Submitted by webmaster on 10 January, 2009 - 11:11
बालमोहन विद्यामंदिर इथे शिकलेले मायबोलीकर
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
बालमोहन विद्यामंदिर इथे शिकलेले मायबोलीकर
मराठे सरांना मी ओळखते (
मराठे सरांना मी ओळखते ( शाळेमुळे नाही )
सावे सर मला होते ( कदाचित धाकटे सावे सर असावेत )
चौधरी बाई मी माध्यमिक मध्ये गेले तेव्हा मुख्याध्यापिका होत्या आणि मी ८वीत असताना निवृत्त झाल्या त्यानंतर सावे बाई मुख्याध्यापिका होत्या
अरे वा! चौधरी बाइ
अरे वा! चौधरी बाइ मुख्याध्यापिका? खुप चांगल्या शिक्षिका होत्या. दहावीला आम्हाला त्या बिजगणीत व भुमितीला होत्या. अक्षर फारच सुंदर होते त्यांचे. वन ऑफ माय फेव्हरेट टिचर अलाँग विथ मायताइ जतकर(सातवीच्या वर्गशिक्षिका) आणी डेरे बाइ(अर्थशास्त्र)
सावे बाइ(खुप उंच व बारीक होत्या..) ८ वी का ९ वीत भुगोल शिकवायला होत्या.
मला आपल्या शाळेत शिरल्या शिरल्या दोन्ही बाजुला मोट्ठे फळे होते.. त्यावर करंट इव्हेंट्स किंवा सणांची माहीती असायची ती खुप आवडायची. एका बाजुला लेफ्टनंट दिलिप गुप्तेंचा पुतळा होता व एका बाजुला कोटणीस यांचा पुतळा होता.. दोघेही बहुतेक १९६२ च्या चिन...भारत युद्धात शहिद झाले होते.
प्रवेशद्वारासमोरच एक मोट्ठा फिश टँक होता.
मोठे धाकटे दोन्ही सावे,
मोठे धाकटे दोन्ही सावे, मराठे, पापल, वर्तक हे सर मी शाळेत असताना होते. आणि दामले सरही
राजाध्यक्ष सर चित्रकलेला होते.
सावे बाई दहावीला आणि चौधरी बाई सातवीला वर्गशिक्षिका होत्या. दोन्ही बाई द बेस्ट! बाकी जाधव, चौबळ, कुसुम परुळेकर, शेणॉय बाईसुद्धा होत्या. म्हणजे मला शिकवायला नव्हत्या, पण माझ्या शालेय कालात कार्यरत होत्या. तसंच नाईक सर
मुख्याध्यापक म्हणून आणि दाभोळकर सर मुख्य पर्यवेक्षक झाल्याचं आठवत आहे. दाभोळकर सर नंतर मुख्याध्यापकही झाले.
मुकुंद, तुमच्या वेळच्या देसाई बाई ह्या लालजी देसाईंच्या पत्नी.
त्यांनाही माहिती होतं ते.
आमच्यावेळी देसाई बाई होत्या त्या पी.टी.च्या बाई होत्या. माझ्या आडनावामुळे आणि उंचीमुळे मी त्यांची फारच लाडकी होते. त्यांना सगळे 'उदबत्ती' म्हणायचे
लीलावती (हे नाव टाईप करताना दरवेळी मला 'बॅगवती' म्हटल्यासारखं वाटतं
), चौधरी बाई मुख्याध्यापिका म्हणजे तू लहान आहेस माझ्यापेक्षा ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मंजु .. मी चौधरी बाइंबद्दल
मंजु .. मी चौधरी बाइंबद्दल काय लिहीले आहे बघ!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
देसाइ बाइ आमच्या वेळेला सुद्धा खेळाला होत्या( पापल्,करावडे व वर्तक सर आणी मांजरेकर बाइ हे सगळे खेळाला)
आणी राजाध्यक्ष सर आम्हालाही होते चित्रकलेला.
हे सगळे शिक्षक आमच्या वेळेसही
हे सगळे शिक्षक आमच्या वेळेसही होते. उदबत्ती म्हणजे बाणावलीकर बाई.
