आजकालच्या जमान्यात लंडनला जाण्याची " अपूर्वाई " पहिल्यासारखी रहिली नसली तरी ही भारतीय मनाला अ़जूनही लंडनचे आकर्षण वाटतेच. अलीकडेच मला लंडनला जायची संधी मिळाली. लंडन वर आजपर्यंत भरपूर मान्यवरांनी लिहीले आहे, आपल्यासारख्या एका अति सामान्य बाईने त्यात आणखी कशाला भर घालावी ह्या विचारात काही दिवस गेले. पण मला लंडन खूप आवडले आणि शेवटी " असेल राजहंसाची चाल डौलदार पण म्हणून कावळ्याने चालूच नये की काय? " ह्या विचाराने गारुड केले आणि म्हणून हा लेखन प्रपंच.
विमानतळावरून मी बाहेर आले आणि एका थंड हवेच्या आणि गार वार्याच्या झोताने मला अलिंगन दिले. मुंबईच्या उकाड्याला आणि घामाला कंटाळलेल्या मनाने त्या गार वार्याला व्वा म्हणून दाद दिली खरी पण नंतर त्या थंडीचा चांगलाच हिसका दिसला.
घरी जायला आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. सकाळची वेळ, मधूनच डोकावणारा निस्तेज सूर्यप्रकाश, लांबवर दिसणार करडं आकाश, दुशीकडे दिसणारी एक मजली रोहाऊसेस, घरापुढे असणार छोटसं अंगण, फुटपाथवर पानगळीच्या तयारीत रंगांचा साज ल्यालेली मेपलची झाडं, आणि रस्त्यावर शांतता. प्रथमदर्शनीच मी लंडनच्या प्रेमात पडले आणि ते प्रेम दिवसेंदिवस वृधिंगतच होत गेलं
ही आहेत रो हाऊसेस
From london2014
आणि एक हे जवळून
From london2014
लंडनला आलेल्या प्रत्येकाला हे शहर बघण्याची ओढ असतेच. लंडन जर तुम्हाला एका झटक्यात बघायच असेल तर ह्या शतकाच्या प्रारंभी उभारलेलं लंडन आय आहे तुमच्या दिमतीला
From london2014
किंवा अलीकडेच बांधलेली ही इमारत. हिच्या वरच्या मजल्यावरुन सुध्दा लंडनचे विहंगम दर्शन घेता येते.
From london2014
दोन इमारतींच्या मध्ये जो स्तंभ दिसतो आहे ना त्यावरुन ही लंडन पाहता येते. ह्याला वर जाण्यासाठी एक गोल जिना आहे आणि साधारण तीनशे पायर्या आहेत. सोळाव्या शतकात एका बेकरीमध्ये अनावधानाने राहिलेल्या ठिणगीमुळे लागलेल्या महा भयंकर आगीत हे संपूर्ण शहर बेचिराख झाले होते. त्याची स्मृति म्हणून हा स्तंभ उभारला आहे आणि त्याला " मॉन्युमेंट " असचं नाव आहे.
From london2014
बिग बेन टॉवर आणि पार्लमेंट स्क्वेअर या दोन्ही शिवाय लंडन अपूर्ण आहे. आत्ता आत्ता पर्यंत कोणत्याही इमारतीची उंची ही बिग बेन पेक्षा कमीच असली पाहिजे असा नियम होता लंडन मध्ये. सेंट्रल लंडनमध्ये गगनचुंबी इमारती दिसत नाहीत ते या मुळेच.
From london2014
भर शहरात असणारी हाईड पार्क, ग्रीन पार्क सारखी मोठी मोठी पार्क्स हे लंडनचे वैभव आहे असं मला वाटतं. हे आहे हाईड पार्क . हिवाळा सुरु झाल्याने झाडानी रंग पालटायला सुरवात केली होती पण अजून हिरवळ आणि फुलं टिकुन होती.
