक्षा वाईट अवस्था त्या डेडबॉडीची झाली होती. एक पोलीस त्याही परिस्थीतीत डेडबॉडीच्या बाजूने खडुचे मार्किंग करत होता. पोलीसांनी लगेच सगळा परिसर सील केला. पोलिसांसोबत आलेला फोटोग्राफर सटासट स्पॉटचे फ़ोटो काढत होता. कॉन्स्टेबल जाधवांनी आजुबाजुला पाहिलं तर बिल्डिंगच्या पोर्चमध्ये दोन सिक्युरिटी गार्डस उभे होते. त्यांच्यासोबत तिथे अजुन दोघेतिघेजण उभे होते. जाधवांनी त्यांच्याजवळ जाउन विचारले.

" तुमच्यापैकी घोसाळकर कोण आहे?"

"मी आहे" उत्तरासरशी एक 40-45 वर्षाची व्यक्ती पुढे आली.

"आम्हाला फोन तुम्ही केलेलात?"

"हो....."

"कधी झालं हे??.."

"आता तासाभरापुर्वी.....आम्ही सगळे झोपलो होतो. अचानक खाली गलका ऐकु आला. मी उठलोच होतो की दारावरची बेल वाजली. पाहिल तर दारात आमचा वॉचमन शिवदास होता. प्रचंड घाबरलेला दिसला. मला म्हणाला की लवकर खाली चला प्रॉब्लेम झालाय. मी त्याच्यासोबत खाली आलो, बघितल तर हे असं झालेल. बॉडीची हालत बघता डॉक्टरांना फोन लावण्यात काही फ़ायदा नव्हता म्हणुन मग मी लगोलग तुम्हाला फोन लावला. "

"बरं...." जाधव बोलले. जाधवांच्या अश्या थंड उत्तरावर घोसाळकर चिडून म्हणाले.

" बरं काय बरं....???? पंधरा मिनिटात येतो अस म्हणालात आणि आता पाउण तासानंतर येताय. अरे कशाला मग त्या स्कॉटलेंडच्या पोलीसांशी उगाचच्या उगाच स्पर्धा करता? आधी वेळेत यायला शिका. एकतर हे सगळ असल बघून आधीच बायका पोर घाबरलीयत आमची. दोघातिघांना चक्कर आलीय. आम्ही सगळे इकडे एव्हढे टेन्शनमध्ये असताना तुम्ही या आरामात." घोसाळकर वैतागत बोलत होते.

"तुम्ही सांगितलेल्या वेळेत यायला आम्ही काय तुमच्या आईच्या लग्नाच्या वरातीतले बेंजोवाले लागुन गेलोय का?"

पाठीमागुन आलेल्या भारदस्त आवाजाने सगळेच दचकले. घोसाळकरांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर एक उंच, स्मार्ट, कुरळ्या केसांचा आणि पिळदार शरिरयष्टिचा एक तरुण उभा होता.दमदार पावल टाकत तो तरुण घोसाळकरांच्या समोर येउन उभा राहिला.

" तुम्ही ज्यांना हे सगळं समजावताय, ते गेली पंधरा वर्ष हेच सगळं पहाताहेत. जेवताना झोपतानाही त्यांच्या डोळ्यांसमोर सगळ हेच नाचत असतं. आम्हालाही हे सगळ पहायला आवडत असं नाही पण तुमच्यातल्याच काही विकृत माणसांमुळे आमच्या वाट्याला हे भोग येतात. आम्ही पोलिसांनी तर आजवर कधी अशी कुठे तक्रार केली नाही आणि आज हे सगळ तुम्हाला फ़क्त पाउण तास सहन होत नाही. आम्हा पोलीसांना मदत करायची सोडुन उलट वर तुम्ही निर्लज्जपणे आम्हालाच शहाणपणा शिकावताय. तुमच्या वयाचा मान ठेवतोय म्हणुन नाहीतर........ "

त्या तरुणाच्या ह्या वाक्यासरशी घोसाळकर वरमले. त्यांनी हळूच जाधवांना विचारलं

"हा कोण???"

"हे आमचे सायेब.इन्स्पेक्टर धिरज..धीरज पवार. नवीनच जोईन झालेत. फार कडक आहेत. गेल्या महिन्यात एक म्हातारा असाच तुमच्यासारखा आगाउपणा करीत होता. दोन तास कोबंडा बनवून ठेवला होता त्याला. आताही सायबांची गाडी दिसली की जिथे असेल तिथून बांग देतो." जाधवांचे हे वाक्य पूर्ण होण्या आधीच घोसाळकर इन्स्पेक्टर धिरजकडे धावले.

"Hello inspector Dhiraj. Myself Mr. Ghosalkar. I am secretary of this society. Glad to meet you.."

फर्मास इंग्रजी बोलत घोसाळकरांनी शेक हेंडसाठी हात पुढे केला. उत्तरादाखल इन्स्पेक्टर धिरजने खिशातून सिगरेट काढुन शिलगावली आणि डेड बॉडीकडे गेले. बॉडीच्या भवती एक चक्कर मारून इन्स्पेक्टर धिरजने बिल्डिंगकडे एक नजर टाकली. वर पाहिलं तर बिल्डिंगची हरएक बाल्कनी त्यांच्यावरच नजर रोखुन पहात होती.

"शशांक माळकर.. रुम नं 1804, अठरावा माळा"

पाठिमागुन जाधवांनी माहिती पुरवली. इन्स्पेक्टर धिरजनी आजुबाजुला काही संशयास्पद सापडल का? किंवा बॉडिच्या खिशात काही सुसाईड नोट वगैरे सापडली का? ह्याची विचारणा केली.

"अजुन तरी काही नाही" जाधवांनी सांगितले.

"फ़ोटोग्राफ़रच इकडच काम झाल असेल तर त्याच्यासोबत अजुन एकाला घ्या आणि वर चला आणि हो बरोबर त्या सेक्रेटरीलाही घ्या"

पाच मिनीटात लिफ़्टने सहाजण अठराव्या माळ्यावर पोहचले

"ह्या इथे उजवीकडे...." घोसाळकर पुढे होत म्हणाले.

उजवीकडे थोड चालल्यावर आतल्या बाजुला एक दार होत. त्यावर "शशांक अनंत माळकर" अशी अत्यंत सुबकरित्या कोरलेली पाटी होती. बिल्डिंगची फ्लोर प्लानिंगही ह्या मजल्यावरच्या चारही रूमची प्राईव्हसी जपणारी होती. कुठल्याही दारातुन बाकीची दारे दिसत नव्हती. आता ते सहाहीजण रूम नं 1804 च्या समोर उभे होते. जाधवानी आपल्याकडल्या मास्टर की ने दरवाजा उघडला. आतमध्ये गुडुप अंधार होता.

" तुम्ही फ़क्त आमच्या सोबतच रहायचं. कुठल्याही गोष्टीला हात लावायचा नाही. विचारलेल्या प्रश्नांचीच फ़क्त उत्तर द्यायची आणि महत्त्वाचं म्हणजे आत काय काय पाहिलत हे बाहेर पडल्यावर विसरून जायचं समजलात काय..." ग्लोव्हज घालता घालता जाधवांनी घोसाळकरांना ताकीद दिली. मगाशी जाधवांनी सांगितलेल्या कोंबडा प्रकरणांमुळे घोसाळकरांची हवा टाईट झालेली होती. जाधव पुढे झाले. आतमध्ये जाउन ते लाईटच बटण शोधू लागले.

"डाव्याबाजुला असेल...." घोसाळकरांनी मार्गदर्शन केल.

घोसाळकरांनी सांगितल्याप्रमाणे डाव्या बाजुला चाचपडाताच जाधवांचा हात बटणांना लागला. नेमक दिव्याचं बटण कुठल हे शोधत न बसता. जाधवांनी होती नव्हती तेव्हढी सगळी बटण चालु केली. त्यामुळे घरातले एक साथ सगळे दिवे लागले. समोरची रूम लख्ख प्रकाशात उजळुन निघाली. रूम तशी व्यवस्थित होती. सगळेजण घरात आले. जाधव सगळ्यात पुढे होते. त्यांनी सगळीकडे एक नजर फिरवली सगळ्या गोष्टी जागच्या जागी होत्या. अशीच त्यांची नजर वर गेली आणि ते जागीच थबकले. त्याची नजर कुठेतरी अडकलीय हे लक्ष्यात येताच, सगळेजण तिकडे पाहू लागले आणि ते ही गांगरले. समोरच्याच भिंतीवर मोठ्या अक्षरात लाल रंगाने 'कडेलोट' अस लिहिलं होत. थोडा विचित्रच प्रकार होता. सोबत आलेला फोटोग्राफर सटासट फ़ोटो काढत होता. घोसाळकरांना दारात उभ राहिला सांगुन सगळेजण घरात घुसले.

इन्स्पेक्टर धिरज शांतपणे सगळ्या घरावरून आपली शोधक नजर फिरवत होते. फ्लेट एकदम आलीशान होता. १३०० चौ.फ़ुटाचा हा फ्लेट, 2BHK असल्याने अगदी ऐसपैस होता. हॉल एकदम मोठा होता. बहुतेक मोजकच सामान ठेवलेले असल्यामुळे तो अजुनच मोठा वाटत होता.हॉलच्या मध्ये एक मोठा सोफासेट समोर एक काचेच मोठ टेबल. टेबलावर एक व्हिस्कीची बॉटल कलंडलेली. ग्लासही पडलेले होते. कलंडल्यामुळे बॉटलमधली दारु बरीचशी जमिनीवर सांडलेली होती. त्याचा ओघळ सोफ़्य़ाखालीही गेला होता. टेबलावर एक गोल्ड फ्लेक च पेकेट ऐश ट्रे आणि एक इम्पोर्टेड लायटर होते. त्यावर "V" लिहिलेल होत. हॉलला लागुनच बाल्कनीला एंट्री होती. बाल्कनी कसली एक छोटा टेरेसच होता तो. अठराव्या माळ्यावर हवा ही जोरदार होती. इन्स्पेक्टर धिरज बाल्कनीत आले फारच विलोभनीय दृश्य दिसत होत तिथून. एका बाजुला निवांत पसरलेला समुद्र. त्यावरून वहात येणारा वारा शरीराला भिडताना सुखावत होता. समुद्रांच्या लाटांचा आवाज आजुबाजुच्या शांत वातावरणाच्या बेकग्रांउडवर एका गझलेसारखा वाटत होता. एका क्षणासाठी इन्स्पेक्टर धिरजच्या मनात एक विचार आला की काय साला विरोधाभास आहे. जिथे दिवसभरच्या रेटारेटीतुन पुन्हा नव्याने जगायची उमेद मिळत होती तिथूनच कुणितरी उडी मारून आपले जीवन संपवले होते.

"साहेब ज़रा इथे या ना...."

पाठीमागून आलेल्या जाधवांच्या आवाजाने इन्स्पेक्टर भानावर आले. इन्स्पेक्टर धीरज जाधवांच्या मागोमाग एका रूममध्ये गेले. ती शशांकची बेडरुम होती. तिथला नजारा हॉलच्या अगदी विरुध्द होता. हॉल जेव्हढा व्यवस्थित आणी टापटिप होता, बेडरूम तेव्हढाच अस्त्याव्यस्त आणि अजागळ होता. अस वाटत होत की कुणीतरी काहीतरी शोधाशोध करताना ह्या सगळ्या गोष्टी विस्कटल्याहेत. एका पोलिसांनी कुठे काही ठसे किंवा काही खुणा सापडताहेत का? हे शोधायला सुरुवात केलेली. तेव्हढ्यात जाधवांनी एक फोटो पुढे केला

"स्टडी टेबलावर सापडला साहेब हा फ़ोटो. हा जो डाव्याबाजुला उभा आहे ना तो शशांक आहे साहेब."

"तुम्हाला कस कळल??"

"मघाशी डेडबॉडीची झडती घेताना त्या बॉडिच्या खिशात त्याच पॉकेट सापडल. त्यातल्या ड्रायव्हिंग लायन्संस वरुन ओळखल साहेब"

"आणि हे बाकीचे तिघे????"

"ह्यांना शोधायला लागेल साहेब"

इन्स्पेक्टर धिरज यांनी तो फ़ोटो निरखून पाहिला. त्यात चार तरुण होते. समवयस्क होते. त्यातला एक शशांक होता. बाकीच्या तिघांना लवकरात लवकर शोधावे लागणार होते. त्यांचा ह्या केसशी काहितरी संबध असणार असा इन्स्पेक्टरचा अंदाज होता.

"जाधव शशांकच्या सगळ्या पर्सनल गोष्टी ताब्यात घ्या. ह्या फ़ोटोतल्या बाक़ी तिघांच्या संबधी कुठली गोष्ट सापडतेय का? ते ही पहा. हो आणि मला ह्या फ़्लेटमधल्या कोपऱ्या न कोपऱ्याचे फोटोज हवेत" जाधवांना सूचना देऊन धिरज तिथून निघणारच की त्यांची नजर समोर भिंतिवर लावलेल्या शशांकच्या फ़ोटोवर गेली. बेडरुमची ती भिंत शशांकच्या फोटोनी आणि बाक्षिसांनी व्यापलेली होती. फोटो आणी ट्रॉफ़िजवरून शशांक हॉकीमध्ये मास्टर होता हे जाणवत होता.

"जाधव ह्यातलाही एक फोटो जमा करा..." एव्हढ बोलून धिरज पुन्हा हॉलमध्ये आले.

घोसाळकर अजुनही आहे त्या जागेवरच उभे होते. इन्स्पेक्टर धिरजनी आपला मोर्चा घोसाळकरांकडे वळवला. इथे आजुबाजुला कोण कोण रहात ह्याची विचारपूस करता. ह्या मजल्यावर शशांकखेरीज रुम नं 1802 मध्ये आनंद परब रहातात बाकी उरलेल्या दोन रूम्स बंद आहेत ही माहीती घोसाळकरांनी दिली. LA VIEW च्या अठराव्या माळ्यावरच्या पेसेजमध्ये रात्रीचे सव्वा तीन वाजता तिघेजण उभे होते.

" शशांक माळकर बद्दल काही सांगु शकाल का?"

"जास्त काही माहिती नाही साहेब. कधी बोलणच झाल नाही. तसही ह्या सोसायटीतले मेंबरर्स एकामेकांशी फ़क्त AGM मध्येच बोलतात." परबांचे ह्याही परिस्थितीतले हजरजबाबीपणाचे इन्स्पेक्टरला कौतुक वाटले. हां शालजोडीतला फटका घोसाळकरांसाठी होता हे न कळण्याइतके इन्स्पेक्टर मुर्ख नव्हते. घोसाळकर परबांना उत्तर द्यायला सरसावलेच की

"जेव्हढ विचारू तेव्हढ्याचीच उत्तर अपेक्षित आहेत. शशांकबद्दल जी माहिती आहे ती सांगा" इन्स्पेक्टर धिरजनी विषय भरकटण्यापासुन वाचण्यासाठी मध्येच तोंड घातले.

"त्याच्याबद्दल खरच काही जास्त माहिती नाही हो साहेब. थोडा विचित्रच होता. कधी दिसला तर साध हसायचाही नाही. काय काम करायचा कधी कळाल नाही पण रहायचा मात्र एकदम रिच. त्याला बऱ्याच मुली भेटायला यायच्या. नक्की कुठल्या टाईपच्या हे तुम्हाला वेगळ सांगायला नको. कित्येकदा आम्ही कंप्लेट ही केली होती आदरणीय सेक्रेटरीसाहेबांकडे. पण काही उपयोग झाला नाही."

"अरे त्याच्यावर काही कारवाई करण्यासाठी तो आधी भेटायला तरी पाहिजे की नको" घोसाळकर साहेब उसळुन म्हणाले.

"कधी बघाव तेव्हा ह्याच्या घराला टाळ. रात्री कधी यायचा ते कळायच नाही आणि आला तरी नेहमी पिउन यायचा. तेव्हा त्याच्याशी काय बोलणार. घरी असला तरीही काही बोलण्याच्या शुद्धित नसायचा. त्याला आता आम्ही तरी काय करणार. उंटावरुन शेळ्या हाकणे सोप्पे असते.कधी तरी जमिनीवर या म्हणजे कळेल आता हे लोकांना कस समजावणार." घोसाळकरही काही कमी नव्हते. ह्यांच्याकडून काही जास्त कळणार नाही. उगाच आपला वेळ वाया जाणार हे इन्स्पेक्टर धिरजने ताडले.

"ठीक आहे.माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. गरज लागली तर पोलीस स्टेशनला यावं लागेल, तयारी ठेवा किंवा तुम्हाला काही आम्हाला सांगावस वाटलं तरी you are most welcome" असं म्हणून इन्स्पेक्टर निघण्यासाठी वळले. एक दोन पावलच गेले असतील की मागुन परबांची हाक ऐकू आली.

"एक मिनीट साहेब...

एक सांगायच होत. आज रात्री मी उशिरा आलो. घरी जस्ट पोहचलो दार लावलं शुज काढतच होतो की बाहेर कसलातरी आवाज झाला. कुणीतरी जोरात लिफ़्टकडे धावत गेले. मी बाहेर येउन बघितल तर लिफ़्टचा दरवाजा ऑल मोस्ट क्लोज झाला होता. त्यामुळे नक्की कोण होत ते कळु शकलं नाही. लगोलग पाठिमागुन 1804 चा दरवाजा लावाल्याचा आवाज आला. मला ज़रा विचित्र वाटलं "

"विचित्र वाटलं तर तुम्ही लगेच त्याची शहनिशा का केली नाही?" इन्स्पेक्टरनी परबांना प्रतिप्रश्न केला.

