लेंण्डस्केप पॉइन्ट-२ (माथेरान)
एको पॉइन्टच्या उजव्या हाताला जी उघडीनागडी भिंत दिसते तोच लेंण्डस्केप पॉइन्ट. एको पॉइन्टच्या ३० ते ४० पावले आधी उजव्या हाताला तुटलेल्या रेलिंगच्या मागे एक ओढा दरीमध्ये धडपडत उडी मारतो, हाच मार्ग आहे लेंण्डस्केप पॉइन्टच्या पायथ्याला जाण्यासाठी. एका बाजूला लेंण्डस्केप पॉइन्टची भिंत आणि दुसऱ्या बाजूला एको पॉइन्टची भिंत यातून हा मार्ग जातो. मध्येच एके ठिकाणी एक मोठा खडक वाटेत पडून वाट थोडी अवघड झाली आहे. स्थानिक विक्रेत्यांनी या खडकाच्या खाली झाडाचा ओंडका उभा केला आहे पण तोही अधांतरी आहे तेंव्हा जपुनच उतरावे लागते. आमच्याकडे सामान असल्यामुळे जास्तच. इथे कोणीही येत नाही त्यामुळे हि काही रहदारीची वाट नाही.
लेंण्डस्केप पॉइन्टच्या पायथ्याला म्हणजे माथ्यावरून जवळपास ३०० फुट खाली, ४-५ फुट रुंद लेज संपूर्ण डोंगराला आडवी जाते. त्या लेजपासूनच चढाईचा मार्ग सुरु होतो. या लेजच्या खाली हजारभर फुटांची खोल दरी आहे आणि खालील मार्ग खूपच ठिसूळ आहे, त्यामुळे प्रस्तरारोहणासाठी लेजवरील भागच उपयोगी आहे. गिरीविराज हाईकर्सच्या पहिल्या पिढीने सर्वप्रथम १९९१ मध्ये चढाई करून हा मार्ग खुला केला होता.
लीड क्लाईम्बर - किशोर मोरे
सेकंड मेंन - मनीष पिंपळे
थर्ड मेंन - सन्नी वैती
.
दिनांक - १२ मे २०१२
हमाल - अमोल मोरे, राधेश तोरणेकर, सुदर्शन माळगावकर, सतीश कुडतरकर
१.
From Landscape-2 12may2012
२.आडवी समांतर लेज
From Landscape-2 12may2012
३.सुरुवात
From Landscape-2 12may2012
४.
From Landscape-2 12may2012
५.
From Landscape-2 12may2012
६.
From Landscape-2 12may2012
७.
From Landscape-2 12may2012
८.
From Landscape-2 12may2012
९.
From Landscape-2 12may2012
१०.सेकंड मेंन मनीष पिंपळे, लीड क्लाईम्बर किशोर मोरेकडे झुमारिंग करीत झेपावताना
From Landscape-2 12may2012
११.सेकंड मेंन जवळ पोहोचताच पुढील चढाई सुरु
From Landscape-2 12may2012
१२.
From Landscape-2 12may2012
१३.
From Landscape-2 12may2012
१४.
From Landscape-2 12may2012
१५.
From Landscape-2 12may2012
१६.
From Landscape-2 12may2012
१७.सेकंड मेंन मनीष पिंपळे, लीड क्लाईम्बर किशोर मोरेकडे झुमारिंग करीत झेपावताना
From Landscape-2 12may2012
१८.सेकंड मेंन जवळ पोहोचताच पुढील चढाई सुरु
From Landscape-2 12may2012
१९.
From Landscape-2 12may2012
२०.प्रेक्षक गेंलरी
From Landscape-2 12may2012
२१.
From Landscape-2 12may2012
२२.
From Landscape-2 12may2012
२३.माथा नजरेच्या टप्प्यात
From Landscape-2 12may2012
२४.
From Landscape-2 12may2012
२५.सेकंडमेंन मनीष आणि थर्डमेंन सन्नी दोराचे नियंत्रण करताना
From Landscape-2 12may2012
२६.
From Landscape-2 12may2012
२७.
From Landscape-2 12may2012
२८.
From Landscape-2 12may2012
२९.
From Landscape-2 12may2012
३०. माथा गाठला
From Landscape-2 12may2012
३१.एको पॉइन्टवर असलेला आमचा कॅंप
From Landscape-2 12may2012
३२.टीम (उजवीकडून उभा असलेला दुसरा किशोर मोरे)
From Landscape-2 12may2012
जबरदस्त !
जबरदस्त !
जबरी आहात रे.. लोक माथेरानला
जबरी आहात रे..
लोक माथेरानला घोड्यावरून जातात तुम्ही कड्यावरून एंट्री मारलीत .. मस्तच !!!
जबरदस्त आहे! सरळसोट कातळावर
जबरदस्त आहे! सरळसोट कातळावर कसे उभे राहू शकतात?
चित्तथरारक!!!
चित्तथरारक!!!
क्लाईंबिंग सोडल्याचे कधी कधी
क्लाईंबिंग सोडल्याचे कधी कधी दू:ख्ख होते.
जबरदस्त
जबरदस्त
नुसते हे फोटो पहाणे सुद्धा
नुसते हे फोटो पहाणे सुद्धा निव्वळ थरार आहे!
