गार्डन फ्लॅटसाठीचे नियम काय आहेत?

Submitted by मेधावि on 6 December, 2014 - 08:21

गार्डन फ्लॅट साठीचे नियम काय असतात? अ‍ॅग्रीमेंटमधे फ्लॅटबरोबर गार्डन एरियाचा उल्लेख असतो पण तरीही ती जागा सोसायटीच्या मालकीची असते असे समजले. ह्याचा अर्थ काय?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅग्रीमेंटमधे फ्लॅटबरोबर गार्डन एरियाचा उल्लेख असतो पण तरीही ती जागा सोसायटीच्या मालकीची असते असे समजले. >

सुपरबिल्डअप एरिआ मधे गार्डन पॅसेज वगैरे सगळी जागा मोजली जाते. खरतर हे बिल्डर जागाचे स्वेअरफुट वाढीव दाखवण्याकरीताच करतो. उदा. ५६०स्वे.फु. चा सुपरबिल्डअप फ्लॅट असेल तर घराची एरिआ ही केवळ ४५० स्वेफु असते. बाकीचे स्वे. फु. मधे घराबाहेरचे पॅसेज, टेरेस, ग्राउंडफ्लोअरचे पार्किंग जागा. इ. जागेची विभागणी आपल्या जागेबरोबर जोडतात. आपण खाजगी म्हणुन वापरु शकत नाही तरी त्याचे पैसे भरावे लागतात.
कायद्याची पळवाट म्हणा हवे तर

फ्लॅटची मालकी तुमची. गार्डन एरीआ वापरायचा हक्क तुम्हाला. तुमच्या मनाप्रमाणे बाग लावता येते पण ती जागा सोसायटीच्या मालकीची रहाते.

मग कालांतराने बिल्डींग पाडली, व नवीन बांधली, तर गार्डनचे असलेले स्क्वे. फूट्स, जे तुमच्या अ‍ॅ ग्रीमेंट मधे लिवलेले असतात, ते नवीन जागेत तुम्हाला मिळतात की नाही? सध्या आम्ही जो फ्लॅट बघतोय त्यात जागेच्या प्र स्क्वे फू किंमतीच्या अर्धी किंमत आम्ही गार्डनच्या पर स्क्वे फू साठी देतोय.

सुमेधा, कुणा वकिलाकडेच अ‍ॅग्रीमेंट्सचे पेपर्स दाखवून चौकशी कर. माझ्या माहितीतल्या गार्डन फ्लॅट्च्या बाबतीत वांद्रे येथे ती बिल्डिंग ७० वर्षे जुनी आहे. साधारण २० वर्षांपूर्वी कार्सना जायला जागा अपूरी पडते या कारणास्तव सोसायटीने १/२ बाग कमी करायला लावली होती. तेव्हाच्या करारात जे काही लिहिलेले होते त्यानुसार तसे करणे कायद्याला धरुन होते असे कळले. मला नक्की काय करार होता माहित नाही. ती जागा आमच्या कुटुंबात माझे बाबा शाळेत असतानापासून होती. २ वर्षांपूर्वी विकली तेव्हा गार्डन असणे विचारात घेतले गेले नव्हते. सध्याच्या नव्या टेन्ड प्रमाणे काय लिगली शक्य आहे ते नीट पारखून घेणे इष्ट. रिडेवलपमेंटच्या अनुशंगाने काय होऊ शकते ते आधीच माहित असावे. माझ्या माहितीत पुण्याला एका बिल्डिंगच्या रिडेवलपमेंटबाबत पार्किंग विकत घेतलेल्या मेंबर्सनी त्या जागेचा मोबदला मागितला होता तो नाकारला गेला.

इथे वाचा.

common area with undivided interest साठी आपल्याला पैसे तर भरावेच लागतात, त्या कॉमन एरियाच्या वापराचा हक्क तर मिळतो, पण तो हक्क exclusive नसतो. अन्य सदनिकाधारकांसोबत मिळतो. कॉमन एरियाच्या अमुक एका हिश्श्यावर तुम्हाला वेगळा , स्वत:पुरता हक्क मिळत नाही.

