गटग महाचर्चेचा शेवट होऊन शेवटी एकदाचा वार आणि ठिकाण ठरले. मायबोलीकर सैन्याने दिल्लीच्या चार दिशांकडून प्रवेश करून "पिंड बलूची" ह्या मध्य दिल्ली येथील स्थानावर 16 डिसेंबर रोजी हल्ला चढवला. त्या आधी काही सैन्य भरकटणे (प्राजक्ता पटवे-पाटील आणि सुखदा ८), सेनापती (अल्पना) अचानक रणांगणातून गायब होणे (भ्रमणध्वनीने संपर्क न होणे), मग भरकटलेले सैन्य आल्या पावली परत जाण्याच्या विचारात असणे, आशुतोष०७११ ह्या सैनीकावर गुरगाव वाहतुकीने केलेल्या हल्यामुळे उशीर होणे, स्नू या एकमेव सैनिकाने खिंडीत (पिंड बलूची) दबा धरून बसणे आणि आल्या गेलेल्याकडे मायबोलीकर असल्याच्या संशयाने बघणे असे अनेक प्रकार झाले. मायबोलीकरांचे वर्तन दिल्लीत (पानीपतच्या लढाईत) गेलेल्या मराठ्यांच्या परंपरेला साजेसे राहील याची पूर्ण काळजी घेण्यात आली.
एक वाजता ठरलेले गटग दोन वाजता वेळेत सुरू झाले. आमचे वर्तन किंवा आमच्याकडील सामान पाहून रेस्त्रौ कार्यकारी मंडळाने हे लोक मुक्कामालाच आलेत असे समजून सुरवातीचा अर्धा तास ऑर्डर घेण्यासच नकार दिला असावा. पनीर टिक्का, पनीर मखणी खात खात दिल्ली आणि एकंदरीतच उत्तर भारतीयांच्या पनीर प्रेमाबद्दल माबोकरांनी यथेच्छ टीका केली.
उत्तर भारतीयांच्या मराठी सुनांनी हिंदीत घातलेले शाब्दिक घोळ यामुळे अतिशय करमणूक झाली. (अधिक महितीसाठी सुखदा ८ हिस विपू करावा)
मागील गटग मध्ये आशुतोष ७११ ने एक किलो कैरी साठी लोणचे मसाला आणण्या ऐवजी १ किलो लोणचे मसाला अल्पनास आणून दिल्यामुळे समस्त दिल्लीवासी माबोकरांना बेडेकरांचे पंजाबी लोणचे खाण्यास मिळाले याबद्दल आशुतोष ७११ यांचे जाहीर आभार. आणि नुसतीच लोणच्याची देवाण घेवाण नाही झाली... सुखदाच्या घरच्या शेतात पिकवलेल्या डाळी , आशुतोषचे टांझानिया वाइल्ड लाइफ फोटोचे कॅलेंडर्स आणि गिफ्ट्स इ.इ. वस्तू पण होत्या.
पुढील गटगचे ठिकाण निश्चित करून माबोकरांनी एकमेकांचा निरोप घेतला...
निदान खाण्याचे तरी फोटु
निदान खाण्याचे तरी फोटु टाकायचे.:फिदी:
असु दे (आय डी नव्हे) पण मायबोलीकर निदान एकत्र आले हे महत्वाचे.
उत्तर भारतीयांच्या मराठी
उत्तर भारतीयांच्या मराठी सुनांनी हिंदीत घातलेले शाब्दिक घोळ यामुळे अतिशय करमणूक झाली.
रश्मी, फोटो काढायचं राहीलच.
रश्मी, फोटो काढायचं राहीलच.
गप्पांच्या नादात फोटो
गप्पांच्या नादात फोटो काढायचं लक्षात पण आलं नाही ( दोन दोन फोटोग्राफर्स असूनही).
आणि नुसतीच लोणच्याची देवाण घेवाण नाही झाली... घरच्या डाळी, कॅलेंडर्स, गिफ्ट्स इ.इ. वस्तू पण होत्या.
गटग नंतर साड्या खरेदीचा बेत होता पण गटग संपेपर्यंत घरी परतायची वेळ झाल्याने तो बेत रद्द करावा लागला.
गटग नंतर साड्या खरेदीचा बेत
गटग नंतर साड्या खरेदीचा बेत होता पण गटग संपेपर्यंत घरी परतायची वेळ झाल्याने तो बेत रद्द करावा लागला.
>>
याबायकांच्या खखाव्रताला उतलात मातलात बरे तुम्ही
स्नू, छान संक्षिप्त वॄत्तांत
स्नू, छान संक्षिप्त वॄत्तांत
बराच वेळ खलबत झाल्यावर व्हेज आणि नॉन व्हेज मेनुवर शिक्कामोर्तब झालं. उत्तर भारतीयांच्या पनीर प्रेमाचा जाहीर उद्धार करत एकमेव व्हेज माबोकरणीसाठी पनीर डिशेस(च) ऑर्डर केल्या.
आणि स्नू तु म्हणत होतिस कि
आणि स्नू तु म्हणत होतिस कि तुला लिहीता येत नाही !! मस्तच लिहीलयस !!