कमालीचे धाडस करता तुम्ही लोक!
फोटो पाहुणच जिवाचा थरकाप
फोटो पाहुणच जिवाचा थरकाप होतोय! काळजी घेऊन करतजारे मुलांनो असले धाडस आई वडिलांच्या जिवाला घोर.
जबरी आहेत फोटो.
जबरी आहेत फोटो.
------^-------- ! मस्तच !
------^-------- ! मस्तच !
ौौचित्तथरारक!!
ौौचित्तथरारक!!
मानलं ! सलाम !! [ आणि काय हो,
मानलं ! सलाम !!
[ आणि काय हो, कोणत्या शहाण्याने 'लँडस्केप पॉइंट' हें गोंडस नांव ठेवलं या 'हार्टस्कीप पॉइंट'चं !
(No subject)
जबरदस्त!
जबरदस्त!
____/\____
____/\____
थरारक फोटो
थरारक फोटो
जबरदस्त!!!
जबरदस्त!!!
सर्वांचे आभार! भाऊ खरतर
सर्वांचे आभार!
भाऊ
खरतर लँडस्केप पॉइंट या नावाने शोधायाला जाल तर माथेरान मध्ये कोणालाच माहित नाही. कारण इथे जाण्यासाठी वाट अशी नाहीच आणि माझ्या अंदाजानुसार माथेरानच्या इतर पॉइंट समवेत याचा उल्लेख कुठेही येत नाही. एकोपॉइंटच्या चौकातच लुईझा पॉइंटच्या (हनिमून / हनुमान पॉइंट आणि एकोपॉइंटच्या बरोबर मध्ये) दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरच पहिलच घर आणि त्या घरामागे लँडस्केप पॉइंट. आपणच याला नाव दिल आहे अस किरण काकांनी सांगितलेलं ओझरत आठवतंय. खात्री करून घ्यावी लागेल.
'हार्टस्कीप पॉइंट' अस नाव ठेवायला हरकत नाही. :):-):स्मित:
सतिश.. त्या सेकंडमेंन मनीष
सतिश.. त्या सेकंडमेंन मनीष का सारख वर खाली पाठवता?
इंद्रा सेकंडमेंनच कामच ते,
इंद्रा
सेकंडमेंनच कामच ते, खरतर सेकंडमेंनकडे खूपच सहनशीलता हवी. तासनतास बिचाऱ्याला एकाच जागेवर लटकून रहाव लागत, स्वतःचा जीव सांभाळायचा आणि त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे लीड क्लाइम्बरच्या जिवाची दोरी त्याच्या हातात असते. सिद्धगडावर मी स्वतः सेकंडमेंन असताना याचा अनुभव घेतला आहे. माझा लीड क्लाइम्बर जवळपास हजारभर फुट उंचीवर चढाई करताना विसेक फुटांचा FALL होऊन चढाई रेषेच्या मध्यापासून पन्नास फुट लांब लटकत राहिला होता, त्याच्यापर्यंत पोहोचणेसुद्धा अवघड होऊन बसलेले. त्याच्याकडे supply रोप होता पण त्याला जवळच्या anchor वर खेचण्यासाठी दुसऱ्याच दोराच्या साहाय्याने मला जवळपास १०० फुट चढाई करावी लागली.
सेकंडमेंन जवळ असला कि लीड क्लाइम्बरला सुद्धा आधार वाटतो. सेकंडमेंनला सुद्धा लीड क्लाइम्बरच्या हालचाली नीट दिसतात, त्यामुळे आणीबाणीच्या प्रसंगात अर्थात FALL झाल्यास लीड क्लाइम्बरला सांभाळणे सोपे जाते.
<< खरतर लँडस्केप पॉइंट या
<< खरतर लँडस्केप पॉइंट या नावाने शोधायाला जाल तर माथेरान मध्ये कोणालाच माहित नाही. >> सूनटुन्याजी, कॉलेजनंतर आमचा लहानपणापासूनचा ग्रूप पावसाळा संपता संपता, गर्दी व्हायच्या आधीं, १५-१६ वर्षं ५-६ दिवसांकरतां नियमितपणे माथेरानला जात असे. तुमच्यासारखं डेअरींग त्यावेळीं कल्पनेतही नसलं तरीही माथेरानला आमचं भटकणं मात्र खूप व्हायचं. त्यामुळें, हा पॉईंट कुठे आहे ही कल्पना आली तरी हें नांव ऐकलं नव्हतं , हेंहीं खरं.
पुन्हां एकदां सलाम !
भाऊ नुसताच 'सूनटुन्या' चालत
भाऊ
नुसताच 'सूनटुन्या' चालत माका!
<< नुसताच 'सूनटुन्या' चालत
<< नुसताच 'सूनटुन्या' चालत माका!>> प्रश्न वयाचो नाय रे बाबा, पण वेगळ्याच, डेअरींगबाज 'क्यॅटेगिरी'तल्या मानसाक, आपलोच असलो तरी, 'अरे, तुरे' तरी कसां करूं !!
व्वा मस्तच... जबरी
व्वा मस्तच... जबरी
जबरदस्त... दंडवत स्वीकारा...
जबरदस्त...
दंडवत स्वीकारा...
धन्यवाद सतिश
धन्यवाद सतिश
जबरी !!
जबरी !!