"काय करणार साहेब. गेल्या आठवड्यात पण असच झालं होत. मध्यरात्री अचानक बाहेर जोरजोरात भांडणाचा आवाज आला. बाहेर येउन पाहिल तर शशांक दारात उभा होता आणि दोन माणसे दाराबाहेर उभी होती. त्यातला एकजण धटिगणासारखा दिसत होता. त्याची भाषाही एखाद्या गुंडाला शोभणारी होती. दूसरा साधासा माणुस होता. बरयाचदा यायचा तो इकडे. चेहरया वरून चांगल्या घरातला वाटायचा. तो त्या धटिगणाला जीव तोडून आवरण्याचा प्रयत्न करत होता. नक्की भांडणाचा विषय काय होता ते काही कळाले नाही पण तो धटिंगण जाता जाता सारखा " शशांक तुला सोडणार नाही बघून घेईन " अस म्हणत होता. मला वाटल आजही ह्यातलाच पुन्हा काहीसा तरी प्रकार असेल म्हणुन गुपचुप घरी आलो." नाही नाही म्हणता परबांनी ह्या केसमधली महत्त्वाची माहिती दिली होती.

"तो धटिंगण समोर आला तर ओळखाल?"

"नक्की नाही सांगु शकत. प्रयत्न करीन . कारण त्यारात्री घाईघाईत मी माझा चष्मा लावायला विसरलो होतो आणि हां सगळा प्रकार मी माझ्या दारात उभा राहून पाहिला होता." परब म्हणाले

"धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल"

"आम्ही नेहमीच तयार असतो मदत करायला. आम्ही इतरांसारखे फ़क्त शो बाजी करत नाही" परबांनी घोसाळकरकडे पहात शेवटच्या बॉलवर छगडी मारली.

रुममधली इन्वेस्टिगेशनची सगळी प्रोसीजर पुर्ण झाल्याची खात्री पटताच इन्स्पेक्टर धिरजसकट सगळेजण निघाले. खाली उतरताच हवालदार गावकर एका सिक्युरिटी गार्डला इन्स्पेक्टर धिरजच्या समोर घेउन आले.

"साहेब हा शिवदास आज रात्री मेनगेट वर हाच होता." गावकरांनी त्या 20-25 वर्षाच्या मुलाची इन्स्पेक्टरशी ओळख करून दिली. त्या मुलाकडे पाहून हा प्रत्यक्ष आणिबाणिच्या वेळी ह्या बिल्डिंगला तर सोडाच पण स्वत:ला तरी गार्ड करू शकेल का? हा महत्त्वाचा प्रश्न इन्स्पेक्टर धिरजला पडला होता.

"हम्म....आज रात्री तू कुठे होतास?"

"इथेच मेनगेटवर साहेब" शिवदास घाबरत घाबरत बोलला.

" थांब...एक चहा आणा रे......."इन्स्पेक्टर धिरजनी पाठीमागे कुणाला तरी सांगितलं. थोड्याच वेळात गावकर एक चहा घेउन आले. तो चहा इन्स्पेक्टरने शिवदासच्या हातात दिला आणि म्हणाले

" आधी हां चहां घे, समोर बस आणि निवांत खरं खर सांग" शिवदासने इन्स्पेक्टरनी दिलेला चहा संपवला. इन्स्पेक्टरनी दिलेल्या अश्या वागणुकीमुळे तो बर्यापैकी मोकळा झाला होता.त्याच्या देहबोलीतुन ते कळतही होत. शिवदासनी सांगायला सुरुवात केली.

"साहेब आज रात्री मी मेनगेटवर ड्युटीला होतो. दुसऱ्या गेटवर दूसरा एक नवीन वॉचमन ड्युटीला होता साहेब. आज अस काही विशेष घडल नाही मात्र आज समोरच्या रस्त्यावर काही पोरं उभी होती. ह्या बाजुला ह्या अगोदर कधी दिसली नाहीत. कुणाची तरी वाट बघत होते. सारखे बिल्डिंगकडे नजर ठेवून होते. मी एक दोनदा मुद्दामून गेटवर उभा राहिलो. पण त्यांचा काय अंदाज लागेना की ती कशाला उभी आहेत कुणाची वाट बघताहेत. बर ती समोरच्या रस्त्यावर उभी असल्यामुळे हटकताही येईना. एकतर रात्रीला आम्ही दोनच वॉचमन गस्तीला आणि ती पोर चांगलीच दणकट होती. म्हणुनच मी त्यांच्यावर ज़रा लांबुनच नजर ठेवून होतो. थोडा वेळ गेला असेल की उलट्या बाजूने एक स्कॉर्पिओ आली आणि आमच्या गेटच्या अलिकडे थांबली. लगोलग त्या पोरांमधला एकजण त्या स्कॉर्पिओपाशी आला. तो इसम गाडीच्या मधल्या काचेजवळ आल्यावर काच खाली झाली. आत एक माणुस होता. आतल्या आणि बाहेरच्या माणसात काहीतरी बोलणं झालं. बाहेर उभा असलेला माणुस सारखा मान डोलवत होता. मग आतल्या माणसाने गाडीबाहेर उभ्या असलेल्या त्या माणसाच्या हातात कसलतरी पाकिट दिलं. बाहेर उभ्या असल्या माणसाने ते पाकिट घेतल्या घेतल्या गाडी झपकन निघून गेली साहेब."

"गाडीतल्या माणसाचा चेहरा बघितलास का?"

" नाही ना साहेब.. गाडी जिथे थांबलेली ना तिथेच वरती स्ट्रीट लाईट होती. त्यामुळे नेमका त्या माणसाच्या चेहरयावर काळोख पडला होता. पाकिट देतानाही फ़क्त हातच दिसला.

हात.......

साहेब आठवलं त्या माणसाच्या हातावर 'कनिष्का' अस लिहील होत. आणि त्या गाडीच्या मागे 'वीर मराठा' लिहील होत साहेब."

"बर मग पुढे..."

" पुढे ती पोरे गार्डनच्या दिशेने निघून गेली. नंतर काही ख़ास अस झाल नाही. मी खुर्चीवर बसलो होतो की एका एकी 'धप्प' असा आवाज झाला. पहिल तर कसला आवाज झाला काही कळलच नाही. आवाजाच्या दिशेने बघितलं तर पोर्चच्या समोर कुणितरी पडलेले साहेब. मी धावत त्याच्याजवळ गेलो. पाहिल तर डोळेच फिरले. मी जोरात ओरडलो. मला तर फटकन ओकारीच आली. माझा आवाज ऐकून तो दूसरा वॉचमन पण धावत आला. तो ही हे सगळ पाहून घाबरला. एव्हाना माझा आरडाओरडा ऐकून बिल्डिंग जागी झाली होती. मी त्याला इथे लक्ष्य ठेवायला सांगुन वर सेक्रेटरी साहेबांना सांगायला निघालो. मी पोर्चच्या इथे पोहचलोच असें की कुणितरी मला जोरात धडकलं. मी चमकून वर पाहिल तर एक 30 - 32 वर्षाचा माणुस होता. मी ओळखल नाही त्याला. आमच्या बिल्डिंगमधला नव्हता तो. तो प्रचंड घाबरलेला दिसत होता. मला दूर लोटून तो मेनगेटच्या दिशेने पळाला. मला काही सुचलच नाही. मी एकदम गांगरुन गेलो होतो. तो माणुस गेटवर एक दोन मिनटच थांबला असेल की ती मगासचीच स्कॉर्पिओ परत आली आणि त्या माणसाला घेउन निघून गेली".

"तुला काय माहीती की ती तीच गाड़ी होती म्हणुन" जाधवांनी मध्येच विचारलं

" तो माणुस गेटवर थांबलेला पाहून मी त्याच्या मागे पळालो. पण मी तिथे पोहचे पर्यत तो निघून गेला. त्याला घेउन गेलेल्या गाडीवरही तेच वीर मराठा लिहिलं होत" शिवदासने जाधवांच्या शंकेचे निरसन केलं.

"हे तू खरं सांगतोयस?" इन्स्पेक्टर धिरजने आपली करडी नजर शिवदास वर रोखली

"खंडोबाची शपथ्थ साहेब"

"मग मला नीट आठवुन सांग की बाहेर पडताना तुला धडकणारा माणुस तुला आत जाताना कसा दिसला नाही"

"ते साहेब.. आपलं ते....म्हणजे माझं ....."

"नीट बोल नाहीतर मघाशी गिळलेला चहा तुझ्या नरड्यातुन पिळुन काढीन" शिवदासला अस चाचपडताना पाहून इन्स्पेक्टर धिरजचा आवाज चढला शिवदास घाबरून रडायला लागला.

"मला माफ़ करा साहेब. सलग दोन दिवस ड्युटी करतोय. चुकुन डोळा लागला होता. कुणाला सांगु नका नाहीतर माझी नोकरी जाईल साहेब."

"साल्या तुझ्या हलगर्जीपणामुळे एकाचा जीव गेला आणि आता तुझी नोकरी गेली नाही पाहिजे ह्याची काळजी वाटतेय होय तुला." इन्स्पेक्टर धिरज कडाडले.

इन्स्पेक्टर धीरज विचार करू लागले. केस वाटते तितकी सरळ नाही.

*********************************

दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर धीरज शशांकच्या घरी सापडलेल्या वस्तुंवर एक नजर मारत होते. शशांकच्या खिशात चावी, एक रुमाल त्याच पाकिट आणि मोबाईल सापडला होता. मोबाइलचे कॉल रजिस्टर चेक केल असता. डायलर मध्ये हेमंत, चिनूला आणि एका निनावी नंबरला कॉल केले होते. रिसिव्हिंगमध्ये फक्त हेमंतचाच कॉल होता आणि विरुचे बरेच मिस कॉल्स होते. इन्स्पेक्टर धिरजनी शशांकच्या फ़ोनमध्ये सापडलेले ते नंबर पुन्हा एकदा डायल केले. हेमंत, चिनू आणि तो निनावी नंबरपैकी कुणाचेच नंबर लागले नाहीत. दोघांचे अनरिचेबल तर चिनूचा स्विच्ड ऑफ येत होता पण विरुच्या फोनची मात्र रिंग गेली. फोनवर बोलल्यावर कळले की हया वीरूचे पुर्ण नाव विरेंद्र गायकवाड होते.तो आमदार चंद्रकांत गायकवाडाचां मुलगा.

तेव्हढ्यात जाधव आले आणी त्यांनी सांगितले की शिवदासने दिलेल्या माहितीनुसार चौकशी केली असता अशी गाडी ह्या भागात फ़क्त एकाच माणसाकडे होती. आमदार साहेबांच्या मुलाकडे म्हणजेच विरेंद्र गायकवाडकडे उर्फ़ विरुकडे. म्हणजेच सुसाईडच्या रात्री बाहेर रस्त्यावर फ़िरणारी ती गाडी विरुची होती तर. इन्स्पेक्टर तडक उठले आणि जाधवांना म्हणाले

"चला जाधव साहेब जरा भावी मंत्री महोदयाची भेट घेउन येऊ "

जाधवांनी काही रिअक्शन दिली नाही. उलट पायातल्या पायात घुटमळत ते म्हणाले.

"साहेब रागावणार नसाल तर एक सांगायच होतं?" जाधवांच्या ह्या प्रश्नासरशी इंस्पेक्टर थांबले.

"नाही म्हणजे मला अस वाटतय की ह्या प्रकरणाशी आमदारसाहेबांचा किंवा त्यांच्या मुलाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या काहिजरी संबध असेल तर हे प्रकरण आपल्याला फार डोईजड जाणार आहे साहेब."

जाधवांच्या बोलण्याचा कल नक्की कुठे आहे हे इन्स्पेक्टर धिरजच्या ध्यान्यात आलं होते. उत्तरादाखल ते जाधवांकडे पाहून फ़क्त हसले. त्यासरशी लगेच जाधवांना त्यांची चुक उमगली आणि ते लगोलग इन्स्पेक्टर साहेबांच्या मागोमाग विरुच्या पक्ष कार्यालयाकडे निघाले.

तस बघायला गेल तर जाधव काही चुकीच बोलत नव्हते. आमदार चंद्रकांत गायकवाड ह्या जिल्ह्यातले मोठे प्रस्थ होते. राज्यातल्या राजकाराणात त्यांचे मोठे वजन होते. आजवर त्यांनी केलेल्या कार्यामुळे लोकांमध्येही त्यांना बराच मान होता. पण म्हणतात नाण्याला जश्या दोन बाजू असतात तश्या आमदारसाहेबांच्या कारकिर्दीलाही दोन बाजू होत्या. आता पक्ष चालवायचा म्हणजे काही येड्या गबाळ्याच काम नाही. आमदारासाहेब जसे जनतेत लोकप्रिय होते तसाच त्यांचा तेथील उद्योगपती, बिल्डर लोकांनमध्ये सॉल्लिड वचक होता. जिल्ह्यातली कुठलीही मोठी डील त्याच्या परवानगी शिवाय होत नसे. आता त्यांनी त्यांच्या मुलालाही राजकारणात उतरवायच ठरवल होत. यंदाच्या नगरसेवकाच्या निवडणुकीला त्यांचा मुलगा विरेंद्र उभा होता आणि तोच निवडून येणार हे त्यालाच काय तर विरोधी पक्षालाही माहिती होत. आमदारसाहेबांच्या राजकारणातील वजनामुळे पोलिसांना त्यांच्या कार्यकर्त्याना हात लावायची टाप नव्हती आणि इथे तर प्रश्न त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा होता.

इंस्पेक्टर आणि जाधव पक्ष कार्यालयात पोहचले. वीरू कार्यालयातच होता कुठल्यातरी आपल्या कार्यकर्त्याशी प्रचाराच्यासंदर्भात बोलत होता. इन्स्पेक्टर धीरजला तिथे आलेले पाहूनही विरुने त्यांना पाहून न पाहिल्यासारखं केलं. इतकच नव्हे तर त्याने त्यांना साध बसायलाही सांगितलं नाही. विरुची ही नाटक इन्स्पेक्टर च्या लक्ष्यात येत होती. पण ते काहीच बोलले नाहित. विरुचा हां आगाउपणा पाहून जाधवांची मात्र सटकली. इन्स्पेक्टर सरळ पुढे गेले आणि समोर बसलेल्या त्या कार्यकर्त्याला त्यांनी कॉलरला धरून उठवल आणि म्हणाले

"चल निघ मला तुझ्या साहेबांशी ज़रा खाजगी बोलायचय आणि हो .....जाता जाता तुझ्या साहेबांसाठी एक थंडा सांग कारण ह्यापुढचा टाईम त्यांच्यासाठी फार गरम जाणार आहे"

इन्स्पेक्टर साहेबांच्या अश्या एंट्रीनंतर खरतर वीरू थोडा वरमलाच होता पण वरवर तस न दाखवता चेहरयावर उसन हसु आणुन तो म्हणाला.

"अरे इन्स्पेक्टर साहेब, आज इकड कुठे? मला बोलावल असत तर मी स्वत: आलो असतो"

"शशांक माळकरला ओळखता का?" विरुच्या नमस्कार चमत्काराला न भूलता इन्स्पेक्टर धीरज सरळ मुद्द्यावर आले.

"कुठल्या शशांक माळकर बद्दल बोलताय तुम्ही?" विरुने अजाणतेपणाचा आव आणत विचारले. उत्तरादाखल जाधवांनी शशांकच्या घरी सापडलेला फ़ोटो विरुच्यासमोर ठेवला. तसा विरुच्या चेहर्यावरचा रंग उडाला.

"अरे हो, हा तर माझ्या शाळेतला मित्र आहे. दररोज इतक्या लोकांना भेटतो की फार गोधंळ उडतो कधी कधी" वीरू सावरत म्हणाला.

"काल सुसाईड केली त्याने...."

"काय सांगताय काय? अरेरे..फार वाईट झालं" वीरू म्हणाला. विरुची ही रिअक्शन अत्यंत नाटकी आहे हे इन्स्पेक्टर धिरजच्या चाणाक्ष नजरेतुन सुटले नाही.

"काल रात्री तुम्ही कुठे होतात?" इन्स्पेक्टरच्या या अनपेक्षित प्रश्नाने वीरू एकदम चमकला.

"कुठे म्हणजे???"

त्याने खिशातून एक सिगरेट काढली आणि लायटर शोधू लागला. तेव्हढ्यात इन्स्पेक्टर साहेबांनी लायटर पुढे केलं. इन्स्पेक्टरच्या हातातल लायटर पाहून वीरू थंडच झाला.

"काय झालं? ओळखीच वाटतय का? "

विरुची हालत पाहून इन्स्पेक्टर धीरजनी विरुला विचारले.

"नाही काही नाही मी ही पूर्वी असलं लायटर वापरायचो"

"हो का ? मग आता कुठे गेल ते?"

"हरवल"

"कुठे?"

"माहिती असत तर शोधल नसत का?"

इन्स्पेक्टरच्या प्रश्नाला वीरूने वैतागत उत्तर दिलं. उत्तरादाखल इंस्पेक्टर हेतुपुर्वक हसले त्यांनी विरुला पुन्हा तोच प्रश्न केला.

" बर तर काल रात्री तुम्ही कुठे होतात?"

"कुठे म्हणजे? पक्ष कार्यालयातच होतो."

वीरू नजर चोरीत म्हणाला.

"तुम्ही जर का पक्ष कार्यालयातच होतात तर मग तुमची गाडी LA VIEW च्या बाहेर काय करत होती?"

"ते आपलं ....ते म्हणजे......त्याच काय आहे की हल्ली निवडणुका जवळ आल्या आहेत. म्हणुन कार्यकर्ते घेउन जातात कधी कधी माझी गाडी"

इन्स्पेक्टरच्या प्रश्नांची उत्तर देताना विरुची भंबेरी उडत होती.

"अच्छा म्हणजे सुसाईडच्या रात्री त्यावेळेस जी संशयीत माणसे तिथे हजर होती ती तुमची माणसे होती तर........"

वीरू इन्स्पेक्टरच्या प्रश्नांची उत्तर देताना चांगलाच अडकत होता.

"तुम्ही काहीही काय बोलताय. नुसती माझी गाडी तिथे त्या सिक्युरिटी गार्ड़ने पाहिली म्हणुन तुम्ही माझ्या माणसांवर वहिम ठेवताय."वीरू वैतागुन ओरडला.

" तुम्ही तर तिथे नव्हतात तर मग तुम्हाला कस कळल की तुमच्या माणसांना तिथल्या सिक्युरिटी गार्डने पाहीले म्हणुन.....???"

