गटग महाचर्चेचा शेवट होऊन शेवटी एकदाचा वार आणि ठिकाण ठरले. मायबोलीकर सैन्याने दिल्लीच्या चार दिशांकडून प्रवेश करून "पिंड बलूची" ह्या मध्य दिल्ली येथील स्थानावर 16 डिसेंबर रोजी हल्ला चढवला. त्या आधी काही सैन्य भरकटणे (प्राजक्ता पटवे-पाटील आणि सुखदा ८), सेनापती (अल्पना) अचानक रणांगणातून गायब होणे (भ्रमणध्वनीने संपर्क न होणे), मग भरकटलेले सैन्य आल्या पावली परत जाण्याच्या विचारात असणे, आशुतोष०७११ ह्या सैनीकावर गुरगाव वाहतुकीने केलेल्या हल्यामुळे उशीर होणे, स्नू या एकमेव सैनिकाने खिंडीत (पिंड बलूची) दबा धरून बसणे आणि आल्या गेलेल्याकडे मायबोलीकर असल्याच्या संशयाने बघणे असे अनेक प्रकार झाले. मायबोलीकरांचे वर्तन दिल्लीत (पानीपतच्या लढाईत) गेलेल्या मराठ्यांच्या परंपरेला साजेसे राहील याची पूर्ण काळजी घेण्यात आली.
एक वाजता ठरलेले गटग दोन वाजता वेळेत सुरू झाले. आमचे वर्तन किंवा आमच्याकडील सामान पाहून रेस्त्रौ कार्यकारी मंडळाने हे लोक मुक्कामालाच आलेत असे समजून सुरवातीचा अर्धा तास ऑर्डर घेण्यासच नकार दिला असावा. पनीर टिक्का, पनीर मखणी खात खात दिल्ली आणि एकंदरीतच उत्तर भारतीयांच्या पनीर प्रेमाबद्दल माबोकरांनी यथेच्छ टीका केली.
उत्तर भारतीयांच्या मराठी सुनांनी हिंदीत घातलेले शाब्दिक घोळ यामुळे अतिशय करमणूक झाली. (अधिक महितीसाठी सुखदा ८ हिस विपू करावा)
मागील गटग मध्ये आशुतोष ७११ ने एक किलो कैरी साठी लोणचे मसाला आणण्या ऐवजी १ किलो लोणचे मसाला अल्पनास आणून दिल्यामुळे समस्त दिल्लीवासी माबोकरांना बेडेकरांचे पंजाबी लोणचे खाण्यास मिळाले याबद्दल आशुतोष ७११ यांचे जाहीर आभार. आणि नुसतीच लोणच्याची देवाण घेवाण नाही झाली... सुखदाच्या घरच्या शेतात पिकवलेल्या डाळी , आशुतोषचे टांझानिया वाइल्ड लाइफ फोटोचे कॅलेंडर्स आणि गिफ्ट्स इ.इ. वस्तू पण होत्या.
पुढील गटगचे ठिकाण निश्चित करून माबोकरांनी एकमेकांचा निरोप घेतला...
मी ७ मार्चला दिल्लीत असेन.
मी ७ मार्चला दिल्लीत असेन. दिल्लीकरांना शक्य असल्यास भेटायला आवडेल.>>>>>>>>>>> चिनुक्स आम्हालाही आवडेल तुम्हाला भेटायला .
Pages