From london2014
From london2014
From london2014
टेम्स नदी ही लंडनची जीवनदायिनी आहे. तिच्या दोन्ही किनार्यावर लंडन वसलं आहे म्हणून नदी पार करण्यासाठी टेम्सवर ठिकठिकाणी पूल बांधण्यात आले आहेत. त्यातले काही तर फक्त पादचार्यांसाठीच सुदधा आहेत. हा आहे लंडनची जणुं ओळखच बनलेला टॉवर ब्रिज. मोठी मोठी जहाजं जाण्यासाठी हा मधोमध दुभंगतो आणि जहा़जं गेली की परत एकसंध होतो.
From london2014
हा आहे सेंट जेम्स पार्क मधील सेंट जेम्स पॅलेस.
From london2014
हे एक अगदी आटोपशीर असे पार्क आहे आणि ह्या पार्क मध्ये पाणपक्ष्यांना अभय आहे. हा त्यापैकीच एक
From london2014
ह्या पार्क मधील मोठ्या मोठ्या खारींपैकी ही एक झुपकेदार शेपटी असलेली.
From london2014
ही आहे लंडनची भुयारी रेल्वे. मुंबईच्या लोकलने रोज प्रवास करणार्या मला ह्यात फारच रस होता. जवळ जवळ दीड शे वर्षापूर्वी जगातील पहिली भुयारी रेल्वे इथे सुरु होणं हे जगातलं आठवं आश्चर्यच वाटत मला. चिकाटी, दूरदृष्टी, तंत्रज्ञानातील प्रगती, अपार कष्ट याचेच हे प्रतीक आहे. हिला इथे ट्युब म्हणतात. ट्युबच जाळं सर्व लंडनभर पसरलं आहे आणि प्रवास खूपच सोपा आहे. ट्युबचा नकाशा प्रत्येक स्टेशनवर, स्टेशनाच्या बाहेर, ट्युब मध्ये आणि आता मोबाईल मध्ये ही आहे त्यामुळे चुकायचं म्हटल तरी चुकता यायच नाही.
From london2014
आम्ही ऑड वेळेला प्रवास करत असल्याने हे ही बघायला मिळालं . ट्युबची मेंटेनन्स कार
From london2014
भाड्याच्या सायकलींचा स्टँड. घ्या सायकल, चालवा आणि आपलं ठिकाण आल की जवळच्या स्टँड्वर ठेऊन द्या.
From london2014
टॉवर ऑफ लंडनच्या किल्ल्याच्या ( इथेच आपला कोहिनूर विराजमान आहे) प्रांगणात पहिल्या महायुद्धात कामी आलेल्या ब्रिटीश सैनिकांच्या संख्ये एवढी सिरॅमिकची पॉपी फुलं खोवली होती त्या सैनिकांना श्रद्धांजली म्हणून.
From london2014
आणि ते पहाण्यासाठी अशी गर्दी उसळली होती.
From london2014
हा पक्षी एवढा माणसाळलेला होता की आम्ही कॉफी पीत बसलेलो असताना अगदी आमच्या पायात पायात येत होता. कोण आहे हा ?
From london2014
आणि बाजूलाच आपली चिऊताई ही
From london2014
एका पुलावरुन घेतलेला प्रचि
From london2014
ट्रॅफल्गार स्क्वेअर
From london2014
ग्रीनिच पार्क वरुन दिसणारे लंडन
From london2014
हे ग्रीनिच पार्क
From london2014
आणि सगळ्या जगाला पूर्व आणि पश्चिम मध्ये विभागणारी काल्पनिक ग्रीनिच रेषा इथे धातुच्या पट्टीने मूर्त स्वरुपात.
From london2014
तर हे काही प्रचि मी काढलेले. लंडन मला खूप आवडलं. एवढ मोठं जागतिक कीर्तीच शहर पण ह्या शहराने अजून ही आपलं गावपण कसोशीने जपलं आहे असं मला जाणवलं. छोटी छोटी साधी तरीही टुमदार एकासारखी एक घरं, त्यापुढे छोटीशीच बाग, रस्त्यावर जुने जुने विशाल मेपल वृक्ष, रस्त्यावरच्या दिव्याच्या खांबांवरही टांगलेल्या फुलझाडांच्या कुंड्या, सेंट्रल लंडन पासून अगदी कमी अंतरापासूनच सुरु होणारी उपनगरं, भर शहरातली आणि उपनगरातली मोठी मोठी उद्याने आणि उपवने आणि जागोजागी कशोशीने जपलेल्या इतिहासाच्या खुणा या सगळ्यांमुळे वाटलं असेल मला तसं कदाचित. पण हे शहर माझ्या अंगावर नाही आलं, उलट अगदी छोट्या कालावधी साठी का होईना पण मला त्याने आपल्यात सामावून घेतलं असं मला वाटलं.