चौधरी बाई आपल्याच शाळेच्या
चौधरी बाई आपल्याच शाळेच्या विद्यार्थिनी. त्या नेहमीच दादासाहेबांबद्दल खूप सुंदर आठवणी सांगायच्या. त्या सर्वप्रथम शिक्षिका म्हणून शाळेत रुजू झाल्या तेव्हा त्यांची पाचवीच्या 'ग' वर्गावर वर्गशिक्षिका म्हणून नेमणूक करण्यात आली. हा वर्ग म्हणजे अगदीच हूड मुलांचा चौथीला अत्यंत कमी मार्क (जवळजवळ नापासच) मिळवलेल्या मुलांचा होता. दादासाहेबांना मुलांना नापास करणं पटत नसे म्हणून अश्या मुलांचा वेगळा वर्ग करण्यात आला होता. त्या मुलांना नेहमीच्या पद्धतीने न शिकवता वेगळ्या पद्धतीने हाताळायला हवे असे त्यांचे मत होते. आणि म्हणून अत्यंत विश्वासाने त्यांनी आपल्याच विद्यार्थिनीला या वर्गावर पाठवले. चौधरी बाई त्यांना सगळे विषय खडूफळ्याचा वापर न करता गोष्टीरूपाने शिकवत असत. बाई गोष्ट सांगत असताना ती मुलं आपला बेंच सोडून हळूहळू बाईंच्या भोवती गोळा होत असत. अश्या रितीने शिकवत पाचवीला तो संबंध वर्ग पास करून दाखवला होता चौधरी बाईंनी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दादासाहेबांना शिक्षणामहर्षी का म्हणतात ते अश्या प्रसंगांतून दिसून येईल
नाही, उदबत्ती म्हणजे देसाई
नाही, उदबत्ती म्हणजे देसाई बाईच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाणावलीकर बाई मला आठवीला वर्गशिक्षिका होत्या. मराठी आणि हिंदी विषय.
खळे बाई सातवीला मराठीला होत्या. मराठी शिकवायच्या. फारच गोड होत्या. टिळक बाई सहावीला आणि बहुतेक नववीलाही वर्गशिक्षिका होत्या. राही अनिल बर्वे त्यांचा अत्यंत लाडका विद्यार्थी होत्या.
आम्ही बाणावलीकर बाईंना
आम्ही बाणावलीकर बाईंना बोलायचो उदबत्ती, खूप बारीक होत्या म्हणून.
मंजु ... हे आपण चौधरी
मंजु ... हे आपण चौधरी बाईंबद्दल काय लिहीत आहोत हे चौधरी बाईंनी स्वतः वाचले पाहीजे इथे.
माझ्या दादांच्या आठ्वणी पुढच्या वेळेला इथे आलो की लिहीन.... ही हॅज अ ट्रिमेंडस इंफ्लुअंस ऑन माय लाइफ!
मंजूडी मी ग वर्गात होते. खरं
मंजूडी मी ग वर्गात होते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खरं तर मी ५ वि पर्यंत सांगलीत शिकले. मुंबईत आल्यावर बालमोहन मध्ये अॅडमिशन घेतले. तेव्हा मला ग वर्गात टाकले होते. ७वी तुन ८वीत जाताना काही मार्क्स कमी पडल्याने मला ब वर्गात जाता आले नाही. नववीत असताना मी इंग्लिश आणि मराठीत सर्व डिव्हिजन्स मध्ये पहिली आले. इतर मार्क्ससुद्धा चांगले होते. तेव्हा आम्हाला डेरे बाई होत्या इंग्रजी शिकवायला. त्या उपमुख्याध्यापिका सुद्धा होत्या. त्यांनी दाभोळकर सरांना सांगुन मला आणि माझ्या आणखी एका मैत्रीणीला ग मधून ब मध्ये घेतले.
ग वर्गातल्या काही जणांशी अध्ये मध्ये संपर्क येतो. बरेचसे जण आपापल्या क्षेत्रात सुस्थापित आहेत. अगदीच टाकाऊ नव्हती ती मुले.
चौधरी बाई ग्रेट शिक्षिका !
चौधरी बाई ग्रेट शिक्षिका ! माझ्या सगळ्यात आवडत्या !
त्यांनी मला खूपच exposure मिळवून दिलं प्रसंगी इतरांचा विरोध असतानाही !
अगं अमि, आपल्यावेळी
अगं अमि, आपल्यावेळी सातवीपर्यंत जन्मतारखांप्रमाणे वर्ग असायचे गं... आमच्या वर्गात ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात धमाल असायची.