इन्स्पेक्टरच्या ह्या गुगलीवर वीरू पुरता फसला. त्याने खिशातला रुमाल काढुन कपाळावरचा घाम पुसायला घेतला.

"कनिष्का"

इन्स्पेक्टरांनी नाव उच्चाराताच वीरू दचकला

"नाही तुमच्या हातावर कोरलय .....कोणाच नाव आहे हे????"

"माझ्या मुलीच"

"त्यारात्री म्हणजे तुम्ही.........."

तेव्हढ्यात इन्स्पेक्टर धिरजचा फोन वाजला. पाहिल तर DCP साहेबांचा फोन होता.

"हेलो सर......"

"......................"

"पण सर.........."

"........................"

"........................."

"ठीक आहे सर..."

"........................"

"OK सर..........."

इन्स्पेक्टर धिरजनी वैतागुन फोन कट केला. नाराजी त्यांच्या चेहरयावर स्पष्ट दिसत होती. इतक्या वर्षाच्या अनुभवावरून काय झाले असावे ह्याचा थोडा अंदाज जाधवांना आला होता. पण तरीही त्यांनी हळूच विचारले.

"काय झाले साहेब.कुणाचा फोन होता..."

"काही नाही भावी नगरसेवकाची आम्ही उसवतच होतो की अगोदरच शिवणार्याचा फोन आला. असो......."

एक उसासा सोडुन इन्स्पेक्टर विरुकडे पाहून बोलले.

"चला आदरणीय गायकवाड साहेब. येतो आम्ही आता.पण लवकरच भेटु"

पोलिस स्टेशनला आल्या आल्या चव्हाणांनी इन्स्पेक्टर धीरजला सांगितले की हेमंतला फोन लागलाय पण सध्या तो कामानिमित्त चिपळुनला आहे.आज संध्याकाळपर्यंत हजर होतो म्हणालाय.

"ठीक आहे आणि बाकीच्या दोन नंबरच काय झालं?"

"चिनुचा आणि तो निनावी नंबरचा अजुनही कॉण्टेक होत नाही आहे सर" चव्हाणांनी सांगितले

"ठीक आहे उद्यापर्यंत वाट पहा नाहीतर ह्या दोन्ही व्यक्तिंच्या विरुध्द अटक वॉरेंट काढा आणि मला पोस्टमोर्टमचा रिपोर्ट लवकरात लवकर हवाय."

इन्स्पेक्टर धिरजनी चव्हाणांना सूचना दिल्या.

संध्याकाळी हेमंत सांगितल्याप्रमाणे पोलीस स्टेशनला हजर झाला. त्याच्याकडे पाहून तो ऑलरेडी बराच घाबरला असल्याचे जाणवत होते. बहुतेक तो पहिल्यांदाच पोलीस स्टेशनची पायरी चढत होता. टिपिकल मध्यमवर्गीय पर्सनेलिटी असलेला हेमंत व्यवसायाने सॉफ़्टवेअर इंजिनिअर होता.

"ह्याला ओळखता???"

शशांकचा फ़ोटो समोर ठेवून इन्स्पेक्टरनी हेमंतला विचारले.

"हो........"

"कस काय??"

"माझा मित्र होता तो. होता म्हणजे आहे?"

हेमंत बोलताना झालेली चुक लगेच सावरत म्हणाला.

"नाही हेमंतसाहेब तुम्ही अगोदर बरोबर म्हणालात. होता....कारण तुमचा मित्र आता ह्या जगात नाही....."

"............."

"काल रात्री सुसाईड केली त्याने"

हे ऐकून हेमंत रडायलाच लागला. त्याचा तो आवेग ओसरता इन्स्पेक्टरांनी हेमंतला विचारलं.

"काल रात्री तुम्ही कुठे होतात?"

"त्याचा या सुसाईडशी काय संबध?"

हेमंतने वैतागुन इन्स्पेक्टरांना म्हणाला

" संबध आम्ही कुठे जोडतोय? उलट तुम्हीच असे वागून आम्हाला तो जोडायला भाग पाडताय. नीट आठवुन सांगा काल रात्री तुम्ही कुठे होतात ते?"

इन्स्पेक्टर धिरजच्या शांत आवाजातली जरब ऐकून हेमंत गार झाला.

"काल रात्री मी इथे नव्हतोच. कामानिमीत्त परवाच चिपळुनला गेलेलो .ज्या कामासाठी गेलेलो ते कामही झालं नाही आणि येताना उशीर झाला म्हणुन मित्राकडे माणगावला थांबलेलो. तिथून आज आलोय."

"कश्यावरुन? तुमच्या ह्या म्हणण्याला पुरावा काय?"

"पुरावा म्हणजे?? हे बघा माझ माणगाव ते मुंबईच परतीच टिकिट" एव्हढ बोलून हेमंतने तिकिट इन्स्पेक्टरच्या हातात दिलं. तिकिट पाहून इन्स्पेक्टर म्हणाले

"ही असली तिकिट पुरावा म्हणुन गृहीत धरली जात नाहित"

"What do you mean? गृहीत धरली जात नाहित. हे अस होणार आहे, हे माहीती असतं तर सगळे पुरावे जपून ठेवले असते " हे सगळ ठासून सांगताना हेमंतचा आवाज मात्र कुठेतरी कॉन्फ़िडेंट वाटत नव्हता. कुणितरी पढवल्या सारखा वाटत होता.

"बर ........मग तुम्ही तुमच्या ह्या मित्राला शेवटच कधी भेटला होतात?"

इन्स्पेक्टरच्या ह्या प्रश्नांवर हेमंत गडबडला.

"त्याला मी एक ......नाही नाही दोन आठवड्यापुर्वी भेटलो होतो. आणि इन्स्पेक्टर मी आता जाऊ शकतो का? माझी तब्येत नीट नाही वाटत आहे"

हे बोलताना हेमंत फार तणावाखाली वाटत होता.

"ठीक आहे. आता जा तुम्ही .पण आत्तापर्यंत तुम्ही दिलेली सगळी माहिती खरी आहे असे समजतो आम्ही. पण ह्यातल काहिजरी खोट आढळलं तर मात्र तुमचा आणि तुरुंगाचा संबध मात्र मी नक्की जोडीन" इन्स्पेक्टर धिरजने परवानगी दिल्यावर हेमंत जवळ जवळ पळतच बाहेर गेला.

"साहेब उगाच सोडला तुम्ही त्याला. अजुन थोडा टाईट केला असता ना तर....." जाधवांनी आपला त्रागा व्यक्त केला.

"सगळ्या गोष्टी आजच नको जाधव. नाहीतर केस मधली मजाच निघून जाइल. वीरू आणि हेमंत ह्याच्यांवर बारीक लक्ष ठेवा."

त्यारात्री इन्स्पेक्टर शशांकच्या घरी सापडलेल्या वस्तु पुन्हा पहात होते. त्या हेमंतला पाहिल तेव्हा त्यांना फ़ोटोतला तिसरा माणुस सापडला होता. आता उरलेला शेवटचा माणुस कोण असेल चिनू की तो निनावी नंबर हाच विचार करत असताना धिरजच्या टेबलावरचा फोन खणखणला. पलिकडे जाधव होते.

"नमस्कार जाधव बोलतोय साहेब. आता मी दर्या किनार्याला आहे . थोड्या वेळापुर्वी इथे माझ्यासमोर वीरू आणि हेमंत बसले होते. काहीतरी महत्वाचं बोलत होते साहेब. अचानक वीरू भडकला आणि हेमंतवर वैतागुन निघून गेला. हेमंत तिथेच बसला होता. वीरू गेल्यावर थोडा वेळाने हेमंतला त्याच्या सेल फोनवर कसलातरी मेसेज आला आणी तो मेसेज वाचुन तो जाम अस्वस्थ झाला साहेब." हेड कॉन्स्टेबल जाधवांनी एका दमात सगळी माहिती दिली.

"ठीक आहे जाधव. त्यांच्यावर असच लक्ष ठेवा आणि मला अपडेट देत रहा."

फ़ोन ठेवताच धीरज विचार करू लागले.

नक्कीच काहीतरी गडबड आहे. हेमंत आणि वीरू काहीतरी लपवताहेत हे मात्र नक्की.

********************************

शशांकच्या सुसाईडनंतर आजचा तीसरा दिवस होता. त्याच्या फोनबुक मधले दोघजण अजुनही सापडले नव्हते. एक होता चिनू आणि दूसरा होता तो निनावी नंबर. केसच्या दृष्टीने ह्या दोघांचा लवकरात लवकर तपास लागणे गरजेचे होते. चिनुच्या रहात्या पत्त्यावर पोलिस जाउन आले होते. चिनू घरी नव्हता.शेजार्यांकडे चौकशी करता तो तीन चार दिवस झाले दिसला नव्हता. बहुतेक कामानिमित्त बाहेरगावी गेला होता.

दुसरीकडे एक विचित्र तिढा निर्माण झाला होता. शशांकच्या नातेवाइकांनी

शशांकची बॉडी ताब्यात घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्याचा आणि घरच्यांचा संबध फार पुर्वीच संपला असल्याचे कळले. शशांकबद्दल इतरस्त्र चौकशी केली असता. सगळीकडून त्यांच्याबाबतीत वाइटच माहीती कळत होती. शशांकच्या नावावर बरेच फ़सवणुकीचे किस्से सर्वश्रुत होते. आता त्याच नशीब चांगल होत की निगोशिएशन ते माहीत नाही पण ह्यापैकी कुठल्याही गुन्ह्याची पोलीसी दफ्तरी नोंद नव्हती. त्याचे वडिल गेल्यानंतर त्याने चलाखीने प्रोपर्टीचा सगळ्यात मोठा हिस्सा त्याने स्वत:च्या पदरात पाडून घेतला होता. त्याच्याच जीवावर त्याच आजवरच सगळ चालत होत. LA VIEW मधला फ़्लेटही ह्याच पैश्यातुन घेतला होता. भारिसभर म्हणुन शशांकचा शौक़ीन मिजास ही त्याच्या बदनामीला कायम ठेवण्यासाठी हातभार लावत होता. बाई आणि बाटली त्याची कमजोरी होती. खर तर त्याच्या मृत्युमुळे बऱ्याच लोकांनी सुटकेचे निश्वास टाकले असतील अस म्हणायलाही वाव होता.

सकाळी सकाळी चव्हाण घाईघाईत इन्स्पेक्टर धिरजच्या केबिनमध्ये शिरले त्यांनी खरच महत्त्वाची माहीती आणली होती.

शशांकच्या सुसाईडच्या आठवडयाभरापुर्वी साई दर्या मध्ये शशांक आणि विरुची बाचाबाची झाली होती. त्या वेळेला विरुने शशांकला जीवे मारण्याची धमकी दिली होती. वेटरने तशी लेखी जबानी दिली होती. तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीने मध्यस्थी केलेली. इन्स्पेक्टर धिरजनी वेटरला फ़ोटो दाखवताच धमकी देणारा व्यक्ती म्हणुन विरुवर बोट ठेवले. आणि मध्यस्थी करणारा तो चौथा व्यक्ति होता ज्याची अजुन ओळख पटायची होती.

चिनुचा अद्याप पत्ता लागला नव्हता. इन्स्पेक्टर सर्च वॉरेंट काढण्याच्या तयारीत होते.

शेवटचा प्रयत्न म्हणुन त्यांनी चिनुला पुन्हा फोन लावला. ह्यावेळेस मात्र रिंग गेल्या. चार पाच रिंग नंतर समोरून फोन उचलला गेला. चिनुची चौकशी केली असता उत्तरादाखल एका मुलीचा आवाज आला. त्या मुलीने चिनूची एव्हढी चौकशी कश्यला करता अस विचारताच. इन्स्पेक्टर धिरजनी स्वत:ची ओळख सांगून घडलेला प्रकार सांगीतला. थोडावेळ समोरून काही रिस्पोंस आला नाही. इन्स्पेक्टर धिरजनी चिनुची पुन्हा चौकशी केली असता अचानक त्या मुलीने "Wrong number" सांगुन घाईघाईत फोन कट केला. इन्स्पेक्टरनी पुन्हा फोन केला असता फोन बिझी येत होता. इन्स्पेक्टर धीरजला संशय आला.

दोन तीन मिनिट झाली असतील तसा समोरून चिनुच्या नंबरवरुन फोन आला.

तीच मुलगी होती. तिने इन्स्पेक्टरला सांगितले की ह्या प्रकरणात चिनुला काही होणार नसल्यास तरच स्वाधीन करणार. इन्स्पेक्टर धिरजनी चिनू निर्दोष असल्यास त्याला काहीही होणार नाही अशी हमी देताच त्या मुलीने स्वत:चा पत्ता दिला आणि सांगितले की चिनू तिच्याकडे तिच्या घरीच आहे. पण घरी येताना दोघ तिघच या आणि कृपया येताना सिव्हिल ड्रेस मध्येच या.नाहीतर उगाचच बदनामी होईल अशी विनंती केली.

लगोलग पोलीस दिलेल्या पत्त्यावर हजर झाले. मलाड पश्चिमेला मढच्या बीचपासून दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावर एक टुमदार दुमजली बंगला होता.

जाधवांनी दारावरची पाटी वाचली

डॉ. विजय निकम

एक दोनदा बेल वाजवूनही दार उघडले नाही म्हणुन जाधव तिसर्यांदा बेल वाजवणार तेव्हढ्यात आतून दार उघडल्याचा आवाज आला. एक 25-26 वर्षाची तरुणी दारात उभी होती.

"सोनाली???" इस्पेक्टर धिरजनी विचारले.

"yes कोण हवय आपल्याला?"

"मी इन्स्पेक्टर धीरज चारकोप पोलिस स्टेशन मगाशी आपल फोनवर बोलण झालं होत चिनुच्या बाबतीत" आपलं ओळखपत्र सोनालीच्या हातात देत इन्स्पेक्टरनी स्वत:ची ओळख करुन दिली. ओळखपत्र बघून सोनालीने इन्स्पेक्टर धीरज आणि त्याच्यासोबत आलेल्या जाधव आणि चव्हाणांना घरात घेतलं. सोनाली दिसायला एकदम सुंदर होती. कितीही स्वत:ला आवरल तरी तिला सारख सारख पहायचा मोह आवरत नव्हता. सोनालीला पाहून इन्स्पेक्टर थोड्यावेळासाठी आपण इथे कुठल्या कामानिमित्त आलो आहोत ते देखिल विसरले. पण लगोलग भानावर येत त्यांनी सोनालीला चिनुबद्दल विचारले.

"चिनू कुठाय?"

उत्तरासरशी तीने आतल्या खोलीकडे निघाली. मागोमाग ते तिघेही. ते जस जसे आत जात होते आतून कुणितरी जोरजोरात ओरडण्याचा आणि दार वाजवायाचा आवाज येत होता. अखेर सगळे त्या खोलीजवळ आले जिथून हां आवाज येत होता. खोलीला बाहेरून टाळे होते.जाधवांनी सोनालिकडे चावी मागितली इन्स्पेक्टरानी सोनालीकड़े पाहिल ती खुप भेदरलेली दिसत होती.

दार उघडताच समोर कुणीच दिसल नाही. जाधव आणि चव्हाण सावधपणे आत शिरले.

त्यांनी पाहिलं की आत एक 30-32 वर्षाचा एक तरुण कोपर्यात शरीराची पुरचुंडी घालून बसला होता. प्रचंड घाबरलेला. कश्यापासुन तरी लपायचा प्रयत्न करत होता. तो तोडांने सतत काहीतरी पुटपुटत होता. राजे राजे मी नाही काही केलय. आता कडेलोट होणारच अस काहीतरी. त्या तरुणाने जाधवांना समोर पहाताच जोरजोरात किंचाळ्या मारायला सुरुवात केली आणि हातापाया जोडून गयावया करू लागला. इंस्पेक्टर धिरजनी सोनालीला खुणेनेच विचारले की हाच चिनू आहे का? तिने होकारार्थी मान हलवली. तसे त्यांनी जाधव आणी चव्हाणाना इशारा केला. जाधव आणि चव्हाणांनी चिनुला उठवल तेव्हा त्याला धड उठताही येइना. त्याच्या हातावर खरचटल्याच्या खुणा होत्या. हाताच्या पंजावर एक खोल घाव होता. तो पळायचा प्रयत्न करीत असताना जाधवांनी त्याला धरला. आणि ते इन्स्पेक्टरला म्हणाले"साहेब अंगात ताप आहे ह्याच्या". चिनू राजेच्या नावाने आता जोरजोरात ओरडत होता. मदतीसाठी वीरू शशांक आणी हेमंतला हाका मारत होता. कडेलोट होणार सगळ्यांचा कडेलोट होणार अस म्हणत हसायला लागला. चिनू प्रकरण थोड विचित्रच दिसत होतं. अखेर चव्हाणांनी चिनुच्या तोडांत बोळा कोंबला आणि अक्षरश: उचलून घेउन गेले. चीनुला घेउन जाताच सोनाली मटकन खाली बसली. आणि रडायला लागली. तिचा थोडा आवेग ओसरताच इन्स्पेक्टरांनी तिला विचारले

"Are you OK??"

"Ya i m fine"

सोनाली आता सावरली होती.

"कधीपासून होतय हे अस?"

"कालपासुनच जेव्हा तो लोणावळ्याहून आलाय."

"चिनू लोणावळयाला कशाला गेलेला?"

"ऑफ़िसच्या कामासाठी गेला होता"

"मग"

"मग काही माहिती नाही परवा पासून त्याचा फोन लागत नव्हता मी फार काळजीत होते. अचानक काल रात्री हा घरी आला तोच ह्या अश्या अवस्थेत. तिकडच्याच हॉटेलवाल्यांनी ह्याला इथे आणुन सोडला" सांगुन सोनाली पुन्हा रडायला लागली.

"हम्म...कसलातरी फार मोठा धक्का बसलाय त्याला. त्याच्या अंगावर ह्या जखमा कसल्या?"