खूप्पच सुंदर दिस्तंय लंडन
खूप्पच सुंदर दिस्तंय लंडन तुझ्या कॅमेर्यातून... वाह!!!!
पॉपी फुलांचा गालिचा किती गोड दिसतोय...
धन्यवाद सगळ्यांना. मानुषी,
धन्यवाद सगळ्यांना.
मानुषी, होय ते सेंट पॉल्सच आहे.
टोचा, तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. तंतोतंत पटलं
सुंदर फोटो.. अगदी रोजच्या
सुंदर फोटो.. अगदी रोजच्या येण्या-जाण्याच्या मार्गावरचे फोटो इथे पाहून मस्त वाटल !!
आमचे लंडन भारीच आहे. सुरुवातीला जरा ग्लुमी आणि कायम मळभ असलेले वाटते. पण चांगली वाईन जशी हळु हळु चढते तसे लंडन तुमच्या मनावर जे चढते त्यानंतर दुसरी कीती श्रीमंत, मोठे रस्ते, उंच इमारतींची शहरे असलीतरी लंडन सोडवत नाही. >>>>> ++१११ भरपूऊऊउर अनुमोदन
माधुरी आपणही लंडनकर का
माधुरी आपणही लंडनकर का
हो
हो
मस्त. काही फोटो खूप छान आलेत.
मस्त. काही फोटो खूप छान आलेत.
वा,मनिमोहोर,.सुन्दर
वा,मनिमोहोर,.सुन्दर प्रचि.तुमचे मनोगत अगदि बोलल्यासारखे वाटते.एकदम कोकणातुन फारिनला ,काय जास्त छान आहे असा प्रश्ण पडला.खर सान्गु का तुमच्या नजरेचि कमाल आहे,शब्दान्ची कमाल आहे.जग सुन्दर आहे, बघायला सुन्दर मन पाहिजे तुमचे आहे.खूप खूप आनन्द दिलात .आता कुठे नेणार? वाट पहाते.
राजहंसाची चाल डौलदार पण
राजहंसाची चाल डौलदार पण म्हणून कावळ्याने चालूच नये की काय? " ह्या विचाराने गारुड केले आणि म्हणून हा लेखन प्रपंच.
>>>>>>
सुरुवातीला हे वाचून मुद्दामच मग पुर्ण वाचले, कारण अश्यावेळी लेखनावर सजावट करायच्या भानगडीत न पडता जसे दिसलेय तसे लिहिलेले असते.. थोडकेच पण नेमकेच आणि अपेक्षेप्रमाणेच, छान लिहिलेय.. फोटो तर मस्तच टिपलेत! लंडन आयचा विशेष आवडला!
हेमाताई फार सुंदर वर्णन आणि
हेमाताई फार सुंदर वर्णन आणि फोटो.
माझी नणंद आहे तिथे ती पण मला तिथल्या फुलांचे फोटो पाठवते. खुप ताजी टावटवीत फुले आणि त्याचीपानेही असतात.
अप्रतिम !
अप्रतिम !
मस्तच अगदी...फोटो आणि लेखन
मस्तच अगदी...फोटो आणि लेखन दोन्हीही...:स्मित:
धन्यवाद सर्वाना. मीरा तुझा
धन्यवाद सर्वाना.
मीरा तुझा प्रतिसाद वाचुन मी कोणीतरी फार मोठी असल्यासारखे वाटले. तसं काही नाहीये ग. पण प्रतिसाद आवडला. लंडन छान आहेच पण कोकण त्याही पेक्षा छान आहे. शेवट आपलं आहे ना !!!
