पारीसाठी:
१ कप कणीक,
१ टेबलस्पून कच्चा बारीक रवा,
चिमटीभर साखर,
चवीला मीठ,
भिजवायला कोमट दूध लागेल तसे,
२ मध्यम चमचा साजूक तूप गरम करून वितळून.
सारणः
२ वाटी ताजे मटार साफ करून, धूवून,
हिरवी चटणी:
तिखट आवडेल तश्या हिरव्या मिरच्या,बोटभर आलं, एखादीच लसूण पाकळी बारीक ठेचून घेवून.
कचोरी मसाला:
१ चमचा जीरं, १ चमचा बडीशेप, पाव चमचा खसखस,१ चमचा साखर,१-२ लवंगा, चिमटीभर हिंग, १ चमचा पादेलोण, १ चहा वेलची. वरील जरासेच गरम परतून घेवून बारीक वाटून झालं की पादेलोण घालावं व मसाला बाजूला ठेवावा.
प्रत्येकी १ चमचा बेदाणे, काजू बारीक चिरून,
पाव वाटी ताजं खोवलेल खोबरे,
१ चमचा लिंबू रस
आल्याची चटणी:
पाव चमचा भाजलेलं जीरं, १ चमचा मनुका/गूळ्/साखर, १ वेलची, ३ चमचे खिसलेलं आलं,चवीला मीठ, एखादीच ब्याडगी मिरची.
कच्चं बारीक वाटून घ्यावी. झाली चटणी तयार.
पारी:
१. कणीक, रवा , मीठ, साखर एकत्र करून त्यात गरम तूप ओतून घेवून करून घ्यायचे. अतिशय घट्ट अशी कणीक भिजवून घ्यावी दूध लागेल तसे टाकून. फ्रीजमध्ये झाकून ठेवावी. करायच्या आधी काढून मग पुन्हा मळावी.
२. सारण:
मटार कच्चेच ठेचावे.
आता बेताचे तेल पातेल्यात घालून आधी हिरवी चटणी घालावी. चटनी जळू न देता मटार त्यावर घालावे.
मग खोबरे घालावे. एखाद दुसरी वाफ काढावी झाकण न ठेवता. मग कचोरी मसाला लिंबू रसात घोळवून घालावा. वरून काजू व बेदाने घालावे व सारण गार करायला ठेवावे.
आता पारीचे पीठ खूप मळून घ्यावे.
पोळी बनवून पुन्हा आता पीठी भूरभूरावी व लडी वळवावी.
मग सुरीने गोळ्या कापाव्या(पापडाला कापतो तश्या).
गोळी लाटून,सारण भरून, करंजीचा आकार नाहितर कचोरी सारखे वळून तळावे.
नाहितर २७५ फॅरेनहाईट वर तास भर भाजाव्या. मध्येच अर्धा तासाने पलटाव्या.
हिरवी चटणी नाहितर आल्याची चटणी बरोबर द्यावे खायला.
पादेलोण घातल्याने वेगळी चव येते.
इतक्या प्रमाणात मटार खाताना दुसर्याचा विचार नक्कीच करा म्हणून पादेलोण घालावे.
फोटो टाका ना प्लिज
फोटो टाका ना प्लिज
मटार करंजी छानच लागते. पण
मटार करंजी छानच लागते. पण त्याबरोबर चटणी मात्र करून पहायला हवी.
मस्त !!! फोटो टाका की असेल
मस्त !!!
फोटो टाका की असेल तर....
माझी भुक खवळली आता
>>पादेलोण घातल्याने वेगळी चव येते.
इतक्या प्रमाणात मटार खाताना दुसर्याचा विचार नक्कीच करा म्हणून पादेलोण घालावे<<
दुसर्याचा विचार नक्कीच करा
दुसर्याचा विचार नक्कीच करा म्हणून पादेलोण घालावे. >>>
छान रेसिपी
सुरेखच पाककृती. नक्कीच करुन
सुरेखच पाककृती. नक्कीच करुन पाहीन.
छान चटकदार आहे प्रकार हा !
छान चटकदार आहे प्रकार हा !