"माहिती नाही काल आला तोच हां असा"

"मग तुम्ही डॉक्टरांना नाही बोलावलत? आणि चिनूला विचारल नाहीत का ? काय झाल म्हणुन?" इन्स्पेक्टरांनी टिपिकल चौकशी सुरु केली.

"मी बराच प्रयत्न केला पण हां काही सांगायलाच तयार नव्हता सारखा कुठेतरी लपायला बघतोय, तोंडाने कडेलोट कडेलोट बोलतोय. मी डॉक्टरांना फोन करणार तेव्हढ्यात हां गच्चीवर पळाला . मी वेळेवर पोहचले म्हणुन नशीब नाहीतर त्यांने वरुन जवळ जवळ उडी मारलीच होती. मी कसा बसा त्याला खाली आणला आणि त्याला ह्या खोलीत डांबुन ठेवला. मला तर काय करायच सुचतच नव्हत. आज तुमचा फ़ोन आला आणि सांगितलत की शशांक वारलाय. त्याच संदर्भात तुम्ही चिनुला शोधताय हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी तुमचा फोन कट करून लगेच विरुला फोन लावला. त्यानेच सांगीतल की तुम्ही सांगताय ते खर आहे. म्हणुन मी तुम्हाला फोन करून बोलावून घेतल. पण मी खर सांगते इन्स्पेक्टर साहेब माझा चिनू खुप साधा आहे हो. तो कधीच कुणाच काही करू शकत नाही. प्लीज तुम्ही त्याला सोडा." सोनाली इन्स्पेक्टरला विनवु लागली.

"हे बघा मेडम चिनू ज़र का निर्दोष असेल तर त्याला काहीही होणार नाही. बाय द वे चिनू तुमचा कोण ?" इन्स्पेक्टर धीरज सोनालीला आपल्या परीने शांत करू पहात होते.

"चिनूशी माझ लग्न ठरलय"

सोनालीने हे सांगताच धीरज का कुणास ठावुक पण तिथुन लगेच निघून जायची इच्छा झाली पण लगेच त्याने स्वत:ला सावरल.

"तुम्ही एकट्या रहाता?"

"नाही आई बाबा सध्या US ला गेलेत महिन्याभरासाठी आणी नेमक हे लफड होउन बसलय"

"ठीक आहे निघतो आम्ही आता. तशीच काही गरज वाटली तर आम्ही तुम्हाला कळवु" एव्हढ बोलून इन्स्पेक्टर धीरज सोनालीच्या घरून निघाले. सोनालीकडुन निघताना निदान एक गोष्ट तरी चांगली झाली होती ती म्हणजे शशांकच्या गृप फ़ोटो मधली सगळी केरेक्टरर्स आता सापडली होती.

******************************

आज पुन्हा LA VIEW च्या सिक्युरिटी गार्डला चौकशी साठी पोलिस स्टेशनला बोलावले होते. कितीजण असतात, शिफ़्ट कधी बदलते, कुठल्या वेळेस कोण कुठे असतो अशी जुजबी चौकशी झाल्यावर इन्स्पेक्टर धिरजनी शिवदासला शशांकच्या घरी सापडलेला तो फ़ोटो दाखवला आणि त्या रात्री ह्यांच्यापैकी कोणी तुला दिसलेले का? असे विचारले.

इन्स्पेक्टर धिरजनी दाखवलेला तो फ़ोटो पाहून त्यारात्री आपल्याला धडकलेला तो इसम हेमंत असल्याची माहिती शिवदासने इन्स्पेक्टरला दिली.

जाधवांनी शिवदासला पुन्हा एकदा विचारता त्यारात्री आपल्याला धडकलेली ती व्यक्ती दूसरी तीसरी कुणी नसून हेमंतच होती हे शिवदासने शपथेवर सांगितले. शिवदास म्हणण जर का खर असेल तर ह्याचा अर्थ एकच होता की सुसाईडच्या रात्री हेमंत मुम्बईतच होता. इन्स्पेक्टरांनी जाधवांना लोकल ट्रेव्हल्सवाल्यांकडे त्या रात्रीची चौकशी करायला सांगितली.

दोन तासात जाधवांनी माहीती काढुन आणली. इन्स्पेक्टरचा अंदाज खरा ठरला होता. सुसाइडच्या रात्री हेमंत मुंबईतच होता. त्या रात्री शशांकच्या सुसाईडनंतर हेमंतचं एका लोकल ट्रेव्हल्सवाल्याकडे कोकणात जाणारया बसमध्ये बुकिंग सापडल होत आणि हेमंत माणगावला उतरला होता हे ड्रायव्हरने कबुली दिली होती. त्याच्या बरोबर अजुन कुणी होत का ह्याची चौकशी केली असता. त्याच्या बरोबर अजुन कुणी नव्हत पण हेमंतला सोडायला गायकवाड साहेबांची गाडी आली होती ही महत्त्वाची माहीती त्या ट्रेव्हेल्सवाल्याने पोलिसांना पुरवली. सिक्युरिटी गार्ड आणी ट्रेव्हेल्सवाल्याच्या जबानी मुळे संशयाची सुई आता हळुहळु हेमंत आणि विरुवर येउन स्थिरावली होती.

हेमंत आणि विरु दोघांनाही इन्स्पेक्टर साहेबांनी पुन्हा चौकशीसाठी बोलावले. पण ह्यावेळेस मुद्दामून एकत्र बोलावले. इन्स्पेक्टरांनी आल्या आल्या दोघांनाही हा राजे कोण आहे म्हणुन विचारलं. अचानक राजेचे नाव ऐकताच हेमंत आणि वीरू दोघेही चपापले. हेमंत काही बोलला नाही. त्याने घाबरून विरुकडे पाहिल पण वीरू नॉर्मल होता. इन्स्पेक्टरच्या ह्या प्रश्नाला वीरूने स्पष्ट शब्दात नकार दिला आणि ह्यापुढे ह्या प्रकरणासंबधी अगोदर आमच्या वकिलाला भेटावे असा आगाऊ सल्लाही दिला. विरुची ही अरेरावी ऐकून इन्स्पेक्टरांनी पुढच्याच क्षणाला शिवदास आणि त्या ट्रेव्हेल एजंटला बाहेर बोलावले. सिक्युरिटी गार्डने त्या रात्री आपल्याला धडकलेली व्यक्ति म्हणुन हेमंतकडे बोट दाखवले आणि त्या ट्रेव्हेल एजंटनेही त्या रात्री आपण हेमंतला आपल्या बसमध्ये बुकिंग दिल्याचे कबूल केले. सिक्युरिटी गार्ड आणि त्या ट्रेव्हेलवाल्याला समोर पाहून हेमंतची वाचाच बसली. आता आपण पुरते अडकलोय हे लक्ष्यात येताच तो रडायलाच लागला. आणि रडता रडता 'मी काही केलेल नाही साहेब. हे सगळ राजेने केलय.' अस काहीबाही बोलायला लागला.

"नीट काय ते सांग" जाधवांनी दरडावुन विचारले.

"सांगतो साहेब सगळ खर खर सांगतो"

हेमंतने पोलिसांसमोर शरणागती पत्करताच विरुने कपाळावर हात मारला. पण आता त्याच्या हातातून वेळ निघून गेली होती. विरुकडे एक नजर टाकुन हेमंत सांगु लागला

"अगदी काल परवाचीच गोष्ट वाटते साहेब. ह्या वर्षीच में महिन्याच्या अखेरीस आमच्या शाळेचे रियूनियन झालेले, तेही थोड्याथोडक्या नाही तर तब्बल सतरा वर्षानंतर. चिनुनेच ओर्गनाईज केले होते. सगळ्यांना आमंत्रणापासुन ते रात्री निघताना सगळ्यांना गिफ़्ट काय द्यायचे इतपर्यंत सबकुछ चिनुच होता. आम्ही सगळे मित्र मैत्रीणी बऱ्याच काळानंतर एकत्र येत होतो. तसे मी, वीरू, चिनू आणि शशांक एकामेकांना शाळेपासुनच ओळखायचो. त्यातल्या त्यात मी आणी चिनू तर एकाच वर्गातले त्यामुळे ज़रा जास्तच जवळचे. शेवटच्या दोन एक वर्षापर्यंत एकामेंकाना महिन्यातून निदान एक दोनदा भेटायचोही. तेव्हा चिनू आमच्याच गल्लीत रहायचा. म्हणजे आताही रहातो पण आता आमच्या दोघांच्याही कामाचा प्रपंच वाढल्याने पुर्वीसारख्या भेटीगाठी होत नव्हत्या. गेल्या सतरा वर्षात पुलाखालून बरच पाणी गेल होत. त्यावेळची होपलेस पोरंही आज व्यवस्थित मार्गस्थ झाली होती.

वीरूने स्वत:चा व्यवसाय सुरु केलेला. मुंबई उपनगरात त्याच्या फिटनेस सेंटरची चेन होती आणि जोडीला वडिलासोबत आता तो राजकारणातही उतरला होता. यंदा विभागातुन नगरसेवकाच्या निवडणुकीसाठी उभा राहिलेला. पुर्वीचच दणकट व्यक्तिमत्त्व आता कर्तुत्वाने भारदस्तही झाल होत. तो ह्या रियूनियनला त्याच्या प्रचाराच्या दृष्टिकोनातुनच बघत होता. चिनू शाळेत होता तसाच शांत, साधा सगळ्यांचा आवडता, स्वत: CA होता. मधल्या काळात त्याने स्वत:ची CA फर्म काढली होती. चिनू होताच तसा मेहनती. शशांकने काय संगितलं ते कुणालाच काही कळलं नाही. काहीतरी इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझीनेस आहे अस म्हणाला. तो तसा पहिल्यापासूनच बाताड्या. त्यामुळे आम्ही त्याच म्हणन एव्हढ काही सिरिअसली घेतल नाही. आताही त्याच्या बोलण्यात लाखाच्याखाली एक रुपया नव्हता. ह्याच रियुनिअनला आम्हाला राजे भेटला.

त्याच खर नाव 'विवेक भोसले'. सुरुवातीला तो कुठल्या वर्गात होता हे कुणाला आठवेच ना. बर्याच लिंक आणि त्याने दिलेल्या संदर्भानंतर चिनुला आठवलं की राजे सातवीलाच शाळा सोडुन गेलेला होता. FaceBook वर चिनुने टाकलेल रियुनिअनचं इन्व्हिटेशन वाचुन स्वत:हुन आला होता. ऐकून थोड अजबच वाटल पण आता तो आलाच होता तर ह्या बाबतीत बोलण्यात सध्या तरी काही अर्थ नव्हता. हा राजे म्हणजे अजब वल्ली होता. बराचसा बोलबच्चन. उगाचच मध्ये मध्ये करत होता. शिवकालीन इतिहासाची बरीच माहीती होती त्याला. निदान तस दाखवत तरी होता. बोलता बोलता तो म्हणाला की त्याच्यामते त्याच घराण हे शिवाजी महाराजांच्या कुळाशी निगडीत आहे. म्हणुनच त्याला हे सगळं माहिती. मला आणि विरुला तर त्याच काही खर वाटत नव्हतं. प्रेमाने त्याला ओळखणारे सगळे त्याला "राजे" असे म्हणतात हे देखिल त्यानेच आम्हाला सांगितले. मला तर तो सनकीच वाटत होता. व्यवसायाने राजे कमर्शिअल फोटोग्राफर होता. तिथेही तो स्वत:चा केमेरा घेउन आलेला. बऱ्याच जणांचे फोटोही काढले त्याने. असे हे शिवरायांचे वंशज या जगात मात्र एकटेच होते. ना कुणी आगा ना पिछा.

त्या रियूनियनला चिनुने फार उत्तमरीत्या ओर्गनाईज केल होत. फार मजा केली. काही लोकांनी गाणी म्हटली, चिनुने हसवा फसवी नाटकातले काही केरेक्टरर्स अगदी हुबेहूब सादर केले. एव्हढ्या वर्षानी भेटल्यामुळे सगळीकडे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते पण ह्या रियुनिअनच खर आकर्षण कुणीतरी वेगळंच होत.

'सोनाली'

सोनाली... चिनुची होणारी बायको. पुरुषानीच नाही तर बायकांनीही मागे वळुन पहाव अशी जोरदार पर्सनालिटी.

तिला पाहून लहानपणी गोष्टीतून ऐकलेली परिराणी खरच अस्तित्वात असावी अशी खात्री पटत होती. चिनुला एव्हढी चांगली बायको भेटल्याबद्दल मुलींना चिनुचे कौतुक तर आम्हा मुलांना त्याच्या नशीबाचा हेवा वाटत होता. बहुतांशी सगळेजण तिच्याशी ओळख करून घ्यायला उत्सुक होते. राजेने त्यादिवशी काढलेल्या फ़ोटोमध्ये तिच्याच फ़ोटोंचा भरणा अधिक होता.

अश्या ह्या सोनपरीशी आमची त्यारात्री चिनुमुळे ओळख झाली.

रियुनियन नंतरही आम्ही whatsapp वर संपर्कात होतो. हा गृपही चिनुनेच बनवलेला. बाकीचे कुणी भेटत नसले तरी आम्ही पाचजण दर दोन महिन्यातून किमान दोनदा तरी भेटायचो.

प्रत्येक भेटीच्या वेळेस राजेंचाच पुढाकार जास्त असायचा. मी कामानिमित्त बर्याचदा फिरतीवर असायचो म्हणुन बहुतांश वेळेस नसायचो. विरुही कधी कधीच असायचा. पण राजे ,शशांक आणि चिनू मात्र जवळपास प्रत्येक भेटीला उपस्थित असायचे.

सगळ चागलं चाललं होत. असेच थोडे दिवस गेले की एकेदिवशी राजेने आपण कुठेतरी पिकनीकला जाउया ही नवीन टुम काढली आणि मुख्य म्हणजे तो ही पिकनीक स्वत: ओर्गनाईज करणार होता. शशांक तर अश्या गोष्टीची वाटच बघत असायचा, तो लगेचच तयार झाला. कधी नव्हे तो विरुही तयार होता. चिनु सुरुवातीला कारण देत होता पण नंतर उगाच बाकिच्यांचा हिरमोड होऊ नये म्हणुन त्यानेही पिकनीकला यायच कबूल केल. आता रहाता राहिलो मी. सगळ्यांनाच जर तयार होते तर मग मलापण काही प्रॉब्लेम नव्हता.

ठरल्याप्रमाणे आम्ही सगळे शुक्रवारी संध्याकाळी त्रुंगारेश्वरला पिकनिकला निघालो. तिकडे वरती काही बौध्दकालीन लेणी होती म्हणे. रात्र त्या गुहेत काढुन सकाळी लेणी पहायची अन रात्री परत घरी. असा साधासोप्पा कार्यक्रम होता. विरुने गाडी आणलेली आणी स्वत: ड्राईव्ह करत होता. पुढे चिनू आणि मागे मी , राजे आणि शशांक बसलो होतो. शशांक आणि विरुची बरीच मस्ती चालली होती. मधे मधे आम्हीही त्यांना शामील होत होतो. प्रवासात राहून राहून फ़क्त एकच गोष्ट खटकत होती, ती म्हणजे आज कधी नव्हे तो राजे एकदम शांत होता. आम्ही त्रुंगारेश्वरला पोहचलो.

विरुने फार कौशल्याने गाडी घाटमाथ्यावर पोहचवली होती. आम्ही त्या लेण्यांपर्यत पोहचतोवर रात्र झाली होती. सगळीकडे अंधारुन आल होत. आम्हाला तर वाटेचा काहीच अंदाज लागत नव्हता, पण राजेला हा परिसर सरावाचा होता. तो ह्या अगोदर बर्याचदा इथे येउन गेला असावा बहुतेक. अखेर एकदाच हव होत ते ठिकाण आलं. पण अजुनही पुर्ण प्रवासात राजे गप्पच होता. आम्ही विचारलेल्या प्रश्नांनाही मोजकीच उत्तर द्यायचा.

थंडीचे दिवस असल्याने रात्र एकदम मस्त होती. रात्री शेकोटी केली. छान, शांत आणि निवांत वाटत होते. तेव्हढ्यात राजेनी दारु काढली. आज तर मौक़ा आणि दस्तूर दोन्हीही होते. त्यामुळे सगळेच तयार होते. थोड्याच वेळात सगळ्यांची विमान हळुहळु हवेत जायला लागली. त्यात नेहमीप्रमाणे राजेचे विमान पहिलं होत. मगासपासुन शांत असलेला राजे आता सुटला होता. एकाएकी त्यांने उगाचच रियुनिअनच्या हिशोबाचा विषय काढला. हळुहळु विषय भांडणाच्या दिशेने जाऊ लागला. मग मीच मध्यस्थी करून तो विषय तिथेच थांबवला. तरी राजेची कुरकुर चालूच होती. तो फिरून फिरून पुन्हा त्याच गोष्टीवर येत होता.

आता तर मी ही वैतागलो होतो. चिनू आणि वीरू दोघेही शांत होते. मला नवल वाटलं की एव्हढी सगळी नाटक पाहूनही वीरू इतका गप्प का ? मला सारखी भीती वाटत होती की ही नक्कीच वादळापूर्वीची शांतता होती. विरु एकटक राजेकडे पहात होता आणि मी विरुकडे पहात होतो. चिनू मात्र ह्या सगळ्यापासून अलिप्त मोबाईल ऐकत होता. शशांकला काहिएक पडलेली नव्हती. एकंदरीत पहाता ही पिकनीक आता फ़क्त दोघेचजण एन्जॉय करीत होते ते म्हणजे एक शशांक आणि दूसरा राजे.