जागु खरं आहे ग तुझं . तिकडची फुलं थंड हवा, मळभ किंवा निस्तेज सूर्यप्रकाश यामुळे जास्त दिवस ताजी राहतात आणि रोज थोडा थोडा पाऊस पडत असल्याने पान ही स्वच्छच राहतात. लंडनचा पाऊस हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. कधी मुंबईसारखा धुवांधार प्डतो तर कधी पुण्यासारखा पडतोय की नाही ते कळत ही नाही असा पडतो . सकाळी ऊन दुपारी पाऊस आणि संध्याकाळी परत ऊन असं ही बरेचदा घडतं. कोणत्याही गावातला पाऊस मला आवडतोच. लंडनचा नि:शब्द भुरभुरणारा पाऊस ही खूप आवडला.
हा घ्या उच्चार आणि ठरवा काय
हा घ्या उच्चार आणि ठरवा काय ते.
सेनापती Caught you !!!
सेनापती
Caught you !!! hahaha
मस्त!
मस्त!
गुलमोहर, काय हसते आहेस
गुलमोहर, काय हसते आहेस
मनीमोहोर, आवडले फोटो आणि लंडन
मनीमोहोर, आवडले फोटो आणि लंडन सफर.
पहिला फोटो रोडरॅशमधल्या रस्त्यासारखा वाटला.
धन्यवाद सगळ्यांना. गजानन, तो
धन्यवाद सगळ्यांना.
गजानन, तो पहिला फोटो ग्रिनिच इथल्या घरांचा आहे.
सगळ्या गोष्टीत निपुण असुन
सगळ्या गोष्टीत निपुण असुन देखिल स्वभावात किती नम्रता !... व्वा हेमा ताई...
सुरेख सफर, वर्णन... एक सांगु, एक फोटो तुमचा हवा होता,,,, अगदी दोन तीन वेळा निरखुन पाहिले..
सुंदर वर्णन.....व फोटोहि
सुंदर वर्णन.....व फोटोहि
पन्नास प्रतिसाद !
पन्नास प्रतिसाद ! अपेक्षेपेक्षा खूप अधिक. धन्यवाद सर्वांना.
फोटो आणि लिखाण दोन्ही छान !
फोटो आणि लिखाण दोन्ही छान !
(No subject)
लिखाण आणि फोटो दोन्ही सुंदर
लिखाण आणि फोटो दोन्ही सुंदर !!!
अरे वा धागा वर आलेला पाहुन
अरे वा धागा वर आलेला पाहुन मस्त वाटलं.
मस्त प्र.चि. क्यू गार्डनला
मस्त प्र.चि.
क्यू गार्डनला नाही गेलीस? ती बाग एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
छान प्रचि. माझ आत्ताच ऑफीस
छान प्रचि. माझ आत्ताच ऑफीस अगदीच थेम्स ला चिटकुन आहे. तुमच्या त्या शार्ड च्या प्रचि मधे आमच ऑफीस पण डोकवतय
चिमण , आभार प्रतिसादासाठी.
चिमण , आभार प्रतिसादासाठी. क्यू गार्डन बघायच्या लिस्ट वर होतं . आमचं घर क्यू गार्डन च्या खूप जवळ होतं आणि प्रत्येक वेळी वाटायचं आधी लांबच बघून घेउ या क्यू गार्डन काय केव्हा ही बघता येईल पण याचा परिणाम म्हणजे जायचा दिवस आला तरी नाही बघितली क्यू गार्डन ( स्मित )
सचिन मस्त प्रतिसाद .
समहाऊ लंडन वर्षानुवर्ष
समहाऊ लंडन वर्षानुवर्ष हुलकावणी देत आलयं. तस्मात दुधाची तहान ताकावर.… लेख, फोटो छान छान !
अनिंद्य थॅंक्यु धागा वर
अनिंद्य थॅंक्यु धागा वर आणल्याबद्दल.
वाचलं मी ही पुन्हा कारण मला ही विसरायला झालं होतं मी काय लिहिलं होतं ते.
Pages