" शट् यार…. चार्जर कुठे राहीला…. " अक्षता तिच्या मोबाईलचा चार्जर शोधत होती घाईघाईत. कुठे ठेवला ते तिला आठवतंच नव्हतं. तशी अक्षता विसळभोळी नव्हती. तरीही आज तिला चार्जर भेटतच नव्हता. खूप शोधला पण चार्जर समोर येण्यास तयार नव्हता.
आता अचानक चार्जरची आठवण कशी झाली ? काल ऑफिसमधून उशिरा घरी आली अक्षता. मोबाईल तसाच बेडच्या बाजूला ठेवून झोपी गेली. खूप दमलेली ती ना. नाहीतर रोज ऑफिस मधून आल्या आल्या , खूप लोकांसारखी ती सुद्धा प्रथम मोबाईल charging ला लावते. बरं, रात्री मोबाईल charge केला तरी सकाळी सुद्धा ऑफिसला जाण्याआधी तिला मोबाईल charge करण्याची सवय. त्यात आज रविवार. सुट्टीचा दिवस म्हणून रोज लवकर उठणारी अक्षता, आज जरा बेडवरच झोपून Time-pass करत होती. आज काही घाई नाही, धावपळ नाही. मस्त time-pass करायचा आज. बेडवर पडल्या पडल्याच मोबाईल वरून तिची chatting चालू होती , friends नी काय काय post केलं आहे FB वर ते चेक करत होती, कोणाचा वाढदिवस आहे वगैरे. सगळी काम झोपूनच चालू होती.
थोडयावेळाने तयार होऊन घरातली कामे सुरु झाली. आवराआवर , केरकचरा वगैरे गोष्टी झाल्या आरामात. ऑफिस नसल्याने डब्बा करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे दुपारचे जेवण बाहेरून मागवले , छानपैकी एकदम. त्यात मध्ये मध्ये मोबाईल बरोबर चाळे चालू होते तिचे. भरपेट जेवून , TV बघत बघत छान दिवस गेला. दुपारची मस्त झोप काढून झाली होती तिची. संद्याकाळचे ५ वाजले तेव्हा तिच्या मोबाईलच्या रिंगने तिला जाग आली. मित्राचा call आला होता. त्याच्या बरोबर जरा वेळ बोलून झाले आणि तिचे लक्ष मोबाईलच्या Battery indicator गेलं. " १६%" एवढीच charging राहिली होती मोबाईल मध्ये.तेव्हा तिला चार्जरची आठवण झाली आणि लागलीच ती चार्जर शोधायला लागली.
अर्धा - पाऊण तास कसा गेला कळलंच नाही , चार्जर नव्हताच घरात. ऑफिसच्या bag मध्ये नव्हता. रोजच्या ठिकाणी नव्हता. मोबाईल charge तर केलाच पाहिजे नाहीतर तो बंद होईल. आणि एकदा का मोबाईल बंद झाला कि जवळपास सगळ्या जगाशी संबंध तुटण्यासारखे. सगळे contacts त्यात save केलेले, पाठ कशाला करायला पाहिजे. chatting बंद होईल, FB Update कुठे पाहणार ? , news कश्या कळणार ? . अक्षताला काहीच आठवत नव्हतं. मेंदूवर जरा ताण देऊन तिने आठवण्याचा प्रयन्त केला. काल रात्री, उशिरा आले म्हणून charging लावलं नव्हतं. मग चार्जर bag मधून काढलाच नाही. bag मध्ये तर चार्जर नव्हताच. म्हणजे तो bag मध्ये ठेवलाच नाही. ऑफिस मधून निघताना घाईघाईत तिकडेच राहिला वाटते चार्जर.
आता ती काहीच करू शकत नव्हती. शेजारच्या काकूंकडे असा चार्जर आहे, हे तिला आठवलं तशी ती काकूंकडे धावत गेली. पण काकूंचा दरवाजा बंद…… बाहेर गेल्या होत्या कुठेतरी . आता आली ना पंचाईत… आता कुठे जाणार ? , …. मोबाईल तर charge करावाच लागेल नाहीतर तो बंद होईल. निराश होऊन अक्षता तिच्या रूममध्ये आली. मोबाईलचा वापर आता कमीतकमी करावा लागेल, battery फार कमी राहिली आहे. कोणाचा call आला तरी battery कमी होणार, काय करायचं ? काय करायचं ? अक्षता विचार करत बसली होती.
( पुढे वाचा . आवडली तर नक्की share करा.
http://vinitdhanawade.blogspot.in/2014/12/wrong-number.html )
आवडली तर नक्की share करा.
आवडली तर नक्की share करा.
मस्तय !
मस्तय !
thank you !!! आवडली तर नक्की
thank you !!!
आवडली तर नक्की share करा.
वरती घ्या धागा !
वरती घ्या धागा !
धागा वर काढून चांगल केलात....
धागा वर काढून चांगल केलात....
आणि हा छान कथा विनित जी
मस्तय ! पण मला शेवट नक्की काय
मस्तय ! पण मला शेवट नक्की काय झाला ते कळालं नाही
खूप छान
खूप छान
खुपच छान...शेवट एकदम
खुपच छान...शेवट एकदम अनपेक्षित..आईची माया कधीच कमी होत नाही.
खुपच छान...शेवट एकदम
खुपच छान...शेवट एकदम अनपेक्षित..आईची माया कधीच कमी होत नाही..
मला असे वाटते की त्यांनी तो फोन नंबर दुसऱ्या ला बदलायला सांगण्यापेक्षा मुलाने स्वत:कडे ठेवावा.. आईची अन्य त्याची भेट होईल