अचानक बोलता बोलता मध्येच शशांकला एको पोईंटवर जायची हुक्की आली. आम्ही नकार दिला पण राजे हट्टाला पेटला. तुम्हाला नाही यायचे नका येउ मी एकटा जाइन अस बोलायला लागला. शशांक सोडुन बाक़ी सगळे त्याला समजावत होते. शेवटी कसाबसा तो ऐकला. रात्री बर्याच उशीरा आम्ही झोपलो. सकाळी आम्हाला शशांकनेच उठवल आणि म्हणाला की राजे कुठे दिसत नाहीय. आम्हाला पहिलं वाटल की इथेच कुठेतरी असेल पण सलग दोन तास शोधुनही राजेचा काही पत्ता लागला नाही. रात्री राजे बाथरुमला जातो म्हणुन शेवटचा दिसला होता असं चिनू बोलला. आजुबाजुला शोध घेता घेता आम्हाला एको पोईंटला जाणार्या रस्त्यावर राजेची एक चप्पल सापडली. म्हणुन आम्ही त्या पोईंटवर जाउन त्याला शोधायला लागलो. शोधता शोधता थोड पुढे जाऊन पाहिल तर कड्याच्या टोकाला एका फ़ांदिवर राजेच्या शर्टाचा तुकडा फ़डफ़डत होता. मनात नको नको त्या शंका येत होत्या. त्याभागात अजुन तासभर शोधूनही राजेचा काही मागामुस लागला नाही. शेवटी माझ्या मनातली शंका विरुने बोलून दाखवली की रात्री बहुतेक दारूच्या नशेत राजे इथून खाली पडला असणार. हे ऐकून चिनू घाबरून रडायलाच लागला. मनापासून तर हे सगळ खोट असाव अस वाटत होत. पण त्या क्षणाला सदय परिस्थिती स्विकारण्या वाचुन दूसरा काही पर्याय नव्हता.सकाळपासून सलग तीन तास आम्ही राजेला शोधत होतो. चिनुच्या मते पोलिसात तक्रार करायला हवी होती. पण विरुचा ह्या गोष्टीला स्पष्ट नकार होता. शशांकनेही विरुलाच सहमती दाखवली. माझा नाईलाज झाला. आम्ही गुपचुप तिथून निघून जायचे ठरवले. अखेरचा पुरावा असलेले राजेचे सामान विरुने तिथेच गाडले. ती पिकनीक आम्ही आमच्या आठवणीतुन कायमची पुसून टाकली. चिनुला अधुनमधुन झटके यायचे हळुहळु मग तो ही नॉर्मल झाला. दोन महिन्यापर्यंत आम्ही गुपचुप सगळ्या पॉसिबल ठिकाणी राजेची चौकशी केली तरी राजेचा काही पत्ता लागला नाही. मग अचानक एकेदिवशी चिनू पेपर घेउन आला. राजेची म्हणे डेडबॉडी सापडली होती. पोलिसांनी त्याचा मृत्युची त्यांच्या दफ्तरी अपघाती मृत्यु अशी नोंद केली होती. म्हणजे विरुचा अंदाज बरोबर निघाला. राजे त्या रात्री खरच कड्यावरुन कोसळला होता हयात काही शंका नव्हती. त्यादिवशी विरुने एकजात सगळ्यांना हा विषय विसरून जायची समज दिली. त्यादिवसानंतर आमच्यासाठी राजे चेप्टर क्लोज झाला होता. पण आता अस वाटतय की आमच्यासाठी हा विषय बहुतेक अजुनही संपलेला नाही आहे .

"नीट सांग" इन्स्पेक्टर धिरजने आपली करडी नजर हेमंतवर रोखली.

"तो परत आलाय" हेमंत म्हणाला

"तो कोण??"

"राजे....."

"म्हणजे?????" इति जाधव

एक आव्हंढा गिळुन हेमंत पुढे सांगु लागला.

" शशांकने सुसाईड केली त्या रात्री तो मला whatsappवर त्याला राजे दिसतो असं सांगत होता. मला पहिल वाटलं की तो सवयीप्रमाणे माझी बहुतेक मस्ती करतोय. मी त्याला फोन केला. तो घरीच होता. त्याचा आवाज फार विचित्र वाटला. जणु काही तो कुणापासुन तरी लपून माझ्याशी बोलत होता. मला म्हणाला की प्लीज माझी मदत कर. मला घेउन जा इथून, नाहीतर राजे माझा जीव घेईल म्हणुन. मला टेंशन आल. मी चिनुला आणि विरुला फोन लावला. चिनू लोणावळ्याला होता म्हणुन त्याला काही सांगितल नाही. विरुला सांगितले तर त्याने मलाच वेड्यात काढलं. मला म्हणाला की शशांक प्यायला असेल आणि ही फ़ालतुगिरी करत असेल. पण मला पटल नाही कारण शशांकचा मगासचा तो भेदरलेला आवाज सारखा माझ्या कानात घुमत होता. मी विरुला म्हटलं की तुला यायच नसेल तर नको येउस मी चालोय आणि मी फोन ठेवला. थोड्यावेळात विरुचा समोरून फोन आला की तो ही त्याच एरियात आहे तसच काही वाटल तर लगेच फोन कर. विरुचा फोन ठेवून मी शशांककडे निघालो.

रात्रीचा एव्हाना एक वाजला होता. मेनगेटवरचा वॉचमन गाढ झोपेत होता. मी तडक वर गेलो. दोन तीनदा डोरबेल वाजवली पण काही रिस्पॉन्स आला नाही. कडी वाजवायला गेलो तर दारच उघडल. आत गेलो तर सगळीकडे अंधार होता. मी बटण दाबली पण लाईट काही लागेना. घर एकदम शांत होत. भितिंवरल्या घड्याळ्याच्या आवाजाशिवाय दूसरा कुठलाच आवाज नव्हता. मी आत गेलो. हलकेच शशांकला हाक मारली. वारा बर्यापैकी सुटला होता. मी बेडरुमकडे पोहचलोच होतो की अचानक मला कुणितरी बाल्कनीच्या इथून हाक मारली. मी दचकून तिकडे पाहिल तर बाल्कनीत एक सावली बसली होती. मी त्याच्याकडे पाहतोय हे पाहून तो त्याच्या नेहमीच्या स्टाईलने हसला. शशांक बरोबर सांगत होता. राजे परत आला होता. माझी तर बोबडीच वळली होती. मी घाबरून तडक मागे फिरलो. फिरताना नेमका टेबलाला आपटुन जमिनीवर पडलो. टेबलाला धक्का लागून टेबलावरची बॉटल की काहीतरी होत ती कलंडली. मी वळुन पाहिल तर राजे जागेवरून उठला. मी घाबरून ओरडण्याचा प्रयत्न केला पण भीतीने माझ्या तोडुंन आवाजच फुटेना. राजेने एक पाउल पुढे आला. मी जोरात दाराकडे धूम ठोकली. नशीबाने लिफ़्ट मजल्यावरच होती. मी तडक खाली पळालो. लिफ़्ट तळमजल्यावर पोहचताच मी जीव घेउन बाहेर पडलो. तेव्हढ्यात कुणीतरी मला धडकल. बहुतेक तो बिल्डिंगचा सिक्युरिटी गार्ड होता. बाहेर पोर्चमध्ये आलो नी समोर पाहिलं तर दूसरा गार्ड उभा होता आणि कुणीतरी एकजण जमिनीवर पडला होता. कुणीतरी सुसाईड केलीय अस कानावर आलं. नीट निरखून पाहिलं तर तो शशांकच होता. आता तर मला काहीच सुचेना. मी तडक विरुला फोन लावला. नशिबाने तो जवळपासच होता. वीरू लगेच गाडी घेउन आला. मी गाडीत विरुला घडला प्रकार सांगितला आणि राजे परत आल्याचं सांगितलं . सुरुवातीला विरुचा विश्वास बसला नाही

पण जशी त्याला शशांक मेल्याची बातमी दिली तसा वीरू टेन्शनमध्ये आला. मला तर रडायलाच येत होते. थोडा वेळ शांत राहून वीरू म्हणाला एक काम कर. तू माणगावला माझ्या फार्महाउसवर जा.

मी सांभाळतो इकडे. माझ तर डोकच चालत नव्हत. मी वीरू जस सांगेल तस वागायच ठरवल. विरुने त्याच्या ओळखीने मला एका ट्रेवेल एजंटकडुन बस पकडून दिली. बास साहेब नंतर मग तुमचा मला फोन आला नी मी इकडे आलो. प्लीज साहेब मला वाचवा साहेब ....मला मरायच नाहीय.......तो नाही सोडणार कुणाला. मला वाचवा साहेब."

एव्हढ बोलुन हेमंत गयावया करू लागला. ह्या सगळ्या गोष्टीत एक गोष्ट मात्र इन्स्पेक्टर धीरजला पटली होती ती म्हणजे हेमंतच्या चेहरयावर मरणाची भिती स्पष्ट होती .

हेमंतची बोलण ऐकून घेतल्यावर इन्स्पेक्टर धिरजनी हेतुपुरस्पर विरुकडे पाहिलं. हेमंतच्या जबानीमुळे विरुकडेही आता खर बोलण्याशिवाय काही पर्याय नव्हता.

" हो साहेब हेमंत बोलतोय ते खर आहे. ती त्रुंगारेश्वरची पिकनीक आम्हाला खरच महागात पडली होती. राजे त्या रात्री गायब झाला तो कायमचाच. शशांक वारला त्यारात्री मी त्याच्या घराजवळच होतो. LA VIEW च्या बाजुच्या बागेच्या नुतनीकरणासाठी काही नवीन कामगार बाहेरून मागवले होते. त्यांच्या रहाण्याची सोय करण्यासाठीच मी तिथे गेलो होतो. शशांकला राजे दिसतोय हे सांगणारा हेमंतचा जेव्हा मला पहिल्यांदा फोन आला, तेव्हा मला त्याच म्हणणं खरच वाटल नाही. तो मला शशांककडे येण्यासाठी गळ घालत होता. पण मला मात्र शशांकच्या प्रॉब्लेममध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. म्हणुन मी हेमंतला पुढे व्हायला सागितल आणि तसच काही वाटलं तर फोन करायला सांगितला."

"मग हे अगोदर का नाही सांगितल?"

"सध्या निवडणुका तोडांवर आल्या आहेत. त्यामुळे अश्या कुठल्याही प्रकरणाच्या संदर्भात माझ नाव गुंतण. हे माझ्यासाठी आणि पक्षासाठी धोकादायक होउ शकत अस मला वाटलं. तस मी काही केलेले नाहीय पण विरोधक ही गोष्ट समजुन घेणार नाहित. तुम्हाला कळतय ना साहेब की मला काय म्हणायच आहे ते" विरुची भाषा आता पुर्णपणे बदलली होती.

"तुम्ही जर का काही केलेले नाही, तर मग शशांकला जीवे मारण्याची धमकी कुणी दिली होती?"

वीरू इन्स्पेक्टरकडे अविश्वासाने बघत होता. विरुच्या मनातली शंका इन्स्पेक्टरला कळली. त्यांनी जाधवांना सांगुन साईदर्याच्या त्या वेटरला बोलावले. आता विरुच्या चेहर्यावर टेंशन स्पष्ट दिसत होत. त्याने सवयीने चेहर्यावरचा घाम पुसला. इन्स्पेक्टर साहेब विरुच्या उत्तराची वाट पहात होते.

"ती मी अशीच दिली होती साहेब. त्यारात्री मी, शशांक आणि चिनू साईदर्यामध्ये बसलो होतो. जवळपास महिन्याभरापुर्वी शशांकने माझ्याकडून पन्नास हजार रुपये घेतले होते. आईच्या ऑपरेशनच्या नावाखाली. मला नंतर बाहेरून कळल की साला तो खोट बोलला होता माझ्याशी. मी जाब विचारला ह्याबद्दल त्याला. तर तो मला उडवाउडवीची उत्तर द्यायला लागला. शब्दाला शब्द लागला. माझेच पैसे घेउन तो माझ्यावरच दादागिरी करायला लागला तरी मी शांत होतो. पण नंतर मात्र माझी सटकली जेव्हा तो माझ्या पप्पांना शिव्या घालायला लागला. मी वाजवली त्याला. चिनू होता म्हणुन नाहीतर तिथेच साल्याची चामडी सोलली असती." थोडावेळ थांबुन वीरू पुढे सांगु लागला.

"मला वाटलेले की तो त्यारात्री नशेत हे सगळ बोलला असेल पण नाही शशांक नंतर सोशल साईटवर माझ्या पप्पांची आणि पक्षाची बदनामी करू लागला. मला माहितीच नव्हत चिनुनेच सांगितल. मी गेलेलो त्याच्या घरी. पण साल्याला कसला माज चढला होता काय माहीत. तेव्हा पण हरामखोर उलटसुलट बोलत होता. तेव्हाही मला चिनुनेच आवरला. मीही निवडणुकीपर्यंत शशांकच्याबाबतीत शांत रहायच ठरवल. बास साहेब बाक़ी माझा ह्या प्रकरणाशी काहिएक संबध नाही" विरुच्या चेहर्यावर शशांकबद्दलची खुन्नस स्पष्ट दिसत होती.

हेमंत आणि वीरू ह्या दोघांचही बोलण ऐकून घेतल्यावर इन्स्पेक्टर धीरज विचार करु लागले. तेव्हढ्यात चव्हाण आले आणि त्यांनी इन्स्पेक्टर धिरजच्या हातात पोस्ट्मोर्टमचा रिपोर्ट दिला. रिपोर्ट वाचुन इन्स्पेक्टर धीरज चव्हाणांना म्हणाले

"माझा अंदाज खरा ठरला. शशांकचा मृत्यु ही सुसाईड नसून मर्डर आहे. सुसाइडचा टाइम आणि शशांकच्या मृत्युची वेळ जुळत नाही. चला मर्डर झालाय हे तर निश्चित झालय फ़क्त आता तो कुणी आणि कश्यासाठी केलाय एव्हढच फ़क्त शोधायचय" शेवटच वाक्य बोलताना इन्स्पेक्टरानी हेमंत आणि वीरूकडे पाहिल. इन्स्पेक्टर धिरजच्या भेदक नजरेने दोघेही आतून घाबरले. हेमंत धावतच इन्स्पेक्टरच्या पायाशी आला आणि गयावया करू लागला.

"प्लीज मला वाचवा साहेब. मी खरच काही केलेल नाहीय. हे सगळ तो राजे करतोय साहेब. तो कुणालाही सोडणार नाही. मी सुरुवातीपासून सगळ्यांना तेच सांगत होतो पण कुणी ऐकल नाही. अगदी परवापण विरुला बोललो की आपण हे सगळ पोलिसांना सांगुया पण त्या साल्याला फ़क्त निवडणुकीची फिकिर पडलेली. मला म्हणाला की याद राख पोलिसांना काही बोललास तर. राजेसारखाच तुलाही गायब करून टाकिन. एव्हढ बोलून वीरू निघून गेला. माझी अवस्था इकडे आड़ आणि तिकडे विहीर अशी झाली होती. विरुला जाऊन दोन तीनच मिनीट झाली असतील की माझ्या फोनवर राजेचा मेसेज आला "शशांकनंतर नेक्स्ट नंबर तुझा आहे मित्रा". मी फार घाबरून गेलो. मी लगोलग फोन केला तर तो फोन नॉट रिचेबल आला. आता पुढे काय करायचे हा विचार करतच होतो की पुन्हा फोनवर राजेचा मेसेज आला. "एव्हढी काय घाई आहे". मी पुन्हा फोन ट्राय केला पुन्हा त्याचा फोन नॉट रिचेबल आला. पुढच्याच क्षणाला राजेचा मेसेज फोनवर पॉप अप झाला की "बास.....आता फ़क्त कडेलोट" माझी तर बोटच थंड पडली. " एव्हढ बोलून हेमंतने इन्स्पेक्टरला तो मेसेज दाखवला. इन्स्पेक्टर धिरजने तो मेसेज वाचला तारीख वगैरे बरोबर होती.आणि मुख्य म्हणजे हेमंतच्या हावभावावरून तो खोट बोलतोय अस मुळीच वाटत नव्हत. त्यांनी सहज म्हणुन राजेचा नंबर त्या निनावी नंबरशी जुळवुन बघितला आणि तो तंतोतंत जुळला. म्हणजेच केस सुटता सुटता तीला अजुन एक पिळ बसला होता. चिनुला डॉक्टरानी मेडिकल सर्टिफिकेटच दिल होत. त्याची मानसीक हालत खराब होती हे निश्चित झाल होत. त्यामुळे त्याच्याकडून सध्यातरी काही माहीती मिळणे शक्य नव्हतं. ह्या राजे प्रकरणामुळे केस एका वेगळ्या वळणावर येउन पोहचली होती. केस सुटेपर्यंत दोघांपैकी कुणीही शहराबाहेर जायच नाही ह्या एका अटिवर त्यांनी हेमंत आणि विरुला जायला सांगितले. तसही इन्स्पेक्टर धीरजला त्याच्याविरुध्द अटक वॉरेंट काढण्यासाठी ठोस पुराव्याची गरज होती. आणी असा पुरावा त्यांना फोरेंसिक लेबच्या रिपोर्टच्या रुपाने त्यांना मिळणार होता.

त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी तो रिपोर्ट तातडीने मागवुन घेतला. आज सगळ्या गोष्टी इन्स्पेक्टरच्या मनासारख्या होत होत्या. रिपोर्ट बरोबर संध्याकाळी आला. त्यांनी घाईघाईने तो रिपोर्ट वाचायला घेतला.रिपोर्ट वाचुन ते उडालेच.