चला आता प्रत्येक गटग चा व्रुत्तांत तुझ्या कडेच .आणि आता परत कधि भेटायचं???
वा, वा! दिल्लीतही माबोकर 'छा
वा, वा! दिल्लीतही माबोकर 'छा गए' म्हणायचे!
वा स्नू! मस्तच गं !!! खुप
वा स्नू! मस्तच गं !!! खुप छान लिहिल आहेस!
खरच खूप मज्जा आली .... आता लवकरच भेटु परत.
मला कधीचं या सगळ्यांना
मला कधीचं या सगळ्यांना भेटायचे आहे.. कधी जमेल ? या दिवसात दिल्ली म्हणजे मज्जाच !
आता परत कधि भेटायचं???<<<<<<<
आता परत कधि भेटायचं???<<<<<<< आता 'दिल्ली दरबार'.
'पिंड बलुची'वाले आपल्याला बघुनच हाकलतील, तेव्हा आधीच दिल्ली दरबारमध्ये रुमाल टाकून ठेवुया.
मस्त वृत्तांत
मस्त वृत्तांत
हो, आता पिंड बलुची अजिबात
हो, आता पिंड बलुची अजिबात नको. दोन वेळा गेलोय आपण. आणि दोन्ही वेळेला तिथेच ठाण मारून बसलो होतो.
यावेळी माझ्या घरी जमुया. कदाचीत त्याआधी एखादं सरप्राइज गटट पण होईल.
मस्तच आहे वृतांत . दिल्लीत
मस्तच आहे वृतांत . दिल्लीत सुद्धा गटग करण्याइतके मायबोलीकर आहेत तर
थोडक्यात पण मस्त
थोडक्यात पण मस्त व्रुत्तांत...
(ह्या अशा खेळी-मेळीच्या धाग्यावर "काउ" का येत नाही? आम्ही आता एखादा कट्टा "काउ" बरोबर करणार.)
जयन्त, बलूची म्हणजे हरिण
जयन्त, बलूची म्हणजे हरिण (किंवा काळवीट किंवा तत्सम प्राणी)... इथे तरी गाय बोलावू नका उगाच .. प्राणी सम्मेलन भरले तर आम्हालाच महाराजांसारखे दिल्लीतून पलायन करावे लागेल.
अल्पना, वन डे ट्रीप प्लान
अल्पना, वन डे ट्रीप प्लान करूया जवळच कुठेतरी...
मस्त वृत्तांत......
मस्त वृत्तांत......
वन डे ट्रीप प्लान करूया जवळच
वन डे ट्रीप प्लान करूया जवळच कुठेतरी...<<<<<स्नू, वन डे ट्रीप टु गुरगांव
वीकडेज मध्ये शक्यच नाही वन डे
वीकडेज मध्ये शक्यच नाही वन डे ट्रीप टू गुडगांव.
मध्ये अध्ये एखादी सुट्टी आहे का?
२५ डिसेंबर आणि १ जानेवारी ला
२५ डिसेंबर आणि १ जानेवारी ला सुट्टी आहे.
२५ ला घरी पाहूणे आहेत +
२५ ला घरी पाहूणे आहेत + आयामच्या ज्युडो-कराटेची कॉम्पिटिशन आहे. आणि २६ ते ५ मी दिल्लीबाहेर असेन.
२६ जानेवारीला मोदीकाका आणि
२६ जानेवारीला मोदीकाका आणि ओबामाभाऊंबरोबर गटग ठरलंय.
नेमकी महाशिवरात्र पण
नेमकी महाशिवरात्र पण शुक्रवारी आहे, फेब एंडला.
दिल्लीत निवडणूक कधी आहे ? एक
दिल्लीत निवडणूक कधी आहे ? एक सुट्टी पक्की.
२६ जानेवारीला मोदीकाका आणि
२६ जानेवारीला मोदीकाका आणि ओबामाभाऊंबरोबर गटग ठरलंय. >>>> खरच का आशुतोष ? मी पण विचार करते आहे लाल किल्ल्यावर परेड बघायला जायचा...
मी ७ मार्चला दिल्लीत असेन.
मी ७ मार्चला दिल्लीत असेन. दिल्लीकरांना शक्य असल्यास भेटायला आवडेल.
मार्च महिन्यात व्हाया दिल्ली
मार्च महिन्यात व्हाया दिल्ली फिरायला जाणे होणार आहे बहूतेक. दिल्लीकरांची धावती भेट घ्यायला अवडेल.
तोश्दा, ठाण्यात येतोस की नाही?
सेन्या तुला जागतिक आणि तोषाला
सेन्या तुला जागतिक आणि तोषाला केंद्रिय निरीक्षक करणार बहुतेक माबो प्रशासन
गटग सहीच्....माबोकर तितुका मेळवावा
घारुअण्णा, सर्वात आधी कळव्यात
घारुअण्णा, सर्वात आधी कळव्यात म्हणजे सासूरवाडीत हजेरी. आहात ना तिथेच?
Pages