स्वाती२ यांनी पहिल्या प्रतिसादात लिहिले आहेच. इमारत पाडून नव्याने बांधली तरी तिथेही कॉमन एरिया असेलच आणि त्यातही असाच common area with undivided interest मिळेलच.
common area with divided interest असेही असते : जसे एखाद्या फ्लॅटशी संलग्न पार्किंग स्लॉट. पण याबद्दल कोर्टकेसेसच्या बातम्या वाचनात येत असतात.

धन्यवाद भरत. पण इंडेक्स २ मधे त्या जागेचा उल्लेख असल्यास त्याचा अर्थ काय असतो? पार्कींगच्या जागेचे स्क्वे फू. अ‍ॅग्रीमेंटमधे लिहिलेले नस्तात परं तु, गार्डन फ्लॅ. मधे मात्र बागेच्या स्क्वे फू चा उल्लेख असतो. त्यामुळे दोघांतला फरक समजला नाही. एकंदरीतच खूप जास्त महाग गोष्टीत आपण खूप जास्त दुर्लक्ष करतो का काय असे वाटायला लागले.

common area with undivided interest साठी आपल्याला पैसे तर भरावेच लागतात, त्या कॉमन एरियाच्या वापराचा हक्क तर मिळतो, पण तो हक्क exclusive नसतो. अन्य सदनिकाधारकांसोबत मिळतो. कॉमन एरियाच्या अमुक एका हिश्श्यावर तुम्हाला वेगळा , स्वत:पुरता हक्क मिळत नाही. ----- ह्या वाक्याचा अर्थ समजला नाही. गार्डन फ्लॅटला सर्वज जण कुंपण घालून ती जागा सार्वजनिक न ठेवता स्वतःपुरती ठेवतात. मग इथे अन्य सदनिकाधारक कुठे आले?

फ्लॅटची मालकी तुमची. गार्डन एरीआ वापरायचा हक्क तुम्हाला. तुमच्या मनाप्रमाणे बाग लावता येते पण ती जागा सोसायटीच्या मालकीची रहाते.>> फक्त बाग लावायला जागेच्या पर स्वेअर फुट च्या अर्धी किंमत देणे म्हणजे टु मच आहे ना? Uhoh

होना....पण तरीही इन्डेक्स २ वर ही जागा लिहिलेली असणे म्हणजे काहितरी जास्त असावे असे वाटतेय..वकीलच नीट सांगू शकतील.

सध्या आम्ही जो फ्लॅट बघतोय त्यात जागेच्या प्र स्क्वे फू किंमतीच्या अर्धी किंमत आम्ही गार्डनच्या पर स्क्वे फू साठी देतोय.
>>
सुमेधाव्ही, तुम्ही इकडे फ्लॅटचा फ्लोअर प्लान टाकाल का? मला तर हा पहिला किंवा शेवटाचा मजल्याचा टेरेस फ्लॅट वाटतो आहे.
१. कॉमन एरियाची(बाग) किंमत बिल्डर सुपरबिल्टअप एरियातून काढतो.
२. गार्डन फ़ेसिंग फ्लॅटचे रेट जास्त असतो (प्रत्येक फुटासाठी १०० ते २०० रु अधिक) पण एकदम ५०% जास्त नसतो.
३. गार्डन टेरेस फ्लॅटमध्ये टेरेससाठि ५०% रक्कम द्यावी लागते . काही बिल्डरतर १००% घेतात.

हे थोडेसे अवांतर..
गार्डन फ्लॅट जर ग्राऊंड फ्लोअरचा असेल तर एक मानसिक त्रास सहन करण्याची तयारी ठेवा. बर्‍याचदा वरती रहाणार्‍यांकडून केसांचे गुंतवळ, सिगारेट्सची थोटके, बारिक-सारीक कचरा गार्डनमध्ये फेकला जातो. ते होऊ नये म्हणून सतत पाठपुरावा करावा लागतो.कितीही उच्चभ्रू सोसायटी असली तरी काही रहिवासी खराब मनोवॄत्तीचे असतातच.
टॉप फ्लोअर असेल तर मग प्रश्न नाही.