"हे कस शक्य आहे? म्हणे त्यारात्री शशांकशिवाय कुणीही दूसरी व्यक्ती शशांकच्या घरात हजर नव्हती. घरातल्या गोष्टीवर शशांक सोडुन इतर कुणाचेही ठसे नाहीत. मग काय शशांकने काय स्वत:च स्वत:ला मारून मग वरुन खाली फेकल. काहीही छापतात साले" इन्स्पेक्टर सॉलिड वैतागले होते. आजवरच्या करियरमध्ये पहिल्यांदाच पोस्टमोर्टम रिपोर्ट आणि फोरेंसिक लेबच्या रिपोर्ट्मध्ये एव्हढी तफावत दिसली होती. काही कळत नव्हत. शशांकचा मृत्यु सुसाईड नाही हा तर पहिल्यापासून इन्स्पेक्टरला संशय होता. त्याला दोन कारण होती. एकतर शशांकच्या अंगावर खरचटल्याच्या खुणा होत्या आणि त्याचे कपडेही फ़ाटलेले होते. जस काही तो कशाला तरी घसटत खाली होता. दुसर महत्त्वाचे कारण म्हणजे शशांकच्या डेडबॉडीच बिल्डिंगपासुनचे अंतर . शशांकची डेडबॉडी बिल्डिंगपासुन अवघ्या 10-12 फ़ुटावर पडली होती. एव्हढ्या उंचावरुन एखाद्याने उडी मारल्यावर तो निदान 20-30 फुटावर तरी पडायला हवा होता. पण शशांकची बॉडी निम्म्या अंतरावर होती म्हणजे शशांकने स्वत:हुन उडी मारली नव्हती तर त्याला कुणीतरी वरुन फेकल होत. आणि आज पोस्टमोर्टम रिपोर्टने इन्स्पेक्टरचा अंदाज खरा ठरवला होता. पण त्याउलट फोरेंसिक रिपोर्ट अगदीच अनपेक्षित आला होता. हा नक्की काय प्रकार आहे हे इन्स्पेक्टरला कळत नव्हत. तेव्हढ्यात त्यांना जाणवल की जाधव मगास पासून दरवाजातच घुटमळत होते. इन्स्पेक्टर धिरजनी पुन्हा एकदा राजेचा फोन ट्राय केला. पुन्हा नॉट रिचेबल आला.

तेव्हढ्यात आतल्या खोलीतून चिनुची किंचाळी ऐकू आली. इन्स्पेक्टरसकट सगळेच आतल्या खोलीकडे धावले. चिनू फार घाबरलेला होता. सारखा त्या उघड्या खिडकीकडे बोट दाखवत "तो आलेला आता. तो मला बोलावतोय. मला जाऊ दया . तो मला न्यायला आलाय." अस काहीबाही बोलत होता. "आता माझी पाळी कडेलोट होणारच" चिनुची बडबड चालु होती.जाधवांनी खिडकी लावून घेतली तेव्हा कुठे चिनू थोडा शांत झाला.

चिनू अजुनही पोलिसांच्या कस्टडीत होता. सध्यातरी त्याच्यासाठी पोलिसस्टेशन हेच सुरक्षित ठिकाण होत. अजुनही त्याला असे अधन मधन झटके येतच होते. चिनुकडे पाहून पोलिसांनाही किव येत होती. एका चांगल्या पोराची अक्षरश: वाट लागली होती.

चिनू नॉर्मल झालेला पाहून इन्स्पेक्टर परत त्यांच्या रूम मध्ये गेले. मागोमाग जाधवही खोलिमध्ये शिरले.

"साहेब रागावणार नसाल तर एक गोष्ट सांगु"

"हम्म" इन्स्पेक्टर अजुनही कसल्यातरी विचारातच होते.

"ही केस नॉर्मल नाय आहे साहेब. लफ़ड्याची आहे."

"म्हणजे??"

"म्हणजे साहेब ही भुताटकी आहे साहेब. तो नाय सोडणार कुणाला. आपण पण हयात न पडलेल बर. उगाच ते आपल्या मागं लागायचं" जाधवांनी एका दमात आपली शंका इन्स्पेक्टरांना बोलून दाखवली.

"जाधव तुमच डोक ठिकाणावर आहे का?.............." इन्स्पेक्टरांचा आवाज चढला ते पुढे बोलणारच होते की चव्हाणांनी बाहेर सोनाली त्यांची वाट बघतेय हां निरोप दिला. इन्स्पेक्टरांनी जाधवांकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि म्हणाले.

"असा नको तो विचार करण्यापेक्षा हेमंत आणि विरुने दिलेली जबानी खरी आहे का ते पडताळुन पहा. आले होते राजेंचे वकिलपत्र घ्यायला."

बाहेर सोनाली इन्स्पेक्टरची वाट बघत होती. इन्स्पेक्टरांनी लांबुनच तिला पाहिली आणि मगासचा जाधवांचा मुर्खपणा क्षणात विसरून गेले. सोनाली आज तिच्या अस्मानी रंगाच्या ड्रेसमध्ये मस्तच दिसत होती. देवगण, मनुष्यगण ह्याच प्रमाणे गंधर्वगणही अस्तित्वात असावा ह्याची प्रचिती सोनालीकडे पाहिल्यावर पदोपदी येत होती.

"अरे वाह, आज इथे कस येण केलत?"

" मी चिनुला परत घरी घेउन जाऊ शकते का?"

"जा की, आम्ही कुठे त्याला पकडून ठेवलाय? पण तो तुम्हाला एकट्याला आवरेल का?"

"हम्म... ते ही खरच पण त्याला अस पोलीस स्टेशनमध्ये ठेवण मला बरं नाही वाटत"

"ठीक आहे तुम्ही घेउन जाऊ शकता त्याला पण एका अटीवर...."

"कुठल्या???"सोनालीने घाबरत विचारल

"अहो घाबरू नका. फ़क्त माझ्या काही प्रश्नांची उत्तर दया आणी खुशाल तुमच्या चिनुला घेउन जा"

".............."

"चिनुबद्दल तुम्हाला काय माहितीय? किंवा चिनू नेमका कसा आहे?"

"तो फार चांगलाय. साधा सरळ शांत हुशार आहे. पण मला तो सगळ्यात जास्त त्याच्या प्रामाणीकपणासाठी आवडतो. एखादी गोष्ट ठरवली की ती पुर्ण झाल्याशिवाय अजिबात स्वस्थ बसत नाही. स्वभावाने एक नंबरचा भित्रा. मनात असेल तरी कधी कुणाला सांगणार नाही. इन्फेक्ट आमच्या ह्या अफेअर मध्येही मीच त्याला प्रपोज केला होता. नेहमी स्वत:च्या अगोदर दुसर्याचा विचार करणारा ...."

"आणि त्याचे मित्र वीरू हेमंत आणि शशांक .......?????" सोनालीच्या चिनुपुराणाला ब्रेक लावित इन्स्पेक्टर धिरजनी पुढचा प्रश्न विचारला.

अचानक असा प्रश्न समोर आल्याने सोनालीचा हिरमोड झाला.

"हो ते मला चिनुच्या रियुनिअनला भेटले होते. ते सगळे चिनुचे मित्र असल्याने मला त्यांच्याबद्दल जास्त काही माहिती नाही." हे सांगताना सोनालीच्या कपाळावर पडलेली सूक्ष्म आठी इन्स्पेक्टरच्या बारीक नजरेने बरोबर टिपली.

"राजेबद्दल काही सांगु शकाल?" इन्स्पेक्टरनी सरळ मुद्द्यालाच हात घातला.

"त्याचा नी माझा काहीही संबध नव्हता" सोनाली आता अस्वस्थ झाली.

"आम्ही संबध नाही तर माहीती विचारतोय"

"..........."

"सोनाली, प्रश्न तुमच्या चिनुचा आहे" इन्स्पेक्टरांनी सोनालीच्या मर्मावर बोट ठेवल.

"राजे. चिनुचा मित्र होता पण चिनुलाही त्याच्याबद्दल काही जास्त माहिती नव्हती. पण राजे फार विचित्र होता. मला रियुनिअनलाच त्याच्यावर संशय आला होता जेव्हा तो फ़क्त माझेच फ़ोटो काढत होता. मी चिनुला तेव्हाच सांगणार होते. पण बऱ्याच वर्षानंतर सगळे मित्र भेटत होते. चिनुही फार खुश होता. त्या दिवसा नंतर मला राजेचे मेसेजेस यायचे. बरेचसे ओफ़ेंसिव्ह. मी सुरुवातीला दुर्लक्ष्य केल. पण त्याचा त्याने वेगळाच अर्थ घेतला. रात्री अपरात्री मिस कॉल करायचा. मी एक दोनदा त्याला ताकिदही दिली होती. आणि एकदा पोलिसात जायची धमकी सुध्दा. मला वाटलं की त्यानंतर तरी त्याचे हे चाळे थांबतील पण नाही त्याच SMS आणि MISS CALL हे प्रकार चालूच होते. चिनूला काही सांगण्यात काहीच फ़ायदा नव्हता. तो संत माणुस. पोलिसात सांगितल तर बदनामीच लफड होत म्हणून मी ही गोष्ट विरेंद्रच्या कानावर घालायची ठरवली.

ज्या दिवशी हे सगळे पिकनीकला जाणार होते त्यादिवशी सकाळी राजेचा मेसेज आला. तेच की मला तुझी आठवण येते तुझ्याशिवाय मला झोप येत नाही वगैरे वगैरे. मला रहावल नाही मी त्याला फोन लावला आणि खोटच सांगितलं की मी तुझे हे प्रताप विरुला सांगितले आहेत.

मी असं बोलताच त्याने काही न बोलता फोन कट केला. त्या क्षणानंतर त्याने कधीच मला त्रास दिला नाही. एव्हढच नाही तर त्या नंतर त्याने कुणाशीच संपर्कात राहिला नाही. मी चिनुला आणि एक दोनदा हेमंतलाही त्याच्याबाबतीत विचारले. पण त्या दोघांनीही उडवाउडवीची उत्तर दिली. मग मीही त्याच्याबद्दल कधीही त्यांना विचारलं नाही." सोनालीचा राजेबद्दलचा राग तिच्या शब्दाशब्दातुन जाणवत होता.

"ओह कुल डाउन. ठीक आहे .धन्यवाद आमच्या सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तर दिल्याबद्दल. आता तुम्ही तुमच्या चिनुला घरी घेउन जाऊ शकता."

"अय्या खरच थेंक्यु इन्स्पेक्टर .फार चांगल गिफ़्ट दिलत तुम्ही मला माझ्या वाढदिवसाच. तुम्हीही आवर्जुन परवा घरी या डिनरला. नक्की या हां मी वाट बघेन" इन्स्पेक्टरनी चिनुला घरी घेउन जायला होकार दिल्यामुळे सोनाली खुप खुश झाली होती.

मगाशी केलेल्या आगाउपणामुळे जाधव फार खजील झाले होते. कसेतरी ते इन्स्पेक्टर धीरजच्या समोर उभे होते.

"काय झाल जाधव??"

इन्स्पेक्टरनी फ़ाइलीतुन मान वर न काढताच विचारल

"साहेब तृंगारेश्वर पोलिस चौकीला फोन लावलेला. हेमंत सांगतोय ते खर आहे. तिथे विवेक भोसले नावाच्या तरुणाची बॉडी मिळाली होती साहेब. पोलिसांनी तपासाअंती अपघाती मृत्यु म्हणुन नोंद केलीय. विरुने सांगितलेल्या जागेवर बेग सापडली. त्यात विवेकच्या काही वस्तु सापडल्या.बेगेत चार्जर आणि हेडफ़ोन्स सापडले पण मोबाईल कुठेच नाही सापडला साहेब. ना बेगेत ना डेडबॉडीजवळ." हेड कॉन्स्टेबल जाधवांनी सगळी माहिती काढली होती.

ह्याचाच अर्थ हेमंतने सांगितलेल्या निदान पहिल्या गोष्टीमध्ये तरी तत्थ्य होत. आता त्याने सांगितलेल्या दुसऱ्या गोष्टीचा निकाल लावायचा होता. शशांकचा मर्डर हा पुर्ववैमन्स्यातुन झालाय की खरच जाधव जसे बोलतात तसे राजेच हे सगळ आपल्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी परत आला असेल??? इन्स्पेक्टरांचा थोडा गोंधळ झाला होता. बाकी काहीही झाल तरी राजेचा अपघाती मृत्यु आणि शशांकचा मर्डर हयात काहीतरी लिंक नक्की होती.

पण कुठली?

विचार करून करुन इन्स्पेक्टरच डोक दुखायला लागल. त्यांनी जाधवांना आवाज दिला

"जाधव गाडी काढा. चला ज़रा एक राउंड मारून येउ"

आज सगळेजण सोनालीकडे जमले होते. स्वत:च्या वाढदिवसाचे निमित्त साधुन सोनालीनेच हा बेत आखला होता. शशांकच्या मृत्युला आता आठवडा होत आला होता. अजुनही पोलीस कुठल्याही निर्णयापर्यंत पोहचु शकले नव्हते. ह्या सगळ्या प्रकरणाचा सगळ्यांनाच मानसिक त्रास झाला होता. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे इतक्या दिवसाच्या त्याच्या मैत्रीतल्या प्रेमाची जागा आता अविश्वासाने घेतली होती. प्रत्येकजण एकमेकाकडे संशयाने पहात होता. हेच सगळं दूर करण्यासाठी तिने स्वत:च्याच घरी एका छोटेखानी पार्टीचे आयोजन केले होते. आता ह्याच निमित्ताने इतके दिवसाचे दडपण निदान ज़रातरी हलक होईल ह्या उद्देशानेच तिने हे सार करायच ठरवल होतं. चिनुही आता घरी आल्यावर बर्यापैकी सावरला होता. म्हणजे त्याचे राजे पुराण आता थांबल होत.

सगळेजण वेळेवर आले होते. केक कटिंगही झालं होत. जेवणाला अजुन वेळ होता. सगळेजण हॉलमध्ये निवांत बसलेले होते. आज कुणीही राजे आणि शशांकचा विषय काढत नव्हते ही चांगली गोष्ट होती. गप्पांना उत आला होता आणि अचानक दरवाजाची बेल वाजली. हेमंतने दार उघडले तर समोर इन्स्पेक्टर धिरज आणि हेड कॉन्स्टेबल जाधव पुष्पगुच्छ घेउन उभे होते. सगळ्यानाच नवल वाटले. मीच आमंत्रण दिले होते असे सोनालीने सगळ्यांना सांगताच वातावरणातला तणाव ज़रा कमी झाला. थोड्यावेळाने पुन्हा एकदा गप्पांना उत आला. इन्स्पेक्टर धीरजनी त्यांच्या प्रोफ़ेशनचे काही मजेदार किस्से सांगितले की सगळ्यांची हसता हसता पुरेवाट झाली. जाधवांनी किशोरची एक दोन फर्मास गाणी म्हटली. त्यावेळी प्रत्येकाला अस मनापासून जाणवलं की ह्या खाकी वर्दीच्या मागेही एक सर्वसामान्य माणुसच असतो. ज्याला हसता येत, गाता येत, दाद देता येते. वेळ अगदी मजेत जात होता की तेव्हढ्यात सोनालीच्या मोबाईलवर एक मेसेज आला. मेसेज वाचताच तिच्या तोडुंन अस्फुट किंचाळी बाहेर पडली. सगळे एकदम शांत झाले.

"काय झालं??" इन्स्पेक्टर धिरजने विचारलं

उत्तरादाखल तिने तिचा मोबाईल इन्स्पेक्टरांना दाखवला. इन्स्पेक्टर धिरजनी मोबाईल वरचा मेसेज वाचायला लागले.

I love YOU sonali- Raje

सोनाली घाबरून रडायला लागली. क्षणांत पार्टीचा रंग बदलला. चिनुने सोनालीला सावरलं. अचानक एकाएकी कोपऱ्यात बसलेला हेमंत विरुकडे गेला आणि त्याला ओरडायला लागला.

"बघितलस ना! आता बसला ना तुझा विश्वास की अजुनही काही शंका आहेत. तुला खर वाटो किंवा नको वाटु दे पण राजे परत आलाय हे एकच सत्य आहे"

वीरू काय बोलणार. आतातर इन्स्पेक्टर धिरजही शांत होते. काहीतरी बोलायच म्हणुन शेवटी वीरू म्हणाला की

"जाऊ दे हेमंत . तू नको टेंशन घेउस"

"अरे तुला काय जातय टेंशन नको घेउस बोलायला. शशांक नंतर तुझा नंबर अशी धमकी राजेने मला दिलीय तुला नाही. अरे मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलाय त्याला शशांकच्या घरात. साली कुठली अवदसा आठवली आणि त्यादिवशी मी तुमच्यासोबत त्या पिकनीकला आलो. देवा आता तूच मला वाचव ह्या सगळ्यातुन" हेमंत आता सैरभैर झाला होता.

मेसेज वाचुन इन्स्पेक्टरही विचारात पडले. थोड्या वेळाने इन्स्पेक्टर धिरज म्हणाले "सध्यातरी मला ह्यावर आता फ़क्त एकच उपाय आहे"

इन्स्पेक्टर धिरजनी असं म्हणताच सगळ्याजणांच्या भुवया ताणल्या गेला. सगळ्यांवरती आपली नजर फिरवीत

"आता ह्या प्रकरणातुन तुम्हाला देव नाही तर फ़क्त आणि फ़क्त राजेच सोडवू शकतात" इन्स्पेक्टर धिरजनी उपाय सांगितला.

"कसे काय?" इति सोनाली

"आपण बोलू त्यांच्याशी. इजिप्शिन संस्कृतीनुसार एखाद्या आत्म्याच्या आवडीच्या व्यक्तीने त्याच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केल्यास तो रिस्पॉन्स देतो. आपण ट्राय करू. बघू काही फ़ायदा होतो का ते?."

इन्स्पेक्टर धिरजनी सगळ्यांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. सगळे एकामेकांच्या तोंडाकडे पहात होते.

इन्स्पेक्टरने सर्वप्रथम वीरूला त्या नंबरवर कॉल लावायला सांगितला.

अपेक्षितपणे तो नंबर नॉट रिचेबल आला. मग त्यांनी हेंमंतला सांगितला. हेमंतने फोन लावता, त्यालादेखिल तो नंबर नॉट रिचेबल आला. अचानकपणे इन्स्पेक्टरनी तो फोन सोनालीच्या हातात दिला. ती घाबरून नको नको म्हणत होती. धिरजनी तिला धीर दिला. तिने घाबरत घाबरत नंबर रिडायल केला आणि खोलीत इतका वेळ साचून राहिलेल्या स्मशानशांततेची चिरफ़ाड करीत कुणाच्यातरी फोनची रिंग वाजली. सगळेच दचकले. सोनाली अविश्वासाने आवाजाच्या दिशेने पाहू लागली. चिनू खाली मान घालून पुतळ्यासारखा स्तब्ध उभा होता. चिनुच्या मोबाइलची रिंग अजुनही वाजत होती. इन्स्पेक्टर धीरज चिनुजवळ आले आणि त्याच्या खिश्यातुन मोबाईल काढला. त्यावर Sonali calling.......येत होते. इन्स्पेक्टर धिरजनी फोन कट केला.

