Submitted by Prashant Pore on 30 November, 2014 - 11:49
जन्मते माझ्याबरोबर वेदना
राहते आजन्म सहचर वेदना
मी सुखांशी थाटतो संसार पण
प्रेयसी असते खरेतर वेदना
तू तिथे दगडात मी चेतन इथे
हे तुझ्या माझ्यात अंतर वेदना
एकदा तक्रार मी केली तिची
आणि मग उठली जिवावर वेदना
प्रश्न साधा; "का जगावे वाटते?"
फक्त आहे एक उत्तर; "वेदना"
चेहरा का पांढरा पडला असा?
कोरली कोणी नभावर वेदना?
वेदनेचा वंश वाढावा किती ?
नेहमी असते गरोदर वेदना
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर
सुंदर
उत्तम रदीफ छान निभावलीत
उत्तम
रदीफ छान निभावलीत
धन्यवाद व शुभेच्छा
धन्यवाद काका धन्यवाद वैभवराव!
धन्यवाद काका
धन्यवाद वैभवराव!
एकदा तक्रार मी केली तिची आणि
एकदा तक्रार मी केली तिची
आणि मग उठली जिवावर वेदना<<<
सुंदर शेर!
गरोदर हा काफिया असलेला शेरही चांगला!
रदीफ छान निभावलीत<<+1 तू तिथे
रदीफ छान निभावलीत<<+1
तू तिथे दगडात मी चेतन इथे
हे तुझ्या माझ्यात अंतर वेदना
वेदनेचा वंश वाढावा किती ?
नेहमी असते गरोदर वेदना
वा व्वा !
एकदा तक्रार मी केली तिची आणि
एकदा तक्रार मी केली तिची
आणि मग उठली जिवावर वेदना
प्रश्न साधा; "का जगावे वाटते?"
फक्त आहे एक उत्तर; "वेदना"
वेदनेचा वंश वाढावा किती ?
नेहमी असते गरोदर वेदना >>>> वा! खूप सुंदर
सर्वांगसुंदर गजल ...
सर्वांगसुंदर गजल ...
छान गझल. मतला पुढीलप्रमाणे
छान गझल. मतला पुढीलप्रमाणे वाचून बघितला
जन्मली माझ्याबरोबर वेदना
राहिली आजन्म सहचर वेदना...
अर्थात मूळ मतला उत्तमच आहे.
सुंदर, अनेक शेर खूप
सुंदर, अनेक शेर खूप आवडले
धन्यवाद
छान ! सर्वच शेर आवडलेत ''मी
छान ! सर्वच शेर आवडलेत
''मी सुखांशी थाटतो संसार पण
प्रेयसी असते खरेतर वेदना''
क्लास !!!
-दिलीप बिरुटे
(प्रियकर)
धन्यवाद! सर्वांचे!
धन्यवाद! सर्वांचे!