चौधरी बाईंची ही खूप पुर्वीची गोष्ट आहे.
सातवीत आठवीत जाताना 'ब' वर्ग मिळाला नाही (चौधरी बाईच वर्गशिक्षिका होत्या) त्याचा माझ्या आयुष्यावर खोलवर परीणाम झाला. त्याविषयी न बोलणेच बरे. शाळेविषयी एकमेव बेकार आठवण.
हो जन्मतारखांप्रमाणे होते
हो जन्मतारखांप्रमाणे होते तेव्हा वर्ग त्यामुळे ग वर्गात सर्वात लहान मुले असत.
२०१४ साली माझ्या एका
२०१४ साली माझ्या एका मित्राच्या आईला बालमोहनमधून पास आउट होऊन ५० वर्षे झाली. त्यानिमित त्यांच्या बॅचने 'गोल्डन जुबिली' सोहळा साजरा केला होता. आता ते सारे ६५-६६ वयाचे असतील.
हो आमच्याही वेळेस म्हणजे
हो आमच्याही वेळेस म्हणजे आत्ता आत्तापर्यंत जन्मतारखांप्रमाणे होते वर्ग पण नंतर वर्गच कमी झाले
पण नंतर वर्गच कमी झाले>> आँ?
पण नंतर वर्गच कमी झाले>> आँ? खरंच का? तुमच्यावेळी पॅरलली इंग्लिश मिडियम चालू झाली होती का? म्हणून वर्ग कमी झाले?
तेव्हा काही वाटायचं नाही. पण आता अशी शाळा असेल तर मीच मुलीला तिथे पाठवणार नाही.
सध्या तिच्या वर्गात ५० मुलं आहेत, तीही जास्त आहेत असं मला वाटतं.
आमच्यावेळी अ ते ग तुकड्या आणि कमीत कमी ८० मुलं एका वर्गात
माझी फक्त मराठी माध्यमाची
माझी फक्त मराठी माध्यमाची शेवटची बॅच. २००१ मध्ये इंग्लिश मिडियम चालू झाले. माझ्या बॅच मध्ये अ - ग आणि प्रत्येक वर्गात ७० - ७५ सरासरी होते
पण नंतर तुकड्या इ / फ पर्यंत आल्याचे ऐकले मी. इंग्लिश मिडियम मुळे झाले वर्ग कमी हे काही अंशी खरेच आहे.
बालमोहन मध्ये मराठी माध्यम
बालमोहन मध्ये मराठी माध्यम बंद झालय का?
नाही. अजूनतरी चालू आहे.
नाही. अजूनतरी चालू आहे.
वॉटसअॅपवर शेखर प्रभावळकर
वॉटसअॅपवर शेखर प्रभावळकर यांनी लिहिलेला बुवा आणि त्यांच्या दुकानाबद्दलचा लेख वाचला. चणिया मणिया बोरांची आठवण जागी झाली.
माझी भाची इंग्लिश मिडियमच्या
माझी भाची इंग्लिश मिडियमच्या पहिल्या batch ची विद्यार्थिनी.
निर्मल.. बुवाच्या दुकानाला
निर्मल.. बुवाच्या दुकानाला विसरुनच गेलो होतो!.. आमच्या वेळेला त्याच्याकडे चिंचा, बडीशोप व जिरागोळ्या सुद्धा मिळायच्या. आहे का ते दुकान्(दुकान कसले.... टपरी होती त्याची) अजुन?
मंजु.. अग तळेगावची आपल्या शाळेची शाखा.. रामभाउ परुळेकर कलानिकेतन.. दादांनी रिफॉर्म होणार्या विद्यार्थ्यांसाठीच काढली होती . त्या मुलांना इतर कुठल्याच शाळेत प्रवेश मिळत नसे. तश्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी दादांनी ती शाळा काढली व तश्या मुलांना.. कुठलाही धाक न देता वा शिक्षा न देता, छडी व माराचा वापर न करता.. नुसने त्यांच्याशी प्रेमळ वागुन, मायेने शिकवुन त्यांनी ती शाळा यशस्वी केली होती.
नो वंडर चौधरी बाईंसारख्या शिक्षिकांची त्यांनी आपल्या शाळेत भरती केली होती.
नाही. बुवाचे दुकान नाही आता.
नाही. बुवाचे दुकान नाही आता.