" ह्या स्मार्ट फ़ोन्सनी माणसाचे आयुष्य किती बदलून टाकलय. नवीन नवीन अप्लिकेशन्स काढुन आपल जीवन सुखकर केलय ह्यांनी. आता हेच अप्लिकेशन बघा. ह्या अप्लिकेशननुसार एक विंडो पिरिअड ठरवायचा, आपल्या आवडीनुसार कॉन्टेक नंबरर्स फ़िल्टर करायचे की बास...आपण त्या नंबरर्सना कॉल किंवा मेसेज करू शकतो पण त्यांच्यासाठी मात्र आपण नॉट रीचेबल.

मस्त आहे ना...पण साला बनवणार्याने हयात एक गोची करून ठेवलीय. समोरून एकाच नंबरवरुन सलग तीनवेळा फोन ट्राय केला तर मात्र दर तिसऱ्या ट्रायला फोन कनेक्ट होणार. आणि आता आपण नेमक तेच केल. इतर वेळेस आपण फ़क्त एकदाच ट्राय केला आणि राजेंशी भेट होता होता राहिली. मगाशी सोनालीला आलेला मेसेज मी माझ्या फोनवरून केला होता. आणि मेसेज वाचण्याच्या निमित्ताने तिचा फोन हातात घेउन तुम्हाला फोन करायला देताना राजेचा नंबर डायल करून दिला होता. आपण एकाच नंबर वरुन राजेंचा फोन ट्राय केला आणि राजे नाही सापडले पण त्यांचे वंशज तरी भेटले.

राजे नाहित तर नाहित त्यांचे स्वघोषीत वंशज तरी आपली मदत करतील

हो की नाही चिनू राजे....??????

चला पटापट सांगा की मोठे राजे कुठे आहेत ते"

इन्स्पेक्टर धिरजनी असे म्हणताच चिनू बसकन खाली बसला आणि ओस्काबोस्की रडायला लागला. थोड सावराल्यावर त्याने बोलायला सुरुवात केली.

"हो हो.. मीच मारल त्या राजेला. पण राजे माझ्याकडून चुकुन मारला गेला होता. सोनालीची शपथ्थ. It was an accident. मला त्याला मारायचे नव्हते.

राजे आम्हाला रियुनिअनला भेटला. तसा थोडा विचित्र होता पण प्रत्येकाचा एक विशिष्ट स्वभाव असतो म्हणुन मला त्याच काही वाटल नाही. पण एक गोष्ट मात्र मला जाणवलेली, ती म्हणजे त्याचा सोनालीमधला इंटरेस्ट. त्याची नियत तिच्याबाबतीत चांगली नव्हती आणि ते त्याने दाखवुनही दिल. झाल अस की त्यादिवशी मी माझ्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांना साईदर्यामध्ये पार्टीला बोलावल होत. त्यारात्री पार्टीला आमच्यासोबत सोनालीही होती. वीरू काही कामानिमित्त शहराबाहेर गेला होता म्हणुन तो फ़क्त नव्हता. सगळ चागलं चाललं होत की फालतुगिरी झाली. सोनालीसोबत असल्याकारणाने आज ड्रिंक्स घ्यायचे नाहीत अस पहिलं ठरलेले असुनही राजेने ड्रिंक्स मागवली. शशांक तर एक नंबरचा अधाशी त्यानेही एनवेळेला राजेला पाठिंबा दिला. माझ्या मनात तेव्हाच शंकेची पाल चुकचुकलेली की आज काहीतरी लफ़डं होणार आहे. त्याला कारण ही तसच होत. राजेला दारु झेपायची नाही. दारु प्यायल्यावर तो जास्तच अघळपघळ बोलायचा. त्यारात्रीही नेमक तेच झाल. मी माझ्या शांत स्वभावामुळे नेहमीच सगळ्यांचा सॉफ़्ट टारगेट असायचो. म्हणजे सगळेजण नेहमी कुठल्याही गोष्टीवरुन मला चिडवायचे. मीही त्यांच हे अस चिडवणं कधी मनाला लावून घ्यायचो नाही. पण त्यारात्री राजे सोनालीसमोर ज़रा जास्तच करत होता. सरळ सरळ कळत होत की तो हे सर्व तिला इंप्रेस करायला करत होता. एका क्षणाला मात्र राजेने हद्दच केली. त्याने एकाएकी सोनालीचा हात धरला. सोनाली तर मगासपासूनच ह्या सगळ्या गोष्टीमुळे एकतर वैतागली होती. आणि आता तर कहरच झाला होता. तिने खाडकन राजेच्या मुस्कटात लावून दिली आणि तरातरा निघून गेली. लगोलग मीही तिच्यामागोमाग निघालो. तिच्याकडून काय तर कुठल्याही मुलीकडुन हीच प्रतिक्रया अपेक्षित होती. मलाही राजेचा राग आलेला. तरी नशीब त्या रात्री वीरू तिथे नव्हता नाहीतर राजे त्या रात्री तिथेच फ़ुटला असता. सोनाली जाम वैतागली होती. मला तिची समजूत घालताना नाकी नऊ येत होते. सगळ्यात पहिला मी हेमंतला फोन केला की झालेला प्रकार विरुला कळु देऊ नकोस. राजे वेडा आहे.उगाच नसती लफडी होतील आणि सगळ्याना भारी पडतील. त्यालाही ते पटलं.

दुसर्याच दिवशी राजेने घडलेल्या प्रकाराबद्दल माझी माफी मागितली. मीही मोठ्या मनाने त्याला माफ़ केल. सोनाली मात्र त्या घटनेनंतर कधीच आमच्यासोबत आली नाही. एव्हढच नव्हे तर तिने बकिच्यांशी बोलणं ही जवळजवळ तोडलच होत. इनफ़ेक्ट पिकनिकच्या वेळेसही तीने मला सावध केल होत म्हणुन सुरुवातीला मी थोडी टाळाटाळच करत होतो. पण शेवटी आपल्यामुळे बाकिच्यांचा मुड जाऊ नये म्हणून तयार झालो. आता अस वाटतय की तेव्हा सोनालीच ऐकल असत तर बर झालं असत."

दोन क्षण सोनालीकडे पाहून चिनू पुढे सांगु लागला.

"पिकनीकच्या त्यारात्री एको पोईंटच्या गदारोळानंतर शेवटी कधीतरी उशीरा एकदाचे आम्ही सगळे झोपलो. रात्री मध्येच माझ्या पायाशी कसली तरी हालचाल जाणवली आणि मला जाग आली. बघितलं तर राजे धडपडत कुठेतरी चालला होता. बहुतेक बाथरूमला जात असावा. साला वाटेत कुठेतरी पडायचा म्हणुन मी ही मग त्याच्यामागुन गेलो. राजेला बरीच झाली होती. त्याला काय करायचे होते तेच कळत नव्हते. बराच वेळ तो नुसता चालतच होता. मग अचानक एका झुडुपापाशी थांबला. माझा अंदाज बरोबर निघाला. एका झुडुपापाशी राजे बराच वेळ हलका होत होता. बरोबरच होत म्हणा इतक प्यायल्यावर हे अपेक्षितच होत. कार्यभाग आटपल्यावर राजे वळला. अचानक मला तिथे पाहुन सुरुवातीला दचकला मग सावरून म्हणाला.

"अरे चिनू तु आहेस होय. मला वाटलं की ......सोड जाउदे. ही साली दारु जास्त झाली की मला सगळीकडे तीच दिसायला लागते."

मी विचारलं त्याला की कोणाबद्दल बोलतोयस. तो बोलणारच होता की लगेच सावरून म्हणाला

"सोड ना तुला काय आहे त्याच? तुला तुझ्या औकातीपेक्षा चांगला आयटम भेटलाय की. मग कशाला दुसर्यांच्या गोष्टीमध्ये लुबडेगिरी करतोस.

माXXXX साला. बाक़ी चिन्या तू नशीब काढलस लेका. काय सॉल्लिड पोरगी पटवलीयस. हिंदीत एक मस्त कहावत आहे ऐकली आहेस की नाही. थांब मी सांगतो तुला.

लंगुर के मुह में अंगुर

खरोखरच अंगुर आहे रे सोनाली. रियुनिअनला जेव्हा पहिल्यांदा पाहिली ना तेव्हाच आपण फ़िदा झालो होतो तिच्यावर. आपण तर तिचे फोटोज पण सेव्ह केलेत आपल्या मोबाईलमध्ये.हे बघ...."

अस बोलून त्याने मला त्याचा मोबाईल दाखवला. मी फ़ोटो पाहिले तर माझे डोळेच फिरले. हरामखोराने सोनालीचा चेहरा कुठल्यातरी अश्लिल फोटोज वर मॉर्फ केला होता आणि असे एक नाही तर बरेच फोटोज होते. राजे खरच हरामी होता. सोनाली अगदी बरोबर बोलत होती त्याच्याबाबतीत. इकडे राजे तोंडाला येईल ते बडबडत होता.

"आपल्याला हे फोटोज रात्री किमान तीनदा बघितल्याशिवाय झोपच येत नाय यार. साली टॉप टू बॉटम एकदम कडक आहे. पण स्वत:ला खुपच शहाणी समजते. नाय एक दिवस तिचा सगळा माज उतरवला ना तर नाव नाय लावणार. मजा येईल तिला कुस्करायला. एक गोष्ट पक्की आहे चिन्या, एकदा का तिला माझी चटक लागली ना की ती काय तुला हुंगत नाय हा हा हा हा हा........."

राजे एव्हढ बोलून जोर जोरात हसायला लागला.

आता तर माझं टाळकच सटकलं. मी त्याच्या हातातून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि एकेक करून ते फ़ोटो डीलीट करू लागलो. तसा तो अजुनच हसायला लागला आणि म्हणाला "अबे चूXX हे एव्हढेसे फ़ोटो डिलीट करून काय फ़ायदा? माझी अख्खी हार्ड डिस्क भरलीय तिच्या ह्या असल्या फ़ोटोंजनी. तिने जर का ह्यापुढे मला नकार दिला तर एकजात सगळ्या सोशल साईटवर तिचे हे फ़ोटो तिच्या नावानिशी अपलोड करणार. साली माझा गेम करते काय?" एव्हढ बोलून राजे पुन्हा हसायला लागला.

आता माझी सहनशक्ती संपलेली होती. त्याला असाच हसताना पाहून माझी खोपडीच खसकली. मी रागाच्या भरात त्याचा गळा दाबला. राजे प्रतिकार करत होता पण जास्त झालेल्या दारुमुळे त्याची ताकद अर्धी उतरलेली होती. तो जेव्हढा सुटायचा प्रयत्न करायचा मी तेव्हढ्याच ताकदीने त्याचा गळा आवळत होतो. जणु काही माझा सगळा राग माझ्या हातात उतरला होता. हळुहळु राजे शांत झाला आणि माझा रागही. नेमकं त्याचवेळी शशांक मागुन आला. त्याने मला राजेच्या अंगावरुन दूर लोटल आणि शशांक राजेला उठवु लागला. मी एव्हाना भानावर आलो होतो. आपल्या हातून काय घडलय हे समजताच प्रचंड घाबरलो. शशांकने माझ्याकडे पाहिलं आणी म्हणाला

"चिन्या काय केलस हे ??? अरे मेला ना तो......"

शशांकने असं म्हणताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी शशांकला समजावू लागलो की अरे चुकुन झाल हे मला नव्हतं मारायच त्याला पण तो सोनालीबद्दल नाही नाही ते घाणेरड बोलत होता आणि माझा कंट्रोल सुटला. मी शशांकला विनवल की प्लीज सोडव मला यातून. मी त्याच्या हातापाया पडत होतो.

थोड्या वेळाच्या शांततेनंतर शशांक म्हणाला " ठीक आहे. शांत हो नाहीतर वीरू आणि हेमंतपण जागे होतील. आता झालं ते झालं. आधी एक काम करू सगळ्यांत पहिलं बाक़ी कुणाला काही कळायच्या आत ह्या डेड बॉडीची विल्हेवाट लावू" मग शशांकच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही दोघांनी मिळुन राजेला एको पोईंटवरुन खाली फेकला. फ़ेकण्याअगोदर शशांकने राजेचे पॉकेटमधले पैसे, चैन वगैरे तत्सम वस्तु काढुन घेतल्या. शशांक पैश्याच्या बाबतीत खरच लालची होता. राजेचा मोबाईल माझ्याकडेच होता पण मी ते शशांकला सांगितले नाही. शशांक म्हणाला "आता ह्या रात्रीला कायमचा विसरून जा. नशीबाने साथ दिली तर कुणालाच काही कळणार नाही."

शशांक खरच त्यारात्री माझ्यासाठी देवासारखा धावून आला होता. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघांनीही हेमंत आणि विरुसोबत राजेला शोधण्याच नाटक केल आणि मग विरुच्या म्हणण्यानुसार गपचुप माघारी फिरलो. शशांकच्या अंदाजानुसार थोड्या दिवसानी हे प्रकरण आपोआपच शांत झाल.

एव्हढं सांगुन चिनू शांत झाला. रूममध्ये एक जडावलेली शांतता पसरली.

"आणि मग शशांकला का मारलस? "

इन्स्पेक्टर धिरजनी चिनुच्या मानेवर हात ठेवत चिनुला प्रश्न केला. चिनुने दचकून इन्स्पेक्टरकडे पाहिलं आणि मान खाली घातली. आधीच्याच धक्कातुन खोलीतली मंडळी सावरली नव्हती की इन्स्पेक्टरांनी अजुन एक बॉम टाकला होता.

"चिनूराजे बोला लवकर ...."

इन्स्पेक्टरनी चिनुच्या मानेवर आपली पकड घट्ट करीत म्हटले.तसा चिनू बोलायला लागला.

"तो मला ब्लेकमेल करायचा.

पहिल मला वाटलेल की शशांकबद्दल लोक उगीचच काहीबाही बोलतात. तो कसाही असला तरी मैत्रीला जागणारा होता. पण तो माझा भ्रम होता ह्याचा प्रत्यय मला लवकरच आला. एके दिवशी त्याने माझ्याकडे दहा हजार मागितले. दोन दिवसात परत देतो सांगुन. त्याने कठिण प्रसंगात मला केलेली मदत आठवुन मीही दिले. पंधरा दिवसात तो पुन्हा हजर झाला ह्यावेळेस वीस हजार हवेत अस म्हणायला लागला. मी पहिल्या घेतलेल्या पैशाची आठवण करून दिली. तर दोन्ही एकत्र देतो असं म्हणाला. मग हे रोजचच झालं दर पंधरा एक दिवसांनी कधी दहा तर कधी वीस हजार मागायचा. एके दिवशी मी त्याला नाही म्हणुन सांगितलं तर तो म्हणाला

"ठीक आहे. जरा whatsapp ऑन कर ना. एक मेसेज पाठवलाय बघ. मस्त आहे."

मी मोबाईल चेक केला तर साल्याने मला मी राजेचा गळा आवळत असलेल्याची क्लिप पाठवलेली. याचाच अर्थ त्यारात्री त्याने मला राजेचा गळा आवळताना नुसतं पाहिलंच नव्हतं तर माझी क्लिपही काढली होती. मी घाबरलो तसा तो मला म्हणाला की

" मी उद्या इथे येईन ते ही शेवटचा. ह्या नंतर मात्र तू माझ्याकडे यायच मी बोलावेंन तेव्हा...समजलास काय?"

माझ्याकडे काही पर्यायच नव्हता. तो गरज लागेल तसा माझा पैसा उधळत होता. असच एकेदिवशी त्याने मला घरी बोलावलं आणि म्हणाला

"चिनू तू मला बरीच मदत केलीस आणि ह्या उलट मी तुला फार त्रास दिला. आता मी ठरवलय की तुला आता मोकळ करायचं. आता आपण एक लास्ट डील करू. मी तुला तुझी क्लीप देतो, त्याबदल्यात तू मला फ़क्त एका रात्रीपुरती सोनाली द्यायचीस बास बाक़ी काही नाही"

मला तर विश्वासच बसत नव्हता. मी त्याला समजावायचा फार प्रयत्न केला पण तो हलकट ऐकतच नव्हता. त्याने मला एका आठवड्याची मुदत दिली. रोज काही फायनल झाल का? अस विचारण्यासाठी फोन करायचा. माझ्यासाठी तर हां डेडलॉक होता. शेवटि शेवटी तर मी त्याचा फोनच घ्यायचो नाही. त्यादिवशी मी कामानिमित्त लोणावळ्याला चाललेलो की सोनालीचा मला फोन आला. ती म्हणाली की शशांकसारखा तिला फोन करतोय आणि तुझ्याबद्दल विचारणा करतोय. आवाजावरून भरपूर प्यायलाय अस वाटतय. आता हे म्हणजे शशांकच अति झाल होत. म्हणजे तो आता सोनालीपर्यंत पोहचला होता. मी तिला म्हटलं की तू काळजी करू नकोस. मी बघतो काय ते आणि आता शशांकचे फोन उचलु नकोस एव्हढ सांगुन मी तिचा फोन ठेवला. तोवर लोणावळा आल होत. माझ डोकच फ़िरलेले. मी शशांकचा आता कायमचा बंदोबस्त करायचा ठरवल. मी तिथल्याच एका हॉटेलमध्ये रूम बुक केली. मुद्दामून शहराबाहेरच छोट हॉटेल निवडल की जिथे फार कमी लोक असतील. रूम बुक करतानाही बाहेरच्या बाजूने थोड़ी आडोश्याची आणि जिथून मला हॉटेलवाल्याच्या अपरोक्ष ये जा करता येईल अशी निवडली. गाडी मुद्दामून हॉटेलच्या अलिकडे पार्क केली. हॉटेलमध्ये मुद्दामुन माझ्या पत्त्याच्या जागी सोनालीच्या घराचा पत्ता दिला. दिवसभर स्टाफच्या नजरेत रहावे म्हणुन त्यांना सारखा छोट्या छोट्या गोष्टीसाठी बोलवत राहिलो. कामानिमित्त असलेली मिटींगही होटेलवरच केली. डोक्यात एक आग लागलेली होती. मी आता रात्रीची वाट पाहू लागलो. आजुबाजुला थोडी सामसूम होताच मी हॉटेलच्या खिडकीतुन मागच्या मागे उतरलो. गाडी काढली आणि तडक मुंबई गाठली. इथेही गाडी मुद्दामून बागेच्या थोड्या अलिकडे लावली. नेहमीच्या येण्याजाण्यामुळे सिक्युरिटिच्या शिफ़्ट कधी चेंज होते ते माहीती होते. मी त्याचाच फ़ायदा घेउन मागच्या बाजूने बागेच्या कंपाउडवरून बिल्डिंगमध्ये प्रवेश केला. वर आलो शशांक घरीच होता. मला त्याने आत घेतलं. समोर सोफ्यावर बसताना त्याने मला ड्रिंक ऑफर केली. हरामखोर माझ्याच पैश्याची पिउन मलाच ऑफर करत होता. मी ड्रिंक घेतली तसही मी जे आता ठरवून आलो होतो त्यासाठी मला ह्या ड्रिंकची नितांत गरज होती. त्याने मग एकदम विषयालाच हात घातला "मग काय ठरवल आहेस?" मी म्हटलं "डील फायनल झाल्यावर तू मला फ़सवणार नाहीस कश्यावरुन" त्यावर तो म्हणाला "बास काय ...एव्हढा विश्वास नाही काय आपल्यावर आणि तसही माझ्या सांगण्यावर अवलंबून रहाण्याखेरिज तुझ्याकडे दूसरा काही चॉईसही नाही आहे" एव्हढ बोलून शशांक जोरजोरात हसायला लागला. एखाद्या गोष्टीसाठी हा प्राणी किती खालच्या पातळीवर उतरु शकतो ह्याची कल्पना मला तेव्हा आली. मी उठून शशांकच्या मागे येउन उभा राहिलो. शशांक अजुनही हसतच होता. मी आजुबाजुला पाहिलं तर कोपऱ्यात एक हॉकी स्टिक होती. मी हातात येताना केमिस्ट्मधुन घेतलेले ऑपरेशनल ग्लोव्हस घातले. मग ती स्टिक सरळ उचलली आणि शशांकला काही कळायच्या आत त्याच्या डोक्यात घातली. बहुतेक माझा पहिला फ़टकाच वर्मी लागला होता. समोर टेबलावर शशांक निपचित पडला होता. तरीही मला रिस्क घ्यायची नव्हती. मी वेड्यासारखा शशांकच्या बॉडिला फटके घालत होतो. ते कुठे बसताहेत ह्याकडे माझ लक्ष नव्हत. मला फ़क्त माझी खुन्नस शांत करायची होती. थोड्यावेळाने माझी खात्री झाली की शशांक इज नो मोअर. मग मी विचार करू लागलो की पुढे काय करायच. सर्व प्रथम मी घरातल्या सगळ्या वस्तु वरचे माझे ठसे पुसायला सुरुवात केली. नंतर शशांकचे सगळे ड्रॉवरर्स ,सेल्फ वगैरे सगळ चेक केल. चेक करताना मला कळल की साल्याने राजेच्या वस्तु अजुनही जपून ठेवल्या होत्या. मग मला एक कल्पना सुचली की ह्या सगळ्यातुन सुटायचा एकच उपाय आहे, की ह्या प्रकरणात राजेला आणायचा. तसही राजे आता ह्या जगात नाही, पोलिसांनीही त्याचा मृत्यु हां अपघाती मृत्यु म्हणुन घोषित केलाय आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे राजे प्रकरणातला महत्त्वाचा साक्षिदार नुकताच माझ्या हातुन मारला गेलाय. सगळ्या गोष्टी जुळत होत्या. फ़क्त आता कुणितरी राजेचे अस्तित्व आहे हे मान्य करायला हवं होत . विचार करता ह्या कामासाठी हेमंत अतिशय योग्य माणुस होता. आमच्या गृप मध्ये हेमंत ही एकच व्यक्ति अशी होती की जिचा भुताखेतांवर जरा जास्त विश्वास होता. ह्या प्रकरणात मी त्याला सॉफ़्ट टारगेट ठेवला. मुद्दामून त्याला शशांकच्या मोबाईलवरुन मेसेजेस केले की मला राजे दिसतो. राजे परत आला आहे. मला खुप भीती वाटतेय म्हणुन. तू प्लीज इथे ये. सुरुवातीला त्यांने रिस्पॉन्स दिला नाही .नंतर त्याचा फोन आला मी तो घेतला. तेव्हा मी त्याला अस भासवल की शशांक खुप घाबरलाय आणि त्याला मदतीची गरज आहे. हेमंत येईपर्यंत मी शशांकची बॉडी बेडरूममध्ये नेउन ठेवली. पुन्हा एकदा माझ्या सगळ्या खुणा पुसल्या आणी खोली अगदी व्यवस्थीत लावून ठेवली. हेमंत येण्याच्या वेळेचा अंदाज घेउन मी बाल्कनीत जाउन बसलो. मुद्दामून अंधारात जेणेकरुन त्याला माझा चेहरा दिसणार नाही अश्या पध्दतीत. अपेक्षेप्रमाणे खोलीतला अंधार बघून हेमंत बाचकला. घाबरत घाबरत तो घरात शिरला. तो हॉलच्या मध्यभागी येताच मी राजेच्या ठेवणीच्या आवाजाची नक्कल केली.राजेचा आवाज ऐकताच हेमंतची बोबडीच वळली. तो पाठच्या पाठीच पळाला. जाता जाता टेबलाला आपटुन खाली पडला. तो पडल्या पडल्या त्याला माझा चेहरा दिसू नये म्हणुन मी प्रसंगावधान राखून लगेच उठलो. तर तो अजुनच घाबरला आणि त्याने धूम ठोकली. तो बिल्डिंगमधुन निघून जायच्या आत मला पुढच काम करायच होत. मी लगोलग शशांकची बॉडी बेडरुममधुन बाहेर आणली आणि त्याला त्याच्याच बाल्कनीतुन खाली फेकून दिला. दोन तीन सेकंदानंतर मला धप्प असा आवाज ऐकू आला. मी मनातल्या मनात म्हटले चला शशांक मुक्कामाला पोहचला. लगोलग मी फ़्रिजमधल्या सॉसची बॉटल एका रुमालावर मोकळी करत तिथल्याच एका भितींवर फ़टाफ़ट "कडेलोट"असं लिहील. पोलिसांच्या गाडीचा आवाज ऐकताच मी निघालो. घराचा दरवाजा हलकेच ओढुन घेतला सोबत शशांकची हॉकी आणि तो रुमाल घेतला आणी तडक गच्चीवर पळालो. तासा दोन तासानंतर पोलीस निघून गेले तोवर सकाळचे चार वाजले होते. रात्रीच्या ह्या गडबडीमुळे सोसायटी आत्ताशी कुठे झोपली होती. माझ्यासाठी एक्सीट वे क्लिअर होता. मी गच्चीवरुन खाली उतरलो. आल्या रस्त्याने परत निघालो. परत जाताना मात्र वांदे झाले. बिल्डिंगची कंपाउंड चांगली सहा फ़ुट उंच होती. पलीकडून येताना एव्हढा प्रॉब्लेम झाला नाही. तिथे मोठी मोठी दगड होती. ती एकावर एक रचून भिंतीवर आरामात चढता आलं. इथून मात्र पंचाईत होती. तरीही फार मेहनतीने वर चढलो तर भितिंवर काचांचे तुकडे लावलेले होते. भरपूर त्रास झाला. अक्षरश: सोलवटुन निघालो. कसातरी पलिकडे उतरलो. चालातानाही त्रास होत होता. गाडीत बसताना फार गिल्टी वाटत होत. काहीही झाल तरी शशांक आपला मित्र होता यार. तडक गाडी टर्झनला आणली. तिथे एक तलाव आहे हे ठिकाण तस सुनसान. शाळेत असताना आम्ही इथे पोहायला यायचो. आता मात्र कुणी जात नाही. तिथे ती हॉकी स्टिक बाहेर काढली त्यावरचे ठसे पुन्हा पुसले आणि ती स्टिक दूर तलावात भिरकावून दिली. खर तर मला ती जाळायचीच होती. पण माझ्याकडे तेव्हढा वेळ नव्हता. मी तिथून तसाच परत लोणावळ्याला गेलो. मुंबई ते लोणावळा तसा अडीच तीन तासाचा पल्ला. पण मी तो दोन तासात गाठला. पुन्हा हॉटेल स्टाफची नजर चुकवून रूममध्ये शिरलो. तिथे मी माझ्या नाटकाचा दूसरा अंक चालु केला. एकाएकी मी बोंबाबोंब सुरु केली. हॉटेल स्टाफ़ला सळो की पळो करून सोडला. थोडीशी केल्क्युलेटेड रिस्क घेतली आणी हॉटेलच्या पोडियमच्या गच्चीवरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माझ्या डोक्यावर परिणाम झालाय ह्याची लोकांना खात्री पटली. त्यांनी स्वत:हुन मला घरी आणुन सोडला. इथे आल्यावर माझ फ़क्त एकच काम होत ते म्हणजे माझ वेडाच नाटक चालु ठेवायच आणि हेमंतला जास्तीत जास्त घाबरवुन राजेच अस्तित्व मान्य करवून घ्यायच. म्हणुन मी त्याला माझ्याकडे असलेल्या राजेच्या फोनवरून मेसेजेस पाठवायला सुरुवात केलेली. हेमंत माझ्या जाळ्यात अडकत चालला होता.डॉक्टरांनीही माझी बिघडलेली मानसिक हालत मान्य केली होती. मला फ़क्त ती जोवर राजेचे अस्तित्व सगळे मान्य करत नाहीत तोवर अजुन थोडे दिवस कटिन्यु करायची होती. सगळ कस अगदी माझ्या प्लाननुसार घडत होत. पण ..............

असो, माझ्याकडून जे काही घडल त्याच्याबद्दल मला आज ज़राही खंत नाही. त्याची लायकीच ती होती. फ़क्त मला राहून राहून एकाच गोष्टीच दुःख आहे ते म्हणजे, सॉरी हेमंत मी माझ्या फायद्यासाठी तुझा वापर केला. मला तस करायच नव्हत पण माझ्या दूसरा काही पर्यायही नव्हता. माझ्यामुळे हेमंत आणि विरुला तुम्हाला फार त्रास झाला. जमल्यास मला माफ़ करा"

एव्हढ बोलून चिनू शांत झाला. पुर्ण खोलीत एक स्मशान शांतता पसरली होती. त्या शांततेला चिरत इन्स्पेक्टर धिराज बोलायला लागले.

"तुझा प्लान एकदम फुलप्रूफ होता. सगळे परिस्थितीजन्य पुरावे तुझ्या सोबतच होते. पण तुझ्या सारख्या डोकेबाज मर्डररला नशिबाने साथ दिली नाही. एकतर तू त्यादिवशी ती हॉकी स्टिक खरच जाळायला हवी होतीस. कारण तिनेच आज आम्हाला तुझ्याजवळ पोहचवल. परवा फ़ोरेंन्सिक लेबचा रिपोर्ट वाचुन केस एका पोइंटला येउन अडकली होती. माझ डोक काम करत नव्हत म्हणुन मी जाधवांना घेउन पोलीस स्टेशनच्या बाहेर पडलो फिरता फिरता एका मैदानाच्या बाजुला मी आणि जाधव असेच गप्पा मारित उभे असताना तिथे काही मुले क्रिकेट खेळत होती. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या हातात बेट च्या जागी हॉकी स्टिक होती. टी हॉकी स्टिक मला कुठेतरी पाहिल्यासारखी वाटत होती. क्षणात डोक्यात ट्युब पेटली अशी हुबेहूब हॉकी सोबत शशांकचा फ़ोटो त्याच्या घरी पाहिला होता. त्या मुलांकडे त्या हॉकी स्टिक बद्दल चौकशी केली असता, ती त्यांना टर्झन च्या तलावात सापडली होती. आम्ही तडक LA VIEW ला गेलो. शिवदास कडून त्यारात्रीची पुन्हा चौकशी केली. त्यारात्री समोरच्या बाजुला तर आम्ही होतो. बिल्डिंगच्या बाकीच्या दोन्ही बाजुला समुद्र त्यामुळे रहाता राहिली बागेची आणि बिल्डिंगची सामाईक कंपाउड वॉल. तिची बारकाईने पहाणी केली असता. भितीवर आतल्या बाजुला काहीतरी घासल्याच्या खुणा होत्या. म्हणजे त्यारात्री जे कुणी होते ते इथूनच वर चढून पळाले होते. आम्ही वर चढून बघितले तर वरच्या कांचावर सुकलेले रक्त होते. ह्या एव्हढ्या कसरतीतच माझ्या हाताला एक काच बोचली होती. आणि तिथे जेव्हढ्या काचांवर रक्त होते ते पाहून त्यावरून जो कुणी पळाला असणार तो चांगलाच सोलवटला असणार. मला लगेच डोळ्यासमोर चिनू आला. आम्ही जेव्हा चिनुला पहिल्यांदा सोनालीच्या घरी पाहिला तेव्हा त्याच्या अंगावरही तश्याच खुणा होत्या. शिवदासला पुन्हा तो फ़ोटो दाखवून तुझ्याबद्दल जेव्हा विचारल तेव्हा तुझ शशांककडे बर्याचदा येन जाण असल्याच कळल. शशांकच्या शेजार्यांनीही तुला ओळखल. मग मला संशय आला की आजवरच्या सगळ्या प्रकरणाचा साक्षीदार असलेला सगळ्यांचा परममित्र चिनू नेमका शशांकच्या सुसाइडच्या वेळेसच गायब कसा? एकतर ह्या प्रकरणात तुझ्याबद्दल लोणावळ्याच्या हॉटेलवाल्यानेही तू तिथेच असल्याचा स्टेटमेंट दिलेलं. मी बराच विचार केला पण तुझी कुठेही लिंक लागेना. पण त्यादिवशी लक खरच आमच्या सोबत होत. US हुन माझा भाचा आला होता. त्यानेच मला ह्या नवीन सोफ्टवेअरची माहीती दिली आणि नेमकी तुझी ह्या प्रकरणातली मिसिंग लिंक मला सापडली. त्याच जोरावर मी आजचा हा प्लान केला आणि त्यात तू सापडलास. जाधव उठा राजांची निघायची वेळ झाली"

चिनू सगळ सुन्न पणे ऐकत होता. जाधव जवळ येताच मुकाट्याने उठला आणि चालू लागला.

"त्याला प्लीज सोडाना. त्याने जे काही केलय ते माझ्यासाठी केलय.तो खरच खुप चांगलाय हो" सोनाली चिनुसाठि इन्स्पेक्टर कडे गयावया करीत म्हणाली. सोनालिच्या अश्या आर्जवानी इंस्पेक्टर डॉन क्षण थांबले आणि तिच्याकडे वळुन म्हणाले

"हे सगळ करण्याच्या मागची चिनुची सिच्युअशन,त्याची मजबूरी आणि तुमचं प्रेम पहाता त्याला आज इथून घेउन जाताना आम्हालाही फार जड जातय. पण कायदा तुझ्या आणी चिनूसारखा भावनेच्या आहारी जात नाही त्यामुळे आमचा नाइलाज आहे. पण सोनाली तू राजे प्रकरणात वेळीच पोलिसांची मदत घेतली असतीस तर आज तुझा चिनू तुझ्यासोबत असता. एक मात्र खरं की आज जर का महाराज असते तर त्यांनीही अश्या विकृत माणसांना "कडेलोटाचीच" शिक्षा फ़र्मावली असती."

इन्स्पेक्टरांनी जाधवांना नेहमीच्या स्टाईलने ओर्डर दिली. चिनू निघाला. जाता जाता त्याने फ़क्त एकदाच सोनालीकडे पाहिल. ती त्याच्याकडेच एकटक पहात होती. चिनुने तिच्याकडे पाहून हात जोडले आणि तिची माफी मागितली. तसा सोनालिचा स्वत:वरचा ताबा सुटला. ती ढसाढसा रडायला लागली.

*********************************

हेलो.......

हेड कॉन्सेटेबल जाधव बोलतोय चारकोप पोलीस स्टेशन"

"......... "

"कधी??????"

"............."

"तुम्ही कोण बोलताय?"

"............."

" ठीक आहे तिथेच थांबा, आम्ही पोहचेपर्यंत कुणालाही बॉडीला हात लावू देऊ नका. आणि हो तुम्हीसुद्धा लांब उभे रहा"

"जागेचे नाव काय???"

"................"

"ठीक आहे पोहचतो"

एव्हढ बोलून जाधवने धाडकन फोन आपटला.

"भोXXच्यांना रात्रीचीच सुसाईड करायची काय हुक्की येते. काय माहित"

चला चव्हाण गाडी काढा. सगळ्यांना सांगा मी आलो मोठ्या सायबांना फोन करून"

समाप्त

A Story by

Amol Parab

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीए अगदी - प्लॉट सुरेख, ओघवती लेखनशैली, गुंता उकलण्याचे कसबही मस्तच ...
एकंदरीत जमलीये अग्दी ....
पुढील लिखाणाला खूप सार्‍या शुभेच्छा .... Happy

कडक

मस्त. Happy

मला आधी वाटलं होतं की कोणातरी राजेची आयडेन्टिटी चोरून तो विवेक भोसले(?)च हे करतो आहे.

सर्वत प्रथम अभिनन्दन ... कथा एका भागत सम्पवल्यबद्धल... दुसरे लेखक असते .. ३ भाग केले असते क्रमशा तकुन तकुन...

कथा चान जम्लि आहे ... पु ले शु ...

Pages